* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662474
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET- 4 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. NADKARNI IS A MULTIDIMENSIONAL VERSATILE PERSONALITY. HE HAS A COMMAND OVER LITERATURE, MUSIC, ART, SCIENCE, SPORTS, AND POETRY. HE IS A PERFECT COMBINATION OF DILIGENCE AND DISCERNMENT.HIS WRITING REVEALS ALL HIS PECULIARITIES MAKING IT UNIQUE. HE SEARCHES THE HORIZONS IN THE FIELDS OF MUSIC TO SCIENCE ENTERTAINING AND CAPTURING THE MINDS OF THE READERS.THE PRESENT BOOK IS YET ANOTHER OF HIS ASTONISHINGLY WONDERFUL CREATION.
डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी हे एक बहुवेधी व्यक्तिमत्व आहे. साहित्य, संगीत, कला, विज्ञान, क्रीडा, शेर-शायरी अशा विविध क्षेत्रांमध्ये अधिकारवाणीनं संचार करणारं. व्यासंग आणि रसिकता यांचा सुरेच मेळ असलेलं. म्हणूनच कमालीचं वैविध्यपूर्ण आणि रसरशीत शैलीनं नटलेलं असं लेखन हे त्याचं वैशिष्ट्य ठरतं. संगीताच्या मैफलीपासून गूढगुंजनाचा शोध घेणा-या विज्ञानापर्यंत अनेक विषयांचा रसग्राहक, शोधक मागोवा ते घेतात; आणि वाचकाला आपल्याबरोबर रमणीय विश्वात रमवतात... "अज्ञाताचे विज्ञान" ही आहे त्यांने घडविलेली अशीच एक आगळीवेगळी सफर....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADNYATACHEVIDNYAN #ADNYATACHEVIDNYAN #अज्ञाताचेविज्ञान #SCIENCE #MARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्र नाडकर्णी "
Customer Reviews
  • Rating StarDaulati Vairat

    दोनदा वाचले आहे. छान आहे.

  • Rating StarAnil Soman

    मध्यंतरी fb वर `पृथ्वीवर माणूस उपराच` हया पुस्तकावर पोस्ट आली होती. त्या संदर्भात डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांचे माझ्या संग्रही असलेले `अज्ञाताचे विज्ञान` हे पुस्तक आठवले. डॉ.नाडकर्णी म्हणजे एक व्यासंगी व्यक्तिमत्व. साहित्य, संगीत, शेरो शायरी आशा विवध क्षेत्रात त्यांची मुशाफिरी आहे. आपल्या अवती भोवती निसर्गात अशा अनेक घटना घडत असतात की त्या मागची कारण मीमांसा आपल्याला समजू शकत नाही. हे असे कसे व का ह्याची उत्तरे सापडत नाहीत. अनेक घटना विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येत नाहीत. त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. आणि मग साहजिकच त्यांना गुढतेचे वलय प्राप्त होते. प्रस्तुत पुस्तकात ह्याच अज्ञात वाटणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न ह्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. जाणीव म्हणजे काय, तेजोवलय कोष, दूर संवेदना ई. कांही लेखांची शीर्षके आहेत. लेखकाने अनेक संदर्भही दिले आहेत. पुस्तक छान माहितीपूर्ण आहे. लेखकाची शैलीही उत्कंठा वाढविणारी आहे. वेगळ्या विषयाची आवड असणाऱ्यांना हे पुस्तक नक्की आवडेल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    या विश्वात कितीतरी अशा गूढ गोष्टी आहेत की जेथे मती गुंग होते... आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग घडतात की आपली बुद्धी चक्रावून जाते, असे अनेक अनुभव लोक सांगतात की त्यांचे तर्कशक्तीच्या बळावर आकलन - स्पष्टीकरण करणे जड जाते. ज्या गोष्टींचे स्पष्टीकरण व कर्यकारणभाव सहजपणे उलगडत नाही, अशा गोष्टी संदिग्ध आणि गूढ ठरतात, त्यांची गूढरचना ही माणसाला पिढ्यान्पिढ्या भूल घालत राहिली आहे. आपल्या भविष्यात काय दडलेले आहे, आपल्या पूर्वजन्मी आपण कोण होतो, पक्ष्यांची भाषा आपल्याला कळू शकते का, मृत्यूनंतर माणसाचे काय होते, आत्मा हा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून काही कामे करून घेऊ शकतो का, भूत वगैरे प्रकार खरोखरच आहेत का, दूर अंतरावर असणाऱ्या दोन व्यक्तींच्या मनात एकाच वेळी एकच विचार होणे असा प्रकार संभवतो का, भावी अनर्थाची पूर्वसूचना मिळते का, काही विशिष्ट स्थळी गेल्यावर व विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर मनःशांतीचा अनुभव येतो हे खरे आहे का, चंद्र व ग्रह यांचा मानवी मनावर व जीवनावर प्रभाव पडतो का, ग्रहशांती-यज्ञयाग करून काही फायदा होतो का, केवळ स्पर्शाने रोग बरा करण्याची क्षमता कोणात असते का, पंचेंद्रियांनी होऊ शकत नाही असे काही ज्ञान आहे का, आणि तसे ते असल्यास त्याच्या आकलनासाठी अधिक ज्ञानेंद्रिये असणे संभाव्य आहे का, लहान वयातच संगीत, गणित वगैरे क्षेत्रांत विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या मुलामुलींच्या व पूर्वजन्माच्या स्मृती सांगणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा अन्वयार्थ कसा लावायचा इ. इ्... हे आणि असे अनेक प्रश्न हे जगभरच्या शास्त्रज्ञांनाही सारखे सतावत राहिलेले आहेत. गूढ व रहस्यपूर्ण असा त्यांच्यावर शिक्का मारून ते स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांचा उलगडा करण्यासाठी ते प्रयोग करीत आहेत. अज्ञानाचा बोध व्हावा, त्याची उकल व्हावी म्हणून त्यांची खटपट चालू आहे. अशा या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न डॉ. सुरेशचंद्र कुलकर्णी यांनी ‘अज्ञानाचे विज्ञान’ या पुस्तकातील चोवीस लेखांद्वारे केला आहे. मानवी सृष्टीतल्या अज्ञात, गूढ अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकणारे हे लेख आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पाश्चात्त्य पुस्तकांचा उपयोग केला आहे. अडीच वर्षे खपून बारा-तेरा हजार पृष्ठांचे वाचन करून, टिपणे काढून, भरपूर श्रम घेऊन योग्य ते संदर्भ जमवून या लेखांची मांडणी केली आहे. पाश्चात्त्य देशात एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्ती व संस्था सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या संशोधनाचे निष्कर्ष वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात. काही संशोधक हे निष्कर्ष काढताना नको तेवढी चलाखी दाखवून, दिशाभूलही करतात. परंतु एकूण या संशोधनामुळे अनेक बाबींवर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश पडत जातो हे खरेच आहे. डॉ. नाडकर्णी यांनी पुढील विषय या पुस्तकात घेतले आहेत. वैश्विक चक्र व त्याचे परिणाम, चंद्राचा मानवी जीवनावर व स्वभावावर होणारा परिणाम, ग्रह आणि व्यवसाय, ग्रहावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न, आत्मा, उपद्व्यापी कंपनलहरी, मानसिक सामर्थ्य, प्रत्येक व्यक्तीभोवती असणारे तेजोवलय कोष, विद्युत चुंबकीय क्षेत्र, अ‍ॅक्युपंक्चर व शियात्सू इ. उपचार पद्धती, मनलहरी, इच्छाशक्ती, धातूचे सोन्यात रूपांतर करणारा परीस, आदिम समाजातील औषधोपचार पद्धती, हस्तरेखाशास्त्र, संमोहनशास्त्र, बाह्यमन व अंतर्मन, मंत्रविद्या व चेटूक, स्वप्ने व अबोध मन, दूर संवेदना, अंतःप्रेरणेने मिळणारे संकेत, काळावर मात करण्याचे प्रचत्न, भूतयोनीचे गौडबंगाल, मृत्यूनंतरचे अस्तित्व, मानवाचे भवितव्य. ह्या लेखांतून अनेक शास्त्रज्ञ, अनेक प्रयोग, अनेक नव्या संकल्पना समोर येतात. आपल्या विचारांना त्यामुळे चालना मिळते. पस्तीस आणि चाळीस सेल्सियस तापमानाच्या दरम्यान पाणी अत्यंत अस्थिर वागते. माणसाच्या शरीराचे तापमान नेमके याच तापमानाच्या टप्प्यात असते. हा केवळ योगायोग मानायचा का? (७) पृथ्वीवर सापडणाऱ्या सुमारे ११० मूलद्रव्यांपैकी फक्त सोळा द्रव्येच सजीवांचे शरीर घडवितात. त्यांच्या क्रमवारीचे संयुग साखळ्या (कंपाउंड चेन्स) बनविल्या जातात. बुरशीपासून देवमाशापर्यंत सर्वांच्या बाबतीत हाच प्रकार होतो. (९) विशिष्ट क्रमवार मांडणीने होणारी सजीवांची निर्मिती हा एक चमत्कारच आहे. मांजराचे कान इतके तीक्ष्ण असतात की त्यांचे वर्णन हाय फिडेलिटी इक्विपमेंट असे करता येईल. (११) डॉ. सेमिअन किर्लेअन यांनी मानवी शरीराभोवती असणाऱ्या तेजोवलय कोषाचा फोटो घेणारे तंत्र विकसित केले. (८९) हाताच्या पृष्ठभागावरचे किरणांचे पुंज या यंत्राद्वारे दिसल्यावर डॉ. मिखाईल गायकिन यांना अ‍ॅक्युपंक्चरच्या उपचारबिंदूच्या नकाशाशी ते जुळतात असे आढळून आले. (९०) चरक व सुश्रुत यांनी मानवी शरीरावरील १०७ मर्मबिंदूंची नोंद केलेली आहे. (९१) टोबिस्कोप या यंत्रामुळे बायोप्लाझ्मा (सूक्ष्मदेह), तेजोवलय (ऑॅरा) आणि अ‍ॅक्युपंक्चर व शियात्सू या उपचार पद्धतीत एक नवीनच दुवा निर्माण झाला आहे. (९२) सूक्ष्मदेह व तेजोवलय दोहोंना जोडणारे मन शरीरात कुठे आहे? अंतर्मनात अनेक सुप्त भावना दाबून ठेवल्या जातात. कारणपरत्वे त्यांचा एकाएकी उद्रेक होतो, तेव्हा मनोगतिकीच्या घटना घडून येतात. त्यांना भानामती असे मानले जात असावे असे डॉ. नांदोर फॉडोर हे मनोविश्र्लेषणतज्ज्ञ मानतात. (९५) डॉ. जेनेडी सर्जेयेव्ह यांनी म्हटले आहे की अत्यंत गाढ झोपेत वा समाधी अवस्थेत मेंदूतून प्रतिसेकंद चार लयीत ह्रदयाचे ठोके स्पंदन पावत असतात. त्यांना थिटा लहरी म्हणतात. (९६) जपानमध्ये १९१०-१९१३ या अवधीत टोमाकिशी फुकुराई याने सीलबंद फोटोप्लेटवर आपल्या मनातील विचारांचे छायाचित्र उमटवून दाखविण्याचा प्रयोग केला. (९८) निरनिराळ्या भाषांतील शब्दोच्चारणाची पद्धत व त्यातून निर्माण होणारे ध्वनी लक्षात घेऊन जागतिक ध्वन्यानुसारी (फोनेटिक) वर्णमाला तयार करण्यात आली. (५६) विश्वातील सर्व अणू हे कंपनशील आहेत आणि एखाद्या गोलाकार घंटेप्रमाणे सतत नादनिर्मिती करीत असतात. परमाणू हे स्वरसमूह आहेत. सजीवांचे शरीर हे एक वाद्य आहे. त्यातून सतत संगीत बाहेर पडत असते. ‘सिंफोनी ऑफ लाइफ’ या ग्रंथात डॉ. डोनाल्ड अँड्र्यू यांनी ही कल्पना मांडली आहे. (५७) दूर अंतरावरून, स्पर्श न करता दिवा पेटवता येतो हा प्रयोग १९३०-३१ साली डॉ. हॅरी प्राइस यांनी मार्गारेट एलिन या महिलेबाबत करून दाखवला. (६७) नेलिया मिखाइलोव्हा या महिलेने स्लाइसच्या चळतीकडे रोखून पाहिले. त्यातील एक स्लाइस बाहेर पडून नेलियाच्या दिशेने सरकत गेली - ही रशियातील साहित्यिक लेव्ह कोलोनी आणि व्हादिन मरीन यांनी नोंदवलेली कहाणी. (७५) नेलियाचे विद्युत चुंबकीय क्षेत्र इतरापेक्षा अधिक शक्तिशाली होते. केवळ नजरेने अंड्याचा पांढरा व पिवळा भाग अलग केला. (७७) लहान मेंदूच्या खालील भागात कल्पिलेले आज्ञाचक्र (थॅलॅमाय) हे अत्यंत महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असन कुंडलिनी जागृती करणारे साधक त्याला शिवाचे स्थान मानतात. (७७) प्रत्येक सजीवाच्या शरीराभोवती त्याचे स्वतःचे असे एक स्थितिज विद्युत क्षेत्र (स्टॅटिक इलेक्ट्रिकल फील्ड) असते. गूढ विद्यासाधक हे तेजोवलय कोष पाहू शकतात वा तसा दावा करतात. (८३) डॉ. ऑस्कर बॅग्नल आणि डॉ. वॉल्टर क्लिनर यांनी त्यावर प्रयोग केले. (८४) शरीरातील सर्वात महत्त्वाची चेतासंस्था दिवसाकाठी तीन ग्रॅम पोटॅशियम उपयोगात आणते. आक्र्टिक व अंटार्टिक प्रदेशात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या शास्त्रज्ञांच्या बाबतीतही हेच प्रमाण आढळते. यावरून पृथ्वीचे दिनमानचक्र आणि मानवी शरीराच्या क्रिया यांचा संबंध लक्षात येतो. (१३) पहाटे चार वाजता मातेचे शरीर कमाल शिथिल अवस्थेत असते. त्याच वेळेस जन्मणाऱ्या बालकांचे प्रमाण जास्त आढळते. पहाटे शरीर क्रिया मंदावलेल्या असल्याने गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस ही वेळ निवडतात. सर्वाधिक मतिमंद मुले डिसेंबर-जानेवारी या कालावधीत जन्मलेली दिसतात. मे-जून मध्ये जन्मलेल्या मुलांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आढळतो. डॉ. हॅटिंग्टन व डॉ. हेन्री नॉब्लॉक यांचे संशोधन. (१४) शुक्ल पक्षात चंद्रकला वाढताना व पौर्णिमेला केलेल्या शस्त्रक्रियांच्या वेळी हजारपैकी ८७० रुग्णांना रक्तस्राव जास्त होतो. (१९) अमावास्येच्या आसपास केलेल्या शस्त्रक्रियांत अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो म्हणून ते दिवस शस्त्रक्रियांसाठी वापरावे असे डॉ. एडसन अँड्र्यू यांचे मत आहे. (२०) चोरी, उचलेगिरी, आततायी बेदरकार ड्रायव्हिंग, अतिरिक्त नशापान, इ. गुन्हे पौर्णिमेच्या दिवशी अधिक घड़तात, असे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेटॉलॉजीच्या अहवालात दिले आहे. (२०) जन्मलग्नी शनि-मंगळाशी निगडित असलेल्या व्यक्ती वैद्यकीय व्यवसायात जास्त आढळतात असा डॉ. मायकेल गॉकिलिन यांनी निष्कर्ष नोंदवला आहे. (२६) कर्करोग होण्यापूर्वी शरीराच्या अवयवांच्या विद्युतभारात लक्षणीय बदल घडून येतात असे डॉ. हॅरॉल्ड बर (येल युनिव्हर्सिटी) यांनी जाहीर केले. (३९) संपूर्ण शरीरात एकदिश विद्युत प्रवाह आहे. मात्र चेतासंस्थेतून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी वेगळ्या आहेत. सजीवाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र हे एकात्मीभूत कार्यतंत्र आहे आणि सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर देखील ते काही काळ मागे उरते असे डॉ. एडवर्ड रसेल यांना आढळून आले. (४१) ‘नियतीची संकल्पना’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र म्हणजे तर आत्मा नव्हे ना? पिरॅमिडच्या विशिष्ट रचनेमुळे खाद्यपदार्थ काही काळ तसेच टिकून राहतात. पिरॅमिडच्या आत ठेवलेली विद्युत उपकरणे कोणताही बिघाड न होता बंद पडतात असे डॉ. अमर गोहेड यांना आढळून आले. (५१) गोल, चौकोनी व दंडगोलाकृती डब्यापेक्षा मधे फुगीर असणाऱ्या पिंपात दारू वा बीअर स्वादिष्ट बनते. (५१) बुरशीसारखे सूक्ष्म जीवजंतू व मानवासारखा विकसित गुंतागुंतीचा देह यांच्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडस एकाच पद्धतीने निर्माण होतात. निसर्गात आढळणाऱ्या विविध आकृतिबंधांच्या शास्त्राला ‘सायमॅटिक्स’ हे नाव आहे. (५४) कंपनलहरी व त्यांच्या प्रभावामुळे घडवली जाणारी आकृती यांतील कार्यकारणभाव लक्षात घेऊन डॉ. हान्स येनी चांनी टोनोस्कोप हे यंत्र बनवले. ध्वनिलहरींची त्रिमिती आकृती रेखाटणारे हे साधन आहे. (५५) ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more