* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BONOBO HANDSHAKE
  • Availability : Available
  • Translators : SHARMILA PHADKE
  • ISBN : 9789386745248
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A YOUNG WOMAN FOLLOWS HER FIANCÉ TO WAR-TORN CONGO TO STUDY EXTREMELY ENDANGERED BONOBO APES-WHO TEACH HER A NEW TRUTH ABOUT LOVE AND BELONGING. IN 2005, VANESSA WOODS ACCEPTED A MARRIAGE PROPOSAL FROM A MAN SHE BARELY KNEW AND AGREED TO JOIN HIM ON A RESEARCH TRIP TO THE DEMOCRATIC REPUBLIC OF CONGO, A COUNTRY REELING FROM A BRUTAL DECADE-LONG WAR THAT HAD CLAIMED THE LIVES OF MILLIONS. SETTLING IN AT A BONOBO SANCTUARY IN CONGO`S CAPITAL, VANESSA AND HER FIANCÉ ENTERED THE WORLD OF A RARE APE WITH WHOM WE SHARE 98.7 PERCENT OF OUR DNA. SHE SOON DISCOVERED THAT MANY OF THE INHABITANTS OF THE SANCTUARY-APE AND HUMAN ALIKE-ARE REFUGEES FROM UNSPEAKABLE VIOLENCE, YET BONOBOS LIVE IN A PEACEFUL SOCIETY IN WHICH FEMALES ARE IN CHARGE, WAR IS NONEXISTENT, AND SEX IS AS COMMON AND FRIENDLY AS A HANDSHAKE. A FASCINATING MEMOIR OF HOPE AND ADVENTURE, BONOBO HANDSHAKE TRACES VANESSA`S SELF-DISCOVERY AS SHE FINDS HERSELF FALLING DEEPLY IN LOVE WITH HER HUSBAND, THE APES, AND HER NEW SURROUNDINGS WHILE PROBING LIFE`S GREATEST QUESTION: WHAT ULTIMATELY MAKES US HUMAN? COURAGEOUS AND EXTRAORDINARY, THIS TRUE STORY OF REVELATION AND TRANSFORMATION IN A FRAGILE CORNER OF AFRICA IS ABOUT LOOKING PAST THE DIFFERENCES BETWEEN ANIMALS AND OURSELVES, AND FINDING IN THEM THE SAME EXTRAORDINARY COURAGE AND WILL TO SURVIVE. FOR VANESSA, IT IS ABOUT FINDING HER OWN PATH AS A WRITER AND SCIENTIST, FALLING IN LOVE, AND FINDING A HOME. "
"व्हॅनेसा वुड्सनं २००९ मध्ये एका देखण्या प्रियमेटॉलॉजिस्ट- ( चिम्पांझी, बबून्स, बोनोबो इत्यादी एप जातीच्या प्रायमेट्सचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ) ब्रायन हेरसोबत- लग्न करायचं ठरवलं, जो आजवरच्या सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी धडपडत होता. असं नेमकं काय आहे ज्यामुळे आपण ‘मानव’ बनलो? त्याला विश्वास असतो की या प्रश्नाचं उत्तर कॉन्गोमध्ये- फ्रान्सपेक्षा आकारानं तिप्पट मोठं जंगल असणाऱ्या आणि सतत युद्ध सुरू असतं, तिथंच मिळेल, कारण बोनोबो फक्त कॉन्गोमध्येच राहतात. व्हॅनेसा त्याच्यासोबत अनाथ बोनोबोंचं आश्रयस्थान असलेल्या किन्शासा अभयारण्यात राहायला जाते. जंगलातील प्राण्यांना मारून त्यांचं मांस बेकायदा विकण्याचा व्यवसाय करणारे जंगलचोर (बुशमीट ट्रेडर्स) बोनोबोंना ठार मारतात आणि त्यांची अनाथ पिल्लं पाळीव प्राणी म्हणून विकतात. तिथून त्यांची सुटका करून त्यांना ‘लोला’मध्ये आणलं जाण्याआधीची अवस्था दारुण असते. काळ्या जादूकरता आवश्यक म्हणून त्यांची बोटं आणि अंगठे कापून नेलेले असतात. काही हद्दपार झालेले लोक या पिल्लांचा आपल्या घरामध्ये मुलांप्रमाणे सांभाळ करतात. तिथं व्हॅनेसाला स्वतःचा शोध लागतो. बोनोबो हे पुरुषांवर फारसा विश्वास टाकत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर, व्हॅनेसानं सगळे चाचणी-प्रयोग पार पाडावेत, अशी अपेक्षा केली जाते, आणि मग हळू हळू बोनोबो आणि तिच्यात एक सखोल प्रेमाचा बंध निर्माण होतो. त्या परिसराच्या प्रेमात तर ती पडतेच; शिवाय नवऱ्यावरच्या प्रेमाचाही तिला नव्यानं साक्षात्कार होतो. सहजीवनाचा अर्थ तिला खऱ्या अर्थानं उलगडतो. "

No Records Found
No Records Found
Keywords
BONOBO HANDSHAKE# VANESSA WOODS# CHIMPANZEE# BALUKU# BRIAN# ZAINABO# FOUFOU# Z00 #CLAUDINE# MOBUTU# ISIRO# TATANGO# MICKENO# ANGOLA# KINSHASA# KABILA# JACQUES# KIKONGO# SEMENDWA# OLETI# MAMA ESPERANCE# SUZY# SKIPPY# KATAKO# MALOU
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 26-05-2019

    आत्मानुभवाचे प्रांजळ कथन... मराठीत अनुवादित झालेल्या जागतिक साहित्यातून सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक अशा विविध विषयांची माहिती मिळत जाते. अशीच माहिती ‘व्हेनेसा वुड्स’ यांच्या ‘बोनोबो हॅन्डशेक’ या इंग्रजी पुस्तकाच्या शर्मिला फडके यांनी ‘बोनबो – एक शांतिदूत’ या शीर्षकाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून मिळते. हे पुस्तक म्हणजे व्हेनेसा वुड्सची आत्मकथा आहे. जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर अकल्पित नोकरी मिळाल्यावर त्याच कामात रममाण होऊन परंतु सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन चरितार्थ चालविण्यासाठी नव्हे, तर एका दुर्लक्षित मुक्या प्राण्याच्या जीवनासाठी संबंधित ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा व प्रवासाचा हा आलेख आहे. अनेक लहानसहान नोकऱ्या केल्यानंतर लेखिकेला युगांडाच्या बुन्दागो जंगलातील चिम्पांझीची गणना करण्याची नोकरी मिळते आणि येथूनच तिच्या वेगळ्या विश्वातील जीवनाला सुरुवात होते आणि याचवेळी जैववैद्यकीय क्षेत्रातील अनुभव संशोधक ब्रायन याच्याशी तिची गाठ पडते. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कालांतराने विवाहबद्धही होतात. त्यांचे व्यक्तिगत जीवन आणि संशोधन असा त्यांचा समांतर प्रवास सुरू होतो. या प्रवासात त्यांना अनेक प्रकारचे अनुभव येतात. त्यांच्यावर अनेक संकटेही ओढावतात. परंतु त्यांनी त्यावर मात करून आपले कार्य सुरू ठेवले आहे. हे सर्व शब्दबद्ध करताना लेखिकेने कधी तटस्थपणे, तर कधी परिस्थितीशी समरस होऊन प्रसंगचित्रण केले आहे. ब्रायन आणि व्हेनेसा यांनी मर्कट जातीमधील अनेक प्रजातींचा अभ्यास केला आहे. यातूनच वेगवेगळ्या देशांतील माकडांची वेगवेगळी रूपे, आफ्रिकेत आढळणाऱ्या चिम्पांझीच्या प्रजाती, कान्गोमधील चिम्प्स, चिम्पांझी व बोनोबो यांची सविस्तर माहिती लेखिकेने करून दिली आहे. आपला पती ब्रायन यांच्यासह केलेल्या संशोधनातून व्हेनेसा वुड्सने माकडांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे जीवन, त्यांच्या भावना, त्यांच्या वासना, त्यांचा दिनक्रम, विशिष्ट क्रियेनंतर त्यांनी त्यांच्याकडून आलेली प्रतिक्रिया अशा सर्वच बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याला शब्दरूप दिले आहे. याशिवाय आफ्रिकेतील जंगलातील प्राणी व त्यांचे जीवन, त्यांच्या जीवनावर होणारे चांगले-वाईट परिणाम, तसेच त्या प्राण्यांच्या जीवनाशी निगडित अनुषंगिक बाबींचाही येथे परामर्श घेतला आहे. ‘देशविदेशात प्राणीमित्र संघटना कार्यरत असूनही काही विशिष्ट प्राण्यांची दखल घेतली जात नाही’ अशी खंतही येथे व्यक्त केली आहे. माकडांमधील ‘बोनोबो’ ही जात नष्ट होत असताना त्याची ओळख जगाला व्हावी यासाठी प्रयत्न करीत असलेल्या ध्येयवेड्या ब्रायनशी विवाह केल्याने, त्याच्यासह केलेल्या सहप्रवासात सोसाव्या लागलेल्या यातनांना लेखिकेने येथे शब्दरूप दिले आहे. संशोधन आणि व्यक्तिगत जीवन असा समांतर प्रवास करताना लेखिकेला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसे भेटली आहेत. त्यामुळे अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून, उच्चपदस्थ, सत्ताधीश, राजकारणी यांच्यापर्यंत सर्वच स्तरावरील व्यक्तींच्या व्यक्तिवैशिष्ट्यांची माहिती येथे करून दिली आहे. यामध्ये तिचा पती ब्रायन, त्याचा सहकारी रिचर्ड आणि बोनोबोच्या पिल्लांचा सांभाळ करणाऱ्या ‘येवोनो’, ‘हेन्रिएट’ व ‘एस्पोरान्स’ या ‘मामा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्त्रियांची व्यक्तिचित्रे ठळकपणे साकार झाली आहेत. शिवाय मालूचे प्राणिचित्रही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या आत्मकथनातून काही प्रदेशात घडत असलेली अमानवी कृत्ये, लढाया, मानवतावादापासून दूर गेलेली संस्कृती प्राण्यांच्या निवारागृहांचा माणूसच करीत असलेला वापर अशा बाबींवर प्रकाश टाकला आहे आणि तरीही या परिस्थितीत नेल्सन मंडेला व महात्मा गांधी यांच्या विचारांची कास धरून मानवतावादी धोरणाचा अवलंब करत आपण नि:स्वार्थीपणे इतरांना मदत करण्याची वृत्ती जोपासत असल्याचे म्हटले आहे आणि याचा प्रत्यय या आत्मकथनातून येत राहतो. म्हणूनच लेखिकेचा हा प्रवास समजून घेताना, ‘बोनोबो’ या माकडांच्या एका प्रजातीचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करून त्याला एका शांतीदूताचे स्थान मिळवून देणाऱ्या व्हेनेसा वुड्सचे हे आत्मकथन एकदा अवश्य वाचावे असे आहे. – कमलाकर राऊत ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    आफ्रिकेतल्या जंगलात चिंपाझी आणि बानोबो या वेगळ्या जातीचे चिंपाझी यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्हेनेसा वूड्स या तरुणीनं लिहिलेलं हे पुस्तक. एक वेगळ्याच प्रकारचं विश्व व्हेनेसाच्या लेखनातून आपल्यासमोर येतं. एकीकडं जंगलातले, आफ्रिकी संस्कृतीतले एकेक विलक्ण अनुभव मांडत असताना, बोनोबोंबरोबरचं आपलं नातं उलगडून दाखवत असताना व्हेनेसा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा लिहिते. जंगलांमध्ये तिला सापडत गेलेलं कौटुंबिक आयुष्य, माणूसपण ती या पुस्तकात मांडते. ‘बोनोबो हँडशेक’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद शर्मिला फडके यांनी केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more