* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: TWELVE RED HERRINGS
 • Availability : Available
 • Translators : DEODATT KETKAR
 • ISBN : 9789353173005
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 228
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
AN IMPRISONED MAN IS CERTAIN THAT HIS SUPPOSED MURDER VICTIM IS VERY MUCH ALIVE . . . A FEMALE DRIVER IS PURSUED RELENTLESSLY BY A MENACING FIGURE IN ANOTHER VEHICLE . . . A YOUNG ARTIST GETS THE BIGGEST BREAK OF HER CAREER . . . A RESTLESS BEAUTY MANAGES THE PERFECT BIRTHDAY CELEBRATION . . . AN ESCAPED IRAQI ON SADDAM HUSSEIN`S DEATH LIST PAYS AN INVOLUNTARY VISIT TO HIS HOMELAND . . . HOW WILL THEY REACT? HOW WOULD YOU? TWELVE RED HERRINGS IS THE THIRD COLLECTION OF IRRESISTIBLE SHORT STORIES FROM MASTER STORYTELLER, JEFFREY ARCHER. CLEVERLY STYLED, WITH RICHLY DRAWN CHARACTERS AND INGENIOUSLY PLOTTED STORY LINES, EACH OF THE TWELVE TALES ENDS WITH A DELIGHTFULLY UNEXPECTED TURN OF EVENTS.
तुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे... एक चंचल सुंदरी चतुराईनं नवरा आणि नवीन धनिक सावजाकडून वाढदिवसाची भेट मिळवते... वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नौकानयनपटूने बोटक्लब हाउसला भेट म्हणून दिलेल्या ऐतिहासिक वस्तूचीच चोरी होते... कथा-कादंबरी लेखकाला स्तंभलेखन करणारा त्याचा मित्र भोजनादरम्यान जी कल्पना ऐकवतो त्यावर लेखकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते... एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला-ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो... एका तरुण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते... चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्वं, कल्पक कथानक आणि अनपेक्षित शेवट असलेल्या बारा कथांचा संग्रह ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज.’

No Records Found
No Records Found
Keywords
#ट्वेल्व्हरेडहेरिंग्ज #जेफ्रीआर्चर #डॉदेवदत्तकेतकर #शूटटूकिल #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक # अ‍ॅण्डदेअरबायहँग्जअटेल #दपेंशट #मेकिंगदकट#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#JEFFREYARCHER #GOVERNMENTLAWYER #JUDGEMENT #TWELVEREDHERRINGS #DRDEVDATTAKETKAR #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #SHOOTTOKILL # ANDTHEREBYHANGSATALE #THEPATIENT #MAKINGTHECUT #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAMANA 08-03-2020

  उत्कंठावर्धक कथा... जेफ्री आर्चर हे इंग्रजीतील एक बेस्ट सेलर लेखक. रहस्यमय कादंबऱ्यांबरोबरच त्यांनी कथाही लिहिल्या. त्यांचा ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज’ हा कथासंग्रह अनुवादित स्वरूपात वाचकांच्या भेटीला आला आहे. मराठीत अनुवाद केला आहे डॉ. देवदत्त केतकर यंनी. ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज’ हा एकूण बारा कथांचा संग्रह आहे. विविध कल्पनांमधून साकारलेल्या या कथा मनुष्य स्वभावाचे विविध नमुने दर्शवणाऱ्या आहेत. ‘करावे तसे...’ या कथेचा निवेदक एका खासगी मालवाहतूक करणाऱ्या कंपनीचा मालक असतो. रोझमेरी ही त्याची दुसरी पत्नी. रोझमेरी आणि निवेदकाचा मित्र जेरेमी यांची ओळख होते आणि त्यांचं अफेअर सुरू होतं. जेव्हा निवेदक हे प्रकरण उघडकीला आणतो, तेव्हा जेरेमी आणि निवेदक यांच्यात हाणामारी होते. त्यात जेरेमी खाली कोसळतो. निवेदक तिथून निघून जातो; पण दुसऱ्या दिवशी त्याला जेरेमीच्या खुनाच्या आरोपावरून अटक होते. रोझमेरीही त्याच्या विरोधात साक्ष देते आणि तो तुरुंगात जातो; मात्र जेरेमीचा मृतदेह पोलिसांनी पाहिलेला नसतो. त्यामुळे जेरेमी जिवंत आहे, असं निवेदकाला राहून राहून वाटत असतं. काही घटना अशा घडतात, की निवेदकाची तुरुंगातून सुटका होते आणि मग एक माजी पोलीस सुपरिंटेंडन्ट आणि एक माजी पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावर तो जेरेमीला शोधण्याची कामगिरी सोपवतो. त्या दोघांसह निवेदकही त्या कामगिरीत सामील होतो. जेरेमीपर्यंत ते कसे पोचतात, त्याची ही उत्कंठावर्धक कथा आहे. ‘अर्ध्या किमतीत स्वस्त’ ही कथा आहे कॉन्सुला रोझनहाईम या चतुर स्त्रीची. व्हिक्टर रोझनहाईम हा तिचा तिसरा नवरा बडा बँकर असतो. या नवऱ्याकडून भरपूर पैसे उकळून ती पुढचं सावज हेरणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकत असतात. तिच्या वाढदिवसानिमित्त कोणतं महागडं गिफ्ट नवऱ्याकडून उकळावं या विचारात ती काही दुकानं पालथी घालते. तिला आवडतो एक हिऱ्यांचा हार. ती तो हार तिच्या नवऱ्याकडून आणि प्रियकराकडून कसा मिळवते, याची ही कथा आहे. ‘डगी मॉर्टिमरचा बाहू’ मधील रॉबर्ट हेन्री केफर्ड (तिसरा) ऊर्फ बॉबला डर्गी मार्टिमरच्या उजव्या बाहूबद्दल समजतं. केंब्रिजच्या विजयी संघात सलग तीन वर्षं आघाडीचा नावाडी म्हणून त्याने स्थान मिळवलेलं असतं. हेलन ही बॉबची मैत्रीण असते. तिच्या वडिलांच्या पबमध्ये बारच्या मागच्या बाजूला डगी मॉर्टिमरच्या बाहूची ब्राँझमध्ये घडवलेली प्रतिकृती असते. युनिव्हर्सिटी बोट क्लबला एखादं स्मृतिचिन्ह दिल्याशिवाय त्याने घरी परतू नये, असं बॉबच्या वडिलांचं सांगणं असतं. डगी मॉर्टिमरच्या बाहूची ब्राँझची प्रतिकृती स्मृतिचिन्ह म्हणून केंब्रिजला द्यावी, असं बॉब ठरवतो आणि त्याप्रमाणे थोड्या प्रयत्नांनी ती प्रतिकृती मिळवतो. केंब्रिजला समारंभपूर्वक स्मृतिचिन्ह म्हणून देतो; पण त्या समारंभानंतर चार्ल्स फॉरेस्टर आणि बोटमन सिडनी फिस्क त्या बाहूला जलसमाधी देतात, हे बॉब चोरून बघतो; पण त्या दोघांना जाब न विचारता तो वृद्ध ऑक्सफर्ड ब्लू हॅरॉल्ड डियरिंग यांना गाठतो आणि त्या दोघांनी त्या बाहूला जलसमाधी का दिली असेल, याचं कारण त्याला डियरिंग यांच्या बोलण्यातून समजतं. ‘वाट चुकू नका’ ही कथा आहे हमीद झेबारी याची. हमीद हा इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री असतो. एका वर्षी गव्हाचं पीक कमी आलं म्हणून त्याला बडतर्फ करण्यात येतं. इराकमधील एकूण परिस्थिती आणि सद्दामची हुकूमशाही माहीत असल्यामुळे हमीद आपल्या गर्भवती बायकोसह मोठ्या शिताफीने इराकमधून निसटतो. अमेरिकन दूतावासाच्या मदतीने तो अमेरिकेत पोचतो. जाताना त्याने काही गालिचे अमेरिकेत विकण्यासाठी घेतलेले असतात. अमेरिकेत गालिचे विकण्याचा व्यवसाय करत तो स्थिरावतो. तिकडे इराकमध्ये त्याला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेली असते. एकदा तो गालिचे घेण्यासाठी इस्तंबूलला गेलेला असतो. विमानाने अमेरिकेला परत येत असताना विमानात बिघाड होतो आणि विमान बगदादला उतरवण्यात येतं. इथे आपल्याला कुणी ओळखलं किंवा आपला पासपोर्ट तपासला गेला तर आपण सद्दामच्या तावडीत सापडणार, या भीतीने हमीद अक्षरश: गर्भगळीत होतो. तो त्याची ही भीती विमानाच्या कॅप्टनजवळ बोलून दाखवतो. सद्दामचा एक अधिकारी हमीदला ओळखतो; पण कॅप्टन आणि विमानातील कर्मचारी हमीदला कसे वाचवतात, त्याची ही कथा आहे. ‘बोगद्यातली दृष्टी’ या कथेचा निवेदक लेखक आहे. त्याच्या एका कादंबरीच्या पूर्वप्रसिद्धीसाठी तो न्यू यॉर्कला गेलेला असतो. त्या वेळी तो तिथे राहणाऱ्या त्याच्या लेखक मित्राकडे डंकनकडे जातो. डंकन त्याच्या डोक्यात असलेल्या नवीन कादंबरीचं कथानक निवेदकाला अगदी रंगून सांगत असतो आणि ते ऐकताना निवेदकाला मात्र काय करावं ते सुचत नसतं; कारण त्या कथानकावर निवेदकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते. डंकनचं कादंबरीविषयीचं बोलणं आणि निवेदकाची अवस्था, याचं गंमतशीर चित्रण या कथेत केलं गेलं आहे. उपरोल्लेखित कथांप्रमाणेच या संग्रहातील अन्य कथाही जेफ्री आर्चरने आपल्या खास शैलीत रंगवल्या आहेत. डॉ. देवदत्त केतकर यांच्या कुशल अनुवादामुळे या कथांची रंगत आणखी वाढली आहे. या बारा कथांपैकी नऊ कथा सत्य घटनेवर आधारित आहेत. जेफ्री आर्चर यांनी त्या घटनांवर कल्पनेचा साज चढवला आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

 • Rating StarAnil Udgirkar

  मी सद्य्या हे छानपैकि पुस्तक वाचतोय.जेफ्री आर्चर ह्यांच्या अनेक कादंब-या पेक्षा कथासंग्रह फार वाचनिय आहेत असे माझे मत आहे !

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAR HAR MAIDAN FATEH
KAR HAR MAIDAN FATEH by VISHWAS NANGRE PATIL Rating Star
Pankaj Kharade, Vachanveda Group

` मन में हैं विश्वास ` नंतर विश्वास नांगरे सरांचे पुढील पुस्तक म्हणजे ` कर हर मैदान फतेह` . विद्यार्थ्यांना आणि नवयुवक यांना अतिशय मार्गदर्शन पर असे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी तर नक्की वाचावेच पण पालकांनीही ते जरूर वाचायला हवे . सरांचे न में हैं विश्वास हे पुस्तक आणि त्याविषयी माहिती मी या ग्रूपवर शेअर केली होती त्याविषयी अनेक उलट सुलट किंवा नकारात्मक आणि विरोधी कमेंट काही वाचकांच्या आल्या होत्या . नांगरे पाटील यांनी या पुस्तकात स्वतःची आत्मप्रौढी वगैरे मिरवली आहे असा काहीसा त्यांचा स्वर होता. हे त्यांचे आत्मचरित्र आहे , आणि त्यात त्यांनी केलेले संघर्ष आणि त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांना मिळालेले यश त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पोल वॉल्ट सारखी उंच उडी त्यांनी मारली आणि त्याचे वर्णन केले तर ती आत्मप्रौढी होऊ शकत नाही. एखाद्या लेखकाने स्वतःच्या गरिबीचे आत्मकथन केले की आपल्याला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते पण जर तशाच एखाद्या लेखकाने स्वतःच्या संघर्षाचे आणि मिळालेल्या यशाचे वर वर्णन केले की ती आत्मप्रौढी होते काय? .. असो या गोष्टीवर अनेक वादविवाद असू शकतात पण आधीचे पुस्तक हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारे होते विषेतः कॉलेज आणि काहीतरी बनू इच्छिणाऱ्या युवकांसाठी . यूपीएससी झाल्यानंतरचा विश्वास सरांचा पुढील प्रवास हा तितकाच प्रेरक आणि मार्गदर्शन पर आहे . फक्त विद्यार्थीच नाही तर प्रत्येक पालक , नागरिक ,महिला आणि अबालवृद्ध यांना मार्गदर्शन करणारे उद्बोधक नियम आणि कायदे सरांनी अनेक उदाहरणे , अनेक थोर व्यक्तींची सुभाषिते आणि विचार मांडून पटवून दिले आहेत . शरीर आणि मन निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते व्यायाम किंवा योग करावे , महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करावे किंवा काय करू नये, लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांची कोणती कर्तव्ये आहेत . किंवा डिजिटल बँकिंग वापरताना कोणती खबरदारी घ्यावी . अगदी आपले डिजिटल पासवर्ड कसे असावे आणि कधी बदलावे या विषयी अगदी कळकळीने विश्वास सर व्यक्त झाले आहेत . विपरीत परिस्थिती कशी हाताळावी , आलेल्या संकटसमयी त्याला धैर्याने कसे सामोरे जायला हवे , सर्व काही असताना डिप्रेशन का येते आणि त्यातून कसे सावरावे हे सर सांगूच शकतात कारण जिया खान किंवा सुशांत राजपूत सारखी अनेक प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत . वर्दीच्या आतला प्रत्येक पोलिस हा एक नागरिक असतो आणि प्रत्येक नागरिक हा बिन वर्दीचा पोलिस असतो . किती अर्थपूर्ण आहे हे विधान . अशा अनेक गोष्टी आणि प्रसंग वाचताना खूप आत्मविश्वास निर्माण होतो . म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावयास हवे असे मला वाटते.🙏 ...Read more

MANDRA
MANDRA by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
Darshana Chaphekar

कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !