ANNA SAKSE

About Author

Birth Date : 16/01/1905
Death Date : 02/03/1981


ANNA SAKSE WAS A LATVIAN WRITER AND TRANSLATOR. SHE ALSO WROTE UNDER THE NAMES AUSTRA SĒJA, SMĪNS, TRĪNE GRĒCIŅA AND ZANE MEŽADŪJA. SHE WAS BORN INTO A POOR FARMING FAMILY IN VIDZEME AND STUDIED TEACHING AND BALTIC PHILOLOGY AT THE UNIVERSITY OF RIGA BUT LEFT WITHOUT COMPLETING A DEGREE.

अण्णा साक्से एक लातवियान लेखक आणि भाषांतरकार होत्या. ऑस्ट्रा सौजा,स्मिन्स, त्रिनी ग्रिकिस्का आणि झेन मेझुदुजा या नावाने त्यांनी लिखाण केले. विन्डेसमधील एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी रीगा विद्यापीठात शिक्षण घेऊन बाल्टिक भाषाशास्त्राचा अभ्यास केला. त्यांना पदवी पूर्ण करता आली नसली तरी त्यांनी वेगवेगळ्या प्रकाशनांसाठी अनुवाद केले. त्यांनी एडगर अ‍ॅझलॉन यांच्याशी विवाह केला. १९३४ मध्ये त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये सामील झाल्या. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्या रशियाला रवाना झाल्या. या काळादरम्यान त्या ‘लातविया कम्युनिस्ट जर्नल’च्या संपादक होत्या. १९४४ मध्ये सोव्हिएत सैन्य मायदेशात प्रवेश करत असताना त्या परतल्या. १९६५ मध्ये त्यांना लातवियन एसएसआरच्या पीपल्स लेखकाचे शीर्षक मिळाले. लातवियामध्ये प्रकाशित होण्याआधी त्यांचे काही लिखाण रशियन भाषेमध्ये प्रकाशित झाले होते. त्यांचे बरेच लिखाणकाम अनेक पूर्व युरोपियन आणि आशियाई भाषांत अनुवादित झाले आहे. रीगा येथे वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
48 %
OFF
FULANCHE BOL Rating Star
Add To Cart INR 150 INR 78

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more