* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EUTHANASIA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982145
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. GHAISAS SET UP A HOSPITAL AT A PLACE POORLY DEVELOPED THOUGH CLOSE TO MUMBAI A FEW DECADES AGO. HE SOON BECAME A WELL KNOWN FIGURE IN THE VICINITY AS A DOCTOR, AS A FATHERLY FIGURE, AND A PHILOSOPHER. HE LED AN UNHAPPY PERSONAL LIFE: HIS DAUGHTER HAD AN INTER RELIGIOUS MARRIAGE IN THE USA, AND HIS WIFE PASSED AWAY AS A RESULT OF THE SHOCK. DR. GHAISAS LED A LONELY LIFE. HE ADOPTED AN ORPHAN, LENT SUPPORT TO A YOUNG RAPE VICTIM AND ENCOURAGED THE TWO TO STUDY MEDICINE. HE RECEIVED A BOLT FROM THE BLUE WHEN HE CAME TO KNOW THAT HIS DAUGHTER AND HIS SON-IN-LAW MET WITH A FATAL ACCIDENT. HE NOW TOOK THE GRANDSON UNDER HIS WINGS. EUTHANASIA HAS ALWAYS BEEN A HOT TOPIC OF DEBATE. WHILE IN PRINCIPLE ONE MAY AGREE TO OBLIGE TO END THE LIFE OF A TERMINALLY ILL PERSON TO RELIEVE HIM OF LEADING A PAINFUL LIFE, THERE ARE ETHICAL, LEGAL AND PRACTICAL CONSTRAINTS IN PERMITTING EUTHANASIA. IT IS THUS UNEXPECTED THAT IN SPITE OF AN EXCELLENT PROFESSIONAL CAREER, A HOLISTIC VIEW TO LIFE AND FULL KNOWLEDGE OF THE FACT THAT THE LAW OF THE LAND DOES NOT PERMIT EUTHANASIA, DR. GHAISAS OCCASIONALLY ADVOCATES USE OF EUTHANASIA TO THOSE FOR WHOM LIFE WAS MEANINGLESS.
मृत्यू म्हटलं कि भय,दुःख,वेदना काही टाळत नाही. जगण्यावरन आरपार प्रेम, मोह सुटत नाही. `आयुष्य नको आता` अस म्हणणारी माणस जास्तीत जास्त काळ जगतात. हे अस चित्र सर्वत्र दिसत. विकलांग झालेली शरीरही घितपत पडतात. ते आंतर्मनाच्या जगण्याच्या हव्यासापोटीच. नकोसी झालेली हि शरीर, त्रास , अपमान सहन करतात आणि मग अशाना शांत-चित्त मरण हाच अशा विचाराना प्राधान्य दिल जात.... आपणहूनच निर्णय घेतला जातो. मुक्ती दिली जाते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#EUTHANASIA #SWATICHANDORKAR #MARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarPratik Kambale

    या दिवसांत वाचलेलं दुसरं पुस्तक! मुळात विषयच वेगळा असल्याने मन कथेत गुंतून राहतं. उगाचचा अतिरंजितपणा नाही. दयामरण असावं की नसावं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना जो प्रवास घडतो, तो प्रवास म्हणजे #युथनेशिया. Swati Chandorkar यांचं वाचनात आलेलं हे पहिलंच पस्तक. विविध नात्यांबद्दल त्यांच्या संकल्पना, त्यांची वास्तविकता अगदी स्पष्ट आहे. खरंच! नाती ही आपुलकीवर टिकतात. रक्त वगैरे सगळ्या बाबी गौण आहेत. रक्ताची नाती फक्त वारसा सांगण्यासाठीच असावीत कदाचित. कदाचित एवढ्यासाठीच म्हंटल, कारण. सगळीच रक्ताची नातीदेखील स्वार्थाने ओतप्रेत भरलेली नसतात. ❤️ ...Read more

  • Rating StarSuneeta Joshi

    दयामरण किंवा इच्छामरण हे शब्द आपल्याला नविन नाहीत.तरीही या शब्दामागे एक गूढता आहे.याचा उघडपणे कोणत्याही डॉक्टर नी पुरस्कार केलेला नाही,किंवा कितीही पटत असले तरी ते व्यक्त करू शकत नाहीत असे वाटते,कारण डॉक्टर हे जीव वाचवण्यासाठी असतात,कोणालाही ते जाणूनबुजून मृत्यू देऊ शकत नाहीत.... याच नैतिक तत्त्वावर अवलंबून असणारी ," युथेनेशिया" ही स्वाती चांदोरकर यांची हृदयस्पर्शी कादंबरी वाचली. यात dr.घैसास यांच्या बरोबरच त्यांचे कुटुंबीय,त्यांचे सहकारी,त्यांचा दत्तक मुलगा आणि त्यांचा सख्खा नातू ह्यांच्यातील अनेक ताने बाणे सुंदर रित्या गुंफले आहेत. मला स्वतः ला ही कादंबरी खूप पटली आहे,तुम्हालाही नक्कीच पटेल.अवश्य वाचा....! ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 13-03-2011

    ‘युथनेशिया’च्या निमित्ताने… अरुणा शानबाग या परिचारिकेला गेली ३७ वर्षे अंथरुणाला खिळून रहावे लागले आहे. तिच्या दयामरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच स्वाती चांदोरकरलिखित ‘युथनेशिया’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीत लेखिकेने दयामरणाचा मुद्दा कथमध्ये गुंफून प्रभावीपणे मांडला आहे. गेल्या आठवड्यात अरुणा शानबागच्या निमित्ताने दयामरण आणि इच्छामरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याच काळात प्रसिद्ध कथाकार व. पु. काळे यांच्या कन्या स्वाती चांदोरकर यांनी लिहिलेली ‘युथनेशिया’ ही कादंबरीही दयामरणाच्याच प्रश्नावर बेतली आहे. पण, अरुणा शानबागच्या प्रश्नावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच ही कादंबरी लिहून पूर्ण झाली होती. सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वीच स्वाती चांदोरकर यांनी ही कादंबरी लिहायला घेतली होती. या कादंबरीतील नायक डॉ. घैसास हे जगणे नको असल्या रुग्णांना दयामरण देऊन त्यांची सुटका करतात. इच्छामरण मागणे हे रुग्णाच्या हातात असते. कारण हा रुग्ण अंथरुणावर खितपत पडला असला तरी तो कोमात गेलेला नसतो. त्याची विचार करण्याची क्षमता आणि काही वेळा बोलणेही सुरू असते. आपण या आजारातून बरे होणे तर दूरच पण यापुढेही असेच अंथरुणाला खिळून राहू, सगळ्या उपचारांचा आणि व्याधीचा शरीराला त्रास होईलच पण आपली सेवा करणाऱ्यांनाही त्याचा त्रास होईल असे विचार त्या रुग्णाच्या मनात येत असतात. संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगलेल्या या रुग्णाला आयुष्याच्या अखेरीस संपूर्ण परावलंबित्व पत्करणे मान्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णाने इच्छामरणाची मागणी केल्यास त्याला ते देता येते. परंतु कोमात गेलेल्या, सर्व भावना आणि संवेदना नष्ट झालेल्या रुग्णाला दयामरण देण्याचा निर्णय नातेवाईक आणि डॉक्टरांनाच घ्यावा लागतो. अशा वेळी रुग्णाच्या संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून घेणे, रुग्णाची आणि नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती, रुग्णालयातून घरी नेल्यानंतर नातेवाईकांकडून होऊ शकणारा सांभाळ, रुग्ण बरा होण्याची शक्यता अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो. अनेकदा अशा रुग्णाला दयामरण दिल्याने त्याच्या नातेवाईकांच्या मनातही तो सुटल्याचीच भावना निर्माण होते. स्वाती चांदोरकर यांच्या युथनेशियाचा नायक रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या हालअपेष्टा कमी होण्यासाठी दयामरण देतो. पण, समाजविघातक प्रवृत्तींकडून त्याचा गैरवापरही केला जातो. ही कादंबरी सत्य परिस्थितीवर आधारित असली तरी त्यातील पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. या कादंबरीबद्दल बोलताना स्वाती चांदोरकर म्हणता, ‘कादंबरीतील पात्रे मला प्रत्यक्षात जशीच्या तशी भेटली नाहीत. पण, आपल्यावर चारही बाजूंनी सतत अशा प्रकारच्या बातम्यांचे ‘हॅमरिंग’ सुरू असते. कादंबरीत घडणाऱ्या घटना कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात. अशाच कोणाच्याही आयुष्यात घडू शकणाऱ्या सत्य घटनांचे आणि काही काल्पनिक घटनांचे ‘कोलाज’ या कादंबरीत दिसते.’ चांदोरकर यांच्या आई अशाच खितपत पडल्या होत्या. त्या कोणाला ओळखतही नव्हत्या. केवळ हृदय सुरू आहे म्हणून त्या जिवंत आहेत अशीच परिस्थिती होती. त्यावेळी आईच्या शरीराला यातना होण्यापेक्षा ती यातून सुटली तर अधिक बरे होईल असा विचार लेखिकेच्या मनात कित्येकदा यायचा. धडधाकट असताना संपूर्ण कुटुंबाला आधार देणाऱ्या आईची ही अवस्था त्यांना पाहवत नव्हती. रस्त्यावरून चालताना अनेक भिकारी दिसतात. परंतु, त्यातील एक भिकारी लेखिकेच्या विशेष लक्षात राहिला. हा भिकारी अतिशय लाचार अवस्थेत जगत होता. इतरही काही उदाहरणे त्यांच्यासमोर होती. अशा व्यक्तींना यातनांमधून सोडवण्यासाठी दयामरणाचा मार्ग योग्य असल्याचे त्यांना जाणवले आणि यातूनच युथनेशियाने आकार घेतला. खरे तर सुरुवातीला या लोकांना योग्य उपचार कसे मिळतील असा विचार त्यांच्या मनात आला होता आणि त्यावरच कादंबरीचे लेखन सुरू झाले होते. परंतु हळूहळू हा विषय विस्तारत गेला आणि पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहू न शकणाऱ्या मरणासन्न रुग्णांना दयामरण कसे देता येईल या विचाराच्या दिशेने कादंबरीचा प्रवास सुरू झाला. दयामरण देण्यासाठी नातेवाईकांबरोबरच डॉक्टरांच्याही मनाची तयारी व्हावी लागते. तशी मनोवृत्ती तयार होणे सोपे नाही. दयामरण देणारा डॉक्टर अतिशय खंबीर असावा लागतो. यातूनच मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजन प्रभू यांची भेट घेऊन लेखिकेने यातील मानसिक आंदोलनांचा अभ्यास केला. शिवाय इतरही अनेक डॉक्टरांशी बोलून या प्रकरणातील तात्त्विक आणि वैद्यकीय बाबी समजून घेतल्या. या सर्वांशी बोलल्यानंतर त्यांच्या काही संकल्पना बदलून विचार अगदी प्रगल्भ झाले आणि त्यांचा कथेच्या प्रवासावरही परिणाम झाला. इच्छामरण आणि दयामरणात परिस्थितीचा फायदा उठवणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने धडधाकट असतानाच अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्याला दयामरण द्यावे असे सर्वांसमक्ष लिहून ठेवायला हवे. लेखिकेने तसे स्वत:च्या बाबतीत लिहून ठेवले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book