* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Upcoming (COMMING SOON..!)
  • ISBN : 9789357204743
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTMBER 1970
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
IN THE STORY ‘PARDH’, A YOUNG WOMAN TEACHES A GOOD LESSON TO A GULLIBLE YOUNG MAN... IN THE STORY ‘SHENGA’, TWO INNOCENT SOULS FROM A POOR FAMILY GET THE PODS THEY HAVE EARNED WITH GREAT DIFFICULTY AND THEIR STRONG DESIRE TO EAT THE PODS REMAINS UNFULFILLED... IN ‘EKA SHISTH MULICHI GOSHT’, THE LOVE STORY OF A CULTURED, SELF-RELIANT YOUNG WOMAN REMAINS INCOMPLETE AND HER DEATH IS HEARTBREAKING... IN THE STORY ‘SAWANT’, THE MARRIED HERO FALLS IN LOVE WITH ANOTHER GIRL... HIS WIFE CONSENTS TO THIS LOVE... IN THE STORY ‘KHOMBARA’, MHADU’S HEART IS BROKEN UPON HEARING THAT HAUSHI HAS BECOME A WIDOW BEFORE MARRIAGE... A COLLECTION OF HEART-WRENCHING STORIES
‘पारध’ कथेतील गुलछबू युवकाला एक युवती शिकवते चांगलाच धडा... ‘शेंगा’ कथेतील दरिद्री कुटुंबातील दोन निष्पाप जीवांनी महत्प्रयासाने मिळवलेल्या शेंगा पाण्यात वाहून जातात आणि त्यांची शेंगा खायची तीव्र इच्छा अपूर्णच राहते...‘एका शिष्ट मुलीची गोष्ट’ मधल्या संस्कारी, स्वावलंबी तरुणीची प्रेमकहाणी अधुरी राहून तिचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून जातो... ‘सांवट’ कथेतील विवाहित नायक दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो... त्याच्या बायकोची संमती असते या प्रेमाला... ‘खोंबारा’ कथेतील म्हादूच्या काळजाला हौशी लग्नाआधीच विधवा झालीय हे ऐकून खोंबारा लागतो...मनाचा ठाव घेणाऱ्या कथांचा संग्रह
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #कथासंग्रह #ग्रामीणसाहित्य #ऐनबहरातकैफकहरात #महादेव मोरे #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHILITERATURE #MARATHISTORIES #GRAMINSAHITYA#AINBAHARATKAIFKAHARAT#MAHADEVMORE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more