MAHADEV MORE HAS BEEN CREATING LITERATURE ON DIFFERENT TYPES OF DALITS, RURAL AREAS, SLUMS FOR THE PAST SEVERAL DECADES. WITHOUT ANY INVESTMENT IN HIS WRITING, THE DEPICTION OF THE EXPLOITATION OF DALITS HAS REMAINED THE CORE OF HIS LITERARY WORK. - THIS BOOK ALSO SHOWS THE PAIN OF HUMAN EXPLOITATION - THE DESPERATE ATTEMPT TO MEND BROKEN DREAMS AND THE WORLD OF AGRICULTURAL LABORERS, FARMERS, WOMEN WORKERS IN WAREHOUSES, JOGATINIS AND THE DRIVERS, CLEANERS, MASONS ETC. WHO ARE IN THEIR CIRCLE.
महादेव मोरे हे गेल्या अनेक दशकांपासून दलित, ग्रामीण, झोपडपट्टी अशा वेगवेगळ्या प्रकाराची साहित्यनिर्मिती करत आले आहेत. त्यांच्या लिखाणात कोणताही अभिनिवेश न दिसता दलितांच्या शोषणाचे चित्रण हा त्यांच्या साहित्यकृतीचा मूळ गाभा राहिलेला आहे. - या पुस्तकातही दिसून येतात मानवी शोषणाच्या वेदना – मोडलेल्या स्वप्नांची घडी बसवण्याचा जीवापाड केलेला प्रयत्न व कुठेतरी नोकरी धरून पाट्या टाकीत पांढरपेशा बनून न राहता- शेतमजूर, शेतकरी, वखारीतील मजूर स्त्रिया, जोगतिणी आणि त्यांच्या परिघातच असलेले ड्रायव्हर, क्लीनर, मेस्त्री आदी मोटार लायनीचं जग.