* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: KETKARVAHINI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177666502
 • Edition : 4
 • Weight : 200.00 gms
 • Pages : 192
 • Language : MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
 • Available in Combos :S.L BHYRAPPA & UMA KULKARNI COMBO 15 BOOKS
Quantity
THIS IS A STORY OF A CITY GIRL WHO GOES TO A SMALL REMOTE VILLAGE IN KONKAN AFTER MARRIAGE, WITH SWEET DREAMS OF A HAPPY MARRIED LIFE. ONCE THERE, SHE GETS VARIOUS EXPERIENCES, FIGHTS AGAINST ALL THE ODDS AND ADVERSE CONDITIONS. MEANWHILE, HER HUSBAND IS MURDERED. NOW SHE FIGHTS ON LEGAL BACKGROUNDS TOO, ASKING, PLEADING, DEMANDING JUSTICE. THIS IS THE THEME OF THE NOVEL KETKAR VAHINI. THIS IS A TRUE STORY OF A WOMAN`S LIFE AND HER MENTAL POWER AND COURAGE THAT DEPICT ALL THESE THINGS VERY INTERESTINGLY AND CAPTURE THE READER`S MIND. AFTER THE DEATH OF HER HUSBAND, SHE NOT ONLY BRINGS UP HER CHILDREN BUT GIVES THEM HIGHER EDUCATION, SENDING THEM AT BARODA, PUNE, FOR HIGHER EDUCATION. WITH A WILL TO MAKE THEM SELF-RELIANT. THIS WAS A HERCULIAN TASK. BUT SHE DID IT! IN THE SAME WAY SHE WINS MOST OF THE CASES IN VARIOUS COURTS, WHICH IS A GREAT ACHIEVEMENT. IN SHORT, THE NOVEL IS QUITE INSPIRING TO THOSE WHO ALWAYS GRUMBLE AGAINST THEIR POVERTY AND ODDS ARISING OUT OF IT!
गेल्या शतकाचा पूर्वार्ध. स्त्रीशिक्षणाची सुरवात. शहरातली एक मुलगी लग्न करुन कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात गेली, उराशी सुुंदर संसाराची स्वप्नं बाळगून. कडूगोड अनुभवांमधून जाताना तिच्या जीवनात वादळ आलं आणि मग सुरू झाला तिचा प्रतिकूल परिस्थितीशी झगडा. त्यातच मिसळली कायद्याची लढाई! ज्या कायद्याच्या लढाईत पतीची हत्या झाली, त्या युद्धभूमीला पाठ न दाखवता यशस्वीपणे लढतझगडत राहणाया केतकरवहिनींची कहाणी! गेल्या शतकातील स्त्रीजीवन आणि तिची आंतरिक शक्ती यांचं मनोज्ञ दर्शन घडवणारी वास्तव कहाणी! उमा कुलकर्णींच्या ओघवत्या शैलीत, त्यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती.
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarEknath Marathe

  केतकर वहिनी हे चरित्र म्हणजे कोकणातील करंबळे या दुर्गम खेड्यात लग्न होवून खोत घराण्यात गेलेल्या स्त्रीची कहाणी आहे. सातवी पास झालेली ही मुंबईची मुलगी लग्न होवून ठार खेडे म्हणावे अशा पण मुलींना बाहेर गावी ठेवून उच्च शिक्षण देणाऱ्या घराण्यात जाते. घरणे खोत असल्याने तिकडचे ते राजेच असतात. नवरा कमी शिकलेला असून सुद्धा अनेक कामात वाकबगार असतो व कूळ कायद्याचा चांगला अभ्यास केलेला असतो. स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकार जमीन विषयक नवे कायदे करते व कूळ व मालक यांच्यात जमिनीच्या मालकी वरून संघर्ष सुरू होतो. प्रकरण विकोपाला जाऊन नवऱ्याचा खून होतो. मारेकरी निर्दोष सुटतात. या खडतर परिस्थितीत, केतकर वहिनी खंबीर पणे उभ्या राहतात. स्वतः कूळ कायद्याचा अभ्यास करतात व अनेक न्यायालयीन लढे लढून बहुतेक जमिनी ताब्यात मिळवतात. पुढे गावातल्या माणसाना जरबेत ठेवतानाच त्यांचा आदर, विश्वास संपादन करतात. गावात अनेक सुधारणांना हातभार लावतात. हे करताना विधवेला होणारे त्रास, मुलांची परवड, प्रचंड मोठ्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची उठबस, आजारपण, गावातील विरोधी लोकांची कारस्थाने, एकटे पणाच्या वेदना, अनेक प्रकारच्या लोकांचे आलेले अनुभव व शेवटी परत त्या गावाची वाटत असलेली ओढ.. हा सर्व 80 वर्षाचा प्रवास मस्त उतरला आहे. एक स्त्री किती खंबीरपणे सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना आपला हक्क व सन्मान कसा परत मिळवते याची ही तेजस्वी कहाणी आहे. जरूर वाचा ! अनुवादक म्हणून प्रसिध्द असलेल्या उमा कुलकर्णी यांनी हे चरित्र लिहून त्यांच्यातल्या लेखकाला न्याय दिला आहे ! ...Read more

 • Rating StarRajendra Mantri

  जिंकण्याची दुर्दम्य इच्छा! ------------------------------ नुकतेच वाचून संपवलेले पुस्तक. या मालतीबाई माधवराव केतकर (पूर्वीच्या खरे. आमच्या मालाडच्या. येथे मी 25 वर्षे राहिलो, पण त्यांना भेटल्याचे मला स्मरत नाही. पण त्यांच्यापैकी कोणाचे तरी घड्याळाच दुकान मालाड स्टेशनजवळ असल्याचे मला स्मरते.) त्यांचं लग्न झाले 1938 साली. चिपळूणशेजारच्या करंबवणे गावच्या केतकरांशी. या केतकरांना दहा मुली व दोन मुलगे. त्यातील एका मुलाशी त्यांच लग्न झाले. बाई सातवी पास (व्ह. फा.) शिकल्या होत्या. त्यांचे सासरे कायद्याचे अभ्यासू , आणि नोंदी ठेवण्यात अत्यंत नीटनेटके होते. त्यांना मदत करताना केतकरवहिनी हळुहळू कायद्याची कामे शिकल्या. या दहा मुलिंपैंकी मोठ्या गोदूताई 1919 साली जन्मल्या. त्यानंतर इतर. परंतु इतक्या आडगावात राहुन यातील बहुतेक सर्व शिक्षणाकरता घराबाहेर पडुन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. केतकरवहिनींना चार अपत्ये झाली. त्यांच्या पतीचा अत्यंत निर्दयी रीतिने खून करण्यात आला. यातील अकरा जणांविरुद्ध खुनाचा आरोप ठेवण्यात आला. परंतु ते सगळे त्यातुन सुटले. सासऱ्यांनी या खटल्यावर निवेदन व उत्तर निवेदन अशा दोन पुस्तिका छापुन घेतल्या. उत्तर निवेदन ही पुस्तिका नव्वद पानांची असून त्यामध्ये या खटल्याची तपशीलवार माहिती दिली आहे. (मी ह्या दोन पुस्तिका वाचलेल्या नाहीत) कालांतराने सासू-सासरे वारले. परंतु केतकरवहिनींनी एकट्याने त्या मोठ्या वाड्यात राहुन मुलांना वाढवले, त्यांची लग्ने करुन दिली. सुमारे अडीचशे एकर जमिनीचे 25 खटले, व दीडशे केसेस त्यांनी एकट्यानी लढवल्या. सगळे वकीली मुद्दे त्या मराठीतून लिहुन वकीलाला समजावून द्यायच्या. करंबवण्याहुन बंदरापर्यंत अडीच किलोमिटर चालत, तेथूुन लाॅंचने गोवळकोट, तेथून चिपळूणपर्यंत चालत....काम आटपून पुन्हा माघारी. असा हा प्रवास आयुष्यभर या बाईंनी केला. केवळ जगण्याची, व जिंकण्याची दुर्दम्य इच्छा, आणि अभ्यासू वृत्ती यांनी काय चमत्कार घडु शकतो , याचे उदाहरण म्हणजे केतकरवहिनी.....त्यांच्या कर्तुत्वाला माझा सलाम.... हो, आणखी या पुस्तकाच्या प्रेमात पडण्याचे कारण म्हणजे पुस्तकाचे कव्हर. सुमारे 50 वर्षांपूर्वीची डिझाइन स्टाईल चंद्रमोहन कुलकर्णी यांनी सुंदर रीत्या पेश केली आहे. (खरं तर मली कव्हर आवडले. म्हणुन मी हे पुस्तक ग्रथालयातून रॅकवरून उचलले. प्रथम माझ्या बहिणिने वाचले. मस्त आहे. असा निरोप आला. मग तिच्या मैत्रिणी, मग माझी पत्नी असे करत दोन महिन्यांनी हे पुस्तक माझ्या हातात आले.) उमा कुलकर्णी यांनी काढलेला मलपृष्ठावरील केतकरवहिनींचा फोटोही लाजबाब. ...Read more

 • Rating Starश्वेता तांबोळकर

  नुकतेच खरेदि केले व एकादिवसात वाचुन संपवले. खोत म्हटले कि त्यांचा डौल,थाट तसेच कुळांवर अतोनात अत्याचार करणारे हेच चित्र डोळ्यासमोर आले. पण हे पुस्तक वाचायला घेतले आणी स्वच्छ काम करणारे मनापासुन खोत म्हणुन वावरणारे केतकर डोळ्यासमोर उभे राहिले. स्त्ीया वेळ आल्यावर कशा खंबीरपणे उभ्या रहातात याचे सुंदर व मोजक्या शब्दात लिहले वर्णन .आजुन काय लिहावे.त्यापेक्षा वाचुन ठरवावे. मला खुप आवडले. ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 17-09-2006

  ‘‘स्त्रीमानसातील आत्मशक्तीचा स्तिमित करणारा आलेख’’... अभिजात कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी यांची ‘केतकरवहिनी’ ही पहिलीच स्वतंत्र कलाकृती गेल्या शतकातील स्त्रीजीवनपद्धती व स्त्रीचे आंतरिक मनोबल यांचा मनोज्ञ वेध घेत आकारलेला हा ीवनलेख. स्त्रीशिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर परिश्रमपूर्वक शिक्षण घेऊन स्वत:च्या पायांवर उभ्या राहिलेल्या सुप्रसिद्ध केतकर सिस्टर्स, त्यांच्या मालतीबाई माधवराव केतकर या वहिनी. नित्याच्या जीवनातील कौटुंबिक समस्या व सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण होणारे संघर्ष यांना टक्कर देत, मालतीबाई समाजात आपले स्वतंत्र स्थान, स्वतंत्र अस्तित्व कसे निर्माण करतात याचे सत्यनिष्ठ, रोचक व रोमांचक दर्शन लेखिका घडवते. आत्मकथनात्मक शैलीतून ही जीवनकहाणी प्रवाहित झाल्यामुळे प्रसंग, जीवनघटना अधिक बोलक्या, सहजस्वाभाविक व नाट्यपूर्ण रूपात अभिव्यक्त होतात. केतकरवाहिनींच्या अनेकवार होणाऱ्या भेटी, सलगपणे दिवस न् दिवस मिळालेला त्यांचा सहवास, त्यातून त्यांच्याशी होणारा संवाद, जुनी हस्तलिखिते, जुने फोटो या साऱ्यांतून केतकरवहिनींच्या व्यक्तिमत्त्वाचे जे अनेकविध पैलू लेखिकेला दिसले; त्यांच्या मनाचे-विचारांचे जे तलम पदर उलगडत गेले त्यांचा ‘केतकरवहिनी’ हा आलेख, प्रासादिक सौंदर्याने नटला आहे. केतकरवहिनींचे विवाहपूर्व जीवन, त्यांचे आईवडील-भावंडं, आईवडिलांकडून त्यांना लाभलेले गुण व संस्कार, आर्थिकस्थिती, कौटुंबिक वातावरण यांचे कथन केतकरवहिनींच्या मनाची जडण-घडण कशी झाली, याचे हृद्य दर्शन घडवितात. विवाहानंतर केतकर कुटुंबातील सून या भूमिकेतून होणारे निवेदन, प्रसंगचित्रण कुटुंबातील नातेसंबंधांवर प्रकाश टाकीत केतकरपरिवाराची आर्थिक संपन्नता, सामाजिक प्रतिष्ठा यांचे भान देते. शिक्षणाला पराकोटीचे महत्त्व देणाऱ्या या घरात मुलींसाठी वेगळे कायदे सुनेसाठी वेगळे, असे बारकावे व्यक्तिमानसातील परस्परविरोधी प्रवृत्तीचे रेखांकन करीत व्यक्तिमानसातील वैचित्र्य स्पष्ट करतात. कर्तृत्वशाली- स्त्री-विषयक असलेल्या, सामाजिक मानसिकतेला छेद देत उभ्या राहिलेल्या स्त्री-मानसातील आत्मशक्तीचा हा आलेख स्तिमित करणारा आहे. तत्कालीन समाज, कोकणातील-करंबवण्यातील सामाजिक वातावरण व व्यक्तिमानसातील आदिम प्रवृत्तींचे गडद स्वरूप घटनाचित्रणातून प्रकट होते. वैमनस्य, क्रौर्य, शत्रुता, कपट, स्वार्थ, दाभिकता यांचे मानवी मनातील फिके रंग प्रसंगी कसे तीव्र, प्रख स्वरूप प्रकट करतात, याचे अत्यंत संयत रेखाटन लेखिका करते. स्वातंत्र्यानंतर बदललेले जमीनविषयक कायदे आणि त्यातून निर्माण झालेले खटले यातून पतीचा झालेला खून, मामंजींचे हरपलेले छत्र अशा खडतर परिस्थितीला टक्कर देत, स्वत:च्या विचाराने जीवनात खंबीर पावलं उचलणाऱ्या केतकरवहिनींचे व्यक्तिमत्त्व विकसित होते, ते प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यामुळेच! केतकरवहिनींचे फुलत जाणारे कर्तृत्व, सामाजिक मानसिक ताण-तणावासहित उभे करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत आहे. केतकरवहिनींचा स्वाभिमान, तर्कशुद्धता, व्यावहारिक-वस्तुनिष्ठ विचारसरणी, वस्तुस्थितीचा स्वीकार-आकलन-पारख करणारी वृत्ती, ज्यासाठी पतीचं रक्त सांडलं ते खटले व त्या जमिनी प्रामाणिकपणा, अन्यायाविरुद्ध लढत देऊन मिळविण्याची जिद्द इ. स्वभावविशेषांचे प्रकाशमय कवडसे या कथाप्रवाहात प्रकटतात. अगणित अडी-अडचणींनी व्यापलेल्या, केतकरवहिनींच्या करंबवण्यातील जीवनाला अर्थपूर्णता आणण्यात ज्यांचा हातभार लागला त्या व्यक्तिमत्त्वांच्या शलाका या जीवनपटात झळकत राहतात. कृष्णा पाटील, सानेदादा, शिर्के वकील, रमेश लाड, इन्स्पेक्टर खान तसेच कौटुंबिक परिघातील सासू-सासरे, आई-वडील, पती, नणंदा यांची व्यक्तिमत्त्वे जितकी वास्तववादी, तितकीच प्रत्ययकारी उतरली आहेत. ‘केतकरवहिनी’ ही एका संसारी स्त्रीची जीवनकहाणी असली तरी यातील घटनांवैचित्र्य व अनुभवविश्व केतकरवहिनींच्या जीवनव्यवहार विषयक, प्रगल्भ जाणिवांचा आवाका दर्शविते. कोर्टखटले, लेव्ही, जप्ती संदर्भातील अनुभव, भयानक, दूरगामी परिणाम करणाऱ्या घटनांच्या निर्मितीमागील वैरभाव, क्रूरता यांचे चित्रण जसे यात आकारते. तसेच गाईगुरांच्या मायेच्या मांजराच्या सोबतीच्या - जिव्हाळ्याच्या घटना केतकरवहिनींची भावांदोलने चित्रित करतात. केतकरवहिनी स्वप्नात रमणाऱ्या कधीच नसल्या तरी कोसळत्या पावसाच्या अंधाऱ्या रात्री पतीच्या खुनाची आठवण आणि दडपलेलं दु:ख, आर्त हंबरडा फुटण्याइतकं कसं उफाळून यायचं, याचे प्रत्ययकारी रेखांकन केतकरवहिनींच्या मनाचे हळवे कोपरे दर्शवीत घुसमटणाऱ्या मनाचे दर्शन घडविते. कोकणच्या निसर्गाचं, तेथील परिस्थितीचं, सामाजिक मानसिकतेचं भयचकित करणारं चित्रण, कुळकायदा म्हणजे काम, खाजणाची जमीन म्हणजे काय इ.चे स्पष्टीकरण आशयाला सखोलता प्रदान करतं. एकंदरीत, आत्मशक्ती विसरून गेलेली एक स्त्री विश्व हिंदू परिषदेतील मुलांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करून गावातील लोकांसाठीही रस्ता, बससारख्या सुख-सुविधांची निर्मिती-आखणी-योजना करत व प्रेम-आत्मीयता, देत-घेत स्व-कुटुंबाकडून गावपरिसरालाच कुटुंब-परिवार कसा बनवते, कर्तृत्वपरिघाचा व्यास व व्याप्ती कशी विस्तृत करते, याचे अत्यंत प्रासादिक व सहज-सुंदर चित्र उभी करणारी ही कलाकृती प्रत्येकाने वाचावी, अशी आहे. -प्रा. डॉ. शुभदा शहा ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUP
ANUP by ANU AGGARWAL Rating Star
DAINIK SAKAL 13-10-1019

‘अनू’ची कहाणी... ‘आशिकी’ या सिनेमातून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या अनू अगरवाल रातोरात स्टार बनल्या. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली... पण त्यांनी वेगळाच रस्ता शोधला. त्या योगाभ्यासाकडे वळल्या आण त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. हा सर्व प्रवास त्यांनी ‘Unusual’ इंग्रजी पुस्तकात उलगडला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला असून तो ‘अनू’प या नावाने प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकातून आपल्याला अनू अगरवाल यांचे वेगळेच रूप दिसते. उच्च शिक्षित अनूंना समाजकार्याचाही अनुभव आहे. चित्रपटांतील भूमिकांबरोबर ‘सुपरमॉडल’ म्हणूनही त्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या, त्यानंतर त्या योगाभ्यासाकडे वळल्या, योगाश्रमात राहू लागल्या. त्यानंतर त्यांचा भीषण कार अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या व कोमात गेल्या. त्यातून बऱ्या होऊन त्या पुन्हा त्यांच्या कामात सक्रिय झाल्या आहेत. या सर्व प्रवासातील तगमग, मन:शांतीचा शोध याबद्दलचे प्रामाणिक व पारदर्शी कथन या पुस्तकात आहे. स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याचा त्यांचा अनुभवही आपल्याला वेगळ्या प्रकारच्या वाचानाचा आनंद देतो. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकात अगदी ओघवता अनुवाद केला आहे. आयुष्य उत्सव आहे व सर्वत्र फक्त प्रेमच आहे असे मानणाऱ्या अनूंचा हा प्रवास वाचकाला वेगळ्याच जगाची सफर घडवतो. –शिवानी वकील ...Read more

ASHI MANASE YETI
ASHI MANASE YETI by VASANT JOSHI Rating Star
DAILY LOKSATTA LOKRANG 13.1019

मान्यवरांची उल्लेखनीय व्यक्तिचित्रणे हृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. लेखक व संशोधक अशी ओळख असलेल्या दिवंगत डॉ. वसंत जोशी यांनी ‘अशी माणसे येती’ या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नावंत बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, रणजित देसाई, तपस्वी संशोधक डॉ. भाऊसाहेब कोलते, प्रा. राम शेवाळकर, डॉ. श्रीधर कुलकर्णी, तंजावरचे तुळेंद्रराजे भोसले अशा व्यक्तिमत्त्वांवरील उत्तम लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. ही सारी मंडळी महाराष्ट्राच्या साहित्य, संशोधन, अध्यापन क्षेत्रात मोठे योगदान दिलेली अशी आहेत. जोशी यांना यापैकी अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. या सुहृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. ...Read more