* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TANTRADNYANACHI MULAKSHARE BHAG - 2
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789838
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MAN HAS AN UNBREAKABLE RELATIONSHIP WITH NATURE BY BIRTH. MAN EVOLVED BY EXPERIENCING VARIOUS FORMS OF NATURE. HE STUDIED THIS EXPERIENCE TO THE BEST OF HIS BRILLIANT INTELLECT. MANY SMALL AND BIG EXPERIMENTS WERE DONE BY MISTAKE. THIS EXPERIMENT WAS THE STEP OF SCIENCE AND TECHNOLOGY. THE DETAILED AND EASY TO UNDERSTAND INFORMATION ABOUT HOW MAN TOOK STRONG STEPS FROM THIS STEP AND CREATED HUNDREDS OF THOUSANDS OF TOOLS FOR HIMSELF IS THE `PRIMITIVES OF TECHNOLOGY`.
माणसाचे निसर्गाशी जन्मत:च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती. या पाऊलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहिती म्हणजे `तंत्रज्ञानाची मुळाक्षरे`.
अ.भा.म.प्र.संघ उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती प्रशस्तिपत्र २००६-०७
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TANTRADNYANACHIMULAKSHAREBHAG-2 #TANTRADNYANACHIMULAKSHAREBHAG-2 #तंत्रज्ञानाचीमुळाक्षरे- भाग२ #SCIENCE #MARATHI #KAVITABHALERAO #कविताभालेराव "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 26-08-2007

    कविता भालेराव यांनी महत्त्वाच्या शोधांची माहिती देणारे एक सदर वृत्तमान चालवले. त्यात सुमारे पावणेदोनशे, शोधांचा समावेश झाला. सौरऊर्जा, उपग्रह, झेरॉक्स, अग्निबाण, यंत्रमानव, लेसर, विमान, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे अत्याधुनिक शोधांनी आपल्या जीवनात जशी करांती केली तशीच प्राचीन मध्ययुगीन काळापासून माणसाने दैनंदिन जीवनातील सुखसुविधांच्या दृष्टीने शोधून काढलेल्या चाक, कागद, मासेमारी, तराजू, आगकाडी, साबन, बटन, समत, काच, विणकाम, घड्याळ, कुलूप, चष्मा, पूल, गलबत, होकायंत्र, सूक्ष्मदर्शक, सायकल, सिग्नल, रबर, बॉलपेन, स्टेथॉस्कोप, धान्य कापणी यंत्र, शिवणयंत्र या प्राथमिक शोधांनीही मानवी संस्कृतीला आकार दिला. विजेचा बल्ब, टाइपरायटर, प्लॅस्टिक, लिफ्ट, कॅमेरा, सिनेमा, टेपरेकॉर्ड, फ्रीज, वॉशिंग मशीन मानवी जीवन सुखावह, रंजक आणि आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली. या सर्व शोधांच्या हकिकती वाचणे म्हणजे आपल्या मानवी संस्कृतीच्या विकासाची रुपरेखा जाणून घेणे. या पुस्तकात शोधांची माहिती देताना कुठलाही विशिष्ट क्रम पाळलेला नाही किंवा विषयानुसार वर्गीकरणाचाही अवलंब केलेला नाही. सदर म्हणून ज्या क्रमाने पुस्तकात ते दिले आहेत. त्यामुळे कुठलेही पान उघडून वाचू लागले तरी चालते. पहिल्या पानापासून सलग तीनशे पाने कादंबरीप्रमाणे वाचण्याची येथे गरज नाही. कुठला शोध कुठल्या वर्षी लागला आणि तो कोणी लावला याचा कालक्रम शेवटी दिला आहे. माहिती आणि मनोरंजन या दोन्ही दृष्टींनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक कुमार वाचकांना उपयुक्त ठरेल. या शोधांच्या तपशिलातून खूपच गमतीदार माहिती मिळते. अनेक शोध योगायोगाने लागले. करायला गेलो एक आणि झाले भलतेच असा प्रकारही दिसतो. कोणाच्या डोक्यात कुठली कल्पना येईल याचा नेम नसतो. पण ती कल्पना सुचल्यावर ती प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्या व्यक्तीने कधीकधी आपले उभे आयुष्य वेचलेले दिसते; तर कधी, कधी त्या कल्पनेला वेगळेच फाटे फुटले असेही दिसते. माणसाला जाणवणाऱ्या समस्या, माणसाच्या गरजा या शोधांना जन्म देतात, अमुक अमुक सोय असायला हवी होती. अशी कल्पना मनात यावी आणि कोणीतरी ती पूर्ण करण्याचा वसा घ्यावा असा प्रकारही दिसतो. कुठल्याही मजकुराची, चित्राची प्रत जशीच्या तशी मिळावी असे न्यूयॉर्क इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या पेटंट विभागात काम करणाऱ्या वेस्टर एफ कार्लसनला वाटले. कारण पेटंटसाठी अर्ज करताना कागदपत्रांच्या बऱ्याच प्रती द्याव्या लागत. त्या प्रती करण्याचे काम कंटाळवाणे वाटे. फोटो काढायचे तंत्र तर अवगत होते. पण ते वाटेल त्या मजकुराच्या स्वस्तात प्रती काढण्याच्या दृष्टीने व्यावहारिक नव्हते. तेव्हा भौतिकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या कार्लसनने गंधकाचा लेप लावलेल्या विद्युतभारित काचेच्या प्लेटवर मजकूर लिहिलो कागद काही काळ ठेवून बाजूला केला. तेव्हा त्या प्लेटवर ती अक्षरे उमटलेली दिसली. आता ती अक्षरे काचेच्या प्लेटवरून कागदावर कशी उमटतात हा पुढचा टप्पा त्यासाठी त्याने प्रयोग केले. १९३८ साली तीन वर्षांच्या प्रयोगानंतर त्याला त्यात यश आले. पहिले झेरॉक्स मशीन तयार झाले. या यंत्राचे उत्पादन व्यापारी तत्त्वावर व्हावे म्हणून अनेक कारखानदारांना तो भेटला. १९४४ मध्ये जोसेफ विल्सनने त्याला मदतीचा हात दिला. सेलोनियन हे प्रकाशाला संवेदनशील असणारे मूलद्रव्य त्यांनी बॅटेले इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत शोधून काढले. १९६० साली झेरॉक्स ९१४ हे ऑफिस कॉपियर तयार झाले. कार्लसने हे मशीन अवाढव्य आकाराचे आणि कॉपी करण्यासाठी बराच वेळ खाणारे होते. पण ते काही काळ एकमेवाद्वितीय म्हणून वापरात राहिले. झेरॉक्स कॉर्पोरशेनला खूप कमाई करून देणारे ठरले. पुढे १९७३ मध्ये कॅनन या जपानी कंपनीने रंगीत झेरॉक्स मशीन काढले. १९८६ मध्ये लेसर कलर कॉपियर तयार केले. पॅनॅसॉनिक कंपनीने पॉकेट फोटोकॉपियर तयार केला. झेरॉक्ससारख्या एका नव्याच तंत्रज्ञानाचा हा विस्मयकारक विकास कार्लसनच्या आरंभीच्या कल्पनेपासून दोन-तीन दशकांच्या अविरत संशोधनाद्वारे झाला. त्याला स्पर्धक कंपन्यांनीही सतत सुधारण करून आज लहान मुलही हे मशीन सहजपणे हाताळू शकेल इतके सोयीस्कर, सोपे बनवले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू बनली आहे. माणसाने या सर्वांचा उपयोग करून घेतला आहे. सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या ऊर्जेचे उगमस्थान. सूर्याची उपासना भारतात प्रचीन काळापासून सुरू आहे. सौरऊर्जेचा उपयोग अंतर्गोल ढालींच्या माध्यमातून करून आर्किंमिडीजने रोमनांना लढाईत हरवले. या अंतर्गोल ढालींवर सूर्याचे किरण केंद्रित होत. त्यामुळे रोमन सैनिकांना ग्रीकांच्या सैन्याशर मुकाबला करणे अवघड जाई. सूर्यशक्तीचा उपयोग करण्यासाठी माणूस वेगवेगळे प्रयोग करीत राहिला. १७१४ मध्ये आन्तान लव्हाशिए या फ्रेंच संशोधकाने सौरऊर्जेवर चालणारी भट्टी तयार करून तिच्यात धातू वितळता येतात हे दाखवून दिले. १८८० मध्ये सौरशक्तीवर चालणारे वाफेचे इंजिन तयार केले गेले. सूर्याच्या उष्णतेने पाणी तापविण्यासाठी सौरबंबाचा वापर मात्र विसाव्या शतकांत सुरू झाला. सौरऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करणे, पाणी गरम करणे, वीज निर्माण करणे यासाठी आता सर्रास होऊ लागला आहे. सौरऊर्जेसाठी लागणारी पॅनल्स अजून महाग आहेत; ती स्वस्त व सुटसुटीत करता आली तर भारतासारख्या देशात वीजनिर्मितीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. हवेचे गुणधर्म ठाऊक असले तरी ते तपासून पाहण्यासाठी साधने उपकरणे उपलब्ध नव्हती. १६४०मध्ये हवेचा दाब मोजण्यासाठी पहिला दाबमापक गॅलिलिओचा शिष्य टॉरीसेली याने तयार केला. हवेला वजन असते आणि हवा जागा व्यापते हे त्यावरून सिद्ध झाले. पुढे रॉबर्ट बॉयले याने हवेचा दाब आणि घनता यांचा संबंध गणिती भाषेत मांडला. १७७० मध्ये हवेतील वेगवेगळ्या वायूचे घटक शोधण्याचे काम सुरू झाले. जोसेफ प्रीस्टले याने १७७४ मध्ये ऑक्सिजनचा शोध लावला. हा वायू ज्वलनक्रियेला मदत करतो हे त्याच्या लक्षात आले. लव्हॉयझर या शास्त्रज्ञाने ‘आम्ल तयार करणारे’ या अर्थाचा ऑक्सिजन हा शब्द त्यासाठी वापरला. तो रुढ झाला. १८००च्या आसपास हवेचे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, अरगॉन वगैरे घटक आणि त्यांचे प्रमाण याबद्दल बरीचशी निश्चिती झाली. १८१८ मध्ये वायूचे द्रवात रुपांतर करण्याची कल्पना मायकेल फॅरडेला सुचली. हायड्रोजन सल्फाइडला द्रवरुप देण्यात त्याला यश आले. ऑक्सिजनचे द्रवात रुपांतर करण्याचे तंत्र कायलिटेट या फ्रेंच लोहाराने त्यानंतर साठ वर्षांनी शोधून काढले. द्रवरुप ऑक्सिजन साठवण्यासाठी जेम्स देवार याने निवांत बाटली- थर्मासचा शोध लावला. श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी रेस्पिरेटर किंवा व्हेंटिलेटरचा उपयोग करतात. नाकातून नळ्या घालून रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. नाकावर मास्क बसवणेही शक्य होते. अशा कितीतरी शोधांची प्राथमिक माहिती आणि त्या, त्या शोधातील प्रगतीचे टप्पे या पुस्तकातील छोट्या छोट्या लेखांत नोंदवले आहेत. कुठलेही पान उघडावे आणि वाचावे. त्या विशिष्ट शोधाची माहिती मिळवावी यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपले दैनंदिन जीवन अतिशय सुकर झाले आहे. लिफ्टपासून फोटो कॉपीपर्यंत आणि लिफ्टपासून रेफ्रिजरेटरपर्यंत किती तरी विज्ञानदूत आपले कष्ट हलके करत आहेत. ही साधने वापरताना ती कशी तयार झाली असतील, कोणत्या परिस्थितीत त्यांची निर्मिती ाली असेल, असे प्रश्न आपल्याला पडतात. ही जिज्ञासापूर्ती करण्यासाठीच कविता भालेराव यांनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक आणले आहे. ‘युवा सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे पुस्तक वाचनीय आहे. भरपूर संशोधन आणि मेहनत दिसत असली, तरी ही माहिती अतिशय सोप्या शब्दांत आणि रंजकपणे मांडल्याने पुस्तक जड किंवा कंटाळवाणे वाटत नाही. कविता भालेराव यांनी निवडलेले विषय ही या पुस्तकाची खासियत, साबण, निर्लेप तवा, चष्मा, लिफ्ट, सिग्नल, स्टेथोस्कोप, झिप वेल्क्रो, कुलूप, पेन, शिलाई मशिन अशा एरवी वाचायला न मिळणाऱ्या विषयांची निवड त्यांनी केली आहे. ही साधने कशी तयार झाली, त्या वेळची परिस्थिती, सुरुवातीची साधने कशी होती, त्यात बदल कसे होत गेले इत्यादी गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. त्यापैकी अनेक साधनांची आता पुढची पिढी आली आहे किंवा येऊ घातली आहे. तो भविष्याचा धागाही या लेखांमध्ये जोडलेला असल्याने ही केवळ भूतकाळाची सफर ठरत नाही, तर वर्तमानाची माहिती आणि भविष्याची चुणूक यांचाही आनंद त्यात मिळतो. विषयांचे वैविध्य आणि कुतूहल वाढवणारी शीर्षके यामुळे पुस्तक वाचताना मजा येते. जवळजवळ नव्वद साधनांची ‘मुळाक्षरे’ पुस्तकात आहेत. इंटरनेटवर आणि इंग्रजीमध्ये विज्ञानावर खूप माहिती वाचायला मिळत असली, तरी मराठी पुस्तकांत मात्र विज्ञानविषयक लेखन मात्र तुलनेने खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञानप्रेमींच्या संग्रहात हे पुस्तक असायलाच हवे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more