* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TODDLER TAMING:THE GUIDE TO YOUR CHILD FROM ONE TO FOUR
  • Availability : Notify Me
     
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9788184984361
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 436
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AT LAST HERE IS PRACTICAL ADVICE--MIXED WITH HUMOR--FOR HOW TO COPE WITH THOSE DIFFICULTIES THAT TURN YOUR SWEET BABY INTO A HOLY TERROR, INCLUDING: TOILET TRAINING, TANTRUMS AND OTHER TRICKS, SLEEP PROBLEMS, FIDGETS, AND MORE. FEATURING SPECIAL ADVICE FOR WORKING MOTHERS AND SINGLE PARENTS, TODDLER TAMING STRIVES TO CALM YOUR FEARS, WITH ADVICE THAT REALLY WORKS!
अजाण मुलांना वळण लावणं, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या, स्वच्छतेच्या समस्या सोडवणं सर्वच पालकांना कठीण जातं; पण त्यातही नोकरी करणाऱ्या मातापित्यांना तर ती तारेवरची कसरतच वाटते. हे लक्षात घेऊन या पुस्तकात बालकांना संभाळण्याची कला हसत-खेळत शिकवली आहे. आपल्या बालकाचं संगोपन उत्कृष्टरीत्या करण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व पालकांसाठी हे पुस्तक म्हणजे ‘जादुई चिराग’ ठरेल! विशेषत: अवखळ मुलांचा संभाळ करता-करता ताणतणावानं थकून गेलेल्या पालकांना हे पुस्तक संजीवनी देईल. बालसंगोपनासारखा विषय डॉ. खिस्तोफर ग्रीन यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत अत्यंत खेळकरपणे मांडलेला आहे. यामध्ये आधुनिक जगातल्या नव्या पिढीच्या पालकांना उपयुक्त ठरणारे अनेक मैत्रीपूर्ण सल्ले सापडतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HASATKHELATBALSANGOPAN #TODDLERTAMINGASURVIVALGUIDEFORPARENTS #हसत-खेळतबालसंगोपन #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #CHRISTOPHERGREEN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 28-05-2017

    एक काळ असा होता, की लहान मुलांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे अन्य पालकांइतकाच मी ही गोंधळून गेलेलो होतो. पंचवीस वर्षांपूर्वी बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रशिक्षण घेताना मला लहान मुलांच्या वर्तनात काडीइतकाही रस नव्हता. आव्हानात्मक प्रसंग हाताळण्याच्या युक्त्याप्युक्त्या माझ्याकडे मुळीच नव्हत्या. इतर सर्वच प्रशिक्षणार्थीप्रमाणे माझीदेखील सहा महिन्यांकरीता मानसोपचार विभागात पाठवणी करण्यात आली. मानसोपचार विभागात या सहा महिन्यात मी बरंच काही शिकलो. इडिपस गंडापासून ते खच्चीकरण करणाऱ्या चिंता, दडपून ठेवण्यात आलेल्या भावना आणि वरकरणी दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्यापर्यंत बरंच काही. जागतिक कीर्तीचे बालमानसोपचारतज्ज्ञ असलेले ऑस्ट्रेलियाचे एक श्रेष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक माझे निरीक्षक म्हणून काम पाहत होते. तसा माझा बहुतेक वेळ इतर मानसोपचारतज्ज्ञांचं आणि मानसतज्ज्ञांचं निरीक्षण करण्यातच जात असे. पण तरीही मलासुद्धा काही केसेस हाताळण्याकरता देण्यात आल्या होत्या. दर आठवड्याला माझे प्राध्यापक या सर्व केसेसची माझ्याबरोबर चर्चा करत असत आणि मला त्यांची अनुभवी मतं देत असत, पण तरीही बालसंगोपनतज्ज्ञ म्हणून मी अजूनही अनभिज्ञच होतो. त्यानंतर अचानक एका खोडसाळ बालकामुळे आणि त्याच्या गोंधळून गेलेल्या त्रस्त पालकांमुळे माझं सगळं विश्वच बदलून गेलं. मग मी मला मिळालेली नवी माहिती घेऊन पुन्हा माझ्या निरीक्षकासमोर बसलो, त्यांनी सगळं काही तपशीलवार ऐकून घेतलं. त्याच्या वडिलांनी मला पुन्हा विचारलं, पण आम्ही त्याचा खोडकरपणा आवाक्यात आणायचा तरी कसा? मला अजूनही या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. त्यामुळे मी पुन्हा माझ्या प्राध्यापकांकडे परत गेलो आणि त्यांना सगळी माहिती दिली अन् म्हटलं. आता मात्र ते पालक माझ्यावर चिडायला लागलेले आहेत. आपण मुलाचा खोडसाळ स्वभाव बदलण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो? या प्रश्नावर त्यांचं उत्तर काय होतं माहीत आहे? तुला आणखी माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे मी पुन्हा माझा मोर्चा त्या पालकांकडे वळवला, ते मला सांगत असलेल्या त्यांच्या मुलाच्या खोडकरपणाच्या कथांवर काहीतरी उपाय सापडेल. या आशेवर कित्येक आठवडे उलटले. कित्येक आठवडे निघून गेले आणि तरीही त्या नाठाळ मुलाच्या खोडकरपणात तसूभरही फरक न पडलेला पाहून त्या मुलाच्या आईची सहनशक्ती संपली आणि त्याचा पिताही वैतागला. मी माझं प्रशिक्षण संपवलं आणि विशेषतज्ज्ञांच्या पंगतीत जाऊन बसलो. त्यापुढील तीन वर्षांच्या काळात मला रोजच्या रोज दवाखान्यात आणि वॉर्डात खूपच रुग्णांना तपासावं लागायचं आणि त्यांच्यावर उपचार करावे लागायचे, पण ज्या विमान कर्मचाऱ्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझं खरं कुतूहल जागवलं होतं, ते कुतूहल मला राहून राहून मुलांच्या वागणुकीकडे खेचून घेत राहिलं. अशीच काही वर्षं गेल्यानंतर पालक मला शोधत यायला लागले आणि माझ्या लक्षात आलं की मी माझ्या प्राध्यापकांना जे प्रश्न विचारत होतो, त्यांची उत्तर मला सापडलेली आहेत. मग पालकांच्या गटांकडून मला मुलांच्या झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या, स्वच्छतेच्या सवयींबद्दल आणि त्याच्या वागण्याच्या समस्यांवर बोलण्यासाठी आमंत्रणं यायला लागली. लवकरच रेडिओवरही माझी भाषणं सुरू झाली. एके दिवशी एका पित्यानं माझं बोलणं ऐकलं, तो आपल्या मुलामुळे रात्र रात्र जागून अक्षरश: हैराण झाला होता. त्या मुलाचे आभारच मानायला हवेत! पालकांना काय हवं आहे ते मला माहीत आहे असं त्याला वाटत होतं आणि माझं सुदैव म्हणजे तो आंतरराष्ट्रीय प्रकाशक निघाला. त्यानं माझ्या दारात चक्क तळच ठोकल्यावर मी त्याला एक पुस्तक लिहून द्यायचं कबूल केलं. अशा प्रकारे या पुस्तकाचा जन्म झाला. गेल्या दोन दशकात जगात बरीच उलथापालथ झालेली असली, तरी एका गोष्टीत मात्र काहीच बदल झालेला नाही आणि तो म्हणजे बालकांचा व्रात्यपणा. बदलत्या काळाचा मुलांच्या अविचारीपणावर आणि वाट्टेल तशा वागण्यावर काहीही बदल झालेला नाही. स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा हटवादीपणा जराही दबला गेलेला नाही. ही मुलं पूर्वीइतकीच चैतन्यानं आणि त्यांच्यामध्ये असलेल्या सदाबहार जादूनं रसरसलेली आहेत. त्यामुळे थोडक्यात काय, तर २१ वर्षांपूर्वी पालकांना ज्या काळज्या आणि चिंता सतावत होत्या त्याच आजही त्रास देतच असतात. आधुनिक पालकही आपल्या नखरेल मुलाला जेवूखाऊ घालण्याच्या बाबतीत पूर्वीच्या पालकांइतकेच गोंधळून गेलेले आहेत आणि स्वच्छतेचे अंतहीन धडे देऊन देऊन जेरीला आलेले आहेत. आपल्या झोपेचं खोबरं करत धावपळ करून थकले भागलेले पालक दिवस उजाडायची वेळ होईपर्यंत चिडीला आलेले असतात. आपल्या चिरंजीवांच्या नाठाळ कारवायांनी हादरून गेलेले असतात आणि त्याच्या अगम्य सवयी पाहून हवालदिल झालेले असतात. त्यांच्या चिरंजीवांची बोटं एरवी गोंडस दिसणाऱ्या नाकांमध्ये अखंड खुपसलेली असतात आणि आतल्या चिकट द्रवाच्या तारांमधून ही मुलं आपल्या ‘कलेचं’ प्रदर्शन करत असतात. अशा परिस्थितीत बिचारे पालक जीवघेणा संघर्ष करत राहतात यात काहीच नवल नाही. ‘माझं काय चुकलं?’ असं विचारत राहतात. खरं म्हणजे काहीच चुकलेलं नसतं आणि इतकी तडतड करण्याचीही खरं तर काहीच गरज नसते. तुमचं मूल अगदी नाठाळात नाठाळ असलं, तरी त्यावरही उपाय आहेत. मुलांची बाल्यावस्था आनंददायी व्हायला हवी आणि तुम्हाला सांगतो, माझ्या मदतीनं ते नक्की शक्य आहे. तर मग चला, पाय घट्ट रोवून उभे राहा. बाह्या सरसावा आणि तुमच्या अपत्याच्या बालपणातली गंमत चाखायला तयार व्हा. -डॉ. खिस्तोफर ग्रीन ...Read more

  • Rating Starनंदा गोरे

    बेस्ट book

  • Rating StarLOKPRABHA 13 March

    मुलांना वळण लावणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं, त्यांना घडवणं आणि आयुष्यात यशस्वी करणं ही अनेक पालकांसाठी तारेवरची कसरतच असते. पण आपल्यावरची पालकत्वाची जबाबदारी त्यांना मनापासून निभवायची असते. पण नोकरी व्यवसाय सांभाळून पालकत्व निभवायचं आणि तेदेखील हसखेळत, तर ते एक प्रकारचे आव्हानच असते. त्यामुळेच पालकत्वाचं शिवधनुष्य लीलया कसे पेलावे हे सांगणारे एक पुस्तक नव्या पिढीतील पालकांसाठी अत्यंत उपयु्क्त आहे. पालकत्वाचा बाऊ न करता आपल्या मुलांची निकोप वाढ करायची असेल तर हे विक्रमी खपाचे पुस्तक वाचावे लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.