* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PANI KUTHAVAR AALA GA BAI...
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788171618189
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 56
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A SECOND COLLECTION OF POEMS AFTER DAYA PAWAR`S KONDWADA. HIS AUTOBIOGRAPHY ` BALAUTAM` CONTRIBUTED VALUABLE TO MARATHI LITERATURE AND AT THE INTERNATIONAL LEVEL. HE ALSO REACHED HIS COSMIC `BALAUTAM`. IN SPITE OF THIS. DAYA PAWAR’S ORIGINAL ORIGIN REMAINS AS A GENUINE CONTEMPORARY POET. HE WROTE HIS OWN POEM IN KONDWADA. THERE IS A SIMPLE, EASY TO- USE AND NON -ACCELERATED MOVE TO REBEL AGAINST REBELLION. THIS DISCOVERY HAS BEEN SHOWN IN MORE COMPLEXITY AND OVERALL IN WHERE DID WATER COMES FROM? DAYA PAWAR SENSITIVITY IS ANOTHER IMPORTANT ASPECT IN THIS COLLECTION. THE HARD WORK OF THE YOUNGEST, THE OPPRESS WOMEN, THE MISERY OF THE DALIT WOMEN`S PAIN HAS PERSISTENTLY KEPT ON MANY PLATFORMS. FROM THE TOP OF THE COLLECTION ` WHERE DID WATER COMES FROM? IT IS UNDERSTOOD THAT IN THE LIFE OF DALIT WOMEN- IN HER Q- LEVEL, MERCY PAWAR EXPERIENCE A WHOLE SYSTEM.
दया पवार यांच्या ‘कोंडवाडा’ नंतरचा हा दुसरा कवितासंग्रह. त्यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनानं मराठी साहित्याला मोलाचं योगदान दिलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील त्यांचा लौकिक ‘बलुतं’मुळंच पोहोचला. असं असलं तरी दया पवारांचा मूळ िंपड हा अखेरपर्यंत अस्सल समकालीन कवीचाच राहिला. ‘कोंडवाडा’मधून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी कविता नोंदवली. विद्रोहाच्या तप्त आवाजाच्या कोलाहलातही स्पष्टपणे ऐवूÂ येणारी साधी, संयत आणि न एकारलेली. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ मध्ये हा शोध अधिक प्रगल्भतेनं आणि समग्रपणे व्यक्त झाला आहे. दया पवारांच्या संवेदनशीलतेला या संग्रहात आणखी एक महत्त्वाचं परिमाण लाभलं आहे. सर्वांत पायतळी असलेल्या कष्टकरी, दलित स्त्रीच्या अपार दु:खाचं. लोकगीताच्या देशीय रूपबंधातून दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवारांनी अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं जागता ठेवला. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ या संग्रहाच्या शीर्षओळीपासूनच हे जाणवतं की, दलित स्त्रीच्या जगण्यात – तिच्या आQस्तत्वात, दया पवार सबंध व्यवस्थेचं प्रतिरूप अनुभवतात. भारताच्या सांस्कृतिक बेटांमधली दरी नाहीशी व्हावी यासाठी ‘माझी कविता बळी पडली तरी चालेल,’ असे दया पवारांनी कोंडवड्याच्या प्रस्तावनेत लिहिले आहे... ‘धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात, तसं आपण हसत मरावं...’ त्यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’मधूनही शेवटपर्यंत जाणवतो. कवी दया पवारांचे ‘समकालीनत्व’ अधोरेखित करणारा हा संग्रह मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहात अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरावा. प्रा. प्रज्ञा लोखंड
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #KONDVADA #PANIKUTHVARALAGBAI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-12-1999

    दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर... आपल्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानांविषयीची व प्रचलित काव्यविचार व परंपरेने चालत आलेली मराठी कविता यांच्यापेक्षा आपल्या कवितेच्या वेगळेपणाविषयीची जाणीव बहुसंख्य दलित कवींनी आपल्या कवितेतून प्रकट केली आहे. दया पवा हे या कवींमध्ये महत्त्वाचे नाव आहे. कोंडवाडा नंतरच्या त्यांच्या कविता पाणी कुठंवर आलं गं बाई ’ या संग्रहात चित्रित करण्यात आल्या आहेत. हा संग्रह त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनाला प्रकाशित करण्यात आला. पवारांच्या कवितेचे वेगळेपण ‘कोंडवाडा’ मध्येच प्रकट झाले होते. दलित कवितेच्या महालात त्यांची साधी, संयत ठाम उभी होती. पवारांनी भोगलेले बरेवाईट सर्व अनुभव मनात साठवलेले आणि नंतर संयमशील वृत्तीने त्या अनुभवांचे प्रकटीकरण केलेले दिसते. त्यामुळे त्यांच्या कवितेत विद्रोह असला तरी आक्रस्ताळेपणा नाही. ती चिंतनशील कविता आहे. आपल्या उरातल्या जखमा हळुवारपणे,सौम्यपणे ती उघड्या करून दाखवते. आर्त स्वरात व्यथा गुंफून आवेगाने कड्यावरून कोसळणारी अशी ही कविता आहे. वाट्याला आलेला अनुभव कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ते मांडतात. ज्वालाग्राही अनुभव मनात खदखदत ठेवून ते सौम्यपणे त्याचा आविष्कार करतात. त्यामुळे येथे दलित वेदना आक्रस्ताळ्या भाषणबाजीत न सापडता चिंतनशील काव्यरूप घेतात. दया पवारांच्या कवितेचे हे विशेष ‘कोंडवाडा’तच दिसले होते. मग ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ या नव्या संग्रहाचा विशेष कोणता? सामूहिक दु:खाचा शोध ते येथे अधिक प्रगल्भतेने घेतात आणि अधिक समग्रपणे व्यक्त करतात. वैयक्तिक अनुभवांतून सामूहिक आविष्कार हे या कवितेचे स्वरूप आहे. कवीचे अनुभव व कविता यांच्यामध्ये त्याचे व्यक्तिमत्त्व उभे असते. अनुभवाचा अर्थ शोधणे व त्या अथानुरूप मूळ अनुभवाचा आकार व घाट साधणे, ही प्रक्रिया ते व्यक्तिमत्त्व करीत असते. येथे दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवार यांच्या संवेदनशीलतेला नवे परिमाण मिळवून देतो. स्त्रीचे दु:ख व्यक्त करण्यासाठी त्यांना लोकगीतांचा देशीय रूपबंध सहज हाती लागतो. ‘कोंबडा’, ‘बाजार’, ‘लोणी’, ‘आडाचं पाणी’, ‘चिलमाचं गाव’, ‘पाणी कुठवर आलं गं बाई’, ‘धरण’ या त्यांच्या कवितांना लोकगीतांच्या अर्थाला सादृश्य असा अर्थ व घाट लाभतो. ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ आणि ‘बाई मी धरण बांधीते, माझं मरण कांडीते’ या विद्रोहाच्या अंगार फुलवणाऱ्या कविता नर्मदा आंदोलनाच्या प्रेरणास्थानी राहिल्या आहेत. दया पवारांनी कवितेला लढ्याचे साधन मानले आहे. त्यामुळे या कविता एखाद्या आंदोलनाच्या प्रेरणास्थानी राहणे म्हणजे त्यांनी प्रेयस प्राप्त करण्यासारखेच आहे. नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला सामाजिक संदर्भाची अपरिहार्यता प्रदान करणारी कविता दिली. तोच प्रकार पवारांच्या कवितेबाबत झाला आहे. सामाजिक संदर्भात बोलत असूनही ही कविता प्रचारकी थाटाची होत नाही, तर दलित जिण्याचा आलेख काढते. ती लढ्याचे साधन बनल्याने निराश होत नाही. जीवनातील एवढे भोग भोगूनही ती उदास बनत नाही. भविष्यकाळाची उत्तेजक स्वप्ने तिच्याजवळ आहेत. वेदनांच्या चित्रणाने भरलेली असूनही ती प्रचंड आशावादी आहे. दया पवार यांचा विकास व जागृती यांच्याशी त्यांची कविता समांतरपणे वाटचाल करीत राहिली, म्हणूनच प्रत्यक्ष जीवनानुभवाशी थेट नाते सांगणारी ठरली आहे. एका संयमित मनाने जीवनाच्या वेदनांचा समर्थपणे घेतलेला हा शोध आहे. संघर्षापेक्षा समर्पणशीलतेकडे झुकणारी ही कविता झपाटून टाकत नाही, पण समंजस मनाने घेतलेला मागोवा वाचकाला, श्रोत्याला अस्वस्थ करीत राहतो. -संतोष शेणई ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    लोकगीताच्या रूपबंधातून कष्टकरी स्त्रीच्या वेदनेचा करूण स्वर आळवणाऱ्या दया पवार यांच्या रचना बलुतंकार दया पवार यांच्या ‘बाई मी धरण, धरण बांधते’ आणि ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ या कविता अत्यंत गाजल्या. दलित स्त्रीच्या जगण्यातले जीवघेणे दु:ख त्यांच्या या कवतांद्वारे वाचकांच्या हृदयाला चटका देऊन गेले. ‘कोंडवाडा’नंतरच्या त्यांच्या कवितांचा वारसा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या. प्रा. प्रज्ञा लोखंडे यांनी सिद्ध केला आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने तो ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ या शीर्षकाने प्रकाशित केला आहे. अडतीस कवितांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, येशू खिस्त, भगवान बुद्ध, पंढरीचा राया यांना उद्देशून केलेल्या कविता आहेत. ‘माय मराठी’, ‘गुणगान’ करणारी एक रचना आहे. दलित स्त्रीच्या भाव-भावनांचा विविध पातळ्यांवरचा आविष्कार करणाऱ्या काही कविता आहेत, भारताच्या सद्य:स्थितीतल्या विषमतेच्या चटक्यांचीही जीवघेणी वेदना बहुतेक कवितांमधून या ना त्या स्वरूपात प्रकट होत राहते. कलंक कायमच आपण या देशात, या समाजात नेमके कुठे आहोत याबद्दलचा संभ्रम सतत त्यांना सतावत राहतो. ‘मी तळ्यात की मळ्यात’ असा प्रश्न पडतो. अहंकाराचा बुडबुडा फुटला तरी माथ्यावरचा कलंक अजून पुसला गेलेला नाही, अद्वैताचा नाडा हाती लागत नाही, खाली पाय ठेवावा, तर निसरड्या शेवाळावरच तो पडतो. (किती पायऱ्या उतराव्या), या तुमच्या दुनियेत, तुमच्या संस्कृतीत आपल्या पायाखाली सतत रक्ताचे सडेच पसरलेले दिसतात. तुमच्या पोशाखी संस्कृतीत आपले नाकडेपणच उठून दिसते. तुमचा मुखवटा घालून जगणे अशक्य होते. आपण सतत वधस्तंभाकडेच चाललोय, अशी पदोपदी जाणीव होते. (वधस्तंभ), अशी आपली घुसमट ते व्यक्त करतात. अमेरिकेतही भारताची आठवण अमेरिकेच्या दौऱ्यातील प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या काही कविता या संग्रहात आहेत. मारूतीसारखे सातासमुद्रापलीकडे उड्डाण करून गेल्यावर कोकणच्या राजा झिम्मा खेळतो - हेच गाणे ओठावर येते. तेथील पितळी कुंडीतले कॅक्टस बघून तुळशीवृंदावन आठवते, नाइट क्लबमधील स्ट्रिपटीझ बघताना रासलीला आठवते. निग्रो वस्तीचे हार्लेम बघताना गोलपाठीचे स्मरण होते. त्या कोणा अक्करमाशाच्या आईच्या गाईसारख्या डोळ्यात आपलीच आई दिसते. अशी सारखी त्यांना भारताची सतत आठवण होत राहते. आर यू इंडियन ? न्यूयॉर्कमधला स्वातंत्रता देवीचा पुतळा प्रथम हसताना दिसतो, नंतर त्यावर आपलेच थेंब थेंब रक्त सांडताना दिसते. पंचतारांकित हॉटेलात पाणी मागितल्यावर मद्याची सुरई घेतलेली काळी राणी ‘आर यू इंडियन’ असा प्रश्न विचारते, तेव्हा त्या प्रश्नाने जिव्हारी बाण लागल्यासारखी जखम होते. भारतात पाणी मागितल्यावर जात आठवते; येथे स्वतंत्रता देवीच्या देशातही तेच भागधेय वाट्याला येते. कुठेही गेले तरी जात वा देश विचारला जातोच (स्वतंत्रदेवतेचा पुतळा) हा जय कुणाचा ? पराभव कुणाचा ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खेडी सोडा-शहरात चला असा संदेश दिला. शहरात धर्मांधता-कर्मकांड-भेदभाव यांनी अपमानित व्हावे लागणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. परंतु आता या शहरातूनही चौकाचाकात धर्मांधता उफाळून आलेली दिसते, याबद्दलची खंत प्रकट केली आहे. (बाबा, कालपरवाची गोष्ट), बाबांच्या नावाचा ध्यास घेऊन इतकी वर्षे बरबाद केली म्हणून तुम्ही हसत तर नाही ना ? असा सवाल करून मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव दिले गेले, तेव्हा ही काही एका दिवसाची कमाई नव्हे, पुन्हा पुन्हा खांडववन पेटून हरळीच्या मुळीसारखे तक्षक तरले म्हणून आजचा दिवस उगवला असे कवी म्हणतो. बाबा, तुमच्या नावाचा विटाळ आज संताच्या भूमीत धुतला गेला हा जय कुणाचा - पराभव कुणाचा दिव्याने दिवा पेटत गेला मनामनात दडलेला काळोख मिटला (बाबा) येशू खिस्त आणि भगवान बुद्ध येशू खिस्ताचा जन्म गोठ्यात झाला. गावकुसाबाहेर झाला. मानवमुक्तीसाठी तो एकाकी लढला. सत्तेचे जुलमी तख्त त्याने उलथवले, क्रूसावर रक्त सांडूनही सर्वांवर दयेची पाखर घातली. गाईच्यासारख्या त्याच्या डोळ्यातून करुणेचा पान्हा उमळून आला. ‘येशू तू आमच्यासाठी हंबरलास’ अशी आपली भावना ते प्रकट करतात. भगवान बुद्ध अजंठ्याच्या लेण्यातील आडव्या फत्तराप्रमाणे चिरनिद्रा न घेता विकलांग आम्रपालीच्या जखमा धूत होता आणि हाताने तिला विझवणारा घालत आहोत; म्हणून कवी आपला आदरभाव व्यक्त करतो. पंढरीच्या रायावर मात्र तो धारेवर धरणाऱ्या सवालांची एकापुढे एक सरबत्ती करतो. पंढरीच्या राया चोखा का बाहेरी ? तूच खरा डोंगा दाविली पायरी तुझे भक्तगण देवळाच्या दारी निर्मिली रे भिंत कर कढेवरी का रे घबरशी, लपशी गाभारी ? आणि नंतर कवी त्याच्या दांभिकपणावरच सरळ हल्ला चढवतो. उन्हापावसात कण्हते पायरी छत्र चामरात तू आत भरजरी चांदीचे डोळे तुझे गाले गारगोटी (पायरी) माझा कोंबडा कुणी मारला बाई (कोंबडा) घुसळ घुसळीने बाई - अजून लोणी का ग न्हाई, (लोणी), मांडव रचता रचता उभी हयात ग गेली (मांडव), आडाचं पाणी बाई खोलवर, हाताचा आले फोड (आडाच पाणी), केलं रक्ताचं शिपान येल मांडवाला गेली, गोऱ्या गोऱ्या दंडावर बाई चोळी मी गोंदली, (चोळी), सोन्याची बाई सुरी तिला चांदीची ग धार, कोन दळती दळती जात्यात, बाई मी चिधीत ग सांधीत, जात्यावरचा वरचा दिसता हात कोन हसती हासती बाई सुपात (चिलमाचं गाव), या लोकगीतांच्या लयीतल्या गीतांच्या बाज स्त्री जीवनातल्या सुखदु:खांना समर्थपणे कवटाळतो. ‘‘बाई मी धरण, धरण बांधीते, माझं मरण, मरण कांडीते’’ आणि ‘‘पाणी कुठवर आलं ग बाई’’ या दोन गीतांनी तर अनेकांना भुरळ घातली आहे. तुझे पांग कसे फेडू ? ‘माय मराठी’ या कवितेतूनही दया पवार आपली अंतरीची वेदना प्रकट करतात. धर्ममार्तंडाची कोट रचल्याने पोथी-पुराणात मराठी भेटली नाही, पण जात्यावरच्या ओव्यांत मराठी भेटली, धुळपाटीवर शब्द गिरवता आले, मूक नायकाच्या हाती लेखणी आल्यावर आता दु:खाची गाणी वेशीवर टांगण्याचे बळ लाभले. आता मात्र ‘माय मराठी गे तुझे पांग कसे फेडू’ असे गदगदून आले आहे. दया पवार यांच्या अल्पाक्षरी कवितेतील स्त्री मनाचे भावदर्शन आणि एक दलित म्हणून भोगाव्या लागलेल्या दु:खाचे निवेदन संवेदनाक्षम मनावर नक्कीच आघात करील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more