* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YOGA TO BANISH BACKACHE
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788177668384
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 64
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK IS SPECIALLY DESIGNED FOR THOSE WHO SUFFER FROM BACK ACHE DUE TO VARIOUS REASONS SUCH AS CERVICAL SPONDYLITIS, SLIP DISC, SCIATICA PROLAPSED, INTESTINAL PROBLEMS OR SCOLIOSIS. THIS BOOK EXPLAINS ALL THESE PROBLEMS AND THE VARIOUS SIMPLE AND NATURAL YOGAMUDRA TO OVERCOME THEM. AT THE END OF THE BOOK, SHE ALSO SUGGESTS US ABOUT THE IDEAL WAY TO SET OUR ROUTINE. SHE SUGGESTS THE PROPER WAY TO SIT AND STAND, THE WAY TO MAINTAIN OUR CALORIES INTAKE. SHE ALSO GIVES GUIDELINES ABOUT WHEN AND HOW TO PERFORM THE YOGA EVERY DAY.
या पुस्तकामध्ये वाचकांना मानेच्या मणक्यांना सूज येणं (सर्व्हायकल स्पॉण्डिलायटिस), स्लिप-डिस्क, सायटिका प्रोलॅप्स, आतड्यांमधील वायुदोष आणि स्कोलिओसिस यांसारख्या विविध प्रकारच्या पाठीच्या दुखण्यांसंबंधी आणि त्यावरील साध्या, सोप्या पण तरीही परिणामकारक योगिक आणि नैसर्गिक उपायांची माहिती मिळेल. बिजयालक्ष्मी होता या एक नामांकित योगचिकित्सक असून गेली पंचवीस वर्षं या क्षेत्रात काम करत आहेत. अस्थमा, सांधेदुखी, पाठदुखी इ. पासून ते विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर) आणि कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PATHDUKHIGHALAVANYASATHIYOGSADHANA #YOGATOBANISHBACKACHE #पाठदुखीघालविण्यासाठीयोगसाधना #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #BIJOYLAXMIHOTA #बिजयालक्ष्मीहोता "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI (KOLHAPUR)

    पाठदुखीग्रस्तांसाठी उपयुक्त मार्गदर्शक... सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीसोबत पाठदुखी ही पाठराखण करायला आल्यासारखी आणि कायम ठाण मांडून बसलेली दिसते. स्त्री-पुरुष तसेच सर्व वयोगटांत पाठदुखी सर्रास आढळते आहे त्यामुळे अर्थातच माणसाची कार्यक्षमता खालवते आे, हालचालींवर मर्यादा येतायत. ‘पेनकिलर हा तात्पुरता दिलासा ठरत असला तरी त्यामुळं पाठदुखी काही कायमची पाठ सोडत नाही. शिवाय शरीराला या औषधांची मात्राही लागू पडेनाशी होते तो प्रश्न व या औषधांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या वेगळ्याच! मात्र, पाठदुखीने त्रस्त व्यक्तींना आता एक पुस्तकरूपी मार्गदर्शक व दिलासा लाभला आहे. नामांकित योगचिकित्सक विजयालक्ष्मी होता. यांनी ‘पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना’ या छोटेखानी पुस्तकात पाठीच्या विविध प्रकारच्या दुखण्यासंबधी आणि त्यावरील साध्या, सोप्या पण परिणामकारक योगिक व नैसर्गिक उपयांची सुबोध माहिती दिली आहे. प्रशांत तळणीकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. ‘पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना’ या पुस्तकात पाठदुखीचे प्रकार, त्यासाठी आसनं सचित्र दिली आहेत. त्या जोडीनं ध्यानधारात्मक प्राणायाम, योगिक विश्रांती यांची तंत्रंही अगदी सोप्या भाषेत सांगितली आहेत त्याचबरोबर उपचाराच्या इतर पद्धती म्हणजे पायी चालणं, पोहणं, कटिशेक, सूर्यस्नान, मालिश, पोहणं यासंबंधीही या पुस्तकात विवेचन केलं आहे तसंच योगसाधनेचे नियमही सांगितले आहेत. मनापासून साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. -सौ. सुप्रिया वकील ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 16 -12 -2007

    पाठदुखी घालविण्यासाठी योगसाधना आपला संपूर्ण दिवस वाचन-लेखनात जातो. संगणकासमोर तासन्तास आपण बसून राहतो. संध्याकाळी सभासमारंभाला गेल्यावरही आपण बसून राहतो किंवा तास-दोन तास उभे राहतो. स्रिया उंच टाचांच्या चपला घालून फिरतात. या आपल्या जीवनशैलीचा परिणामआपल्या शरीरावर होतो. विशेषत: आपल्या पाठीवर परिणाम होतो याची आपल्याला जाणीवही नसते. पन्नाशीनंतर पाठीची तक्रार सुरू झाली म्हणजे ते उमगते आणि आपल्या हालचालीवर मर्यादा येऊ लागल्यावर वेदनाशामक औषधे घेऊन जगण्याची पाळी येते. या वेदनाशामकांमुळेही शरीरामध्ये विषारी द्रव्ये जातात आणि पचनसंस्था पार पाडता येत नाहीत; कार्यक्षमता कमी होते. आपण झोपतो तेव्हाही आपल्याला शरीरात २० एकक स्नायूसंधित ताण असतो. त्यामुळे पेशींना रक्तपुरवठा कमी होतो. हा ताण टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा. ताण हे पाठदुखीचे एक मोठे कारण असते. स्नायूंना पद्धतशीर व्यायाम मिळाला तर शरीर-मनाचा ताण कमी होऊन शरीराला मोकळे मोकळे वाटते. पाठीच्या कण्याच्या दोन मणक्यांमध्ये जी चकती असते ती आपल्या जागेवरून सरकली तर स्लिप्ड डिस्कचा त्रास सुरू होतो. आपल्या शरीराच्या चौकटीचा पाठीचा कणा हा एकमेव आधार असतो. मेरुदंड असेही त्याला म्हणतात. ३० लहान हाडे (मणके) एकावर एक रचून हा पाठीचा कणा-मेरुदंड तयार होतो. हे मणके अस्थिबंधनाने जोडलेले असतात. पृष्ठमज्जारज्जूने (स्पायनल कॉडने) ते एकमेकांशी दोरीत ओवल्याप्रमाणे व्यवस्थित राहतात. मज्जारज्जूमधून उगम पावतात आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला संदेश पोहोचवतात. मणके एकमेकांना घासू नयेत म्हणून त्यामध्ये चकतीसारखी उशी असते. (इंन्टरव्हॅटेंबल डिस्क) या चकत्या जेलीसारख्या मऊ पदार्थाने भरलेल्या असतात. हा मऊ पदार्थ चकत्यांच्या तंतूंना घट्ट धरून ठेवतो. हालचालीच्या वेळी आवश्यक तो ताण निर्माण करू शकतो. या चकत्यांची झीज होत असते आणि पुरेशी विश्रांती मिळाल्यावर ती झीज भरून निघते. या चकत्यांमध्ये ८० टक्के ताण पडून त्यातील जेली बाहेर सांडते. मणक्यांमध्ये घर्षण उत्पन्न होते आणि पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते. त्यामुळे पाठ आखडून येते. पाठीत वेदना सुरू होते. पाठीचा कणा हा खालच्या बाजूला, म्हणजे कमरेला जोडलेला असल्याने कमर दुखू लागते. स्लिप डिस्कचा त्रास सुरू होतो. मानेच्या मणक्यांवर ताण पडला तर मानेच्या मणक्यातील चकती जागेवरुन सरकते आणि सव्र्हायकल स्पॉडिलायटिसचा त्रास जाणवू लागतो. मान हा पाठीच्या कण्याचा सगळ्यात परिणामप्रवण भाग असतो. लहानमोठा कुठलाही अपघात झाला तर मानेलाच झटका बसतो आणि मानेतील अस्थिबंधने तुटू शकतात. अस्थिबंधन तुटणे ही गोष्ट हाड मोडण्याएवढीच वेदनादायक असते. मानेला दुखापत झाल्याने, चकती हलल्याने, चकती झिजल्याने, आजूबाजूच्या मज्जातंतूवर दाब पडतो. हात व खांदे दुखतात. त्यांना मुंग्या येतात. हे अवयव बधीर होतात. मानेतल्या कोणत्या मज्जातंतूवर दाब निर्माण झालेला आहे त्यावरुन सव्र्हायकल स्पॉडिलायटिसची लक्षणे ठरतात. कमरेतून निघून पायापर्यंत वेदना जाणवणे, कळ उठणे म्हणजे सायटिका, स्पायनल कॉर्डच्या खालच्या म्हणजे कमरेतून निघून दोन्ही पायांमध्ये मागच्या बाजूने थेट टाचेपर्यंत सायटिक मज्जातंतू किंवा ओघळलेला स्नायू दाब आणत असल्यास सायटिका ही अवस्था उद्भवते. पाठदुखीच्या तक्रारींचे स्वरुप असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. वैद्यकीय उपचार करुनही अनेकदा काही फायदा होत नाही. योगासनांनी पाठदुखी थांबू शकते आणि या तक्रारी दूर होऊ शकतात असा नामांकित योगचिकित्सक विजयालक्ष्मी होता यांचा अनुभव आहे. परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या कृपाप्रसादाने त्यांना योगासनांमध्ये प्रावीण्य संपादन करता आले आणि शेकडो व्यक्तींच्या व्यथावेदना दूर करता आल्या. पाठदुखी घालवण्यासाठी योगसाधना या पुस्तकात त्यांनी योगासनांचा केव्हा, कसा उपयोग करावा याची माहिती दिली आहे. श्वासन, अद्वासन, मत्सक्रीडासन याद्वारे तीव्र वेदना कमी होऊ शकतात. त्यासाठी कधी दीड-दोन आठवडेही लागू शकतात. तीव्र वेदना कमी झाल्यावर नियमित योगासने करता येतात. तीव्र वेदना असताना सर्व आसने करता येत नाहीत, करुही नयेत. स्लिप डिस्कचा त्रास असेल पाय छातीवर, भुजंगासन, ताडासन, शवासन, मार्जारी आसन करणे श्रेयस्कर ठरते. सव्र्हायकल स्पॉडिलायटिसमध्ये शशांकासन, आकर्ण, धनुरासन, सर्पासन, शवासन आणि हात वरखाली व मागेपुढे करणे फायदेशीर ठरते. सायटिकामध्ये व्याघ्रासन, अर्ध शलभासन, सरल धनुरासन यांच्यामुळे दुखणे थांबवता येते. पाठीचा कणा सदोष असेल तर, स्कोलिऑसिसच्या अवस्थेत समकोनासन, गुप्त पद्मासन, अर्धचंद्रासन, स्पिंक्स, उष्ट्रासन, ताडासन ही आसने उपयुक्त ठरतात. स्कोलिओसिचे दुखणे लहान वयात, शरीर लवचिक असतानाच आटोक्यात येऊ शकते, लहानपणी पोक काढून बसण्याची सवय असेल तर पाठदुखीचा त्रास हमखास होतो. स्कोलिओसिस मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळतो. उसण भरल्याने पाठीचे स्नायू आखडतात. त्यामुळे हालचाल करणे कष्टदायक होते. मान आणि कंबर भरून येते. पोटाच्या पोकळीतला गर्भाशयासारखा अवयव मूळ जागेवरुन खाली सरकरणे याला प्रोलॅप्स म्हणतात. त्यामुळे पाठ दुखते, नौकासन, उत्थानपादासन, कंध्रासन, पश्चिमोत्तानासन, वितरीत करणी मुद्रा, अश्विनी मुद्रा यांनी फायदा होतो. पाठ दुखू नये म्हणून सरळ पाठीच्या खुर्चीवर बसावे. पोक काढून बसू नये, बसल्यावर गुडघे मांड्यांच्या पातळीच्या वर असावे. झोपताना कठीण पृष्ठभागावर झोपावे. त्यामुळे कमकुवत पाठीला आधार मिळतो. अशा अनेक सूचनाही शेवटी दिल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more