* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IGIN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664065
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEO MORE COMBO SET - 19 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORIES BY MAHADEV MORE HIGHLIGHT THE LIVES OF THE DOWNTRODDEN, OF THE LOWEST LOWER CLASS. SOME OF THEM HAVE A SERIOUS APPROACH WHILE SOME REFLECT HUMOUR. ON THE OUTSKIRTS OF THE VERY FEW MIDDLE CLASS PEOPLE LAYS THE VASE UNIVERSE OF THE WORKERS, DALIT, ETC. THESE STORIES ARE ALL ABOUT THEIR LIVES, THEIR STYLES, THEIR PROBLEMS, THEIR MOMENTS OF HAPPINESS, ETC. THE VERSATILITY OF SUBJECTS IS THE PECULIAR FEATURE OF THESE STORIES. THE AUTHOR HAS SPENT HIS LIFE WITH THEM, HE HAS LABORED ON THE FARMS, WORKED IN AN AUTOMOBILE WORKSHOP, DRIVEN A TAXI, RUN A FLOUR MILL. DURING THIS JOURNEY, HE CAME ACROSS MANY SEEDS FOR STORIES. HE HAS SOWN THEM AND NURTURED THEM. HIS STORIES ARE NOT JUST ENTERTAINING, THEY HAVE THE QUALITIES TO MAKE US STOP AND THINK ABOUT OTHERS. HE HAS NOT CAPTIVATED HIS LANGUAGE IN ANY OF THE ARTISTIC PRESENTATION. HIS WORDS ARE VERY SIMPLE. YET, HE HAS ADDED SUBSTANTIALLY TO THE MARATHI LITERATURE.
महादेव मोरे यांच्या ‘ईगीन’ या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखित करतात. काही गंभीर, तर काही गमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलितपददलितांचे, कष्टकयांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्षखेदाच्या, व्यथाविवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायिंव्हग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे व आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणाया ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणाया, विचार करायला लावणाया व काही वेळा त्याच्या गालांवर स्मितहास्याची रेषा फुलविणाया ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तिचित्रे हेही ह्या कथांचे सामथ्र्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 08-08-2004

    वास्तवतेचा स्पर्श असलेला कथासंग्रह : ईगीन महादेव मोरे हे नाव मराठी साहित्यात विपुल लेखनामुळे चांगलेच परिचित झाले आहे. कथा, कादंबरी आणि ललित लेखन करणाऱ्या मोरे यांचा ‘ईगीन’ हा नवा कथासंग्रह आहे. शोषित समाजाच्या व्यथा व वेदना मांडणाऱ्या कथांचा समावेश सलेले हे पुस्तक ग्रामीण वाचकाला आपलेसे करून टाकणारे आहे. या कथांमधील पात्रं त्यांच्या भाषेत बोलतात आणि विशेष म्हणजे, या कथांमध्ये काल्पनिकता नसल्यामुळे या कथा एका वेगळ्या वास्तव जगात घेऊन जातात. एकूण पंधरा कथांचा समावेश असलेल्या या पुस्तकात बेळगाव भागातील कानडीमिश्रित हिंदी व मराठी भाषा असून, त्या प्रदेशातील खास शब्दांचा वापर आलेला आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरातील माणसांच्या जीवनातील विविध बरे-वाईट अनुभव व अस्सल वास्तव जीवन चित्रित करतात. मोरे यांनी जीवनात बालपणी अनुभवलेल्या अनेक प्रसंगांना कथांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण या कथांमध्ये कुणाचेही अनुकरण नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. स्वत:चा वेगळा चेहरा घेऊन या कथा वाचकांपुढे प्रकट होतात. ग्रामीण भागातील चपखल शब्द, नवे नवे प्रयोग मराठी भाषेत मोरे यांनी या कथांमध्ये आणल्याचे दिसते. ‘पार्ट्या’ आणि ‘हिसका’ या दोन कथा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नेमके चित्रण करतात. पार्ट्या ही कथा सरपंच व आबा नाना या दोन व्यक्तींमधून रंगत जाते. ‘बेत’ ही कथा केवळ दागिन्यांच्या लोभापायी एका परिचारिकेची हत्या होते, पण यातील गुन्हेगार मात्र पुराव्याअभावी निर्दोष सुटतो, असे कथानक असणारी ही कथा गुन्हेगाराला शिक्षा होईलच, याविषयी साक्षंकता व्यक्त करते. तळागाळातील माणसांचे दु:ख मांडणे, हा या कथांचा स्थायीभाव असून, ‘रुक्की’ ही कथा अशाच प्रकारची आहे. गरिबीत जीवन जगणाऱ्या स्त्री व पुरुषांचे हाल कसे होतात, ते अत्यंत सूक्ष्मपणे लेखकाने टिपले आहे. जीवनात एखाद्या घटनेमुळे माणसाच्या चारित्र्याला डाग लागला, की तो शेवटपर्यंत जात नाही, असे म्हणतात. एक व्यापारीही अशाच वाईट घटनेमुळे तुरुंगात जातो; पण त्याच्या मुलांनाही त्याच्या या कृत्याचा त्रास होतो, असे सांगणारी ही कथा वाचकाला विचार कराला लावते. याशिवाय ‘लग्गा’, ‘जिगर’, ‘छडीटांग’, ‘जीव’, ‘अजुनी चालतोचि वाट’ या कथाही चांगल्या झाल्या आहेत. काही कथांमध्ये असलेले विनोदी किस्सेही रंगतदार झाले आहेत. मोरे यांची या पुस्तकातील कथा स्वतंत्र विचार मांडणारी आहे. त्यात बऱ्याच कथा शेवटी अपेक्षित उंची गाठतात. अनोखे जग या कथांमध्ये वाचकांपुढे लेखकाने उभे केले असून, समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकांना मराठी साहित्यात या कथांच्या माध्यमातून आणले आहे. विशेषत: कथांमधील पात्रांची नागर भाषा हे या कथांचे वेगळे वैशिष्ट्य असून ही माणसं उपमा व अलंकारिक शब्द वापरून मनोरंजनही करतात. एकूणच ‘ईगीन’मधील कथा वास्तवतेच्या स्पर्शामुळे वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाल्या आहेत. त्यामुळे नवीन कथा वाचू इच्छिणाऱ्यांनी हे पुस्तक वाचणे जरुरीचे आहे. -विलास पगार ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 07-11-2004

    तळागाळाच्या समाजजीवनाचे प्रतिबिंब… महादेव मोरे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक असून आतापर्यंत त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या व दोन ललित गद्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सांप्रतचा ‘ईगीन’ हा पंधरावा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहात १५ कथा समाविष्ट केल्य आहेत. आतापर्यंत मराठी साहित्यात अपवाद वगळता पांढरपेशा वर्गाचे चित्रण झालेले आहे. याला धक्का दिला दलित साहित्याने. याबरोबर मग ग्रामीण साहित्यही आकार घेऊ लागले. परंतु खेड्यातील कष्टकरी जनतेचे एक विशाल जग असते याची जाण फार थोड्या मराठी साहित्यिकांना आहे. यामुळे अशा लोकांचे हर्ष खेद दु:ख यांचे चित्रण साहित्यात झालेले नाही. ‘ईगीन’ हा कथासंग्रह हे जीवन उभे करतो. लेखकाला मोटर वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीतून राबणे यातून जो प्रत्यक्ष अनुभव आला त्याने तो आपल्या समर्थ लेखणीने कथांद्वारे फुलविला आहे. या कथांतील भाषा जिवंत व रसशीत आहे. लेखकाचे वास्तव बेळगाव जिल्ह्यात असल्यामुळे भाषेला कानडी-मराठीचा मृदगंध आहे. लेखकाने कथांमध्ये कलेचा संयम राखला असून कोठेही भडकपणा दाखविलेला नाही. तसेच तत्त्वज्ञान न सांगता ज्याला भावेल ते त्याने घ्यावे असे दर्शविले आहे. मराठीतील दुसरे एक साहित्यिक अनिल अवचट यांनीही आपल्या साहित्याद्वारे पीडित, शोषित लोकांची दु:खे मांडली आहेत. परंतु ती गद्यस्वरूपात आहेत. मोरे यांनी ती कथांद्वारे मांडली आहेत. दारिद्र्य आणि अज्ञान यामुळे खेड्यातील जनता तामसीवृत्तीची बनली आहे. आणि मग दारू पिणे, हाणामारी, फसवणूक आदी अनिष्ट गोष्टीत त्यांचा जीवनक्रम चालू असतो. ‘ईगीन’ आदी कथा याचे प्रत्यंतर आहे. लेखकाची शैली वैशिष्ट्यपूर्ण असून या कथातून उभी केलेली पात्रे स्वत:च्याच भाषेत बोलतात असे वाटते. व्यक्तिचित्रेही ठसठशीत आहेत. त्यामुहे हा कथासंग्रह तळागाळाच्या लोकांचा असूनही वाचावासा वाटतो. या ठिकाणी एक-दोन गोष्टींकडे लेखकाचे लक्ष वेधावेसे वाटते. ग्रामीण लोकांच्या दैनंदिन व्यवहारात मुखाद्वारे शिव्या सहजगत्या निघत असतात. या साहित्यात उमटाव्या का? कारण या कथांत दोन-तीन ठिकाणी अस्सल शिव्या वापरल्या आहेत, त्या टाळल्या असत्या तर बरे झाले असते. नाही तर कालांतराने मराठी साहित्यात शिव्या या ओव्या होऊन बसतील ही भीती. तसेच काही महत्त्वाच्या शब्दांना मराठी प्रतिशब्द जोडायला पाहिजे होते. मोरे यांनी उपेक्षित समाजातील लोकांवर आणखी कथा लिहाव्यात असे सुचवावेसे वाटते. संग्रहाला प्रा. अनंत मनोहर यांची मार्मिक प्रस्तावना लाभली आहे. कथासंग्रह केवळ वाचनीय नसून संग्राह्य असा आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 06-06-2004

    भणंग जगण्याच्या गोष्टी… अगदी सुरुवातीला मराठी लेखक हे पांढरपेशा मध्यमवर्गातले होते. त्यामुळे मराठी साहित्यात मध्यमवर्गाच्या जीवनाचे चित्रण होते. आपल्या लेखकांचे अनुभवविश्व खूपच मर्यादित आहे. हा आक्षेप सतत असायचा आणि काही अपवाद वगळता तो खराही होता. नतर मात्र मराठी साहित्यात अनेक नवे, जोरकस प्रवाह आले. ग्रामीण, दलित जीवन प्रतिबिंबित झाले आहे अशा अनेक चांगल्या कथा, कादंबऱ्या, आत्मकथने यांनी आपले भावविश्व व साहित्यविश्व समृद्ध केले. असे असूनही साहित्यावरचा ‘मध्यमवर्गीय’ हा छाप काही मिटत नाही. या प्रस्तावनचे कारण म्हणजे महादेव मोरे यांचा नवीन कथासंग्रह ‘ईगीन’. पंधरा कथासंग्रह, अठरा कादंबऱ्या इतके विपुल लेखन त्यांच्या नावावर आहे. ईगीनमधील कथा १९९२ ते १९९९ दरम्यान विविध मासिकांतून आधी प्रसिद्ध झालेल्या आहेत. महादेव मोरे यांनी स्वत: शेतमळ्यात मजुरी करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे अशा प्रकारे आपले आयुष्य झेललेले आहे. या खडतर जगण्यात जे अनुभव वाट्याला आहे. जे जगणे पहायला मिळाले, तेच या कथांमधून आपल्याला सांगितले आहे. काही कथा पात्राच्या आयुष्यातील एखाद्या अनुभवाचे चित्रण करतात तर काही कथा पूर्ण आयुष्याची चित्तरकथा रेखाटतात. ‘हौस’ या पहिल्या कथेत टुरिस्ट टॅक्सी चालवणाऱ्या बापलेकांच्या आयुष्यातील एक दिवस दाखवला आहे. पंधरा रुपयाच्या भाड्यासाठी हे बापलेक तीन ठिकाणी गाडी ओढ्यात टाकतात, रात्रभर उपाशी राहतात, धोका पत्करतात. परत येताना त्यांची गाडी ओढ्यात फसते, ती बाहेर काढायला त्यांना पंधरा रुपये लागतात. मिळालेले सगळे भाडे खर्च होते. हालअपेष्टा, मेहनत लक्षात घेतली तर तोटाच झाला. मग बाप मुलाला विचारतो, ‘हा असा धंदा आहे, आता हौस फिटली का?’ ‘अजुनी चालतेचि वाट’ ही तरल, भावस्पर्शी ग्रामीण कथा लिहिणाऱ्या एका लेखकाची गोष्ट. साहित्य वर्तुळातील लोकांना ती कोणावर आधारित आहे हे सांगता येईल. पण वाचकांना लेखनाचे एक तत्व माहित होते. लेखकांचे लिखाण त्यांच्या अनुभवावर आधारित असते. पण तो अनुभव गाळून घ्यावा लागतो. अनेक फेरफार करावे लागतात. खेड्यातील गटबाजी, आपापसातील भांडणे यावर आधारित ‘पार्ट्या’ व ‘हिसका’ या दोन कथा आहेत. दोन्ही कथेत भांडणारी विरुद्ध बाजूंची जी दोन प्रमुख पात्रे आहेत. त्यांचा मुलगा व मुलगी मात्र पळून जावून लग्न करतात आणि आपल्या वडिलांचे गावात हसे करतात. ठसठशीत व्यक्तिरेखा उभ्या करणे हे मोरे यांचे ठळक जाणवणारे वैशिष्ट्य. भाषाशैली चांगली आहे. नगर वा ग्रामीण दोन्ही भाषा वापरलेल्या आहेत. निवेदन बहुधा नागर वा ग्रामीण दोन्हा भाषा वापरलेल्या आहेत. निवेदना बहुधा नागर भाषेत आहे. ग्रामीण भाषाही आपल्याला समजणारी आहे. ‘ईगीन’ म्हणजे विघ्न-संकटे असा एखाद्या माहीत नसलेल्या शब्दाचा अर्थ पटकन कळतो. चार-पाच कथांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व कथा आत्यंतिक दारिद्री माणसांच्याच आहेत. हे जगणेच निरर्थक, अगदी हीन पातळीचे जगणे ही शोकांतिका आणि मरण म्हणजे सुटका या व्यक्तिरेखांचे काय मनोव्यापार, मनोविश्लेषण रंगवणार? लेखकाने सर्व कथा, गोष्ट सांगणे या पातळीवर ठेवल्या आहेत. पात्रांच्या स्थितीचे, दु:खाचे कढ आणणारे वर्णन नाही. सामाजिक प्रश्नांची पात्रांकरवी चर्चा नाही. सामाजिक भाष्य नाही, जातीव्यवस्थेला दूषणे देणे नाही. तत्वचिंतन नाही, नैतिक मूल्यांचा बडेजाव नाही. डाव्या किंवा तत्सम विचारसणीचा पुरस्कार नाही. नियतीवाद नाही. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे साहित्यावरचा मध्यमवर्गीय छाप कमी करायचा असेल तर आपण ईगीनमधील कथा अधिक समजून घेतल्या पाहिजेत. उदा. गंडगब्रु कथेतील हा कथानायक, कानातला मळ काढून देऊन त्यावर उपजीविका करणारे आपल्याला माहित आहे. याचा व्यवसाय ‘डोळ्यातलं खंड काढणं’ म्हणजे डोळ्यातील कचरा साफ करून देणे एवढी दारिद्री परिस्थिती त्यात आणखी वागणे सरकलेले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more