PRABHAKAR N. PARANJAPE

About Author

Birth Date : 29/07/1938

प्रभाकर नारायण ऊर्फ प्र. ना. परांजपे यांचा जन्म २९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांनी इंग्रजी मुख्य विषय घेऊन एम. ए.ची पदवी घेतली तसेच इंग्रजीचे भाषाविज्ञान यामध्ये एम. लिट. ही पदवी संपादन केली. परांजपे यांनी १९६३ ते १९७८ या काळात मुंबईमध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. १९७८ पासून पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र-विद्या विभागात प्रपाठक आणि प्रोफेसर म्हणून काम केले. त्यांनी सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका , अक्षर दिवाळी , महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला या ग्रंथांचे संपादन केले. तसेच प्रकाशयोजना आणि नेपथ्य रचना व लिओनार्दो दा विंची या अनुवादित ग्रंथांबरोबर कविता : दशकाची पुस्तकाची संकल्पना व संयोजन केले. त्यांनी कथा, कविता व नाट्यसमीक्षा लेखनही केले. ते ग्रंथाली आणि मराठी अभ्यास परिषद या संस्थांचे संस्थापक सदस्य आहेत. काळकर्ते शिवराम महादेव परांजपे हा त्यांचा ग्रंथही प्रकाशित झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KALOKHACHE THEMB Rating Star
Add To Cart INR 150

Latest Reviews

RAJA RAVI VARMA
RAJA RAVI VARMA by RANJEET DESAI Rating Star
Aniket Save

आत्ताच रणजित देसाई लिखित "राजा रवि वर्मा" वाचुन झाले अन् ह्याच कादंबरीवर आधारित "रंग रसिया" हा चित्रपट सुद्धा पाहुन झाला. राजा रवि वर्मा वाचुन झाल्यावर चित्रपटातील काही दृष्ये खटकतात कारण आपण पुस्तकाच्या अनुषंगाने विचार करीत असतो. असो परंतु चित्रप बनवताना दिग्दर्शकाला काही व्यक्तिस्वातंत्र्य हे घ्यावच लागतं. परंतु रणजित देसाई लिखित ह्या कादंबरी बद्दल बोलायचे झाले तर ते हातातील पुस्तक खाली ठेवु देत नाहीत अन् ठेवलं तर पुन्हा हातात घेण्याची हुरहुर लागुन राहते. त्यांची भाषा अतिशय सोपी,ओघवती आणि गुंतवुन ठेवणारी. कुठेही आपल्याला ती कंटाळवाणी किंवा बोजड वाटत नाही. हेच तर खरं यश आहे लेखकाचं. राजा रवि वर्मा यांनी काढलेल्या देवादिकांच्या चिञांनसमोर जनता आजही नतमस्तक होते आणि आजही अनेक उदयोन्मुख चित्रकार त्यांनाच आपले प्रेरणास्थान मानतात. राजा रवि वर्मा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रकारितेत एक मैलाचा दगड स्थापन केला आहे. मला वाटते ज्यावेळेस चित्रकलेचं नाव घेतलं जाईल तेव्हा राजा रवि वर्मा ह्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आपल्या अवघ्या ५८ वर्षांच्या जीवन कारकीर्दींत त्यांनी अनेक पौराणिक कथांना मूर्त रूप देऊन ती पात्र चित्ररूपात अजरामर करून भारताची चित्रकला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली... ...Read more

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
Adesh Khomane

राधेय वाचून झालं..महाभारत खूप वेळा बघितलंय,मृत्यूनजय वाचलंय,कर्णावरील मालिका बघितल्या पण कर्णा बद्दल च कुतूहुल काही कमी होत नाही..राधेय वाचताना सगळे प्रसंग डोळयांसमोर उभे राहतात...सोपी भाषा, कुठेही काल्पनिकतेचा भास वाटत नाही...एकंदरीत सगळ्यांनी वाावी अशी कादंबरी❣️ "मी योद्धा आहे... जखमाची भीती बाळगून भागायचं नाही. जन्मबरोबरच सुरू झालेल हे युद्ध अखेरच्या क्षणपर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाच यश समावलं आहे" -राधेय ...Read more