* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FIT FOR 50 PLUS FOR MEN
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788184982015
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MEN IN THEIR FIFTIES ARE BECOMING INCREASINGLY CONCERNED ABOUT THEIR DECLINING HEALTH AND FLEXIBILITY, LACK OF ENERGY, AND EXERCISES BRINGS. THIS WORK INCLUDES AEROBIC, TRAINING AND STRETCH EXERCISES.
पन्नाशीचा गृहस्थ हा अठ्ठावीस वर्षांच्या जवानापेक्षा तंदुरुस्त असू शकतो. मध्यमवयाकडे झुकत असलेल्या पुरुषांसाठी फार साध्या आणि सोप्या भाषेत तंदुरुस्तीच्या व्यायामांची आखणी या पुस्तकात सादर केलेली आहे. पन्नाशीकडे झुकलेले पुरुष नेहमीच आपल्या स्वास्थ्याविषयी, फारच काळजी करताना आढळतात. याशिवाय व्यायामाच्या अभावामुळे ऑाQस्टओपोरॉसिसचा (हाडं ठिसूळ होण्याचा), दुसNया क्रमांकाचा मधुमेह, कर्वÂरोग आणि हृदयविकार यांचा त्रास होण्याची शक्यता डोक्यावर सतत टांगत्या तलवारीसारखी असतेच. या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन पुरुषांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबिक्स, वजन उचलण्याचे व्यायाम, बळकटी वाढविण्याचे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. आयुष्याच्या वाटचालीत आपल्याला, आपलं आरोग्य आणि ऊर्जा गमावणं परवडणारं नाही. या पुस्तकात दिल्याप्रमाणे व्यायामाला लागा आणि आयुष्यभर निरोगी रहा. हा व्यायामाचा वास्तव, चपखल आणि संतुलित आराखडा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #FITFOR50PLUSFORMEN #FITFOR50PLUSFORMEN #फिटफॉर५०फॉरमेन #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUBHASHJOSHI #सुभाषजोशी #GREGCHAPPELL "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 01-03-2011

    व्यायाम, आहार आणि विश्रांती - तंदुरुस्तीची त्रिसूत्री : काहीही होत नसतानाही चाळिशीनंतर प्रत्येक स्त्रीने वार्षिक तपासणी करायला हवी आहे. व्यायाम, आहार आणि पुरेशी विश्रांती याबाबतीत स्त्रियांनी आपल्या काळात काळजी घेण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ स्त्ीरोग तज्ज्ञ डॉ. वैजयंती खानविलकर यांनी पन्नाशीनंतरची तंदुरुस्ती याविषयी बोलताना व्यक्त केले. मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या वतीने ‘फिट फॉर ५० प्लस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. खानविलकर बोलत होत्या. त्यांच्या हस्ते ‘फिट फॉर ५० प्लस फॉर विमेन’ आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेश तुळपुळे यांच्या हस्ते ‘फिट फॉर ५० प्लस फॉर मेन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. डॉ. वैजयंती खानविलकरांनी यावेळी तिशीनंतरच फिटनेसविषयीची जागरूकता महिलांमध्ये निर्माण होण्याची गरज व्यक्त केली. स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे त्यांनी आपल्या बोलण्यातून लक्ष वेधले. मला काय झालंय? माझ्यावर कशाला खर्च? अशा विचारांनी स्त्री आरोग्याकडे डोळेझाक करीत आहे. घराला, संसाराला एक भक्कम आधार स्त्रीचा असतो. तिनेच आरोग्याची हेळसांड केली तर घराची इमारतच कोसळते, असे सांगून डॉ. खानविलकरांनी स्वतःच्या आयुष्यातही तिने आनंद घ्यायला हवा. यासाठी स्वतःच्या शरीराची आजच्या तणावाच्या काळात काळजी घेणे हे अत्यावश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. महेश तुळपुळे यांनी तंदुरुस्तीकडे लहानपणापासूनच लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले. मात्र पन्नाशीनंतर फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असून, चरबी वाढणार नाही यासाठी जिभेवर ताबा मिळवणे आवश्यक असल्याचे सांगितले. यात योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि योग्य वेळी योग्य चाचण्या व आवश्यक त्या लसीकरणाकडे लक्ष असावे याकडे लक्ष वेधले. आपल्या मनाशी, स्वभावाशी सुसंगत असा व्यायाम ठेवण्याची गरज सांगताना आपल्या शरीराशी भांडू नका असा सल्ला डॉ. तुळपुळे यांनी दिला. पळण्यापेक्षाही रोज नियमित चालणे हा सर्वांत चांगला व्यायाम असून तो सोपा आणि वर्षभर करता येतो असे आवर्जून सांगितले. या दोन्ही पुस्तकांचे अनुवादक सुभाष जोशी यांनीही जिममध्ये न जाता चालण्यावर भर द्यावा अशी सूचना केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही डॉक्टरांनी उपस्थितांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता आपटे यांनी तर अभय भावे यांनी आभार मानले. -डॉ. खानविलकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book