MADHAV MORDEKAR

About Author

Birth Date : 21/12/1928
Death Date : 21/08/2004




माधव गणपतराव मोर्डेकर यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील खानापूर या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. मात्र, त्यांचे संपूर्ण आयुष्य कोल्हापुरातच गेले. निरनिराळ्या ठिकाणी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, १९५४ मध्ये कोल्हापुरातील श्रीमंत महाराणी ताराबाई टिचर्स ट्रेनिंग कॉलेजमधून त्यांनी बी.टी. पूर्ण केले. त्यानंतर व्यवसाय आणि व्रत म्हणून ‘शिक्षकाचा’ पेशा स्वीकारला. ४ जानेवारी, १९४९ रोजी शि.प्र.मंडळी, या संस्थेच्या वडगाव विद्यालयात ते नोकरीत रुजू झाले. ३० एप्रिल, १९८७ अखेर म्हणजे जवळजवळ ३८ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहताना त्यांनी शिक्षक, पर्यवेक्षक, उप-मुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशी सर्व पदे यथाक्रम भूषवली. १९८७ मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित केले. सेवाकार्याच्या व व्यवसायाच्या निमित्तानेच प्रकाशक अनिल मेहता यांची ओळख झाली. त्यातूनच पुढे त्यांचे ‘क्रिकेटच्या मैदानावर मी’ हे कर्णधार अजित वाडेकर यांचे अनुवादित पुस्तक अजब पुस्तकालयाने १९६९ साली प्रकाशित केले. त्यानंतर एकामागून एक अशी १८ पुस्तके त्यांनीच प्रकाशित केली. प्रकाशित साहित्यापैकी ‘द प्लेन ट्रूथ’ या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालय या संस्थेने ‘नारायण हरी आपटे स्मृति-पारितोषिक’ देऊन गौरविले. अगदी अलीकडेच, आपल्या संस्थेने नव्यानेच सुरू केलेल्या वैÂ. रणजित देसाई स्मृति-पुरस्काराचा एक मानकरी होण्याचे भाग्य त्यांना लाभले.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
AADHUNIK BHARTACHE PRESHIT SWAMI VIV... Rating Star
Add To Cart INR 495
FREEDOM AT MIDNIGHT Rating Star
Add To Cart INR 450
MOTHYANCHYA CHOTYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 90
YODDHA SHASTRADNYA RASHTRAPATI A. P.... Rating Star
Add To Cart INR 100

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.