* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE COMPLETE SHORT STORIES OF MARK TWAIN
  • Availability : Available
  • Translators : ROHINI BAGAL
  • ISBN : 9789395477703
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2022
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR DEFT PLOTTING, RIOTOUS INVENTIVENESS, UNFORGETTABLE CHARACTERS, AND LANGUAGE THAT BRILLIANTLY CAPTURES THE LIVELY RHYTHMS OF AMERICAN SPEECH, NO AMERICAN WRITER COMES CLOSE TO MARK TWAIN. THIS SPARKLING ANTHOLOGY COVERS THE SPAN OF TWAIN’S INIMITABLE YARN-SPINNING, FROM HIS EARLY BROAD COMEDY TO THE BITING SATIRE OF HIS LATER YEARS.
‘लाखाची गोष्ट’ या कथेतील कंगाल नायकासमोर आव्हान आहे लंडनसारख्या शहरात दहा लाख पौंडाच्या नोटेच्या आधारे एक महिना तग धरून राहण्याचं. तो यशस्वी होतो का? ‘ऑनलाइन शुभमंगल’ कथेत अमेरिकेतील दूरदूरच्या दोन टोकांच्या शहरातील युवक-युवती एकमेकांना न पाहता टेलिफोनवरून माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्यांच्या प्रेमात कोणीतरी बिब्बा घालतं. काय होतं पुढे? ‘परतीची वाट’ या कथेतील हेन्री आपल्या घरात आलेल्या अतिथीला आपल्या माहेरी गेलेल्या बायकोविषयी सांगत असतो. तिच्या येण्याची अतिथीही औत्सुक्याने वाट पाहत असतो. येते का ती?... ‘एक डाव भुताचा’ ही कथा पुतळ्याच्या भुताभोवती फिरते... ‘मृत्यूची गोल चकती’ ही कथा, आपल्या पित्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवणाऱ्या निरागस मुलीची आहे...मार्क ट्वेनच्या रंगतदार शैलीतून साकारलेल्या आणि अंतर्मुख करणाऱ्या कथांचा संग्रह.

No Records Found
No Records Found
Keywords
#SHORTSTORIES #MARKTWAIN #AMERICANCLASSICS #MARATHITRANSLATION #MARATHIBOOKS #मार्कट्वेनच्याकथा #अमेरिकनक्लासिक्स #मराठीअनुवाद #मराठीपुस्तके
Customer Reviews
  • Rating Starचंद्रकांत गवांदे (पुणे)

    पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मनुष्य स्वभावाचे किती सुरेख पैलू लेखकाने कथन केलेले आहे व रोहिणी बागल यांनी केलेला अनुवाद हा अनुवाद वाटत नाही, असे वाटते की ते लिखाण अस्सल आहे व त्यामध्ये मराठीतील जो बाज यावयास येणे गरजेचा होता त पूर्णपणे आलेला आहे. लाखाची गोष्ट यामध्ये सर्व सामान्य माणसाच्या जीवनात नोट काय चमत्कार करते याचे रसभरीत वर्णन आपणास वाचायला मिळते . परतीची वाट यामध्ये आपण उत्सुकतेने शेवटपर्यंत वाचित जातो व एक नाविन्यपूर्ण वातावरणात लेखिका आपणास घेऊन जाते व शेवटच्या , परिच्छेद मध्ये पत्नी 19 वर्षांपूर्वी गेलेली असते हे कळते उत्कंठा वाढविणारे ही गोष्ट आहे. एक डाव भुताचा यामध्ये उत्कंठा व भीती याचे मिश्रण अफलातून केलेले आहे व आपण शेवटपर्यंत वाचित जातो. थट्टेतून जॅकपॉट कडे यामध्ये मांणसाच्या नशिबात कोणी चेष्टा करायचे ठरवले आणि नशीब बलवत्तर असेल तर काय चमत्कार घडू शकतो याचे बहारदार वर्णन केलेले आहे. मनुष्य सरळ ,साधा व निष्पाप पद्धतीने वागला तर त्याचे आयुष्य बदलून जाऊ शकते हे या गोष्टीद्वारे दाखविलेले आहे. मृत्यूची गोल चकती यात आपणास विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचा क्लायमॅक्स आहे व एक निरागस छोटी मुलगी आपल्या वडिलांचं आयुष्य कसे वाचवते अशी कथा आहे. मिलिटरी राजवटीत देखील भावनेचा टच असतो अजब स्वप्न यामध्ये तर मृत्यूनंतर काय होते खरं म्हणजे यांची आपल्याला कांही माहिती नसते पण लेखकाने ईतके सुरेख वर्णन केलेले आहे व लेखिकेने हे भाषांतर केलेले बेमालुन ज्ञाले आहे की आपण मृतात्मे स्वतः कथन करतात व त्यांना देखील आपले जुने वैभव आठवते. त्यातील वर्णने मनाला भावतात . आभासी मिळकत त्यातील सालडीन व इलेक्ट्रा हे असेच एक मजेशीर नवरा बायको आहे व आभासी जगात रमणारे आहेत. स्वप्नांचे इमले बांधून त्यावर जगणारी ही मंडळी कधीतरी त्यांचा स्वप्नभंग होतो कॅप्टन स्मार्टफिल्डची स्वर्ग सफर ही थोडीशी अतिरंजीत वाटणारी कथा आहे .त्यांत लेखिकेने भाषांतर करताना जास्तीत जास्त आपलेपणा कसा आणता येईल याची काळजी घेतलेली आहे. कथा वाचून मनाला विरंगुळा मिळतो . जगावे की मरावे अशीच एक अप्रतिम कथा आहे. यामध्ये जीवनातील विरोधाभास दाखविला आहे . भाकरीचा एक तुकडा मिळण्याची भ्रांत असतानाही केवळ आभासी मृत्यू दाखवून कसे कोट्यावधी रुपये मिळवितात याचा प्रत्यय आपणास येतो. सैतानाची डायरी यातील कथा आपणा बऱ्याच जणांना माहिती असते. कारण त्यामध्ये एडम आणि ईहर्ची कथा आहे ही मानवास वेगळ्या दुनियेत घेऊन जाते लेखकाबरोबर लेखिकेने केलेला अनुवाद तितकाच रोमांचकारी आहे अशा कांही कथा मला ज्या भावल्या त्या बद्दल मी लिहिलेले आहे. पुस्तकाचे कव्हर अप्रतिम आहे मार्क ट्रेवनच्या निवडक कथा मराठीत आणल्या बद्दल लेखिकेचे अभिनंदन. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय इतकी चांगली निर्मिती होणे शक्य नाही . यातील पात्रांची नावे इंग्रजी आहेत तसेच शहरांची अथवा गावांची नावे देखील इंग्लिश आहेत अन्यथा सर्व वर्णने मराठीतील वाटतात ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more