* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: COME ON GET SET GO...
 • Availability : Available
 • Translators : ANJANI NARAVANE
 • ISBN : 9788177665703
 • Edition : 7
 • Publishing Year : AUGUST 2005
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 184
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
 • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
ARE YOU INTERESTED TO KNOW ABOUT ` * YOUR RIGHTS WHILE BEING QUESTIONED BY POLICE. * AT THE TIME OF ARREST. * YOUR RIGHTS IN PRISON. * YOUR RIGHTS WITH GOVERNMENT/COURT. * YOUR FUNDAMENTAL HUMAN RIGHTS. -HUMAN RIGHTS- IS ONE OF ITS KIND OF BOOK WHICH ENTAILS ABOUT YOUR BASIC AND FUNDAMENTAL RIGHTS. READ THIS BOOK AND BE AWARE OF YOUR RIGHTS AND HENCEFORTH, FUNCTION AS A MORE RESPONSIBLE AND ACTIVE CITIZEN.
यशस्वी होण्यासाठी, प्रथम काय करू नये, ते शिका. मग काय करावं, ते शिका. हे पुस्तक तुम्हांला तुम्ही खरे कसे आहात, ते उलगडून दाखवतं. खरा यशस्वी माणूस आणि यशस्वी असल्याचं ढोंग करणारा माणूस, ह्यांच्यातला सूक्ष्म फरक हे पुस्तक तुम्हांला सांगतं. हे पुस्तक तुम्हांला स्वत:चा शोध घ्यायला मदत करतं. हे पुस्तक तुम्हांला `सर्र्वांत उत्तम` बनवत नाही, पण ते तुम्हांला `कोणापेक्षाही कमी नाही` असं बनवतं. लोक टीका करतात, तक्रार करतात आणि स्वत:ची कीव करतात. लोक कृत्रिमपणे वागतात, मत्सर करतात, उद्धटपणानं वागतात. लोक बढाया मारतात, त्यांची प्रगती खुंटते आणि सर्र्वांत कमाल म्हणजे, हे सर्व ते कबूल करत नाहीत. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मधे बदल घडवून आणायला प्रेरणा देतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 28-08-2005

  स्वत:मध्ये बदल घडवू इच्छिणाऱ्यांसाठी... कोणत्याही व्यक्तीने पहिल्यांदा स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे. त्यानंतरच स्वत:च्या अंगभूत गुणांची जाणीव होते. यशस्वी होण्यासाठी जीवनाच्या वाटचालीत पदोपदी संघर्ष करावा लागतो. त्या वेळी निरनिराळ्या तऱ्हेच्या व्यक्ती भटतात. त्यांचे स्वभाव, दुर्गुण यांचा अभ्यास करूनच त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे, लोकांशी वांद कसा साधावा याविषयी पती-पत्नी लेखकांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन अनेक विषय समजावून दिले आहेत. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. स्वत:मध्ये बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 21-08-2005

  यशाच्या दिशेने... आज दैनंदिन स्पर्धा, तणाव मिनिटागणिक वाढत आहेत. या तणावांना, स्पर्धेला तोंड देणे सगळ्यांनाच शक्य होते, असे नाही. प्रत्येकजण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. त्यात काही यशस्वी होतात. काहींना ते जमत नाही. त्यामधून मग नैराश्याचा भवरा निर्माण होतो. या अडचणी मग दैनंदिन वाटचालीत माणसाला अधिकच अडचणीत टाकतात. त्यातून निर्माण होते नकारात्मक मानसिकता. या सर्व अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक पुस्तके प्रकाशित होत असून त्यांचा उपयोगही होत आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यासाठी माणसाला मार्ग दाखविण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरत आहेत. याच पठडीतील ‘चला! उठा! कामाला लागा’ या पुस्तकाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. स्वाती व शैलेश लोढा यांनी इंग्रजीतून लिहिलेल्या या पुस्तकांचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपल्याला काय करावे’ यापेक्षा काय करू नये’ याचा अंदाज येत नाही. कोठे कसे वागावे, बोलण्याच्या पद्धती, आवाजाचा सूर, याचे यथायोग्य ज्ञान नसल्यामुळे माणसे बऱ्याचदा त्यांचा मुद्दा बरोबर असूनही हकनाक अडचणीत येतात. त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही. आत्मविश्वासाचा अभाव, हे त्यामागचे आणखी एक कारण! आपल्याला मिळालेले यश, आपली प्रगती आदी गोष्टी ज्यांत बहुसंख्यांना फारसा रस नसतानाही त्याबद्दलची टिमकी मारणे, बढाया मारणे या गोष्टींमुळे आपण कसे इतरांमध्ये अप्रिय ठरू शकतो. आदी मुद्द्यांचा ऊहापोह ‘चला! उठा!...’ या पुस्तकात नेमकेपणाने करण्यात आला असून आपल्यातील लहान-मोठ्या गुणदोषांचा आरसाच जणू आल्यासमोर येतो. त्यामधून वाचकाला मिळते नवी दृष्टी! तुम्ही स्वत:मधील दोष, आळस झटकून टाका आणि कामाला लागा, असा संदेश देणारे हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवेल, असा लेखकांनी केलेला दावा निश्चितच अवास्तव वाटत नाही! ...Read more

 • Rating StarDAINIK AIKYA 11-09-2005

  हे पुस्तक तुम्ही वाचलंत तर तुम्ही स्वत:ला समजू शकाल. या पुस्तकावर तुम्ही विचार केलात, तर तुम्ही स्वत:ला आवडू लागाल. तुम्ही तुमच्या मनात हे पुस्तक ठसवलंत, तर तुम्ही स्वत:वर प्रेम करू लागाल. यशस्वी होण्यासाठी तुमचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक या पुस्काच्या रूपाने हजर आहे. मूळ इंग्रजी लेखक स्वाती शैलेश लोढा या स्वत:च एक आदर्श आहेत. वयाच्या सतराव्या वर्षीच यांचा पहिला लेख प्रकाशित झाला होता. त्याचा आत्मविश्वास आणि दृढनिश्चय अचंबित करणारा होता. सध्या त्या श्वाश या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका आणि जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंटच्या कार्यक्रम संचालिका आहेत. शैलेश लोंढा यांचे ‘अ‍ॅन इव्हिनिंग वीथ शैलेश लोढा’ हा व्यंगपूर्ण विनोदी कार्यक्रम जगभरात यशस्वी झाला आहे. हास्य आणि शिक्षण यांचा अनोखा संगम या कार्यक्रमात असतो. तुमच्यापर्यंत अतिशय साध्या आणि ओघवत्या मराठीमध्ये हे पुस्तक आणले आहे. अंजनी नरवणे या गुणी लेखिकेने आणि अर्थातच पब्लिशक आहेत पुण्याचे मेहता पब्लिशिंग हाऊस. संधी ही देवासारखी असते. ती सर्वत्र असते आणि सर्वशक्तिमान असते, यशस्वी होण्यासाठी आपली मनोवृत्ती बदलणे आणि बुद्धीचा पूर्ण उपयोग करणे, असे मित्रत्वाचे सल्ले देणाऱ्या या पुस्तकात यशस्वी होण्यासाठी प्रथम काय करू नये ते शिका. मग काय करावं ते शिका असा थोडा हटके सल्ला दिलेला आहे. यशस्वी व्यक्ती आणि यशस्वीतेचे ढोंग करणारी व्यक्ती यांच्यातील फरक हे पुस्तक उलगडून दाखवते. हे पुस्तक तुम्हाला सर्वांत उत्तम बनवित नाही पण कोणापेक्षाही कमी नाही, असे बनविते. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा देते. आम्ही एका माणसाला बदलू शकतो, तेव्हा एक जग आम्ही बदललेलं असते. असा स्वाती आणि शैलेश लोढा यांचा विश्वास आहे. ‘काहीच न शिकणारे अयशस्वी, कृत्रिमपणे वागणारे अयशस्वी, दिखाऊ यशस्वी, खरे यशस्वी अशा प्रकारचे वर्गीकरण करून समाजातील विविध पातळीवर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि खास करून तरुण वर्गांच्या स्वभावाची माहिती यात दिलेली आहे. नकारात्मक स्वभाववैशिष्ट्ये कशी दूर करायची आणि सकारात्मकता अंगी कशी बाळगायची ते उदाहरणांनी समजावून दिलेले आहे. हे पुस्तक आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते प्रगल्भ करण्यासाठी कोणते उपाय आणि बदल करणे गरजेचे आहे हे अचूक सांगते. सातत्याने प्रयत्न करणारेच पुढे जातात व यशस्वी होतात पण या मिळालेल्या यशातही सातत्य टिकविणे आवश्यक आहे. संधी गुपचुप चालू येत असते. तुमच्या कानांना त्याच्या पावलांचा आवाज ओळखायला शिकवा. आपल्यातील आत्मविश्वास अपयश आले म्हणून कमी होवू देऊ नका. टीका करणे, तक्रार करत राहणे, आत्म-विश्वासाचा अभाव, प्रश्नाचा डोंगर, निष्कारण नकारात्मक वटवट, स्वत:ची सतत किव करणे, अशा सवयी जर तुम्हाला असतील तर वेळीच सावध होण्याचा सल्ला हे पुस्तक देते, कारण या सवयी म्हणजेच तुम्ही. अयशस्वी असयाची लक्षणं आहेत. सर्वार्थाने वेगळे व प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायला शिकविणारे हे पुस्तक मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच एक खजाना आहे. स्वत:शी नव्याने संवाद साधायला लावणार हे पुस्तक सांगते की, ध्येय ही आयुष्याबरोबर मैलाच्या दगडासारखी जात असतात. आपण एकापर्यंत पोचलो की आपली नजर पुढच्या ध्येयाकडे लागते. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचालच... चला! वाचायला लागा. लेखकाप्रमाणे माझी खात्री आहे की, हे पुस्तक वाचून संपवाल तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगले असाल, हे बदल टिकवून ठेवा... ...Read more

 • Rating StarLOKMAT 17-9-2006

  स्वाती शैलेश लोढा यांच्या ‘कम ऑन - गेट सेट गो’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे. लोढा पतिपत्नी बुद्धिमान, धाडसी आणि उत्साही असून, त्यांनी राजस्थानात ‘स्वाश’ नावाची संस्था स्थापन केली आहे. ही संस्था लोकांमध्ये प्रगी घडवून आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देते. त्या कार्यशाळेत गेलेल्या लोकांची मनोवृत्ती व वर्तन यांत लक्षणीय बदल घडून येतात. स्वाती जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची कार्यकारी संचालिका आहे. तर स्टेजवर सादर होणारे शैलेशचे व्यंगपूर्ण विनोदी कार्यक्रम देश-परदेशात गाजलेले आहेत. प्रशिक्षणाच्या त्यांच्या अनुभवाचे फलित म्हणजे हे पुस्तक. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे, हे सांगणारी पुस्तके आहेत; पण हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी काय करू नये, हे सांगण्यावर भर देते. ते वाचकांना स्वत:मध्ये आमूलाग्र बदल कसा घडवून आणता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन करते, आत्मशोध घ्यायला प्रवृत्त करते. जीवनाच्या वाटचालीच्या दृष्टीने मौलिक मार्गदर्शन घडवते. जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देते. म्हणूनच ते महत्त्वपूर्ण ठरते. या वेगळ्या विषयावरील विवेचनाची विभागणी सात प्रकरणांमध्ये केली आहे. कोष्टके, रेखाचित्रे, महत्त्वपूर्ण वाक्यांचे स्वतंत्र चौकटीत केलेले उल्लेख यामुळे पुस्तक लक्षवेधी झाले असून, चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुखपृष्ठाने त्याचे सौंदर्य वाढले आहे. ‘हे प्रकरण न वाचता पुस्तक वाचू नका’ असे बजाविणाऱ्या प्रस्तावनते दुसऱ्या व्यक्तीचे दोष शोधत न बसता, स्वत:मधील उणिवांचा विचार करावा, असे सुचविले आहे. लेखकाने या पहिल्याच प्रकरणात चार प्रकारच्या लोकांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत - १) काहीच न शिकणारे अयशस्वी, २) कृत्रिमपणे वागणारे अयशस्वी, ३) दिखाऊ यशस्वी व ४) खरे यशस्वी. दुसऱ्या प्रदीर्घ प्रकरणात ‘अयशस्वी होण्याच्या लायकीचे लोक’ सतत तक्रारी व टीका कसे करीत राहतात, स्वत:ची कीव कशी करतात, त्यांच्या मनात कोणतेही काम करताना ‘लोक काय म्हणतील?’ ही भीती कशी असते, स्वत:च्या अडचणींचे वर्णन करून ते लोकांची सहानुभूती कशी मिळवितात, त्यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव कसा असतो, ते सतत भूतकाळाबद्दल बोलत कसे राहतात, याचे वर्णन आहे. असे लोक मनातून मत्सरी असतात. ते आळशी असतात, त्यांच्यामध्ये स्वयंनिर्णयाची कुवत नसते. त्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकत नाही. लेखकाच्या मते, असे अयशस्वी लोक मनाने लाकडी पुतळ्यासारखे असतात. तिसऱ्या प्रकरणात ‘दिखाऊ यशस्वी लोकां’ची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. हे लोक अहंमन्य असतात. ते स्वत:चे यश फुगवून सांगतात आणि इतरांचे यश तुच्छ मानतात. ते आत्मसंतुष्ट असतात आणि त्यांना बढाया मारण्याची सवय असते. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते; पण त्यांचे हे दोष सामान्य लोकांच्या लक्षात न आल्याने लोक त्यांना यशस्वी समजत असतात. ‘शिकण्यासाठी दिशानिर्देश’ या चौथ्या प्रकरणात अपयशातून काय शिकता येईल, याबाबतीतील मार्गदर्शन आहे. आपल्यावर दुसऱ्याने टीका केली, तर ते आपल्याला आवडत नाही; पण आपण मात्र सतत दुसऱ्यावर टीका करीत असतो, हे वास्तव आहे. टीका केलीच तर ती सरळपणे व नेमकेपणाने केलेली असावी. तिच्यात कडवटपणा असू नये. कोणाबद्दल तक्रार करायची असेल तर तीही समर्पक शब्दात, अतिशयोक्ती न करता करावी. संशयी वृत्ती सोडून दुसऱ्यावर विश्वास ठेवायला शिकावे. कोणत्याही कामासंदर्भात चालढकल न करता कार्यरत राहावे, अडचणींवर मात करायला शिकावे. बढाया न मारता स्वत:बद्दल वास्तवपूर्ण मत बाळगावे, आत्मसन्मान ठेवावा, आपली जिज्ञासा व सर्जनशीलता वाढवावी. अशा लहानसहान सूचना लेखकाने केल्या आहेत. अशाप्रकारे पहिल्या चार प्रकरणांमध्ये अयशस्वी माणसांचे वर्णन आहे. पाचव्या प्रकरणात मात्र ‘सोप्या भाषेत यश’ म्हणजे काय असते आणि काय नसते, याचे वर्णन आहे. प्रत्येकालाच यशस्वी होण्याची इच्छा असते. सामान्यत: ज्याच्याकडे संपत्ती व कीर्ती आहे, तो यशस्वी असे मानले जाते; पण लेखकाच्या मते, चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळविणाऱ्याला यशस्वी म्हणणे योग्य नाही. प्रसिद्धीच्या संदर्भातही केवळ गुणवत्ता पुरेशी ठरत नाही. संधी मिळणे, स्वत:ची जाहिरात करता येणे हेही महत्त्वाचे असते. संधी मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असते. ‘बदल : सतत चालू राहणारा लढा’ या सहाव्या प्रकरणात यशस्वी होण्यासाठी १) आपली मनोवृत्ती बदलणे - सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि २) आपल्या बुद्धीचा पूर्ण उपयोग करणे - आत्मविश्वास व कल्पकता यांचा वापर करणे या दोन गोष्टींची आवश्यकता स्पष्ट केली आहे. ‘यशाच्या दारात’ या शेवटच्या सातव्या प्रकरणात आयुष्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करता यावा, यश मिळवता यावे म्हणून चिकाटीने प्रयत्न करायला हवेत, मिळालेल्या संधीचा फायदा घेता यायला हवा, उत्साही-आनंदी वृत्ती हवी, थोडी सामाजिक बांधिलकी व आत्मविश्वास हवा, सर्जनशीलता हवी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. लेखकाच्या अपेक्षेप्रमाणे खरोखरच हे पुस्तक स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा देणारे आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला, त्याबद्दल अभिनंदन! ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more