* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO ENJOY YOUR LIFE AND YOUR JOB
  • Availability : Available
  • Translators : SHUBHADA VIDVANS
  • ISBN : 9788184984453
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :DALE CARNEGIE COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
UNCOVER YOUR HIDDEN ASSETS X YOU CAN FILL EACH DAY WITH EXCITEMENT AND A SENSE OF SATISFACTION! EVEN IF YOU LOVE YOUR WORK, YOU PROBABLY HAVE DAYS WHEN ALMOST NOTHING GOES RIGHT. BESTSELLING AUTHOR DALE CARNEGIE SHOWS YOU HOW TO MAKE EVERY DAY MORE EXCITING AND REWARDING X HOW YOU CAN GET MORE DONE, AND HAVE MORE FUN DOING IT. DALE CARNEGIE`S TIMETESTED ADVICE WILL HELP YOU TO: MAKE OTHER PEOPLE FEEL IMPORTANT X AND DO IT SINCERELY AVOID UNNECESSARY TENSION X SAVE YOUR ENERGY FOR IMPORTANT DUTIES GET PEOPLE TO SAY YES X IMMEDIATELY TURN ROUTINE TASKS INTO STIMULATING OPPORTUNITIES SPOT A SUREFIRE WAY OF MAKING ENEMIES X AND AVOID IT SMILE IN THE FACE OF CRITICISM X YOU`VE DONE YOUR VERY BEST! HOW TO ENJOY YOUR LIFE AND YOUR JOB WILL HELP YOU CREATE A NEW APPROACH TO LIFE AND PEOPLE AND DISCOVER TALENTS YOU NEVER KNEW YOU HAD. DALE CARNEGIE CAN HELP YOU GET THE MOST OUT OF YOURSELF X ALL THE TIME. START DEVELOPING YOUR INNATE STRENGTHS AND ABILITIES X START ENRICHING YOUR LIFE TODAY!
तुमच्या अंगातल्या सुप्त गुणांना वाव द्या – तुमचा प्रत्येक दिवस रोमांचकारी आणि समाधानाचा बनवा. जरी तुम्हाला तुमचे काम आवडत असले; नक्कीच असे काही दिवस तुमच्या आयुष्यात येत असतील की, ज्या दिवशी कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसेल. अत्यंत लोकप्रिय लेखक डेल कार्नेजी तुम्हाला प्रत्येक दिवस मनपसंत आणि बक्षिसपात्र कसा करायचा आणि प्रत्येक दिवस अधिक मजेदार व आनंदी कसा बनवायचा हे सांगतात. ते म्हणतात – १. इतरांना महत्त्व द्या आणि हे प्रामाणिकपणे करा. २. अनावश्यक ताणतणाव घेऊ नका – तुमची ऊर्जा महत्त्वाच्या कामासाठीच खर्च करा. ३. लोकांना ताबडतोब तुमच्याशी सहमत करून घ्या. ४. समस्यांचे रूपांतर संधीमध्ये करा. ५. शत्रू कशामुळे निर्माण होतात, ते ओळखा व ती गोष्ट करण्याचे टाळा. ६. टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहा – तुम्ही तुमचे काम चोखपणे पार पाडले आहे. `हाउ टू एन्जॉय युवर लाइफ अ‍ॅन्ड युवर जॉब,` हे पुस्तक तुम्हाला आयुष्याकडे आणि लोकांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देईल आणि तुम्हालाही माहिती नसलेल्या तुमच्या अंगातील सुप्त गुणांचे प्रदर्शन घडवेल. डेल कार्नेजी तुमच्या सुप्त गुणांना वाव देण्यास मदत करतील; अगदी कधीही! तुमची बलस्थाने व तुमच्या क्षमता ह्यांचे संगोपन करा – तुमच्या आयुष्याला आजच नवीन अर्थ द्या.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MITRAJODAANILOKANVARPRABHAVPADA #LOKANSHIKASEVAGAVE #YABADDALCHIMULBHUT TANTR #LOKANAJINKUNGHENYACHAMULMANTRA #NETRUTVASWIKARA #LAKSHANIYAYASHMILAVINYACHAZATPATMARG
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.