* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STHULATELA KARA TATA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984040
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RESEARCH ON OBESITY, BY DR. ASHISH BORKAR AND DR. GAURI BORKAR IS NOW AVAILABLE IN BOOK FORM. IT IS EASY TO OVERCOME OBESITY IF ONE ADOPTS A THREE-PRONGED ATTACK – A DIET THAT MATCHES YOUR CONSTITUTION AND PROFESSION, REGULAR EXERCISE, AND PROPER TREATMENT. THIS BOOK DELVES DEEPLY INTO THE COMPLICATIONS OF OBESITY AND THEIR TREATMENT AND ALSO THE WORRYING TREND OF CHILDHOOD OBESITY THAT IS ON THE RISE. THIS BOOK IS UNIQUE IN THAT IT OFFERS DETAILED ADVICE ABOUT DIET IN VARIOUS SITUATIONS – DAILY DIET, DIET FOR DAYS OF FASTING, DIET TO BE FOLLOWED IN MARRIAGE RECEPTION BANQUETS AND WHAT TO EAT IF ONE GOES TO A RESTAURANT. MANY PEOPLE FIND IT DIFFICULT TO SPARE TIME TO GO TO A GYM. THIS BOOK COMES WITH A DVD THAT DEMONSTRATES SIMPLE ‘FAT-BURN’ EXERCISES FOR HOUSEWIVES, SALARIED EMPLOYEES, BUSINESSMEN, AS WELL AS YOUNG BOYS AND GIRLS.
डॉ. आशिष बोरकर व डॉ. गौरी बोरकर यांचे `स्थूलते`वरील संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आपली प्रकृती आणि व्यवसाय यांना अनुरूप आहार, योग्य उपचार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री अंगिकारल्यास स्थूलतेवर विजय मिळवणे सोपे जाते. स्थूलतेमुळे होणारे विविध आजार व उपचार यांची माहिती, प्रौढांबरोबरच सध्या लहान मुलांमध्ये आढळणारे स्थूलतेचे चिंता करायला लावणारे प्रमाण याचा सखोल ऊहापोह या पुस्तकामध्ये केलेला आहे. स्थूल लोकांसाठी दैनंदिन आहार, धार्मिक उपवासाच्या दिवशीचा आहार, लग्न-समारंभातील आहार, हॉटेलमध्ये गेल्यास काय आहार घ्यावा यांसारख्या बारीकसारीक गोष्टींचा अंतर्भाव, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य! बऱ्याच लोकांना वेळेअभावी घराबाहेर जाऊन `जीम`मध्ये व्यायाम करणे शक्य होत नाही. गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार, लहान व तरुण मुले-मुली यांच्यासाठी खास सोपे व्यायामप्रकार या पुस्तकाबरोबर डी.व्ही.डी.मध्ये देण्यात आले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #STHULATELAKARATATA #STHULATELAKARATATA #स्थूलतेलाकराटाटा #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #GAURIBORKARASHISHBORKAR #गौरीबोरकरआशिषबोरकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 10-06-2016

    वाढते वजन अपरिहार्य अशा आधुनिक जीवनशैलीचे बायप्रॉडक्ट आहे. वेजची धावपळ, व्यायामाला कमी वेळ, वाढलेल्या जीवनमानामुळे चांगलेचुंगले, चवीढवीचे, भरपूर फॅट्स असलेले खाद्यपदार्थ हवे तेव्हा उपलब्ध असणं, जंक फूडचा मारा, ताणतणाव या सगळ्याचा परिणाम वजन वाढण्यावरहोतो. हल्ली लहान, शाळकरी वयातच स्थूलता येत असल्याचे संशोधन अलीकडेच पुढे आले आहे. थोडक्यात, वजन वाढणे आणि ते नियंत्रणात न येणे ही समस्या आता अनेकांना भेडसावत असते. ‘स्थूलतेला करा टाटा’ या पुस्तकात बोरकर डॉक्टरद्वयीने ही समस्या आणि ती सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची चर्चा केली आहे. ‘आपले वजन का वाढते’ या प्रकरणात आपल्याला स्थूलत्व नेमके कशामुळे येते याबद्दलची चर्चा आहे. आपण स्थूल आहोत का, हे कसे ओळखायचं याबाबत आपल्याला दुसऱ्या प्रकरणात दिलेल्या तक्तावरून समजतं. आपला आहार संतुलित हवा म्हणजे नेमकं काय याबरोबरच संबंधित सगळ्या घटकांची माहिती देण्यात आली आहे. स्थूलतेच्या परिणामाची तपशीलवार चर्चा अतिरिक्त मेदसंचितीचे दुष्परिणाम या प्रकरणात मांडले आहेत. त्यात स्थूलतेचा आयुर्मानावर, श्वसनसंस्था, पचनसंस्थेवर होणारा परिणाम, स्थूलतेमुळे होणारी सांधेदुखी, येणारा थकवा, कंबरदुखी, टाचदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, मधुमेह, प्रजनन संस्थेवर होणारा परिणाम, स्थूलता आणि अंतस्त्रावी ग्रंथी, त्वचेवर होणारा परिणाम, हृदयविकाराचा स्थूलतेशी असलेला संबंध, त्यावर उपाय याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. वयात येताना होणारे मानसिक बदल आणि त्यांचा स्थूलतेशी असणारा संबंध, अशा वेळी पौगंडावस्थेतील मुलांशी कसं वागायला हवं, स्थूलता आणि उपवास यांचा काय संबंध आहे, पाणी पिण्याचे वजनाशी नेमके काय नाते आहे, कॅलरी मोजून आहार घेण्याचे सध्याचे फॅड आणि वस्तुस्थिती नेमकी काय असते या सगळ्या माहितीबरोबरच वजन कमी करण्याचे शास्त्रही हे पुस्तक सांगते. वजन कमी करण्यासाठी आहार काय असावा त्याचा तक्ताही पुस्तकात दिला आहे. आहारासंबंधी हदलेल्या टिप्स वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला उपयोगी पडू शकतात. डॉक्टरांनी मांडलेले रुग्णानुभव हे वाचकांसाठी आरशासारखे ठरु शकतात. स्थूलता आणि व्यायाम, व्यायामाची त्रिसूत्री ही प्रकरणंही महत्त्वपूर्ण माहिती देतात. पण यात मांडलेली माहिती आणखी तपशीलवार असायला हवी होती, असं वाटत राहतं. पुस्तकाबरोबरच डीव्हीडीही देण्यात आली आहे. त्यात चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे वेगवेगळे, सोपे व्यायामप्रकार दिले आहेत. पुस्तक आणि डीव्हीडी असा हा मराठीतला पहिलाच कॉम्बीपॅक आहे. ...Read more

  • Rating Startejas joshi

    I read and followed this book. I really thank dr. borkar and mehta publishing house for such a nice combipack of book and DVD. It is very useful for everyone who is obese.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more