* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I IS FOR INFLUENCE
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9788184989120
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HOW TO USE YOUR BODY LANGUAGE TO IMPRESS PEOPLE AROUND YOU, TO CHANGE THEIR PERSPECTIVE ABOUT YOU ?? IF WE PROVIDE VARIOUS OPTIONS TO CUSTOMERS , WHY THE PERCENTAGE OF ACTUAL PURCHASING FALLS DOWN ?? HOE EVEN 10 RUPEES , INSTEAD OF 50 , COULD CHANGE THE PERSPECTIVE ABOUT ANYTHING IT BELONGS TO ?? SOME PEOPLE POSSES THE ABILITY TO IMPRESS PEOPLE EASILY. THE TACTS AND SKILLS THEY USE , ARE EASILY APPROACHABLE BY OTHERS AS WELL. THIS BOOK, WITH SCIENTIFIC AND THEORETICAL RESEARCH EXCLUDING THE IMAGINATIVE PART, DESCRIBES THE TRUTH IN EASY AND SIMPLE LANGUAGE. THIS POPULAR BOOK NOT ONLY TEACHES THE SECRET OF HOW TO BE THE BEST ; BUT ALSO NARRATES THE TECHNIQUES AND SKILLS FOR, GETTING OUR DESIRED PROMOTION IN CAREER , TO BAG BIG PROJECTS IN BUSINESS, TO GET ALL THE DESIRED THINGS BY WALKING ON A PURE AND LOYAL PATH, AND MANY MORE.
मित्रांना जिंकून घ्यायला, लोकांवर प्रभाव पाडून त्यांचे मनपरिवर्तन करायला देहबोलीचा वापर नेमका कसा करायचा? ग्राहकांना खरेदीचे खूप पर्याय दिले तर प्रत्यक्ष खरेदीची शक्यता कमी का होते? मन वळवण्यासाठी ५० रुपयांपेक्षा १० रुपये कसे परिणामकारक ठरू शकतात? काही लोक दुस-यांवर सहज प्रभाव पाडू शकतात; सहजी त्यांचे मन वळवू शकतात. खरेतर ते पाळत असलेले नियम, वापर करत असलेली तंत्रे; कोणालाही आत्मसात करता येणारी असतात. या पुस्तकात शास्त्रीय संशोधनाच्या ज्ञानसागराचे मंथन करून त्यातील कल्पोकल्पित कथा बाजूला काढून `ख-या सत्या`चे अमृत आपल्यासमोर सहजसोप्या शब्दांत ठेवले आहे. हे पुस्तक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना लीलया कसे जिंकायचे याचे रहस्य सांगून थांबत नाही, तर आपल्याला अपेक्षित असणारी नोकरीतील बढती, उद्योगधंद्यातील-व्यवसायातील मोठी व महत्त्वाची कामे कशी मिळवायची, आपल्याला हवे ते, नीतिमत्तेची कास न सोडता पदरात कसे पाडून घ्यायचे, याबद्दलची हमखास यशस्वी होणारी आणि अनुभवाने सिद्ध झालेली तंत्रे शिकवते

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SUTREPRABHAVPADNYACHI #IISFORINFLUENCE #सूत्रेप्रभावपाडण्याची #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDARSHANATHAWALE #ROBYEUNG "
Customer Reviews
  • Rating StarVYAPARI MITRA MARCH 2018

    ‘आय इज फॉर इन्फ्लुअन्स’ या डॉ. रॉब युंग या लेखकाने इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. राब युंग उच्च गुणवत्ताधारकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारी अधिकारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. या पस्तकाची मांडणी १२ प्रकरणांमध्ये केली आहे. प्रत्येक प्रकरणात दिलेल्या माहितीचे ‘तात्पर्य काय?’ या प्रश्नांचे उत्तर वाचकांना योग्य जागी मिळावे यासाठी खास चौकटींचा पुस्तकात समावेश केला आहे. लोकांवर आपला प्रभाव पाडणे आणि त्यांचे मन वळविणे यात जास्तीत जास्त सक्षम होण्यासाठीचे उपाय व तंत्रे समर्थपणे आत्मसात करून, त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करून यशस्वी होण्याच्या उद्देशाने तुम्ही हे पुस्तक वाचणार असाल तर त्यासाठी तुम्ही ‘नेमके’ काय करायला हवे हे अगदी थोडक्यात, सुस्पष्टपणे अशा चौकटीतून सांगितले आहे. प्रभाव पाडण्याची आणि मन परिवर्तनाची आणखी काही रोजच्या व्यवहारात वापरण्याजोगी तंत्रे पाहिजे असल्यास स्वतंत्रपणे तशा साधनांची यादी शेवटी जोडली आहे. त्याला नाव दिले आहे ‘प्रभाव-साधनांचा संच’ त्यात प्रत्येक प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे तर दिले आहेतच. त्याखेरीज काही प्रयोग आणि सरावपद्धती दिल्या आहेत. त्या तुम्ही आत्मसात केल्यास व त्याचा परिणामकारक वापर करून आयुष्यात यशस्वी होणे तुम्हाला अगदी सहजशक्य होईल. हे पुस्तक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना लीलया कसे जिंकायचे याचे रहस्य सांगून थांबत नाही, तर आपल्याला अपेक्षित असणारी नोकरीतील बढती, उद्योग व्यवसायातील मोठी व महत्वाची कामे कशी मिळवायची, आपल्याला हवे ते, नीतिमत्तेची कास न सोडता पदरात कसे पाडून घ्यायचे याबद्दलची हमखास यशस्वी होणारी आणि अनुभवाने सिद्ध झालेली तंत्रे शिकवते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-01-2016

    मनपरिवर्तनाची प्रभावी सूत्रे... पाश्चात्य लेखक डॉ. रॉब युंग हे मानसशास्त्रीय लिखाणाबद्दल प्रसिद्ध असून त्यांनी लिहिलेल्या सुमारे २५ पुस्तकांपैकी अनेक पुस्तके बेस्ट सेलर ठरलेली आहेत. त्यांच्या ‘आय इज फॉर इन्फ्युअन्स’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘सूत्रेप्रभाव पाडण्याची!’ या नावाने सुदर्शन आठवले यांनी केलेला आहे. एखाद्याला प्रभावित करून आपले काम कसे करून घ्यावे याचे मानसशास्त्राच्या आधारे केलेले विश्लेषण असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रभाव पाडणे हे एक कौशल्य आहे. काही लोक नैसर्गिकरीत्या प्रभावशाली असतात. तर काही लोक मानसशास्त्रीय पातळीवरील तंत्रकौशल्य विकसित करून सर्वसामान्यंवर प्रभाव पाडतात. मनपरिवर्तन करणे म्हणजे बळजबरी नव्हे. तर समोरच्याला त्याच्याही नकळत आपल्या बाजूला वळवून घेणे. त्यासाठी समोरची व्यक्ती नकारच देऊ शकणार नाही अशी विनंती अथवा मागणी कशी करायची? कोणते शब्द वापरायचे? माणसाच्या मनात सचोटी बाणवण्यासाठी कोणते उपाय करायचे? नीतिमत्तेच्या चौकटीत काटेकोरपणे राहूनही प्रभावशाली कसे बनता येईल याचे मौलिक मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात आहे. बहुसंख्यांचे शहाणपण, देहबोलीचे छुपे संकेत, शब्द आणि प्रतिमा यांचे असाधारण सामथ्र्य, छोट्या कृती मोठी परिणती, कल्पनाशक्तीला आवाहन, मैत्री आणि मेहेरबानी, बक्षिसे देण्याचे दुष्परिणाम, मन वळविण्याच्या परिस्थितीजन्य उपायांचे सामथ्र्य आणि त्वरेने मन वळविण्याची वेगवान तंत्रे अशा नऊ प्रकरणांतून प्रभाव पाडण्याच्या कौशल्यासंबंधी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विस्तारपूर्वक ऊहापोह केलेला आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात आवश्यक त्या ठीकाणी चौकटीत माहिती देऊन प्रकरणात आलेले मुद्दे आणखी सोपे करून सांगितलेले आहेत. मनपरिवर्तन आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी पुस्तकात दिलेल्या टिपा आणि युक्त्या या व्यावहारिक पातळीवर उपयुक्त आहेतच, पण घर, कार्यालय आणि परस्परांमधील संबंध या प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतील अशा आहेत. मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी मुद्दाम अभ्यासावे असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more