* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A SERIES OF STORIES BASED ON THE IDEA THAT THE POLICE FORCE AND THE SCIENTIST WORK TOGETHER TO INVESTIGATE THE CRIMES. EACH STORY IS DIFFERENT, EACH HAS A DIFFERENT SET UP, YET ALL THE STORIES ARE RELATED TO AMRITRAO AND KAUSHIK. THE SALIENT FEATURE OF THESE STORIES IS THE SOLUTIONS FOR ALL THE PUZZLES WITH THE HELP OF SCIENCE AND TECHNOLOGY. ALL THE STORIES SUCCEED IN CREATING A SUSPENSE, THE CRIMES RESULTING INTO SOME TENSION, DOUBT, THE SCEPTICAL ENVIRONMENT THAT COMES ALONG WITH IT, EACH MAKING US THINK "WHAT NEXT?` EVEN THOUGH SERIOUS BY NATURE THESE STORIES HAVE A WONDERFUL BLEND OF HUMOUR WHEN AMRITRAO AND KAUSHIK ARE AROUND. THESE TWO THOUGH ARE DR. BAL PHONDKE`S CREATION AND ARE BASICALLY POLICE, THEY ARE SHOWN TO BE VERY SENSITIVE IN NATURE, NO WONDER THE READERS FIND THEM CLOSE TOO.
पोलीस आणि वैज्ञानिक यांनी एकमेकांच्या सहकार्यातून लावलेला गुन्ह्यांचा शोध ही मध्यवर्ती कल्पना मनात ठेवून लिहिलेली मालिका म्हणजेच हा कथासंग्रह. प्रत्येक कथा वेगळी, तिचं सूत्र वेगळं; तरीही या सर्व कथांना जोडणारा समान दुवा म्हणजे अमृतराव आणि कौशिक. ‘वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे उलगडत जाणारी कोडी’ हे या कथांचे खास वैशिष्ट्य! कथेत घडणारे गुन्हे, खून, त्यामुळे निर्माण होणारे गूढ, रहस्यमय वातावरण यातून पुढे काय होणार? ही उत्कंठा तगवून ठेवण्यात सर्वच कथा यशस्वी ठरतात. गंभीर विषय असूनदेखील कौशिक आणि अमृतरावांची मिष्कील जुगलबंदी चांगलीच रंगते. डॉ. बाळ फोंडके यांचे हे मानसपुत्र केवळ पोलीस न ठरता दोन संवेदनाशील व्यक्तिमत्त्वे म्हणूनही वाचकाला जवळची वाटू लागतात, हे या कथासंग्रहाचे खरे यश!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BALPHONDAKE #KHIDAKILAHIDOLEASATAT#DRUSHTIBHRAM #KARNAPISHACCHA#SUGARANICHVIDNYAN #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK GAONKARI 30-1-2011

    पोलीस आणि वैज्ञानिक यांनी एकमेकांच्या सहकार्यातून लावलेल्या गुन्ह्यांचा शोध ही मध्यवर्ती कल्पना मनात ठेवून डॉ. बाळ फोंडके यांनी हा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. या कथासंग्रहात घडणारे विविध गुन्हे, खून, गूढ उकलण्यासाठी लेखकाने अमृतराव आणि कौशिक या दोनकाल्पनिक व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे उलगडत जाणारी कोडी हे या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे. कथांमध्ये रहस्यमय वातावरण निर्मिती करून वाचकांची उत्कंठा तगवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. तसेच गंभीर विषय असून देखील कौशिक आणि अमृतरावांच्या मिश्किल जुगलबंदीचा देखील वाचकांना आनंद मिळतो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर पूर्ण होईपर्यंत सोडवतच नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK YUVAMANAS 29-3-2010

    डॉ. गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके हे व्यावसायिक शास्त्रज्ञ आहेत. त्यांची अनेक पुस्तके, शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. ‘चिरंजीव’, ‘उद्याचे वैद्यक’ आणि ‘कॉम्प्युटरच्या करामती’ या पुस्तकांना महाराष्ट शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. त्यांचे ‘कर्णपिशाच्च’ हा गुनहेगारीचा शोध वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कसा घेतला जातो याचा कथासंग्रह. या कथासंग्रहात बारा कथा असून अमृतराव आणि कौशिक ही दुक्कल गुन्हेगारांचा शोध विज्ञानाच्या साहाय्याने घेते. पोलीस आणि वैज्ञानिक एकत्र आले तर काय घडू शकते याचे चित्रण या कथासंग्रहात येते. उत्कंठा ताणून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. त्याचबरोबर कौशिक अमृतरावांची जुंगलबंदीही चांगलीच रंगते. बाळ फोंडके यांचे हे मानसपुत्र केवळ कर्तव्यदक्ष अधिकारी व्यक्ती न राहता संवेदनशील व्यक्तिमत्त्वे म्हणून वाचकांच्या जवळ येतात. कर्तव्य आणि माणुसकी याची योग्य ती सांगड विज्ञानाच्या दृष्टिकोन आाणि गुन्हेगारांना शोधण्याची पद्धत या सर्वांमुळे हा कथासंग्रह वाचनीय ठरतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book