* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INTIMATE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663198
  • Edition : 18
  • Publishing Year : MARCH 1980
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OUT OUR LIFE EACH ONE OF US ENVIES SOME ONE OR THE OTHER IN SOME FORM. EVERY ONE OF US ALWAYS HAVE A FEELING THAT SOMETHING THAT WE DESERVE THE MOST IS BEING GIVEN TO SOMEONE ELSE, WHO IS NOT SO DESERVING. THIS VERY THOUGHT KILLS US. THE FACT THAT THIS SECRET CANNOT BE SHARED WITH ANYONE IS WORSE THAN THE NAGGING FEELING ITSELF FOR THESE PEOPLE WHO ARE SUFFERING THE MOST WITH THE DISEASE OF ENVY, I OPENED A CLUB, `DILASA MANDAL` OR `RELIEF CLUB`; WITH THE ONLY INTENTION OF PROVIDING AN OUTLET FOR THE VENOM SO FILLED UP IN THEIR MIND. THE PEAK PERIOD OF THIS CLUB IS EITHER THAT OF THE `SAHITYA SAMMELAN AND NATYA SAMMELAN` OR THE PERIOD WHEN THE `SAHITYA PURASKARS` ARE AWARDED. BUT THE ONLY CONDITION FOR THE ADMISSION IS PEOPLE SHOULD BE REALLY JEALOUS OF SOMEONE, THOSE WITH NO JEALOUSY GET NO ADMISSION AT ALL. THE MOST SALIENT FEATURE OF VA PU`S WRITING IS THAT HE UNDERSTANDS ALL THE GOOD AND BAD FEELINGS IN EVERYONE`S MIND AND FURTHER TRIES TO PUT THEM INTO SIMPLE YET EFFECTIVE WRITINGS WITH HIS `MIDAS TOUCH`. HE CONSIDERS LIFE WITH EARNEST ZEAL, ENTHUSIASM AND A POSITIVE APPROACH. HE IS ALWAYS HOPEFUL IN THE MOST HOPELESS SITUATIONS. HE NOT ONLY PRESENTS THE VERY GOOD IN LIFE AROUND HIM BUT WITH THE SAME INTENSITY AND INTIMACY PRESENTS THE EVIL OF THOSE OTHERWISE INNOCENT MINDS, WHICH ASTONISHES THE READER EVERY TIME HE READS ONE OF VA PU`S STORIES. `INTIMATE` IS NO EXCEPTION TO THIS RULE.
अभिनव कल्पनांच्या सहाय्यानं मानवी स्वभावाचं बहुरंगी दर्शन, ‘‘... प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत, ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय, ह्याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी, की हे कुठं बोलता येत नाही! त्यासाठी मी ‘दिलासा मंडळ’ स्थापन केलं. मनातली सगळी मळमळ त्यानं इथं ओकायची..... याचे वर्गणीदार वाढण्याचा सीझन म्हणजे साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, साहित्य पुरस्कार जाहीर होतात, तो काळ..... इथं ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सरी माणसं हवीत....’’ माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बऱ्यावाईट स्वाभाविक भावना उदार अंत:करणानं समजून घेणं आणि आपल्या खास नर्ममुलायम, मिस्कील शैलीत त्या आविष्कृत करणं, हा श्रेष्ठ कथालेखक वपु काळे यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष. मुळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच प्रसन्न, आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे आविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते. अभिनव कल्पनांच्या सहाय्यानं मानवी स्वभावाचं बहुरंगी दर्शन, ‘‘... प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत, ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय, ह्याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी, की हे कुठं बोलता येत नाही! त्यासाठी मी ‘दिलासा मंडळ’ स्थापन केलं. मनातली सगळी मळमळ त्यानं इथं ओकायची..... याचे वर्गणीदार वाढण्याचा सीझन म्हणजे साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, साहित्य पुरस्कार जाहीर होतात, तो काळ..... इथं ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सरी माणसं हवीत....’’ माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बऱ्यावाईट स्वाभाविक भावना उदार अंत:करणानं समजून घेणं आणि आपल्या खास नर्ममुलायम, मिस्कील शैलीत त्या आविष्कृत करणं, हा श्रेष्ठ कथालेखक वपु काळे यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष. मुळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच प्रसन्न, आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे आविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते. अभिनव कल्पनांच्या सहाय्यानं मानवी स्वभावाचं बहुरंगी दर्शन, ‘‘... प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत, ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय, ह्याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी, की हे कुठं बोलता येत नाही! त्यासाठी मी ‘दिलासा मंडळ’ स्थापन केलं. मनातली सगळी मळमळ त्यानं इथं ओकायची..... याचे वर्गणीदार वाढण्याचा सीझन म्हणजे साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, साहित्य पुरस्कार जाहीर होतात, तो काळ..... इथं ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सरी माणसं हवीत....’’ माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बऱ्यावाईट स्वाभाविक भावना उदार अंत:करणानं समजून घेणं आणि आपल्या खास नर्ममुलायम, मिस्कील शैलीत त्या आविष्कृत करणं, हा श्रेष्ठ कथालेखक वपु काळे यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष. मुळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच प्रसन्न, आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे आविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    तऱ्हेवाईक माणसांच्या अंत:करणातले निर्व्याज प्रांजपण... ‘इन्टिमेट’ या कथासंग्रहात फ्रॉम कमिशनर्स डेस्क, जावडेकर बोला, केव्हाही बोलवा, ड्रीम सिक्वेन्स, बिरबलाची आणीबाणी, प्रोव्हिजन, मोदी अँड मोदी, जे फॉर, आणि इन्टिमेट अशा नऊ कथा आहेत. वपु काळे यांच्य कथेतील माणसे चारचौघांसारखी सामान्य संसारीच असतात; पण ती काही बाबतीत चमत्कारिक किंवा तऱ्हेवाईकही वागणारी असतात. मात्र त्या तऱ्हेवाईपणामागे त्यांचे स्वत:चे असे खास तर्कशास्त्र असते; आणि वाचकांनाही ते पटण्यासारखे असते. कारण त्या त्या पात्रांच्या मानसिकतेचा उलगडा त्यामुळे होतो; त्या वर्तनामागचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण वा रहस्य त्यातून प्रकट होते. अशा रहस्याचा भेद करणे हे वपुंच्या कथाकथनाचे विलोभनीय बलस्थान असते. किंबहुना असे काहीतरी मानसशास्त्रीय व वर्तनशास्त्रीय वेगळेपण वाचक-श्रोत्यांच्या मन:पटलावर बिंबवण्यासाठीच वपु आपल्या कथा-कादंबऱ्यांचे डोलारे उभे करीत असतात. ‘इन्टिमेट’ या संग्रहातील कथांमध्ये अशी तऱ्हेवाईक वागणारी अनेक पात्रे भेटतात. शेजारी म्हणून नव्यानेच रहायला आलेल्या विचारे यांना पहिल्याच दिवशी पहाटे कथानिवेदक म्हणतो, ‘‘आज प्रथम माझे तोंड पाहत आहात. दिवस कसा गेला ते रात्री कळवा.’’ आणि रात्री बारा वाजता विचारे या ‘मी’ला गाढ झोपेतून उठवतात आणि मूठभर पेढे देतात; वर रोज पहाटे मला तुमचे दर्शन द्याल का असे विचारतात, कारण त्यांना तो दिवसा फारच शुभ गेलेला असतो. ‘‘रात्री असं रोज रोज उठवणार नसलात तर पहाटे दर्शन देईन असे ‘मी’ म्हणतो. आणि पुढे नऊ वर्षे रोज पहाटे हा शेजाऱ्याला दर्शन देण्याचा परिपाठ अविरत चालतो. (इन्टिमेट). हा मी म्हणजे कथानिवेदक ‘काळे’, म्हणजे कथाकथनकार वपु हेही कथेत स्पष्ट सांगण्यात येते. हे विचारे एके दिवशी आत्महत्या करतात. त्यांच्या मागे त्यांचे पत्र सापडते : ‘‘मी राजीखुशीनं आत्महत्या करीत आहे... गेले महिनाभर हा विचार मनात होताच. सौभाग्यवतीला मुद्दाम माहेरी पाठवलं आहे. माझ्या बाबतीत कोणतीही माझी माहिती माझे इन्टिमेट स्नेही काळे यांनी विचारावी.’’ या पत्रातील ‘इन्टिमेट’ हा शब्द काळे यांना छळत राहतो. विचारे यांनीच त्याबद्दल म्हटले होते, ‘‘मराठी भाषा रांगडी आणि कर्कश आहे. जीवश्च कंठश्च अशी ओळख करून देताना काहीतरीच वाटतं म्हणून साहेबाचा शब्द - इन्टिमेट - हा पळवावा.’’ मग वपुंना हा शब्द आता का छळतो? कारण खरोखर नऊ वर्षे शेजारी राहूनही आणि रोज पहाटे दर्शन सोहळा होऊनही आपल्याला विचारे यांच्याबद्दल फारशी माहिती नाही हे पोलीस चौकशी करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते. ... पण ही गोष्ट केवळ काळ्यांच्याच बाबतीत होते असे नव्हे. काळे दुसऱ्या शेजाऱ्याला विचारतात, ‘‘दळवी, तुम्ही सहा वर्षे काही मित्रांबरोबर रमी खेळताय. सांगा, किती मित्रांच्या बायकांची माहेरची नावं तुम्हाला माहीत आहेत?’’ तेव्हा दळवीही निरुत्तर होतात. जेलसी (मत्सर) या भावनेचा निचरा करणारी एक कथा वपुंनी लिहिली आहे. ‘जे फॉर’ मधील टिपणीस हा कथानिवेदकाचा शाळेपासूनचा वर्गमित्र. त्याचे वर्गशिक्षक त्याला म्हणतात, ‘‘या वयातच तुला कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही हे ठीक नाही... तू कायमचा दु:खी होशील. दुसऱ्यांचं वाईट चिंतितो, तो कधी यशस्वी होत नाही.’’ तो लेखकालाही सांगतो, ‘‘आपल्या सर्व वर्गबंधूमध्ये मीच जास्त यशस्वी होणार... माझा सिक्स सेन्स मला ते सांगतो.’’ टिपण्या बोलायचा तसं व्हायचं. चांगलं नाही; तर वाईट. त्यामुळं लोक त्याला टाळत... हा टिपणीस मोठेपणी लेखकाला भेटतो. व्हिजिटिंग कार्डवर टिपण्या असे टोपणनाव बघून लेखकाला हसू आवरत नाही. पासपोर्ट ऑफिसमध्ये तो बऱ्यापैंकी पदावर असतो. कार त्याला कशी परवडते असा प्रश्न लेखकाला पडतो. हा टिपण्या लेखकाला सांगतो,‘‘अन्न, वस्त्र, निवारा यासारख्याच माणसाच्या काही गरजा असतात. प्रेम, संताप, संशय या गोष्टी व्यक्त करता येतात. पण त्यांनाही मागं सारणारा एक विकार आहे. तो आतल्या आत दाबून जन्मभर हसण्याचं नाटक माणसांना करावं लागतं. मत्सर व्यक्त करायची संधी मिळाली तर अनेक लोकांना सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जाण्यापासून वाचवता येइल... माझं मुख्य सामाजिक कार्य त्याच्याशी संबंधित आहे. प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कोणाला तरी मिळतंय याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी की हे कुठं बोलता येत नाही. त्यासाठी मी एक दिलासा मंडळ स्थापन केलंय. आपल्याला मत्सर वाटतो हे सांगणाऱ्यांचंच हे मंडळ आहेत... साडेतीन हजार आमचे मेंबर्स आहेत. ही संस्था बुडणार नाही. कारण ही मत्सरावरच चालणारी संस्था आहे. इथे ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सर करणारी माणसं हवीत.’’ हा टिपण्या मत्सर व्यक्त करण्यासाठी जागा हवी म्हणून एक बार सुरू करतो. ड्रिंक्स घेतल्यावर माणसांचा संकोच कमी होतो. मत्सर व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून मानसशास्त्र व संज्ञापनशास्त्र यातील जाणकार स्टाफ तेथे नेमतो. बहुतेक माणसांचा मत्सर हा विनाकारण असतो. त्यांना मोकळेपणाने बोलायला मिळाले की ते नॉर्मलवर येतात. सकारण मत्सर करणाऱ्यांनाही दिलासा मंडळ न्याय मिळवून देते. उदाहरणार्थ, एखाद्याला प्रमोशन मिळायला हवे, पण त्यात कोणीतरी आडवा येत असतो. अशावेळी त्याच्या वतीने शब्द टाकणे. — आता स्वत: कथानिवेदकच प्रमोशनला ‘ड्यु’ असतो. आणि त्याची स्पर्धा त्याच्या चुलतभावाशीच असते. तेव्हा टिपण्याला एक नवा मेंबर मिळणे क्रमप्राप्तच ठरते. ही हकीकत आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याला सांगून नंतर निवेदक म्हणतो, ‘‘मला त्या टिपण्याचा विलक्षण मत्सर वाटतोय.’’ हे वाक्य उच्चारल्यावर त्याला एकदम हलकं वाटायला लागतं. आपण आणि टिपण्या यांच्यात काही फरक नाही असे जाणवते. ‘जे फॉर’ मध्ये अशा प्रकारे जेलसीकडे, मत्सराकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन वपु मांडतात. ट्रॅजेडीने कॅथार्थिस होते, तसेच या कथेने मत्सर या भावनेचे विरेचन होते, असे म्हणता येईल ‘मोदी अँड मोदी’ या गाजलेल्या कथेतील पारशी बॉस म्हणजे मोदी हा प्रेमळ आहे. बॉस म्हणून तो स्वत: भरपूर काम करतो, आणि कर्मचाऱ्यांकडून भरपूर कामाची अपेक्षा ठेवतो. आपल्या ऑफिसमधल्या मिस देशपांडेचे लग्न पैशामुळे लांबणीवर पडलेय हे कळताच तिला तीस हजार रुपये देऊन तिचे लग्न व्हावे अशी व्यवस्था करतो. पण नंतर तिच्याकडे एक चमत्कारिक मागणी करतो, ‘‘हनीमूनला गेल्यावर नवऱ्याबरोबर रात्री होणाऱ्या गप्पा टेप करून, त्याची कॅसेट आणून द्यायची.’’ नंतर तिला कळते की मोदीने मधुचंद्राच्या पहिल्या रात्रीच्या टेप्स इतर कर्मचाऱ्यांकडूनही घेतलेल्या आहेत. काहीजणांकडून नवराबायकोच्या भांडणाच्या टेप्सही घेतलेल्या आहेत.... या टेप्स मोदी कोणाला ऐकवत असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. ....आणि शेवटी आपल्या पत्नीच्या मृत्यूने विदीर्ण झालेला मोदी या सर्वांच्या टेप्स परतही करतो. त्याबरोबर स्वत:च्या आवाजातली एक टेपही सर्वांना ऐकवतो. त्यात त्या सर्वांच्या टेप्सनी आपल्याला आनंद दिला, आयुष्यातल्या एका त्रुटीची पूर्तता या टेप्समुळे झाली असे म्हणून आभार मानलेले असतात. ही त्रुटी काय असेल? तर त्याची बायको ही मूकबधिर असते आणि त्याला पत्नीशी भांडण वा शृंगार, मुलांशी सुखसंवाद वगैरे करण्याची संधीच मिळालेली नसते... महापालिकेच्या रुग्णालयातील औषधांच्या चोऱ्या, विशिष्ट कंपन्यांच्या औषधांचीच शिफारस, भरमसाट औषध योजना, वगैरे बाबींचा पर्दा फाश ‘फ्रॉम कमिशनर्स डेस्क’ या कथेच्या माध्यमातून केला गेला आहे. त्यातही वपु मेडिसिन स्टोअर्सचे इनचार्ज पेंडसे यांची वैचित्र्यपूर्ण व्यक्तिरेखा रंगवतात. तोंडात चांदीचा चमचा म्हणजे ‘सिल्व्हर स्पून इन माउथ’ घेऊन काहीजण जन्माला येतात तसे पेंडसे वळलेल्या मुठीत एखादी कॅप्सुल घेऊन जन्माला आले असावेत असे लिखिते यांना वाटते. ते कायम स्टोअर्सच्या बेसमेंटमध्ये दिसतात. त्यांना स्वत:चं असं आयुष्य नसतंच. घरीही पेंडसे अबोलच असतात. फक्त सणावारी बोलतात, अशी त्यांची ख्याती. ‘‘फ्लॅटरी किंवा खोटं बोलणं यासाठी वाचेचा उपयोग करू नये,’ असे ते मानतात. ते पेंडसे औषधांच्या चोऱ्या वॉर्डबॉय किंवा कंपाउंडर नव्हे तर डॉक्टरमंडळीही करतात यावर प्रकाश टाकतात. महागडी औषधं फुकट मिळवून पेशंट ती घेऊन डॉक्टर्सना नेऊन देतात, अशीही उदाहरणे ते देतात... एका कटू सामाजिक समस्येचे कथेच्या माध्यमातून वपु असे सादरीकरण करतात आणि संबंधितांच्या डोळ्यात अंजन घालतात. जावडेकर नावाचे गृहस्थ वपुंना य. गो. जोशी – वि. वि. बोकील यांच्या पंक्तीत बसवून समाजासाठी निव्वळ लेखनापलीकडे आणखी काही करण्याची गरज आहे असे पत्राने कळवून भेटीची वेळ मागतात. जावडेकर आपल्या एकवीस वर्षाच्या मुलीसाठी स्थळ सुचवा असे त्यांना सांगतात. संसारात कुणाचं काय चुकतं हे सांगण्यात लेखकांनी आयुष्य घालवण्याऐवजी दोन अनुरूप व्यक्तींना एकत्र आणून आदर्श पतीपत्नीच्या जोड्या समाजासमोर पेश कराव्या असे जावडेकर म्हणतात तेव्हा त्या प्रयत्नातून एक नवेच सामाजिक वास्तव पुढे येते. .... शेवटी कथालेखक वपु म्हणतात, ‘‘जावडेकर, कथा ह्या वेदनेची होते. तुमच्या आमच्या क्षुल्लक मानापमानाची होत नाही.’’ मनस्वी जीवन जगू पाहणाऱ्या व्यक्तीची विशिष्ट मानसिकता किंवा सामाजिक वास्तवाचे एखादे अनोखे रूप वपुंच्या प्रत्येक कथेत दिसते. जीवनाबद्दलची आस्था, विविध व्यक्तींच्या संदर्भातील जिज्ञासा, संवाद साधण्याची मनोमन आवड या सर्वातून वाचकाला काहीतरी वेगळं सांगण्याची वपुंची कुशलता या कथांना वाचकांच्या भावजीवनात अढळपणे स्थानापन्न करते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 14-07-2002

    संवादोत्सुक कथा… कथा या वाङ्मयप्रकाराचा कौटुंबिक कथा हा जर एक उपप्रकार मानला, तर त्या कथांच्या सदंर्भात कथाकार व. पु. काळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. खास मध्यमवर्गीय संसारकथा म्हणजे व. पु असं समीकरण मांडायला अजिबात हरकत नाही, इतक्या विपुल संख्यनं व. पुं. नी ‘आंबटगोड’ कुटुंबकथा लिहिल्या. माणसांमध्ये वाढत चाललेला विसंवाद, एकलेपणा व. पुं. च्या कथांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येतं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या पुस्तकांची नवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ‘मोदी अ‍ॅण्ड मोदी’ ही टी.व्ही.वर गाजलेली कथा ‘इन्टिमेट’ मध्ये आहे. या संग्रहाची ही चौथी आवृत्ती. ‘केव्हाही बोलवा’ ही कथा माणसाची दुसऱ्याच्या उपयोगी पडणारी वृत्ती महानगरी जीवनामुळे कशी झाकोळून जाते आहे, याचं दर्शन घडवते. व.पुं.चं मानवी स्वभावाचं निरीक्षण आणि अभ्यास किती पक्का होता. हे सांगणारी ‘जे फॉर...’ ही कथाही या संग्रहात आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book