* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAINE RAM RATAN DHAN PAYO
  • Availability : Available
  • Translators : SWATI CHANDORKAR
  • ISBN : 9788184981292
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MEERA IS HEARD, PREACHED AND SANG BY MANY; BUT A VERY FEW CAN REACH HER SOUL. IN THIS MODERN WORLD, OSHO SEEMS TO BE THE ONLY ONE WHO HAS REACHED HER SOUL, WHO HAS FELT HER TEARS, WHO HAS UNDERSTOOD THE INTENSITY OF EACH OF HER BREATH. OSHO HIMSELF HAS LEAD A LIFE FULL OF POETRY, HE HAS FOUND RHYTHM IN HIS LIVING, HE HAS COMPOSED LYRICS BASED ON THE EXPERIENCES. JUST LIKE MEERA, OSHO SEES LOVE EVERYWHERE. FOR HIM IT IS LOVE WHICH KEEPS THIS WORLD GOING ON, FOR HIM IT IS LOVE WHICH PROTECTS HIM, COMFORTS HIM, OFFERS HIM WARMTH. HIS WHOLE BEING IS ‘LOVE’. AND MEERA??? MEERA HERSELF IS SUPREME DEVOTION, SHE IS UNIQUE THOUGH MANY DEVOTEES HAVE ACHIEVED THE ULTIMATE SALVATION. WHAT MAKES HER SO UNIQUE? OSHO HAS TRIED TO PUT HER UNIQUENESS IN WORDS. HE STATES THAT THE CRYSTAL CLEAR DEVOTION PRACTICED BY MEERA IS WORTHY ENOUGH TO PROVE HER DIVINITY. WE ALL KNOW THAT MEERA IS KRISHA, SHE SEES HIM EVERYWHERE, BUT AS WE GO ON UNDERSTANDING HER WE FIND OURSELVES BLENDING WITH HER, WE START BECOMING MEERA IN A WAY. THE PATH TO DEVOTION IS NOT SIMPLE OR EASY. IT IS MARKED WITH UNSEEN HURDLES. IT OFTEN CHECKS ON THE INTENSE DESIRES OF THE DEVOTEE. DEVOTION IS INTRICATE AS THE CAUSE IS UNSEEN. IT NEEDS EXTREME FAITH TO SURRENDER TO SOMETHING WHICH WE BELIEVE TO BE THERE BUT CANNOT SEE WITH NAKED EYES. MEERA DID IT WITHOUT ANY SECOND THOUGHTS IN HER MIND. SHE SACRIFICED HERSELF FOR THE UNSEEN CAUSE OF HER LIFE. THIS IS WHAT MAKES HER UNIQUE FROM OTHERS. A TRUE POEM TAKES BIRTH FROM THE DEPTH OF THE MIND, IT DOES NOT LINGER OVER ATTEMPTING RHYTHM, IT MAY NOT BE WELLVERSED. EVEN AFTER CENTURIES AND ERAS PASS, SUCH TRUE POEM HOLDS THE POWER TO CAPTIVATE MINDS. MEERA HAD ACCEPTED THE FACT THAT SHE IS MERGED IN LOVE. HER FAITH, HER RELIANCE AND HER DEVOTION TAKES US WITH HER.
मीरा म्हणजे भक्ती. भक्तीने परमात्मा साध्य करणारे अनेक आहेत आणि तरीही मीरा वेगळी आहे. का? ओशो सांगतात की भक्तिसाराची इतकी पारदर्शकता मीरामध्ये आहे, की ही पारदर्शकताच तिचं वेगळेपण सिद्ध करते. मीरा कृष्णमय आहे हे कुणी नव्याने सांगायला नको. पण आपण तिची भक्ती बघून मीरामय होऊन जातो हे निश्चित. भक्तिमार्ग हा सर्वांत कठीण मार्ग. न दिसणाया परमात्म्यावर तन, मन, भान विसरून प्रेम करणं, स्वत:ला त्याच्यावर सोपवून देणं हे कठीणच आणि म्हणूनच मीराचं कृष्णासाठी केलेलं समर्पण अनमोल आहे. यमक जुळतंय की नाही याची विवंचना न करता जे हृदयातून उमटत गेलं असं ते काव्य, गीत, भजन आजही आपल्या हृदयाला भिडतात आणि मीरा म्हणते ‘मैं तो प्रेम दीवानी’. हा तिचा भाव, ही तिची भावदशा आपल्यालाही भारावून टाकते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarSHRAMEEK EKJOOT 26-9-2010

    ओशो करतात मीरेची उकल सामान्य माणसाला निराकारावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. पूर्ण लक्ष एकवटल्याखेरीज लक्ष्य नेमके समजल्याखेरीज त्याविषयी आवड किंवा नावड या मनाच्या भावना कशा जोखता येणार? मीरा तर य निराकारावरच प्रेम करते हे अगम्य समजून घेण्यासाठी मीेची प्रेमातील उत्कटता समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ओशोंच्या प्रवचानातून आधी प्रेमाची ताकद उलगत जाते. नंतर स्वत:चा विसर पडल्यानंतरच जीव खऱ्या अर्थाने निराकारावर जडवता येतो याची जाणीव होते. मीरेचे स्वत:ला विसरणे ओशो भक्तांना समजावून सांगतात आणि मीरा आपोआप उलगडत जाते. शब्दांना अगम्य असणारी मीरा तिच्या प्रेमाभावनेची उकल होताच अधिक मोकळेपणाने सादकांसमोर उभी ठाकते. अधात्म मार्गावरील कोणताही विचार ओशोंकडून ऐकणे ही अनुनूभूत अशी पर्वणी ठरते. ओशोंच्या प्रवचनांची ध्वनिमुद्रिते उपलब्ध आहेत. मीरेच्या पदांवर ओशोंच्या केलेल्या विश्लेषणाच्याही कॅसेट, सीडी उपलब्ध आहेतच. मात्र मुळात अरुपावर प्रेम करणारी, हजारो वर्षांचे अंतर तोडणारी आणि कृष्णाला प्रियकर मानणारी मीरा सामान्य माणसाच्या जाणीवेच्या आवाक्यात सहजासहजी येत नाही. भगवंत-भक्त, भगवंत माऊली-मी तान्हा किंवा भगवंत माझा सखा अशा पातळीवरची भगवद् - भक्ती निदान मनाला पटते. म्हणूनच बाकी संत, त्यांचे तत्वज्ञान त्यांची भक्तीची पातळी माध्यमखेरीज समजून घेणे कदाचित शक्य होते. मात्र स्त्री भूमिकेतून कृष्णचरणी सर्वस्व समर्पित करणारी, लोकलज्जेचे भय न मानणारी मीरा गाभ्यातून समजून घ्यायला समर्थ माध्यमाची गरज भासते. ओशो आपल्या प्रवचनातून मीरेची फार सुंदर उकल करतात. नव्याने या प्रातांत शिरणाऱ्यासाठी मुळात ओशोंची शैली समजून घेणेही कठीण ठरते.याच मुद्यावर ओशोंच्या मीरेच्या पदावरील प्रवचनांची पुस्तक रुपातील उपलब्धी महत्त्वाची ठरते. स्वाती चांदोरकर यांनी या प्रवचानांचा मराठीत अनुवाद केला आहे. ध्वनिमुद्रितांमधील प्रवचानांचा शब्दनशब्द पुस्तकात वेचला आहे. मेहता प्रकाशनाने आणलेली ‘मीरेची प्रेमतीर्थावर’ आणि ‘मीरा एक वसंत आहे’ ही दोन्ही पुस्तके मीरा समजून घेताना भक्तांना फार मदत करतात. जाणिवेचा आवाका वाढवण्यासाठी ध्वनिमुद्रितांपेक्षा पुस्तक अधिक साह्यभूत ठरते. गरज पडली तर प्रत्येक विचारापाशी अधिक काळ थांबून आधी ओशोंच्या आणि नंतर मीरेच्या अंत:करणात डोकावणे पुस्तकामुळे अधिक सोपे ठरते. पाच पाच प्रवचनांच्या या पुस्तकरूपात मीरेची भक्ती, मीरेचे साधन- साध्य , मीरेचे संपूर्ण समर्पण ओशोंच्या शब्दात त्यांच्या वाक्यरचनेच्या विशिष्ट शैलीत स्वाती चांदोरकरांनी उघडे केले आहे. मीरेच्या भक्तीबद्दल बोलताना ओशो सांगतात, मीरेची भक्ती कशी होती हा प्रश्नच चुकीचा ठरतो. मीरा ‘मीरा’ नव्हतीच. साक्षात भक्तीच मीरेचे रूप घेऊन पृथ्वीतलावर अवतरली होती. मीरेचे बोटे धरून श्रोत्यांना श्रद्धेच्या पहिल्या पायरीवर नेऊन उभे करताना ओशोंनी श्रद्धेचे स्वरूप वर्णन केले आहे. मरणाच्या दारातही तर्काचा आधार न घेता अढळ राहते. तीच खरी श्रद्धा. जन्म घेतेवेळीच श्रद्धा माणसाच्या बरोबर असते. मनुष्य जन्मानंतर श्रद्धेत अडथळा निर्माण करणारे तर्क हळूहळू शिकत असतो. मनुष्य तर्क इतक्या प्रमाणात शिकतो की त्याची श्रद्धा झाकोळली जाते. पुन्हा श्रद्धा ही लौकीक अर्थाने प्रमाणित न होऊ शकणारी आहे. मग श्रद्धेचे स्वरूप कसे पारखून घ्यायचे? आपली श्रद्धा आहे हाच मुद्दा महत्त्वाचा. श्रद्धा खरी की खोटी असा सवाल मुमुक्षूच्या मनात उमटूच नये. जसे जगात पाणी कुठे ना कुठे म्हणूनच मनुष्याला आर्त तृष्णेची भावना जाणवते. जगात पाणी अस्तित्वात नसतेच तर पाण्यानेच केवळ शांत होऊ शकेल, अशी तृष्णेची भावना माणसाच्या मनात निसर्गत:च निर्माण झाली नसती हे जेवढे निर्विवाद सत्य आहे तेवढीच श्रद्धाही खरी असते. जगात परमात्म्याचे अस्तित्वच नसते तर ते असण्याची भावना मनात निर्माणच झाली नसती. परमात्मा जगात आहेच आहे आणि तो असल्याची ठाम ग्वाही आपले मन देते, हेच श्रद्धेचे निखळ रूप आहे. श्रद्धेच्या पायरीवरून वर गेलात तर अनुभूती निश्चित आहे, असे ओशो ठामपणे सांगतात. अशी अनुभूती मिळायला जाणिवा जाग्या असायला हव्यात असे मात्र नाही. जीवनात अंतिम अनुभूतीचा साक्षात्कार जाणिवेने करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतीचा साक्षात्कार करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतींचे संकेत विनासायास मिळाले होते. मात्र, तेव्हा ही अनुभूती आहे हे कळण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आपल्याकडे नसल्याने या अलौकीक अनुभवाचे अस्तित्व तेव्हा आपल्याला जाणवले नाही. बुद्धी तर्कात अडकल्याने खूपदा या अनुभवाची तुलना एखाद्या क्षुद्र गोष्टीशी करते आणि त्याच क्षणी अनुभवाचे अस्तित्व थांबते. सामान्य माणसाच्या बाबतीत अलौकीक अनुभवांच्या बाबतीत गल्लत होण्याची आणखी एक शक्यता असते. जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा हा अनुभव आपल्याला खरेच आला की हा भास आहे. अशी शंका माणसाच्या मनात येते. साशंक मनाने सत्याला भिडता येत नाही. त्यामुळेच साशंक मन हाच अनुभवातील अडथळा ठरतो. अलौकीक अनुभव येतातच आणि ते सत्यच असतात हे सांगण्यासाठी ओशोंनी सामान्य जीवनातील एक सामान्य उदाहरण दिले आहे. प्रकृती बिघडते तेव्हा आपण डॉक्टरकडे त्याचे कारण जाणून घेण्यासाठी जातो. प्रकृती स्वस्थ असताना ती तशी का आहे याची पृच्छा आपण करत नाही. कारण स्वस्थ प्रकृती ही नैसर्गिक अवस्था आहे. तद्वत जीवाला मिळणारी आनंददायी अनुभूती हीच शाश्वत आहे आणि त्याचे कारण शोधण्याची गरज नाही. अशा प्रकारे प्रेमदिवान्या मीरेची भक्ती समजावून देताना ओशो सामान्यजनांच्या जाणिवा जाग्या करण्याचा प्रयत्न करतात, ओशोंची ही भावना समजून घेण्यासाठी ही पुस्तके आपल्याला मदत करतात. ‘मीरेच्या प्रेमतीर्थावर’ हे १७६पानांचे तर ‘मीरा एक वसंत आहे’ हे १८८ पानांचे पुस्तक प्रत्येकी १५० रूपयांना उपलब्ध आहे. ओशोंच्या तत्त्वज्ञानांचा आदर करणाऱ्यांसाठी हे पुस्तक जणू वरदानच ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more