* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANTARIKASHACHA VEDH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666274
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :JAGTIK UFO DIN OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"SCIENCE IS AN ONGOING PROCESS. IT NEVER ENDS." DR. CARL SAGAM. MAN STARTED HIS JOURNEY IN THIS WORLD, HE EXPLORED SEAS, MOUNTAINS, OCEANS, LANDFORMS, HE EXPLORED EVERYTHING THAT HE CAME ACROSS. HE WAS EAGER TO FIND OUT THE SECRET OF THIS UNIVERSE, THE UNIVERSE WAS CALLING HIM. VERY SLOWLY, BUT FIRMLY, HE LANDED IN IT, THAT WAS THE TIME WHEN HE COULD HEAR THE SOFT CALL FROM THE PAST, FROM THE HISTORY. DURING HIS EXPEDITION, HE FOUND A TRUE FRIEND, A FRIEND WHO WOULD NOT LEAVE HIS SIDE UNDER ANY CIRCUMSTANCES, A FRIEND WHO WOULD ACCOMPANY HIM ON ANY DANGEROUS VOYAGE, A FRIEND WHO WOULD NOT HESITATE TO IDENTIFY THE TRUTH APART FROM THE FALSITY, A FRIEND WHO WOULD SEE BEYOND CASTE, RELIGION, LANGUAGE, NATION, RIGHTS, FELICITATIONS, POWER. A TRUE BELIEVER OF TRUTH. THIS FRIEND HELD THE HANDS OF MAN AND MADE HIM WALK ON THE PATH OF TRUTH, MARCHING FORWARD TOWARDS THE SPACE. THIS FRIEND WAS SCIENCE. AS WE KNOW, THE SPACE IS BOUNDLESS AND SO IS THE SCIENCE. THERE ARE NO LIMITS TO BOTH OF THESE. THE MORE WE TRY TO UNDERSTAND THEM, THE LESS WE COME TO KNOW THEM. THE MORE CLOSE WE ARE TO THEM, THE MORE DEAR THEY ARE TO US. TODAY, WHEN WE ARE EXPLORING THE SPACE MORE AND MORE, OUR FRIEND, THE SCIENCE IS CONTINUOUSLY WITH US, NOT EVEN FOR A SINGLE MOMENT IT HAS REMAINED ALOOF. THROUGH EXPLORING THE SPACE, MAN IS GETTING CLOSER TO KNOW HIMSELF. THIS BOOK IS AN HONEST ATTEMPT TO DESCRIBE THE JOURNEY AND MEASURES OF HAPPINESS DURING IT.
या विश्वाच्या अथांग सागराच्या किनाNयावर आपल्या पाऊलखुणा उमटवत माणसाने आपला प्रवास सुरू केला अन् त्याच प्रवासात त्याला ह्या विश्वाचे रहस्य खुणावू लागले.... विश्वसागराची गाज बोलवू लागली. आपल्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यासाठी त्याने ह्या सागरात आपले पाय हळूच भिजवले, तेव्हा त्याला त्याच्या गतकाळाची, इतिहासाची साद ऐवूÂ आली. ही साद ऐकत असताना त्याने जो प्रवास सुरू केला, त्यात त्याला एक साथीदार गवसला... मित्र मिळाला... हा मित्र कसा आहे? मित्र जसा असावा तसा आहे! खNयाला खरे म्हणणारा अन् खोट्याला खोटे! धर्म, जातपात, भाषा, राष्ट्र, अधिकार, मान-सन्मान, स्थान ह्या कशाकशाचीही पर्वा न करणारा, केवळ सत्य तेच सांगणारा अन् सांगता सांगता, माणसाच्या बोटाला धरून पुढे नेणारा...
स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २००६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANTARIKASHACHAVEDH #ANTARIKASHACHAVEDH #अंतरिक्षाचावेध #SCIENCE #MARATHI #SUDHARISBUD #सुधारिसबुड "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 02-07-2006

    भारतीय संशोधकांच्या चष्मातून अंतरिक्षाचा वेध... अंतरिक्षाचा वेध ‘हे पुस्तक म्हणजे डॉ. कार्ल सॅगन यांच्या ‘कॉसमॉस’ या पुस्तकाचा सुधा रिसबुड यांनी करून दिलेला परिचय आहे. विज्ञानावर आधारित साहित्य सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवण्यात डॉ. सॅगन हे एक यशस्व लेखक मानले जातात. त्यांच्या ‘द ड्रॅगन ऑफ एडन’ या पुस्तकाला ‘पुलित्झर’ हा अमेरिकन साहित्यातल सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. व्हायेजर यानामध्ये जी कालकुपी ठेवण्यात आली, त्या कुपीतील माहिती तयार करण्यात डॉ. कार्ल सॅगन यांचे योगदान मोलाचे होते. शुक्रावरील ‘ग्रीन हाऊस’ परिणाम, मंगळावरील वादळे, टायटन भोवतालचे ढग, जिवाची उत्पत्ती, असे अनेक विषय डॉ. सॅगन यांच्या संशोधनामुळे समजण्यास साहाय्य झाले आहे. अंतराळ संशोधनातील ते पहिल्या प्रतीचे शास्त्रज्ञ मानले जातात. अणुयुद्ध झाले तर मागाहून उद्भवणारा आण्विक हिवाळा यावर त्यांनी संशोधन केले आहे. त्यांचे ‘कॉसमॉस’ हे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण तसेच रंजक आहे. अतिशास्त्रीय माहिती त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या गाजलेल्या पुस्तकाचा परिचय सौ. रिसबुडांनी केलेला आहे. पण हा केवळ ‘कॉसमॉस’चा परिचय नाही तर भारतीय शास्त्रज्ञाने या विषयाचे योगदानही नमूद केलेले आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांबद्दलचा आपला अभिमान दुणावतो. उदाहरणार्थ, आधुनिक ज्योतिषविद्येचा जनक टोलेमी समजला जात असला तरी लगाध यांनी भारतीय खगोलशास्त्राचा पाया घातला. ते वेदांत ज्योतिषांचे मूळ लेखक म्हटले पाहिजे, असे सौ. रिसबुडांनी नमूद केले आहे. (पृ.२७) त्याचप्रमाणे वैदिक काळातील प्रमुख खगोल निरीक्षक म्हणून विश्वामित्राचा उल्लेख करावा लागेल. गुरू या ग्रहाला ओळखण्याचे श्रेय. वामदेवांकडे जाते; तर शुक्र ग्रहाला शोधण्याचे श्रेय भृगूंचा मुलगा वेनभार्गव याला दिले जाते. पाश्चात्त्य संशोधकांनी निकोलस कोपर्निकस (‘ग्रहांची गती’ संबंधीचा सिद्धांत इ.स. १५४३) केप्लेर (हामर्नीज ऑफ द वल्र्ड - ग्रहांच्या परिभ्रमणातील सुसंगती संबंधीचे संशोधन) न्यूटन (गतीसंबंधीचे नियम) यांच्या संशोधनाचाही थोडक्यात उल्लेख केलेला आहे. सूर्याचे सामर्थ मानवी अनुभवापलीकडे आहे. ज्ञानेश्वरांनी ते जाणले होते. एका ओवीत ते म्हणतात – अगा सूर्योदये जालिया । सूर्ये सूर्येचि पाहावा धनंजया । तेवि माते तिया जाणावया मीचि हेतू ।। (अर्थ - हे धनंजया, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजानेच सूर्य पहावा लागतो, त्याचप्रमाणे मला जाणण्याच मीच कारण आहे.) म्हणजे पाश्चात्त्यांचे संशोधन वाचकांपुढे मांडताना भारतीय संशोधक, संत, विचारवंत, परंपरा, बुद्धिमत्ता यांचे दाखले सौ. रिसबुडांनी दिल्याने पुस्तकाची खुमारी वाढली आहे. त्यांनी ‘कॉसमॉस’चे शब्दश: भाषांतर दिले असते तर ते सामान्य वाचकाला कळले नसते व विवेचन कंटाळवाणेही झाले असते. आणखी एक उदाहरण देतो. अनंताची कल्पना भारतीय तत्त्वज्ञांना फार प्राचीन काळापासून ज्ञात होती. ‘अनंत’ म्हणजे काय, याचे नेमके वर्णन भास्काराचार्य (दुसरे) यांनी अचूक मांडले आहे. (इ.स. ११५० च्या सुमारास) ‘खहर राशी म्हणजे अनंत’ असे ते म्हणतात. अस्मिन्विकार: खहरेण राशावपि प्रविष्टेष्वपि नि:सृतेषु । बहुष्वपि स्यल्लयसृष्टी काले ऽ नन्तेऽच्युते भूतगणेषु यद्वत् ।। (ज्याप्रमाणे सृष्टी व्युपत्ती आणि प्रलय काळाच्या समयी, अनंतजीव ब्रह्मातून येतात आणि जातात; परंतु तो (ब्रह्म) मात्र अनंतच राहतो. त्याचप्रमाणे अनंत ही संख्या आहे, त्यात काही वाढवले आणि कमी केले तरी फरक पडत नाही.) सौ. रिसबुडांची शैली कशी ओघवती आहे. याचा नमुना द्यावासा वाटतो. ‘ग्रह-ताऱ्यांचे जीवन’ (पृ. १३२-१४८), या प्रकरणात त्या म्हणतात, ‘नुकतेच जन्मलेले विश्व काही काळ प्रकाशाने व्यापले गेले होते; परंतु काळाच्या ओघात ते निवळले आणि दृश्य प्रकाशाच्या दृष्टीने ते अंधारमय झाले होते. स्थलरूपी धागे, कापड ताणले गेले. नूतन अवस्थेतील विश्वात हायड्रोजन व हेलियम हे दोन्ही वायू अस्तित्वात आले होते. बघण्याजोगे असे त्या विश्वात काहीच नव्हते. (बघायला तरी कुणी होते का?) कालांतराने विश्वाच्या पोकळीत वायूचे मेघ जमा झाले. ते वाढू लागले. त्यानंतर तारे, ग्रह, आकाशगंगा, दीर्घिका निर्माण झाल्या. या पुस्तकात (१) विश्वसागराचा किनारा (२) अंतरिक्षाचा वेध (३) पृथ्वीवरील उत्क्रांतीची वाटचाल (४) खगोलशास्त्राचे शिल्पकार (५) सूर्याची ग्रहमाला (६) मंगळाचे अंतरंग (७) गुरू व शनिकडे झेप (८) युरेनस व नेपच्यूनच्या दिशेने (९) झेप ताऱ्यांकडे (१०) स्थलकालातील प्रवास (११) ग्रह-ताऱ्यांचे जीवन (१२) सीमोल्लंघन (१३) उत्क्रांत मानव आणि देवमासा (१४) अनंत आमची ध्येयासक्ती (१५) विश्वाचे आर्त. अशी एकूण पंधरा प्रकरणे आहेत. त्यापैकी ‘सूर्याची ग्रहमाला’ व ‘मंगळाचे अंतरंग’ ही दोन प्रकरणे अनुक्रमे २४ व २३ पृष्ठांची आहेत. अन्य प्रकरणे साधारणपणे १०-१५ पृष्ठांची आहेत. शास्त्रज्ञांची विधाने स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तेथे आकृत्या, शुक्र, मंगळ, सूर्य व आकाशगंगा यांची छायाचित्रे यामुळे या पुस्तकाची मनोरंजकता वाढली आहे. डॉ. कार्ल सॅगन व अन्य काही शास्त्रज्ञानांची छायाचित्रे दिली असती तर अधिक बरे झाले असते. तळटीपा व परिशिष्टे यामुळे या पुस्तकाला मौलिकता प्राप्त झाली आहे. काही ठिकाणी गोष्टीरूप विवेचन तर काही ठिकाणी काव्यपंक्तींचा दाखला यामुळे सर्वसामान्यांची ‘विज्ञान जिज्ञासा’ निश्चित वाढीस लागेल. -सतीश पोरे ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-05-2006

    वेध गच्चीवरच्या आकाशाचा… भारताने अवकाश युगात प्रवेश केल्याला बराच काळ लागला असला तरी त्याला आत्ता कुठे जागतिक मान्यता मिळू लागली आहे. २००८च्या भारतीय चांद्रयान मोहिमेत खुद्द अमेरिकेने सामील होऊन भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाला सलामी दिली आहे. या पारश्वभूमीवर समाजात निव्वळ विज्ञाननिष्ठा रुजणंच आवश्यक नाही तर विज्ञानाच्या विविध अंगाउपांगाविषयी औत्स्युक्य निर्माण होणंही आवश्यक आहे. यासाठी शाळांतून प्राथामिक शिक्षणाची पातळीवरून जसे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे तशीच प्रसार माध्यमं, ग्रंथमाध्यम यातूनही प्रसार होण्याची आवश्यकता आहे. भारतातल्या ग्रंथनिर्मितीत विज्ञानविषयक ग्रंथांना महत्त्वाचं स्थान आहे. मराठीतही असे प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसतात. विज्ञानकथा, विज्ञानाच्या विविध शाखांची ढोबळ आणि विस्तृत चर्चा करणारी, माहिती देणारी पुस्तकं मराठीत नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात आणि ती खपतही असतात. विज्ञान शाखांतही खगोलशास्त्राचं मराठी वाचकांना विशेष आकर्षण वाटतं. हा विषय मराठीजनांमध्ये लोकप्रिय करण्याचं श्रेय जयंत नारळीकरांना द्यावं लागेल. त्यांनी ललित लिखाणातून हा विषय मराठी लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याची शास्त्रीय माहिती देण्याचं काम या क्षेत्रातल्या अन्य जाणकरांनी व तज्ज्ञांनी घेतली आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेली खगोलशास्त्रविषयक तीन पुस्तकं ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडतात. ‘तारकांच्या विश्वात’ (पराग अळवणी), ‘अंतरिक्षाचा वेध’ (सुधा रिसबुड) आणि ‘कथारुपी खगोलशास्त्र’ (लीना दामले) ही ती तीन पुस्तकं आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरच्या विद्यार्थ्याना खगोलशास्त्राविषयी जे कुतूहल वाटतं किंवा त्याबाबत त्यांना जे प्रश्न पडतात, शंका असतात त्यांचं समाधान करण्यास ही पुस्तकं समर्थ आहेत. ‘तारकांच्या विश्वात’ हे पुस्तक रात्री अंगणात झोपल्यावर दिसणाऱ्या चमचमणाऱ्या आकाशाविषयी मनात निर्माण होणाऱ्या हजोर प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतं. आकाशाचं निरीक्षण कसं करावं, कुठल्या दिशेला कुठला तारा, ग्रह केव्हा असतो, तो कसा ओळखावा, ताऱ्यांचे प्रकार किती, त्यांचं वर्गिकरण, नाव आदी विस्तृत माहिती नकाशा व चित्रासह या पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तकात प्रत्येक ताराकापुंजाचा पानभर आकाराचा नकाशा, त्यांची माहिती त्याच्याविषयी कथा आदी सर्व माहिती देण्यात आली आहे. ज्यांना आकाश निरीक्षणाची हौस आहे त्याच्या हाती कायम असावं असं हे पुस्तक आहे. एकदा ग्रह-ताऱ्यांची ओळख पटली की मन त्यांच्याजवळच थांबत नाही. त्यांच्या पलिकडेही या अवकाशात काय आहे, याचा शोध ते घेऊ लागतं. या विशाल अवकाशाची व्याप्ती किती, त्याच्या पोकळीत ग्रह-ताऱ्यांखेरीज आणखी काय दडलं आहे, आणखी सौरमाला आहेत का, अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, आपल्या सौरमालेतले ग्रह कसे आहेत, डोळ्यासमोर दिसणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश किती अब्ज वर्षांपूर्वी निघाला आहे. उल्का, युफो हे काय आहेत. गॅलॅक्सी म्हणजे काय, धूमकेतूचं रहस्य काय, ब्लॅक होल म्हणजे काय, या विश्वाची रचना कशी झाली आहे असे ग्रह-तारकांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तर ‘अंतरिक्षाचा वेध’ या पुस्तकातून बऱ्याच प्रमाणात मिळतात. सुधा रिसबूड यांनी गोष्टीवेल्हाळपणे ही सर्व माहिती दिली आहे. हि दोन्ही पुस्तकं काहींना शास्त्रीय किंवा जड वाटत असतील तर हाच विषय अधिक सोप्या आणि पटकन समजेल अशा भाषेत म्हणजे गोष्टीरुपाने लीना दामले यांनी ‘कथारूपी खगोलशास्त्र’ या पुस्तकात मांडला आहे. आकाशातली नक्षत्रं, राशी, तारकासमूह, यांच्याबद्दलची माहिती लेखिकेने कथा व संवादाच्या माध्यमातून सांगितली आहे. त्यामुळे हे पुस्तक बोजड वाटत नाही. विशेषत: शाळकरी मुलांना ते वाचायला आवडेल व या विषयाची त्यांच्यात रुचीही निर्माण करेल. या पुस्तकातही नकाशे व चित्रं दिली असल्यामुळे विषय समजायला मदत होते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलींनी ही तिन्ही पुस्तकं वाचली तर त्यांचा वेळ मजेत जाईलच पण खगोलशास्त्राविषयीचं त्यांचं कुतूहलही वाढेल आणि अधिक माहिती मिळवायची ओढ लागेल. मेहता पब्लिशिंग हाऊसने या तिन्ही पुस्तकांची निर्मिती अत्यंत उत्कष्टपणे केली आहे. -दिवाकर देशपांडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more