* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PHYSICS OF THE IMPOSSIBLE
 • Availability : Available
 • Translators : LEENA DAMALE
 • ISBN : 9789353172602
 • Edition : 1
 • Publishing Year : JUNE 2019
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 316
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : SCIENCE
 • Sub Category : PHYSICS, CHEMISTRY, BIOLOGY, ZOOLOGY
Quantity
Buying Options:
 • Print Books:
A FASCINATING EXPLORATION OF THE SCIENCE OF THE IMPOSSIBLE—FROM DEATH RAYS AND FORCE FIELDS TO INVISIBILITY CLOAKS—REVEALING TO WHAT EXTENT SUCH TECHNOLOGIES MIGHT BE ACHIEVABLE DECADES OR MILLENNIA INTO THE FUTURE. ONE HUNDRED YEARS AGO, SCIENTISTS WOULD HAVE SAID THAT LASERS, TELEVISIONS, AND THE ATOMIC BOMB WERE BEYOND THE REALM OF PHYSICAL POSSIBILITY. IN PHYSICS OF THE IMPOSSIBLE, THE RENOWNED PHYSICIST MICHIO KAKU EXPLORES TO WHAT EXTENT THE TECHNOLOGIES AND DEVICES OF SCIENCE FICTION THAT ARE DEEMED EQUALLY IMPOSSIBLE TODAY MIGHT WELL BECOME COMMONPLACE IN THE FUTURE. FROM TELEPORTATION TO TELEKINESIS, KAKU USES THE WORLD OF SCIENCE FICTION TO EXPLORE THE FUNDAMENTALS—AND THE LIMITS—OF THE LAWS OF PHYSICS AS WE KNOW THEM TODAY. HE RANKS THE IMPOSSIBLE TECHNOLOGIES BY CATEGORIES—CLASS I, II, AND III, DEPENDING ON WHEN THEY MIGHT BE ACHIEVED, WITHIN THE NEXT CENTURY, MILLENNIA, OR PERHAPS NEVER. IN A COMPELLING AND THOUGHT-PROVOKING NARRATIVE, HE EXPLAINS: • HOW THE SCIENCE OF OPTICS AND ELECTROMAGNETISM MAY ONE DAY ENABLE US TO BEND LIGHT AROUND AN OBJECT, LIKE A STREAM FLOWING AROUND A BOULDER, MAKING THE OBJECT INVISIBLE TO OBSERVERS “DOWNSTREAM” • HOW RAMJET ROCKETS, LASER SAILS, ANTIMATTER ENGINES, AND NANOROCKETS MAY ONE DAY TAKE US TO THE NEARBY STARS • HOW TELEPATHY AND PSYCHOKINESIS, ONCE CONSIDERED PSEUDOSCIENCE, MAY ONE DAY BE POSSIBLE USING ADVANCES IN MRI, COMPUTERS, SUPERCONDUCTIVITY, AND NANOTECHNOLOGY • WHY A TIME MACHINE IS APPARENTLY CONSISTENT WITH THE KNOWN LAWS OF QUANTUM PHYSICS, ALTHOUGH IT WOULD TAKE AN UNBELIEVABLY ADVANCED CIVILIZATION TO ACTUALLY BUILD ONE KAKU USES HIS DISCUSSION OF EACH TECHNOLOGY AS A JUMPING-OFF POINT TO EXPLAIN THE SCIENCE BEHIND IT. AN EXTRAORDINARY SCIENTIFIC ADVENTURE, PHYSICS OF THE IMPOSSIBLE TAKES READERS ON AN UNFORGETTABLE, MESMERIZING JOURNEY INTO THE WORLD OF SCIENCE THAT BOTH ENLIGHTENS AND ENTERTAINS.
आज जे तंत्रज्ञान अशक्य वाटतं आहे, ते कदाचित येत्या काही दशकांत अथवा शतकांमध्ये अगदी नेहमीच्या वापरातलं होऊन जाईल, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित पुस्तक आहे – अशक्य भौतिकी. हे पुस्तक तीन विभागांत विभागलेलं आहे. पहिला भाग आहे, क्लास-१ अशक्यता. ज्यात टेलिपोर्टेशन, अँटिमॅटर इंजिन्स, काही प्रकारची टेलिपथी, सायकोकायनेसिस आणि अदृश्यता यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आज अशक्य वाटत असले; तरी ते भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करीत नाही. दुसरा भाग आहे क्लास-२ अशक्यता. ज्यात टाइम मशीन, हायपर स्पेस ट्रॅव्हलची शक्यता आणि कृमिविवरातून प्रवास यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान असे आहे; जे या भौतिक जगाच्या आपल्या समजाच्या अगदी काठावर उभे आहे. तिसरा आणि शेवटचा भाग आहे, क्लास-३ अशक्यता. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशक्यभौतिकी #मिचिओकाकू #लीनादामले #अदृश्यता #दूरप्रेषण #मनाच्याशक्तीचेप्रयोग #यंत्रमानव #परग्रह #परग्रहवासीआणिUFOS #समांतरविश्वे #कालप्रवास #शाश्वतगतीयंत्र #भविष्यकथन #प्रकाशाचीतलवार #ऊर्जाक्षेत्रे #आयनायूच्याखिडक्या #तोफग्रह #कथारुपीखगोलशास्त्र #अंतरिक्षाच्याअंतरंगात#PHYSICSOFTHEIMPOSSIBLE #INVISIBILITY #TELEPORTATION #TELEPATHI #PSYCHOKINESIS #ROBOTS #EXOPLANETS #EXTRATERESTRIAL-UFOS #ANTIMATTER #ANTIGRAVITY #ANTIUNIVERSE #NULTIVERSES #PARALLELUNIVERSE #TIMETRAVEL #PERPETUALMOTIONMACHINE #PERCOGRITION #LIGHTSABERS #FORCEFIELDS #PLASMAWINDOWS #ANTARIKSHACHYAANTRANAGAT #KATHARUPI KHAGOLSHASTRA
Customer Reviews
 • Rating StarPranav Patil

  भौतिकशास्त्रातील अशक्यतांचा मागोवा भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, समीकरणे, सिद्धांत, गृहीतके यांच्या आधाराने अशक्यतेचा विषय लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे छायाचित्र) कविता भालेराव भौतिकशास्त्रातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मिचिओ काकू यांच्या ‘िजिक्स ऑफ दि इम्पॉसिबल’ या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद खगोल अभ्यासक लीना दामले यांनी केला असून ‘अशक्य भौतिकी’ या शीर्षकाखाली हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात विज्ञानकथांमधील काल्पनिक उच्च तंत्रज्ञान आणि यंत्रे- जी आजच्या काळात अशक्य वाटत आहेत, ती कुठल्या मर्यादेपर्यंत भविष्यात नेहमीच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी होऊ शकतात, याबाबतचे विवेचन केलेले आहे. सुरुवातीच्या उपोद्घातामध्ये लेखकाने विज्ञानकथा वाचून त्यासंबंधी भौतिकशास्त्राविषयी आपण कसा विचार करू लागलो, याबद्दल लिहिले आहे. प्रो. काकू यांच्या मते, अशक्यता ही सापेक्ष आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी पृथ्वीतलावरून एकाएकी नाहीशा झालेल्या डायनॉसोरचे उदाहरण दिले आहे. एकेकाळी या घटनेचे कारण समजणे अशक्य होते. परंतु कालांतराने पृथ्वीवर पडलेल्या महाकाय उल्केमुळे डायनासोर व इतर बरीच जीवसृष्टी नष्ट झाली, हे वैज्ञानिक सत्य उलगडले. त्याचप्रमाणे आपली गाठ काही दशलक्ष वर्षे जास्त प्रगत असणाऱ्या एखाद्या संस्कृतीशी झाली, तर त्याचे रोजच्या वापरातले तंत्रज्ञान आपल्याला जादूसमान वाटेल का? या प्रश्नाभोवती या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना गुंफलेली आहे. आज एखादी अशक्य वाटणारी गोष्ट भविष्यात काही शतकानंतर किंवा, काही लाखो वर्षांंनंतरही अशक्यच राहील का? भविष्यातील तंत्रज्ञानाची रूपरेषा काय असेल? कशी असेल? असंभवनीय आणि अशक्य यातील निश्चित फरक काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने अशक्य गोष्टी तीन भागात विभागल्या आहेत. यातील पहिला भाग म्हणजेच क्लास – १ – अशक्यता. यामध्ये भौतिकीतील माहीत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत नाही आणि हे तंत्रज्ञान या किंवा पुढल्या शतकात शक्य होईल. या भागात ऊर्जा क्षेत्रे, दूरप्रेषण, रोबो, परग्रहवासी, अवकाशयाने, अँटिमॅटर इ. दहा गोष्टींचा समावेश आहे. यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार होणाऱ्या प्रगत यंत्र मानवांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्याचा माणसाचा विलक्षण ध्यास लक्षात घेता लेखकाने विचारलेला ‘खरोखरच आपले भविष्य ताऱ्यांमध्ये दडले आहे का?’ हा प्रश्न भविष्यातील उत्सुकता वाढविण्यास, विचार करण्यास वाचकाला प्रवृत्त करतो. दुसऱ्या भागात आहे क्लास – २ – अशक्यता. यामधील तंत्रज्ञान कधीकाळी शक्य झालेच तर ते काही लाखो वर्षांच्या कालावधीतच शक्य होईल. त्यात टाइम मशीन, कालप्रवास, कृमी विवर, कृष्णविवर यांचा समावेश आहे. अवकाशशास्त्रज्ञ सर मार्टिन रीस यांनी एक ना ‘एक दिवस जीवसृष्टी या आकाशगंगेला व्यापून त्याही पलीकडे पसरेल असं निश्चितपणे वाटते.’ असे म्हंटले आहे. त्यांच्या या आशावादाचा प्रवासच जणू या भागात वाचायला मिळतो. यातील कालप्रवासाची रहस्ये, काळासंबंधीचे तर्क येणाऱ्या भविष्यकाळाविषयीची आपली उत्सुकता वाढविणारे आहेत. तिसरा भाग हा तिसऱ्या प्रतीची अशक्यता दाखवून देतो. यामधील तंत्रज्ञान, आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे. मात्र अशा अशक्यता फारच थोडय़ा आहेत. त्यात शाश्वत गतियंत्र, भविष्यकथन यांचा समावेश केलेला आहे. भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, समीकरणे, सिद्धांत, गृहीतके यांच्या आधाराने अशक्यतेचा विषय लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विलक्षण प्रवास लिहिण्याची लेखकाची शैली मोहित करणारी आहे. अशा आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे काम लीना दामले यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. मात्र अनुवादाबाबत दोन मुख्य मुद्दे आहेत. एक म्हणजे ज्या संकल्पनांना सोपे मराठी शब्द आहेत, ते त्या त्या ठिकाणी कटाक्षाने वारंवार वापरायला हवे होते. उदा. टेलिपोर्टेशनला असलेला दूरप्रेषण हा शब्द! असे कितीतरी शब्द पुस्तकभर सापडतील. दुसरे म्हणजे एकूणच विज्ञान पुस्तके सलग वाचणे अवघड असते. म्हणूनच आवश्यक तिथे चित्रांचा-फोटोंचा समावेश करायला हवा होता. त्यामुळे पुस्तकाच्या रंजकतेत भर पडली असती. या पुस्तकात मिचिओ काकू यांनी भौतिकीतील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात नव्या प्रगत तंत्रज्ञानाच्या अस्तित्वाने घडू शकतात, हा आशावाद दाखवून दिला आहे. भौतिकशास्त्रातील नवनवी क्षितिजे कायम उलगडतच जाणार आहेत. म्हणूनच मराठी अनुवादाचे ‘अशक्य भौतिकी’ हे नाव दिशाभूल करणारे वाटते. ते सकारात्मकतेकडे झुकणारे असायला हवे होते. विश्व विज्ञानाच्या सरहद्दीपर्यंतचा आपल्या कल्पनाशक्तीच्या मर्यादेपलीकडचा हा प्रवास प्रत्येकाने वाचायला हवा, असाच आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 16-02-2020

  भौतिकशास्त्रातील अशक्यतांचा मागोवा… भौतिकशास्त्रातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मिचिओ काकू यांच्या ‘फिजिक्स ऑफ दि इम्पॉसिबल’ या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद खगोल अभ्यासक लीना दामले यांनी केला असून ‘अशक्य भौतिकी’ या शीर्षकाखाली हे पुस्तक प्रकाित झाले आहे. या पुस्तकात विज्ञानकथांमधील काल्पनिक उच्च तंत्रज्ञान आणि यंत्रे- जी आजच्या काळात अशक्य वाटत आहेत, ती कुठल्या मर्यादेपर्यंत भविष्यात नेहमीच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी होऊ शकतात, याबाबतचे विवेचन केलेले आहे. सुरुवातीच्या उपोद्घातामध्ये लेखकाने विज्ञानकथा वाचून त्यासंबंधी भौतिकशास्त्राविषयी आपण कसा विचार करू लागलो, याबद्दल लिहिले आहे. प्रो. काकू यांच्या मते, अशक्यता ही सापेक्ष आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी पृथ्वीतलावरून एकाएकी नाहीशा झालेल्या डायनॉसोरचे उदाहरण दिले आहे. एकेकाळी या घटनेचे कारण समजणे अशक्य होते. परंतु कालांतराने पृथ्वीवर पडलेल्या महाकाय उल्केमुळे डायनासोर व इतर बरीच जीवसृष्टी नष्ट झाली, हे वैज्ञानिक सत्य उलगडले. त्याचप्रमाणे आपली गाठ काही दशलक्ष वर्षे जास्त प्रगत असणाऱ्या एखाद्या संस्कृतीशी झाली, तर त्याचे रोजच्या वापरातले तंत्रज्ञान आपल्याला जादूसमान वाटेल का? या प्रश्नाभोवती या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना गुंफलेली आहे. आज एखादी अशक्य वाटणारी गोष्ट भविष्यात काही शतकानंतर किंवा, काही लाखो वर्षांनंतरही अशक्यच राहील का? भविष्यातील तंत्रज्ञानाची रूपरेषा काय असेल? कशी असेल? असंभवनीय आणि अशक्य यातील निश्चित फरक काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने अशक्य गोष्टी तीन भागात विभागल्या आहेत. यातील पहिला भाग म्हणजेच क्लास – १ – अशक्यता. यामध्ये भौतिकीतील माहीत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत नाही आणि हे तंत्रज्ञान या किंवा पुढल्या शतकात शक्य होईल. या भागात ऊर्जा क्षेत्रे, दूरप्रेषण, रोबो, परग्रहवासी, अवकाशयाने, अँटिमॅटर इ. दहा गोष्टींचा समावेश आहे. यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार होणाऱ्या प्रगत यंत्र मानवांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्याचा माणसाचा विलक्षण ध्यास लक्षात घेता लेखकाने विचारलेला ‘खरोखरच आपले भविष्य ताऱ्यांमध्ये दडले आहे का?’ हा प्रश्न भविष्यातील उत्सुकता वाढविण्यास, विचार करण्यास वाचकाला प्रवृत्त करतो. दुसऱ्या भागात आहे क्लास – २ – अशक्यता. यामधील तंत्रज्ञान कधीकाळी शक्य झालेच तर ते काही लाखो वर्षांच्या कालावधीतच शक्य होईल. त्यात टाइम मशीन, कालप्रवास, कृमी विवर, कृष्णविवर यांचा समावेश आहे. अवकाशशास्त्रज्ञ सर मार्टिन रीस यांनी एक ना ‘एक दिवस जीवसृष्टी या आकाशगंगेला व्यापून त्याही पलीकडे पसरेल असं निश्चितपणे वाटते.’ असे म्हंटले आहे. त्यांच्या या आशावादाचा प्रवासच जणू या भागात वाचायला मिळतो. यातील कालप्रवासाची रहस्ये, काळासंबंधीचे तर्क येणाऱ्या भविष्यकाळाविषयीची आपली उत्सुकता वाढविणारे आहेत. तिसरा भाग हा तिसऱ्या प्रतीची अशक्यता दाखवून देतो. यामधील तंत्रज्ञान, आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे. मात्र अशा अशक्यता फारच थोडय़ा आहेत. त्यात शाश्वत गतियंत्र, भविष्यकथन यांचा समावेश केलेला आहे. भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, समीकरणे, सिद्धांत, गृहीतके यांच्या आधाराने अशक्यतेचा विषय लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विलक्षण प्रवास लिहिण्याची लेखकाची शैली मोहित करणारी आहे. अशा आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे काम लीना दामले यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. मात्र अनुवादाबाबत दोन मुख्य मुद्दे आहेत. एक म्हणजे ज्या संकल्पनांना सोपे मराठी शब्द आहेत, ते त्या त्या ठिकाणी कटाक्षाने वारंवार वापरायला हवे होते. उदा. टेलिपोर्टेशनला असलेला दूरप्रेषण हा शब्द! असे कितीतरी शब्द पुस्तकभर सापडतील. दुसरे म्हणजे एकूणच विज्ञान पुस्तके सलग वाचणे अवघड असते. म्हणूनच आवश्यक तिथे चित्रांचा-फोटोंचा समावेश करायला हवा होता. त्यामुळे पुस्तकाच्या रंजकतेत भर पडली असती. या पुस्तकात मिचिओ काकू यांनी भौतिकीतील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात नव्या प्रगत तंत्रज्ञानाच्या अस्तित्वाने घडू शकतात, हा आशावाद दाखवून दिला आहे. भौतिकशास्त्रातील नवनवी क्षितिजे कायम उलगडतच जाणार आहेत. म्हणूनच मराठी अनुवादाचे ‘अशक्य भौतिकी’ हे नाव दिशाभूल करणारे वाटते. ते सकारात्मकतेकडे झुकणारे असायला हवे होते. विश्व विज्ञानाच्या सरहद्दीपर्यंतचा आपल्या कल्पनाशक्तीच्या मर्यादेपलीकडचा हा प्रवास प्रत्येकाने वाचायला हवा, असाच आहे. -कविता भालेराव ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more