* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRANTISURYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980837
  • Edition : 8
  • Publishing Year : MAY 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING THE YEAR 1942 NANA PATIL WHO HAD ESTABLISHED QUASI GOVERNMENT IN SATARA, WAS THE BIGGEST HEADACHE FOR THE BRITISH GOVERNMENT. NANASAHEB PATIL HAD MANY QUALITIES. HE WAS A GREAT ORATOR, A VISIONARY SOCIAL WORKER, THE CAPTAIN OF THE FORWARD THINKERS, THE WARRIOR OF THE UNITED MAHARASHTRA MOVEMENT, A PIONEER OF MARXISM IN MAHARASHTRA. HE HAD A GREAT PERSONALITY. HE WAS TOTALLY SHAPED FROM THIS SOIL. HIS COMPETENCY WAS UNIQUE. SINCE CHILDHOOD, NANASAHEB WAS VERY NAUGHTY. ONCE WHEN HE WAS LOST IN A FAIR HE TOLD THE POLICEMAN THAT HIS GRANNY WAS LOST, AND WHEN FINALLY THEY WERE REUNITED HE SCOLDED HER FOR GETTING LOST IN THE FAIR. HE HAD THE GUTS TO MAKE THE PEOPLE THINK, HE QUESTIONED THEM THAT "WAS THE GOD OWNED BY "THEM`?` HE JOINED THE SATYASHODHAK MOVEMENT AND STROVE HARD FOR THE SOCIAL WELFARE. LATER ON, HE STRUGGLED FOR THE FREEDOM MOVEMENT. AFTER MARRIAGE, HE TAUGHT HIS WIFE TO READ AND WRITE. HIS CONTRIBUTION TOWARDS THE FREEDOM STRUGGLE WAS SO GREAT THAT PEOPLE ALWAYS HELPED HIM TO STAY AWAY FROM THE CLUTCHES OF THE BRITISH GOVERNMENT. THE SATARA MOVEMENT DURING THOSE DAYS CONSISTED OF MANY UNDERGROUND GROUPS; A FEW TO NAME WERE THE KISAN VEER AT SATARA, VASANT DADA AT PADMALE, BABURAO CHARANKAR AND GANPATRAO PATIL AT BILASHI, BARDE GURUJI AT VATEGAON, ETC. BUT THE QUASI-GOVERNMENT AT KUNDAL WAS THE MOST STRONG OF THEM ALL. KUNDAL WAS THE CAPITAL OF THE QUASI-GOVERNMENT THEN. AT THE SAME TIME, TODAY NOT ONLY NANASAHEB BUT HIS WORK ALSO HAS BEEN FORGOTTEN BY WE INDIANS. HE SACRIFICED HIMSELF FOR OUR FREEDOM AND WE HAVE TOTALLY NEGLECTED HIM. AFTER FREEDOM, NANASAHEB TURNED TOWARDS MARXISM BUT THAT IS NOT A REASON TO FORGET HIS SACRIFICE. LET US REMEMBER THE GREAT DEEDS BY HIM.
१९४२ च्या धगधगत्या कालखंडात साताऱ्याच्या उदारात "सरकार" (पत्रकार) निर्माता ब्रिटीश प्रतिवणा-या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा.क्रांतिसिंह – एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्यांचावादी सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा सूत्रधार, महाराष्ट्राचा माचार्स. त्यांचे लोभस, रंगड व्यक्तित्व, मातीतून आकारले नेतृत्व, मुलंखागळे कर्तृत्व लक्ष्यवे शोधी, कादंबरी विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ‘क्रांतिसूर’.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
  • Rating Starसांजवार्ता, ११-०३-२०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीच्या सुधारित आवृत्तीत इतिहासाच्या तेजस्वी घटनांचे दर्शन घडवून दिले आहे.

  • Rating Starसमाचार मैफिल, २८-०२-२०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेली ही कादंबरी उत्वंâठावर्धक तर झाली आहेच; परंतु नाना पाटलांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे जाज्वल्य दर्शन देणारी ही ठरली आहे. विश्वास पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर काम केलेलया स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखती तसेच त्या वेळचे अनुभव ऐकून कादंबरी लिहिल्यामुळे केवळ कल्पनेचा पाया कादंबरीत नसून वास्तवाचे भानही या लेखनास प्राप्त झाले आहे. ...Read more

  • Rating Starदैनिक देशदूत, ११ एप्रिल २०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीच्या सुधारित आवृत्तीच्या वाचकांना पुन्हा एकदा इतिहासाच्या तेजस्वी घटनांचे दर्शन घडवून दिले आहे. तुरुंग आणि स्वातंत्र्याची चळवळ या दोन वाटांनी निघालेल्या नाना पाटलंच्या केवळ आगमनाने चैतन्य उभे राहत असे. त्यांच्या जीवनातील अनेक धाडसी प्रसंग या चरित्रात्मक कादंबरीत येतात. नाना पाटलांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे जाज्वल्य दर्शन देणारी ही ठरली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK GAOKARI 27-06-2010

    क्रांतिसूर्य नाना पाटील हे अतिशय मोठे व्यक्तिमत्त्व होते. एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी अशा अनेक अंगांनी महाराष्ट्र नानांना ओळखतो. त्यांचे रांगडे व्यक्तिमत्त्व याला मराठी मातीचा अस्ल गंध होता. त्यांचे नेतृत्व आकार घेण्याकामी त्यांचे कर्तृत्व होते. त्याच कर्तृत्वाचा आढावा ख्यातनाम कादंबरीकार विश्वास पाटील यांनी क्रांतिसूर्य या कादंबरीतून घेतला आहे. पाटील यांचा विशिष्ट वाचकवर्ग आहे. त्यांना पाटील यांची शैली ज्ञात आहे; पण या चरित्राच्या निमित्ताने पाटील यांच्या लेखनाचा नवा परिचय वाचकाला होतो. नाना पाटील यांच्या गगनगामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास ज्यांना करावयाचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरेल. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.