* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THEMBHAR PANI ANANT AAKASH
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788184981087
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 312
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN INSPIRING BIOGRAPHICAL BOOK BASED ON THE DEVOTION AND ACHIEVEMENTS OF PADMASHRI BHAWARLALAJI JAIN, PIONEER OF DRIP IRRIGATION, TISSUE CULTURE, PEPINS, AGRO FOOD PROCESSING INDUSTRIES LIKE ONION POWDER PLANT, PAPAYA PEPINS, MANGO, BANANA, POMEGRANATE PULP PLANTS AND WHO HAS LED REMARKABLE CONTRIBUTION TO GREEN REVOLUTION OF INDIA, AND FOR UPGRADATION OF ECONOMIC CONDITION OF INDIAN FARMERS THE GOAL ACHIEVED BY MR. JAIN IS HIGHLY INSPIRING TO YOUTH IN AGRICULTURAL AND INDUSTRIAL FIELDS. MR. JAIN IS BORN IN BACKWARD VILLAGE IN KHANDESH, MAHARASHTRA, IN LOWER MIDDLE CLASS FAMILY. HE HAS COMPLETED LAW AND ALSO HAD PASSED IAS. BUT HE DID NOT JOIN THE HIGH POST GOVT. SERVICE, WHICH IS DREAM FOR OTHERS. BUT MR. JAIN HAD STARTED WORKING IN AGRICULTURAL AND INDUSTRIAL FIELDS. HE IS FOUNDER CHAIRMAN OF JAIN GROUP OF INDUSTRIES. WHICH IS SECOND HIGHEST INDUSTRY IN DRIP IRRIGATION IN THE WORLD. E HAS DEVELOPED “JAIN HILLS” AT JALGAON, WHICH IS CONVERSION OF HUNDREDS OF ACRES OF BARREN HILLS INTO GREENERY AND A WORTH PLACE TO VISIT FOR AGRICULTURAL TOURISM. HE HAS CREATED MANY WATER RESERVOIRS, RAIN HARVESTING, PLANTED LAKHS OF TREES, HE HAS STARTED AGRI TRAINING AND RESEARCH INSTITUTES TO GIVE TIME TO TIME GUIDANCE TO FARMERS. HE HAS CREATED CHARITABLE TRUST FOR EDUCATION, MEDICAL AND HEALTH & FOR SOCIAL UP GRADATION FOR PUBLIC AT LARGE. THIS BOOK IS BASED ON HIM AND HIS SOCIO AGRICULTURAL REVOLUTION CONCEPTS AND INDUSTRIOUS NATURE EVEN AT HIS OLD AGE, WHICH IS A LIGHT HOUSE FOR COMING GENERATIONS OF RURAL INDIA.
‘भवरलाल, ही दगडाधोंड्यांची ओसाडी विकत घेऊन तू काय करणार आहेस? या दगडांच्या वांझ शरीरातून काही उगवेल तरी का?’ त्यांच्या मनाने त्यांना जाब विचारला. पण व्यवहारी मनाच्या आत एक सृजनशील अंतर्मन दडले होते. त्याने सांगितले, ‘तू हे करच. कारण केवळ तूच हे करू शकशील. तूच या निकामी पथ्थरातून एक संजीवक स्वप्नशिल्प निर्माण करू शकशील.’ ही संजीवक कहाणी आहे, ओसाडीतून नंदनवन निर्मिणा-या, पाण्याच्या थेंबाथेंबातून जीवन देऊन शेतक-यांना समृद्ध करणा-या, भूमी व भूमिपुत्रांवर प्रेम करणा-या पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन या महापुरुषाची! त्यांनी केलेल्या संघर्षाची. निर्माण केलेल्या वेगळ्या वाटेची. श्रम, बुद्धी, संस्कार आणि निसर्ग प्रेमाच्या महामंत्राची आणि त्यातून निर्माण झालेल्या उत्तुंग यशाची!

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #सुरेखा शहा #थेंबभर पाणी अनंत आकाश : डॉ. भवरलालजी जैन यांचे चरित्र #THEMBHAR PANI ANANT AAKASH #SUREKHA SHAH #THEMBHAR PANI ANANT AAKASH
Customer Reviews
  • Rating Starश्री. वसंत लक्ष्मण पवार

    नुकतेच आपण लिहिलेला चरित्रग्रंथ ‘थेंबभर पाणी अनंत आकाश’ हा भाऊंच्या जीवनावरील चरित्रग्रंथ वाचून पूर्ण केला. आपल्या समृद्ध भाषेने, नितांत सुंदर श्रद्धेने सदर चरित्रग्रंथ ओतप्रोत भरलेला असून मला तो खूपच भावला. त्यातले अनेक प्रसंग मी पुन्हा पुन्हा वाचलेव त्यातील भावनांशी समरस झालो. आपली दीर्घ वाङमयीन सेवा वाचून मी खूपच प्रभावित झालो. आपल्या वाङमयाचे वाचन जरूर करायचे असा मनोमन आजतरी निश्चय केला आहे. अतिशय स्वच्छ, सुबोध, मनाची पकड घेणारी आपली भाषा मन मोहवून टाकते. समोर बसून गप्पागोष्टी जितक्या सहजतेने होतात, तितकीच सहजता आपल्या लिखानात असल्यामुळे पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. ही आपली लिखानाची खासियत आहे, असे मला जाणवले. भाऊंचे चरित्र सांगताना आपण अगदी त्यांच्या अंतरंगाचाही वेध घेतलेला दिसतो. त्यामुळे भाऊंचे व्यक्तिमत्त्व हुबेहुब डोळ्यांसमोर साकार होते. त्याशिवायही त्यांच्या एकूण कुटुंबाचा जीवनप्रवास, त्यांची श्रद्धा, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांचे कुटुंबातील संस्कार, प्रामाणिकपणा यांचेही वर्णन अंतर्मुख करणारे वाटले. त्यामुळे पुस्तक, चरित्रग्रंथ खूप खूप आवडला. भाऊंच्या मातोश्री स्व. गौराबाई यांचा जीवनप्रवास आदर्श मातेचा आहे. एका कुटुंबपद्धती, घरातील कर्ती स्त्री, स्वत:चे दु:ख उरात ठेवून कर्तव्यनिष्ठेने आपली कर्तव्य पार पाडणारी गृहस्वामिनी, सुरुवातीच्या काळात अपत्य विरहाचे दु:ख सोसणारी माता, आप्तेष्ठांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर मायेची पाखर करणारी माऊली अशी विविध रूपं मातोश्रींची मूर्ती साकारण्यासाठी, त्या माऊलीने किती अनंत खस्ता खाल्ल्या याचे विवेचन वाचून मन दु:खी, कष्टी होते. बऱ्याच वर्षांच्या विरहानंतर या मातेला पुत्रजन्माचा लाभ झाला. त्यांचे पोटी एका असामान्य वक्तित्वाने जन्म घेतला. त्यांच्यावर आईने कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा, वेळेचे महत्त्व, परोपकार, समाजाप्रती उत्तरदायीत्व हे संस्कार केले. अगदी अजाणतेपणी खिशात घातलेला ‘भवरा’ परंतु त्याबद्दल कोवळ्या बालकाला केव्हडी कठोर शिक्षा या माऊलीने केली? परंतु त्या शिक्षेच्या मागील उदात्त भाव नेमका बालकानेही समजून घेतला. असे हे कठोर व्रत मातोश्रीने घेतले होते. त्यांच्या मनात ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ अशा आशयाचे विचार होते. परंतु त्यांनी हे देवावर न टाकता त्यासाठी निरक्षिर विवेकाने पावले उचलली. व आज जगासमोर ‘भवरलाल जैन’ हे नाव साकार झाले. त्यासाठी किती अथांग कष्ट, अपरंपार मेहनत, रात्रीचा दिवस केला असेल हे त्यांचे त्यांनाच माहीत. एवढे अलौकिक यश मिळविण्यासाठी त्यामागे नितांत परिश्रमाची आवश्यकता असते. १४-१४ / १६-१६ तास काम, काम आणि काम! तेव्हाच आणि तेव्हाच हे शक्य होते. भाऊंच्या पत्नी कांताबाई यांनीही आपल्या सासूबार्इंच्या पावलावर पाऊल टाकून आदर्श सून, आदर्श माता ही बिरुदं मिळवली. अतिशय अबोल राहून कर्म करीत राहणे हा त्यांचा स्थायी भाव. हा स्थायीभाव पाहून गीतेतील वचनाची आठवण होते. कर्मण्ये वाधिरस्ते, मां फलेशू कदाचन! कर्म करीत राहणे हा माझा धर्म आहे. त्याच्या फळाची अपेक्षा धरली नाही. परंतु असे कर्म करणाऱ्यांनाच प्रभू भरभरून देतात. इतके की त्यांच्या कल्पनेतही नसेल. हा निष्काम कर्मयोगाचा महिमा आहे. भाऊंचा घरातील प्रपंच जसा मोठा, त्यापेक्षाही हजारो पट मोठा प्रपंच भाऊंचा घराबाहेर होता. या मोठ्या प्रपंचासाठी भाऊंना खूप वेळ द्यावा लागला तरी त्या गृहस्वामिनीने चकार शब्द काढला नाही. हे त्यांचे मोठेपण त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत करते. त्यांच्या संसारवेलीवर चार काश्मिरी गुलाब फुलले. या गुलाबांचा दरवळ आज जगभर पसरला आहे. श्री. अशोक, श्री. अजित, श्री. अतुल व श्री. अनिल ही मुले आणि सौ. ज्योती, सौ. निशा, सौ. शोभना व सौ. डॉ. भावना या भाऊंच्या स्नूषा! या सर्व भाऊंच्या पोटी जन्मलेल्या हिऱ्यांचे कोंदण आहेत. भाऊ व कांताबार्इंनी यांच्यावर सुवर्णसंस्कार केल्यामुळेच एवढे मोठे साम्राज्य ही सर्व तरुण मंडळी प्रामाणिकपणे सांभाळताहेत. भाऊंच्या या पुत्रांच्या संसारवेलीवर उमललेली त्यांची गोंडस, निरागस नातवंड, त्यांच्यासोबतच भाऊ व कांताबार्इंचा फोटो म्हणजे अप्रतिम असा पुष्पगुच्छ! असे हे सर्वांगसुंदर चरित्र वाचून मला खूप खूप आनंद झाला. हे चरित्र वाचून भाऊंची एक सर्वांगसुंदर प्रतिमा माझ्या हृदयपटलावर उमटली आहे व अंतरंगातून त्याचेबद्दल माझ्या हातून एक छोटेसे ‘मानपत्र’ तयार झाले आहे. ...Read more

  • Rating Starआनंद गुप्ते, मुंबई

    अगदी आठवणीने मला पाठवलेली `थेंबभर पाणी अनंत आकाश` या तुमच्या पुस्तकाची प्रत आजच मिळाली. मन:पूर्वक आभार व धन्यवाद. पुस्तकातील सुरवाती-सुरवातीची काही प्रकरणं मी प्रूफांच्या स्वरूपात वाचली होती, तेव्हाच ही भट्टी फर्मास जमणार, अशी कल्पना आलीच होती. आता ांतपणे व्यवस्थित व संपूर्ण वाचेन. कादंबरीचा ढाचा, मांडणी, प्रसंग रंगविण्याची तुमची शैली फारच छान. म्हणजे आमच्या अवधूतच्या भाषेत सांगायचं झाल्यास एकदम `चाबूक!` त्यामुळेच वाचक सतत खिळलेलाच राहतो. पुस्तक खाली ठेवतच नाही. ही कादंबरी यशस्वी होणारच. सिद्धहस्त लेखिका तर तुम्ही आहातच. तुम्हाला तुमच्या पुढच्या लेखनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 14-10-2010

    `जोहड‘कार सुरेखा शहा यांनी लिहिलेली `थेंबभर पाणी अनंत आकाश’ ही चरित्रात्मक कादंबरी नवयुवकांना उद्योगधंद्याकडे वळवून आपण जीवनात कसे यशस्वी होऊ शकतो, याची प्रेरणा यातून मिळते. उद्योजक भवरलालजी जैन यांच्या जीवनातील चढउतारांचा आढावा येथे घेण्यात आल आहे. जैनउद्योग समूह, जैन गुरुकुल, जैन इरिगेशन जी जगात आज दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथंपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्यात असलेला आत्मविश्वास, चिकाटी, प्रामाणिकपणा, सामर्थ्य, ध्येयाची आस, कठोर परिश्रम, भव्य कल्पकता, स्वप्नवेडी वृत्ती, अपार जिद्द, अचूक निर्णयक्षमता आदी गुणांमुळे त्यांनी आपल्या व्यवसायाचं शिखर गाठलं आहे. `जहाँ न जाऐ बैलगाडी वहाँ पहुँचे मारवाडी’ या उक्तीप्रमाणे भवरलालजींचे पणजोबा राजस्थानमधील आगोळाईहून जळगावच्या वाघोर नदीच्या काठावर असलेल्या वाकोद या खेड्यात स्थानिक झाले. त्यांच्या जन्माची कहाणी लक्षात रहाण्यासारखी आहे. गौराबाई आणि हिरालाल या दांपत्याला होणारी अपत्ये जगत नव्हती. ९ वेळच्या प्रसव वेदनेनंतर झालेलं दहावं अपत्य जगावं म्हणून आजी जमनाबार्इंनी गावकुसाबाहेर राहणाऱ्या सोनाबार्इंच्या ओटीत झालेल्या मुलाला घातलं. मूल माझं आहे असं तिच्याकडून वदवून घेऊन मापटंभर मीठ देऊन, त्या बाळाला विकत घेतलं. तेच बालक म्हणजे भवरलाल जैन. त्यांच्या लहानपणीच्या काही घटना लेखिकेने नोंदविलेल्या आहेत. लहानपणी भोवरा चोरल्यामुळे आई गौराबार्इंनी फुंकणी तुटेपर्यंत भवरला चोपले होते. गावात चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी जळगावात ठेवले. मॅट्रिकनंतर मुंबईला कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन एल.एल.बी. पूर्ण केले. नंतर एम.पी.एस.सी. परीक्षा पास झाले, तरी वकिली अथवा सरकारी उच्चपदस्थ नोकरी न स्वीकारता जिल्हाधिकारी होण्याची संधी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनाचा कल व्ययसायाकडे बदलवण्यामध्ये आई गौराबाई व भिकमचंद जैन यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. जे भारतीय भूमीपुत्रासाठी वरदान ठरले म्हणावे लागेल. भिकमचंद जैन यांना त्याचं जीवन बदलणारा सल्ला दिला. वकिली काय किंवा कलेक्टर काय दुसऱ्याची गुलामगिरीच, त्यापेक्षा मारवाड्याचा बच्चा आहात-व्यवसाय, धंदा करा. या सल्ल्यानुसार तीन पिढ्यांची असणारी सात हजार रुपयांची पुंजी धंद्यासाठी लावली. रॉकेलची एजन्सी घेतली. प्रत्येकाच्या जीवनात कलाटणी मिळते. प्रत्येकाच्या जीवनात कलाटणी मिळते, ती विवाहामुळे. त्यांनी नाशिकच्या सुंदर मुलीला नाकारुन विजापूरच्या कांताबार्इंशी हुंडा न घेता लग्न केलं. नंतर एकदा मुलांच्या तब्येतीमुळे स्वयंपाकाला उशीर झाला. म्हणून दीर रागावले. तेव्हा कुटुंब विभक्त होऊ शकले असते. तेव्हा भवरलाल आपल्या पत्नीला आदरार्थी संबोधन `तुम्ही मोठे व कर्त्या आहात, त्यांना तुम्ही मनातून क्षमा करा’ अशी समजूत घालून त्यांना शांतवलं. अशा बऱ्याच प्रसंगांचं वर्णन वाचायला मिळतं. त्यांनी नंतर खते, बी-बियाणे, पाईप्स, शेती उत्पादने, ट्रॅक्टर्स, स्पेअरपार्टस अशा एजन्सीज घेतल्या. जैन ब्रदर्स प्रख्यात झाले. औद्योगिक विकास साधत असताना, त्यांना आलेल्या बऱ्याच प्रसंगांची नोंद लेखिकेनी घेतली आहे. जगात प्रत्येक पाचवा माणूस खोटा असतो. असं सांगणाऱ्या जॅकहाईम स्पष्टवक्तेला त्यांनी निर्भयपणे उत्तर देऊन, पपई पासून बनवलेल्या पपेनची निर्यात गुणवत्तेने प्रामाणिकपणे केली. अमेरिकेच्या त्या दौऱ्यात थंडी पासून बचाव व्हावा, म्हणून अजाणतेने `मिंक’ चा कोट विकत घेतला. नि:ष्पाप मुक्या प्राण्याची निर्दय हत्या करुन कोट बनवल्याचं कळलं, तेव्हा त्यांनी अहिंसा परमो धर्म न्यायाने वापरायचं सोडून दिलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाङ्गी शेतकऱ्यांनी वर्षातून दोन-तीन पिके घ्यायला हवीत म्हणून मरुभूमी असलेल्या इस्त्रायलमध्ये जाऊन ठिबक सिंचन पध्दतीचा अभ्यास करुन त्यांनी जलक्रांती घडवून आणली. प्रत्येकांनी श्रमप्रतिष्ठा जपली पाहिजे. याचं उदाहरण लेखिकेने चांगल्या पध्दतीने दिले आहे. सायकलसुध्दा नसताना गिऱ्हाईकाला देण्यासाठी भर उन्हात हातात रॉकेलचे कॅन घेऊन ते चालत जात असतं. जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, साहित्यिक, धार्मिक, प्रयोगशील, प्रतिभावंतांना त्यांनी मदत केली. आकाशाएवढे उत्तुंग यश मिळवून त्यांचे पाय मात्र शेतात भिजलेल्या मातीवरच राहिले. प्रा. कमलाताई ठकार यांच्या विनंतीने त्यांनी औसा येथील अंध, अपंग आधार केंद्रात वनौषधी उद्यानात ठिबक सिंचन संच घालून दिला. कविवर्य ना.धों. महानोर हे त्यांचे बालपणीचे मित्र. त्यांच्या घरोबाच्या संबंधाच्या आठवणी लेखिकेने विस्ताराने कथन केल्या आहेत. भवरलालजींनी ३ `नि’ चा मंत्र जपला- निर्व्यसनीपणा, नियमितपणा आणि त्यांनी जळगावातील हजार शालेय विद्यार्थ्यांची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घडवून आणली. सुरुवातीच्या दिवसात एस्सो रॉकेल डेपोचे व्यवस्थापक नूर मोहम्मद शेख यांचे सहकार्य लाभले. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांनी जळगावात त्यांच्या नावाने उर्दू ज्युनिअर कॉलेज काढले. आत्मकथेतील काही भाग जैन चोरडिया परिवारातील व्यक्तिरेखे भोवती फिरत राहतो, घुटमळत रहातो. काही गोष्टीची दुरुक्ती, पुनरावृत्ती झालेली आहे. चहापानाला सुध्दा विषपान समजणाऱ्या भवरलालजी जैन यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कॉफर्ड ग्रीड, पद्मश्री पुरस्कार आदिंनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लाख तर होतच रहातील, पण लाखांचा पोशिंदा होण्याची ताकद, हिंमत ठेवावी असा संदेश देण्यात लेखिका यशस्वी झालेल्या आहेत. -नागेश खमितकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more