MADHAVI DESAI

About Author

Birth Date : 21/07/1933
Death Date : 15/07/2013


MADHAVI DESAI WAS BORN IN KOLHAPUR, BUT SPENT MOST OF HER LIFE IN GOA. PRODUCER OF MARATHI FILMS AND DADASAHEB PHALKE AWARD WINNER KAI. BHALJI PENDHARKAR IS HIS FATHER. MADHAVITAR GOT THE HERITAGE OF ART AND LITERATURE FROM THE FAMILY ITSELF.

माधवी देसाई यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ गोव्यामध्येच व्यतीत केला. मराठी चित्रपटांचे निर्माते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कै. भालजी पेंढारकर हे त्यांचे वडील. माधवीताईंना कलेचा, साहित्याचा वारसा घराण्याकडूनच मिळाला. माधवीताईंनी जवळ-जवळ १६ वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केले. नंतर त्या गोव्यामध्ये वास्तव्यास गेल्या. त्या २५ वर्षे तेथे राहिल्या. आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा प्रारंभही त्यांनी तेथेच केला. अखिल गोवा साहित्य संमेलनाची स्थापनाही त्यांनी केली. त्यांनी जवळ-जवळ ३८ पुस्तके लिहिली. नाच ग घुमा या त्यांच्या आत्मचरित्राला यशो दामिनी हा साहित्य पुरस्कारही मिळाला. प्रतारणा व सीमारेषा या त्यांच्या पुस्तकांना कला अ‍ॅकॅडमी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. देवराई, जगावेगळी, नियती, कांचनगंगा, मंजिरी, प्रार्थना, हरवलेल्या वाटा, स्वयंसिद्धा आम्ही, शाल्मली, आवतन या त्यांच्या कादंबऱ्याही खूप गाजल्या. असं म्हणू नकोस, कथा सावलीची, सागर, किनारा, शुक्रचांदणी हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी घे भरारी या चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखनही केले. या चित्रपटाला अल्फा गौरव अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 12 total
ASA MHANU NAKOS Rating Star
Add To Cart INR 170
DHUMARE Rating Star
Add To Cart INR 130
HARAVALELYA WATA Rating Star
Add To Cart INR 120
KANCHANGANGA Rating Star
Add To Cart INR 220
KATHA SAWALICHI Rating Star
Add To Cart INR 190
KINARA Rating Star
Add To Cart INR 120
28 %
OFF
MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1670 INR 1199
MANJIRI Rating Star
Add To Cart INR 150
NIYATI Rating Star
Add To Cart INR 120
PRARTHANA Rating Star
Add To Cart INR 220
SAGAR Rating Star
Add To Cart INR 100
SHUKRACHANDANI Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more