* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHALISHINANTARCHI VATCHAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667066
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FORTIES` IS A VERY IMPORTANT MILESTONE IN EVERYBODY`S LIFE. DR. SUBHASH REVEALS HERE THE VARIOUS IMPORTANT ASPECTS RELATED TO THIS AGE GROUP. THE `FORTIES` ARE ALSO RESPONSIBLE FOR MANY CHANGES IN OUR BODY, SOUL AND MIND. HE DISCUSSES THIS IN DETAIL ALONG WITH THE OTHER TOPICS SUCH AS MENOPAUSE, HEART DISEASE, CANCER, DIABETES, ETC. WHILE DOING SO HE SKIPS THE DIFFICULT TECHNICAL PART OF EACH OF THE TOPICS AND MAKES THEM VERY SIMPLE TO UNDERSTAND. THIS SIMPLICITY MAKES IT POSSIBLE TO FOLLOW THE GUIDELINES HE HAS PROVIDED TO AVOID THE DANGERS OF CONTACTING THESE DISEASES. HE ALSO TALKS ABOUT THE REMEDIES FOR THESE DISEASES. HE ELABORATES THEM WITH THE EXAMPLES FROM DAY-TO-DAY LIFE.THE SALIENT FEATURE OF THIS BOOK IS THE SECTION DEVOTED TO HEART DISEASE ALONG WITH ITS VARIOUS TESTS, SURGERIES, THE NATURE OF SURGERIES, ETC.HE VERY DELICATELY HANDLES THE SENSITIVE TOPIC OF `SEX AFTER FORTIES` WHICH IS HARDLY DISCUSSED. HE PROVIDES VITAL INFORMATION ABOUT MAINTAINING PEACE IN FAMILY, AVOIDING OLD-AGE HOMES, ETC. HE GIVES DETAILED INFORMATION ABOUT THE OLD-AGE HOMES, ADAPTATION PROCEDURE, WILL, EYE-DONATION, BODY-DONATION, ETC. MAKING IT VERY SIMPLE TO UNDERSTAND THESE TECHNICALLY DIFFICULT TOPICS. THIS BOOK IS THE ONLY OF ITS TYPE FOR THE `OVER FORTY` AGE GROUP. IT WILL SURELY MAKE THEIR LIFE EASIER TO LEAD.
‘चाळिशी’ हा माणसाच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा का मानला जातो, हे सांगून डॉ. सुभाष दांडेकर यांनी या पुस्तकात, चाळिशीनंतरच्या आयुष्याशी अत्यंत निगडित अशा अनेक महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांवर उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. चाळिशीनंतर होणारे शारीरिक बदल, ऋतुनिवृत्ती, हृदयविकार, कर्करोग , मधुमेह अशा अनेक विषयांचे सविस्तर विवेचन करून, लेखकाने या विविध विकारांवरील उपचारांचे नेमके स्वरूप, त्यांतील तांत्रिक क्लिष्टता टाळून स्पष्ट केले आहे. वाचकांना त्यांच्या रोजच्या अनुभवविश्वातील उदाहरणे देत देत या सर्व गोष्टी लेखकाने पटवून दिल्या आहेत. हृदयविकाराच्या विविध चाचण्या, शस्त्रक्रिया, त्यांचे स्वरूप यांचे त्यांनी केलेले स्पष्टीकरण हे तर या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे. ज्या विषयांवर कुटुंबात, समाजात उघड बोललेही जात नाही, असा ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ हा नाजूक विषयीही त्यांनी कौशल्याने हाताळला आहे. ‘कौटुंबिक स्वास्थ्यासाठी काय करावे’, ‘वृद्धाश्रम टाळण्यासाठी काय करावे’, याविषयी मोलाची चर्चा करताना त्यांनी वृद्धाश्रमांविषयीची मौलिक माहिती दिली आहे. दत्तकविधान, मृत्युपत्र, स्वेच्छामरण, देहदान, नेत्रदान या एरवी त्यांतील तांत्रिकतेमुळे क्लिष्ट वाटणाऱ्या विषयांची माहितीही त्यांनी वाचकांच्या आकलनाच्या कक्षेत आणून ठेवली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #डॉ.सुभाष दांडेकर #DR.SUBHASH DANDEKAR #HEALTHCARE & PSYCHOLOGY#चाळिशीनंतरची वाटचाल #CHALISHINANTARCHI VATCHAL #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-09-2002

    समाधानी वृद्धत्वाची पूर्वतयारी... जुन्या काळी मोठी माणसे देवाकडे चांगली शंभर वर्षे आयुष्य मागायची आशीर्वादही तसाच द्यायची तेव्हा ते शंभर वर्षांचे आयुष्य स्वावलंबी, समाधानी असावे अशीच त्यांची इच्छा होती; पण आरोग्यसंपन्न शंभर वर्षाचे आयुष्य जगायचे तर ास प्रयत्न हवेत. सकस आहार, योग्य व्यायाम, विश्रांती स्वच्छता, आजारावरील उपचार याबरोबरच मानसिक आरोग्यही हवे. साताऱ्याच्या डॉ. सुभाष दांडेकर यांनी अशा समाधानी वृद्धपणाची तयारी चाळीशीपासूनच करायला हवी असे प्रतिपादन केले आहे. त्यांच्या घरात चार पिढ्या समाधानाने नांदत आहेत. फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांनी अनेक कुटुंबाचे आयुष्य जवळून पाहिले आहे. चाळिशी हा व्यक्तीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सुमारास अनेक शारीरिक, मानसिक व कौटुंबिक बदल घडत असतात. त्याची जाणीव ठेवून पुढच्या आयुष्याचे नियोजन करावे लागते. पुढील आयुष्याशी अत्यंत निगडित अशा अनेक महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या विषयावर लेखकाने उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. शारीरिक बदल, ऋतुनिवृत्ती, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह अशा अनेक विषयांवर सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली आहे. स्वेच्छामरण, दत्तकविधान, मृत्युपत्र यातली कायद्याची गुंतागुंत सोप्या भाषेमुळे कळते. देहदान, नेत्रदान, यासाठी मनाची तयारी करणे आवश्यक आहे. ओघवती भाषा व रोजच्या माहितीतील उदाहरणे याने विषय सहज सुलभ झाला आहे. सामाजिक व कौटुंबिक समस्यांवर विशेष मार्गदर्शन केले आहे. उघड बोलता न येणारा चाळिशीनंतरचे कामजीवन हा नाजूक विषय लेखकाने विशेष कौशल्याने हाताळला आहे. लग्न झाल्या क्षणापासून पूर्ण अनोळखी कुटुंबाला आपले म्हणायचे, सर्वस्व द्यायचे यापेक्षा मोठा त्याग तो कोणता? हा नित्याचा व्यवहार झाल्याने त्या त्यागाचे मोठेपण कुणालाच जाणवत नाही. पण पतीने तरी आपल्या पत्नीचा हा मोठेपणा जाणावा व तिचे मनही जाणून घ्यावे, स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता असते. उतारवयात तर ती फक्त माताच असते. कामवासना ही फार मोठी ऊर्जा आहे. तिला चांगल्या मार्गाने वळवणे हेही उत्तम पुरुषार्थाचे लक्षण आहे. साठीनंतर स्त्रिया मुले, नातवंडे, देवधर्म यात गुंततात. त्यांना पतीची फारशी गरज भासत नाही. हेच कारण असेल का की स्त्रिया वैधव्य आल्यानंतरही कित्येक वर्षे समाधानाने जगतात. याउलट पुरुष पत्नी निधनानंतर उदास होतो. आजारी होतो. पत्नीच्या पश्चात तो मनाने खचतो. पुरुष मानसिकदृष्ट्या पत्नीवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. कौटुंबिक कलह, चिंता करण्याची वृत्ती, नेहमी सगळ्यांनी आपलेच ऐकावे असा अट्टाहास यामुळे वृद्ध व्यक्ती अनेक घरातून नकोशा होतात. तसे होऊ नये म्हणून काय करता येईल याविषयी तरुणांना व वृद्धांना मार्गदर्शन केले आहे. श्रवणातील दोष व विस्मृती यामुळे कुटुंबात अनेक गैरसमज कसे निर्माण होतात हेही उदाहरणाने स्पष्ट केले आहे. चाळिशीनंतरची वाटचाल सुखासमाधानाची व्हावी म्हणून अनेक महत्त्वाच्या विषयावरची चर्चा एकत्र आणणारे हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. -रजनी वैद्य ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 05-05-2002

    चाळीशी सुखाने पार करण्यासाठी... चाळीशी या निर्णायक टप्प्यावर अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन करणारे विवेचन करणारे डॉ. सुभाष दांडेकर यांचे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चाळीशीनंतर होणारे शारीरिक बदल, ऋतुनिवृत्ती, हृदयविकार कर्करोग, मधुमेह अशा अनेक विषयांचे विवेचन सविस्तर केले आहे. लेखकाने या विकारांवरील उपचारांचे नेमके स्वरूप, त्यातील तांत्रिक क्लिष्टता टाळून स्पष्ट केले आहे. वाचकांना त्यांच्या रोजच्या जीवनातील उदाहरणे देत या गोष्टी पटवून दिल्या आहेत. दत्तकविधान, मृत्युपत्र, स्वेच्छामरण, देहदान आणि नेत्रदान या गोष्टींची माहिती ही लेखकाने वाचकांच्या आकलनाच्या कक्षेत आणून मांडली आहे. चाळीशीनंतरची वाटचाल सुखाची करण्यासाठी चर्चा घडविणारे हे मराठीतील एकमेव पुस्तक असे म्हणावे लागेल. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA, LOKRANG 26-05-2002

    चाळिशी? डोन्ट वरी!... ‘चाळिशीनंतरची वाटचाल’ हे डॉ. सुभाष दांडेकर यांचे पुस्तक. या पुस्तकात वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर कोणकोणते शारीरिक बदल होतात, ते बदल लक्षात घेऊन काय काळजी घेतली पाहिजे, उतार-वयात होणारे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती दक्षता घेली पाहिजे, अशी विविध माहिती देण्यात आली आहे. मेनोपॉज, स्त्रियांना होणारे कर्करोग, मोतीबिंदू, हृदयविकार, मधु-मेह, मूत्रविसर्जन संस्थेचे विकार या संदर्भातील माहिती लेखकाने दिली आहे. उतारवयात निर्माण होणारे कौटुंबिक कलह, ते टाळण्याचे मार्ग, वृद्धाश्रमात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील वृद्धाश्रमांची माहिती, स्वेच्छा-मरण, दत्तकविधान, मृत्युपत्र, नेत्रदान, देहदान आदी विषयही लेखकाने हाताळले आहेत. वृद्धत्वाची चाहूल लागणार हे लक्षात घेऊन मनाची तयारी कशी करावी, दिनचर्या कशी ठेवावी, आदींची चर्चाही या पुस्तकात आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 19-05-2002

    परिपूर्ण सुखी उत्तरायुष्यासाठी आवश्यक पूर्वतयारी… सातारचे एक नामवंत डॉ. सुभाष दांडेकर यांचे ‘चाळिशीनंतरची वाटचाल’ हे पुस्तक चाळिशीचा टप्पा ओलांडणाऱ्या प्रत्येकाला उपयुक्त वाटेल. ‘लाईफ बिगिन्स अ‍ॅट फॉर्टी’ असे सध्या मानतात. कारण चाळिशीचा हा टप्पा हा ता पूर्वीसारखा वार्धक्याचा आरंभबिंदू राहिलेला नाही. तो साठीकडे झुकत आहे. तरीही चाळिशीनंतरचे आयुष्य हे अनेक दृष्टींनी वेगळे ठरतेच. डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चाळिशी हे आयुष्यातील एक संदर्भकेंद्र असून शारीरिक, मानसिक व कौटुंबिक बदलांची जाणीव ठेवून उर्वरित आयुष्याचे नियोजन करण्याची गरज प्रकट केली आहे. डॉ. दांडेकर यांनी वृद्धाश्रम व नेत्रपेढी या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल डॉ. सरदेसाई त्यांना समाजाचे भूषण म्हणतात आणि या पुस्तकात शारीरिक व्याधींप्रमाणेच सामाजिक व कौटुंबिक समस्यांबाबत केलेले मार्गदर्शन महत्त्वाचे आहे याकडे लक्ष वेधतात. चाळिशीआधीचा काळ हा उमेदवारीचा असतो. त्यानंतर नोकरीधंद्यात स्थिरता येते. प्रमोशन्स मिळणे व व्यावसायिक प्रगती होणे हे पुढच्या काळातच सुलभ जाते. आजवरचा अनुभव यासाठी उपयुक्त ठरतो. चाळीशी ते साठी हा आयुष्यातील काळ वर्तमानावर पकडे ठेवून भविष्यकाळ आश्वासक ठरवण्याचा असतो. आपले उत्तरायुष्य आनंदमय करण्यासाठी आवश्यक ती बैठक चाळिशीतच साधावी लागते. या पुस्तकातील आरंभीच सात प्रकरणे मेनोपॉज, स्त्रियांचे रोग, मोतीबिंदू, हृदयविकार, मूत्रसंस्थेचे विकार, मधुमेह यांची चर्चा करतात. चाळिशीनंतरच्या कामजीवनाच्या मर्यादा व पथ्ये यांची कल्पना स्वतंत्र प्रकरणात देण्यात आली आहे. कौटुंबिक कलह कसे टाळावेत हे सांगून वृद्धाश्रमातील वास्तव्य व आर्थिक नियोजन याबद्दलही मार्गदर्शन केले आहे. उत्तरायुष्यात जोपसण्यासारखे छंद, दत्तकविधान, मृत्युपत्र, मरणोत्तर देहदान व नेत्रदान करण्याची पूर्वयोजना यांचीही माहिती देण्यात आली आहे. एकूणच आपल्यासाठीनंतरच्या जीवनाची सर्वकष रूपरेखा ठरवण्याच्या दृष्टीने आपली मानसिक तयारी करून घेणारे हे पुस्तक आहे. चाळिशीचा काळ हा एका परीने उत्साहाचा, स्वप्नपूर्तीचा व भरभराटीचा काळ असतो. साठीनंतरचा काळ हळूहळू सर्वच क्षेत्रांतून लक्ष कमी करण्याचा व निवृत्तीकडे जाण्याचा असतो. चाळिशीतच या साठोत्तरी आयुष्याचे नियोजन केले तर शारीरिक, आर्थिक मानिकस संतुलन उत्तम राहू शकते व शेवटचे दिवस गोड ठरू शकतात. परंतु चाळिशीत चुकीच्या सवयींच्या व व्यसनांच्या आहारी गेले, आर्थिक उधळपट्टी केली, तडजोडीचे हीन मार्ग स्वीकारले तर मात्र उत्तरायुष्याचे एकूणच गाडे रूळावरून घसरत आणि वार्धक्य ही शिक्षा ठरते. ज्येष्ठपण हे बिनचेहऱ्याचे व बिनकण्याचे होते. डॉ. सुभाष दांडेकर यांनी मोजक्या शब्दांत चाळीशीनंतरच्या वैद्यकीय समस्यांचे स्वरूप नेमके सांगून त्याबाबतच्या उपाययोजनांची दिशा सुचित केली आहे. मात्र वैद्यकीय सल्ला घेऊनच पुढे पाऊल टाकावे, असे पुन्हा पुन्हा बजावले आहे. हृदयविकाराची पूर्वसूचना मिळते, तशी लक्षणेही अनेक असतात. चरबी वाढू न देणे, धुम्रपान न करणे, चिडचिड टाळणे, तणावमुक्त राहणे, अंजायनाचा त्रास असेल तर नायट्रोग्लिसरीनच्या गोळ्या सतत जवळ ठेवणे, मधुमेह व रक्तदाब काबूत ठेवणे हे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच हार्टअ‍ॅटक आल्यानंतरचे उपचार व शस्त्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन केले आहे. चाळिशीनंतरच्या कामजीवनाबाबत डॉ. दांडेकर यांनी अनेक सूचना दिल्या आहेत. पुरुष लैंगिकदृष्ट्या कधीच म्हातारा होत नाही. कामभावना अखेरपर्यंत राहते. शीघ्रपतन व ताठरता याबद्दलच्या समस्या काहींना त्रस्त करतात. स्त्रियांची कामभावना या वयात थोडी कमी होते. हे पुस्तक चाळिशीतल्या प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचायला हवे; त्यामुळे उत्तरायुष्यातील बऱ्याच समस्या वेळीच लक्षात येऊन त्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची मानसिकता तयार होईल. दत्तकविधान, मृत्युपत्र, देहदान, नेत्रदान, स्वेच्छामरण याबद्दही आपल्या मनोधारणा निश्चित करण्यासाठी या पुस्तकातील विवेचन परिणामाकारक ठरेल. चाळिशीनंतरची वाटचाल, ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more