* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE EXTRA ONE PER CENT
  • Availability : Available
  • Translators : SUJATA RAUT
  • ISBN : 9788184986266
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THERE ARE TIMES WHEN WE ALL NEED A BIT OF A PUSH TO HELP US REACH THE TOP. DISCOVER WHAT MAKES UP THE `EXTRA ONE PER CENT` THAT DISTINGUISHES EXCEPTIONAL PEOPLE FROM EVERYONE ELSE -- AND HOW YOU CAN MAKE THESE SUBTLE YET CRUCIAL DIFFERENCES WORK FOR YOU TOO. IN THIS BOOK, LEADING PSYCHOLOGIST AND COACH DR ROB YEUNG DRAWS UPON A WEALTH OF SCIENTIFIC RESEARCH AND SHARES REVELATIONS FROM HIS WORK WITH ENTREPRENEURS, BUSINESS LEADERS, WORLD-CLASS SPORTS PEOPLE AND CELEBRITIES. DISCOVER WHAT THESE SUCCESSFUL PEOPLE DO DIFFERENTLY AND FIND OUT HOW YOU TOO CAN REACH OUTSTANDING LEVELS OF SUCCESS BY TAPPING INTO THE PSYCHOLOGY OF HIGH ACHIEVERS BY DISCOVERING THE EIGHT CAPABILITIES THEY POSSESS THAT CAN MAKE ALL THE DIFFERENCE. IN THE EXTRA ONE PER CENT ROB YEUNG WILL SHOW YOU HOW YOU TOO CAN ACHIEVE YOUR FULL POTENTIAL AND DISCOVER HOW TO MAKE THESE STRATEGIES WORK FOR YOU. YOU WILL FIND OUT HOW TO MAKE REAL AND LASTING CHANGES IN YOUR LIFE AND TAKE YOURSELF TO THE NEXT LEVEL.
सर्वसामान्यांपेक्षा वरच्या पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यकता असते ती परिश्रमाची, मेहनतीची आणि सुयोग्य विचार करण्याची. या पुस्तकात व्यवसाय, मनोरंजन, क्रीडा या क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती आहेत. त्यांच्या प्रवासाचा अभ्यास करून त्यातून पुढे आलेली माहिती व शास्त्रीय संशोधन अत्यंत मार्मिक, सूक्ष्मपणे आपल्यासमोर ठेवले आहे, त्यांची व्याख्या केली आहे. जेणेकरून आपल्या करिअरच्या प्रवासात िंकवा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ते मार्गदर्शक ठरावेत. या पुस्तकामुळे तुम्हाला खालील गोष्टी कळतात – - सर्जनशील विचार करणे. - सूक्ष्म विचार करण्याची, टीकाकुशल मानसिकता निर्माण करणे. - इतरांना प्रभावित करून, त्यांचे मन वळवण्याचे मानसशास्त्र अवगत करणे. - नातेसंबंध दृढ करण्यासाठी, पैसा व यश संपादन करण्यासाठी काही प्रात्यक्षिक तंत्रे विकसित करणे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PRAYATNEDHARUYASHPANTH #THEEXTRAONEPERCENT #प्रयत्नेधरूयशपंथ! #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUJATARAUT #ROBYEUNG "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 12-7-2015

    यशस्वी व्हा ! आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे असते पण मुळात यश म्हणजे काय? त्याची परिमाणे कोणती? आपल्याला नक्की काय हवे आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर त्या दिशेने वाटचाल करता येईल. या यशाचा उगम आपल्या मनातूनच होतो. अखिल विश्वातील यशस्वी ाणसांच्या मनामध्ये उमटणाऱ्या या प्रेरणांमध्ये खूपच साम्य असते. म्हणूनच मानसशास्त्रज्ञ रॉब युग यांनी अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखतींमधून अभ्यास करून सिद्ध केलेले हे The Extra One Percent प्रगतिपथावर वाटचाल करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच फलदायी ठरू शकते. सुजाता राऊत यांनी या पुस्तकाचा अनुवाद एखाद्या कुशल शल्यविशारदाच्या हातोटीने केला आहे. मूळ आशयास धक्का न लागू देता तज्ज्ञांचे विचार दुसऱ्या भाषेत सुलभ व सुटसुटीतपणे मांडण्याची अवघड जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली आहे. समूचित अशी प्रस्तावना व त्यानंतर प्रभुत्व, जोपासना, सत्यता, केंद्रीकरण, अनुसंधान, धाडस व नागरिकत्व व अत्यंत महत्त्वाचा म्हणजे दृष्टिकोन आणि निष्कर्ष अशा आठ प्रकरणांमध्ये विभागल्या गेलेल्या या पुस्तकाची परिणामकारकता जागोजागी यशस्वी लोकांचे वस्तुपाठ दिल्याने नक्कीच वर्धिष्णु झाली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला उद्धृत केलेली वचने सकारात्मक ऊर्जा देणारी आहेत. आपल्या कामाचा सर्वोच्च परिणाम साधण्यासाठी व ते सातत्याने करण्यासाठी व्यायाम ही अत्यंत मौलिक गुंतवणूक आहे. कोणत्याही परिस्थितीत नैराश्य झटकून संतुलन साधणे हेच यशाचे गमक आहे. त्यासाठी मनाकडून मिळणाऱ्या नकारात्मक संदेशांना आव्हान व सकारात्मक संदेशांना ऊर्जा द्या. अनुसंधान म्हणजे नवीन लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याबद्दल जाणून घेऊन अस्सल संबंधांचा शोध घेणे, तर धाडस म्हणजे परिणामांची खात्री नसताना कृती करण्याची इच्छा. सुजाण नागरिक नेहमी भविष्याचा, पर्यावरणाचा, समाजाचा विचार करून अनमोल अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग करतो. जबाबदारीने वागतो. आपल्यातील आनंदी, सफल व असामान्य लोक सम्यक दृष्टी निर्माण करतात. सतत अध्ययन, चौफेर विचार व नवे प्रवाह व कल्पना यांचे ज्ञान हे आपला दृष्टिकोन समतोल ठेवतात. जीवनाप्रमाणे दृष्टिकोनही परिवर्तनशील हवा. कणभर कृती ही मणभर सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणूनच हे पुस्तक मन:पूर्वक वाचून स्वत: त्या क्षमतांचा विकास व इतरांच्या क्षमतांचा अभ्यास करण्यासाठी मिळालेला समंजस सल्ला आचरणात आणला पाहिजे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.