MILIND JADHAO

About Author


MILIND JADHAO IS FROM A SMALL VILLAGE - SHELUD. WHICH IS LOCATED IN BULDANA DISTRICT. HE HAD COMPLETED HIS M.A.(ENGLISH) FROM NEAREST TALUKA PLACE CHIKHLI. HE ALSO COMPLETED THE VOCATIONAL COURCE D.ED. & B.ED. FOR THE TEMPERORY JOB HE SPENT A FEW YEARS AT LONAVLA. AT THAT TIME HE ATTRACTED TO HISTORICAL PLACES AND HE GOT A CHANCE TO VISIT MANY CULTURAL HERITAGE IN ALL OVER INDIA. HE SARTED HIS WRITING WITH SHORT STORIES & THE JOURNEY CAME TO THE NOVEL. HIS SOTRYBOOK LALLAT HAS OWN KAVI NARAYAN SURVEY LITERARY AWARD 2018. HIS STORY LALLATRESHA IS INCLUDED IN EDUCATIONAL SYLLABUS FOR B.COM 3RD YEAR IN SANT GADGEBABA AMRAVATI UNIVERSITY. HIS GUNDAL FALA, HAKKASOD, DEVDATT & SAMRAT CHANDRAGUPTA MAURYA ARE ALSO GOOD NOVELS.

मिलिंद जाधव यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील शेलुद या खेडेगावात झाला असून त्यांचे शिक्षण चिखली या तालुक्याच्या गावी एम.ए. (इंग्रजी) पर्यंत झाले आहे. सोबतच डी.एड्. व बी.एड्. या व्यावसायिक पदव्याही त्यांनी मिळविल्या आहेत. सध्या परभणी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तात्पुरत्या नोकरीच्या निमित्ताने काही काळ लोणावळा परिसरात घालवताना त्यांना ऐतिहासिक स्थळं पाहण्याची गोडी तर लागलीच, शिवाय देशभरातल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची संधीही मिळाली. त्यातून पूर्वीची इतिहासाची गोडी वाढत गेली. दरम्यान, कथालेखनापासून सुरू झालेला त्यांचा लेखनप्रवास कादंबरीच्या अंगणापर्यंत विस्तारला. त्यांच्या लल्लाट या कथासंग्रहास नाशिकचा कवी नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला असून त्यातील लल्लाटरेषा ही कथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी.कॉम.च्या तृतीय वर्षाला अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यासोबतच त्यांच्या गुंडाळफळा, हक्कसोड, देवदत्त सम्राट चंद्रगुप्त मौर्य अशा एकापेक्षा एक सरस कादंबर्‍या वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
33 %
OFF
AMIR KHUSRO Rating Star
Add To Cart INR 360 INR 241

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more