* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VAISHAKH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665680
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RANJIT DESAI WAS A MULTIDIMENSIONAL WRITER. "VAISHAKH` INCLUDES THE STORIES DURING THE PERIOD OF HIS APPRENTICESHIP. YET EACH STORY HAS THE STRENGTH TO TOUCH THE INNERMOST CORD OF A SENSITIVE HEART. IT IS BASED ON RURAL LIFE. VAISHAKH LITERALLY MEANS SUMMER. THE HEAT IS IMMENSE THEN. IT BURNS YOU. THE STORIES ALSO HAVE THE CAPACITY TO BURN YOUR MIND. THESE ARE ALL FORMS OF CREATIVE LITERATURE, EACH GIVING LOT OF THOUGHTS. ONE CANNOT FAIL TO NOTICE THE AUTHORS CALLIBRE FROM THESE STORIES.
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हा संग्रह. ग्रामीण जीवनाचा वेध घेणाया कथांमध्ये माणसांतला कोरडेपणा वैशाखाच्या उन्हाप्रमाणेच मनाला चटका देऊन जातो. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarChetan Koli

    खूप मस्त आहे हे पुस्तक... छोट्या कथा आहेत, पण लालित्यपूर्ण आहेत.

  • Rating StarANGHA ATUL KILLEDAR

    रणजित देसाईंच्या अगदी सुरवातीच्या काळातला हा कथासंग्रह. ग्रामीण बाजाच्या या कथा रणजित देसाईंची भाषेवरची आणि माणसे निरखण्याची शैली दाखवतात. सर्व कथा वाचनीय. शाळेत असतानाच्या मे महिन्याच्या सुट्ट्या आठवल्या. हा कथासंग्रहसुद्धा तसाच हपापल्या सारखावाचून काढला. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 09-04-1989

    रणजित देसाई यांची शालीन कथा… दूरदर्शनसारख्या दूरगामी माध्यमातून रामायण, महाभारतासारख्या प्राचीन, सांस्कृतिक वारसांचा जीर्णोद्धार होण्याचे हे दिवस आहेत. व्यक्तिवेध, काव्यविचार, जीवनदर्शन इ. अनेक बाबतीत हे नवे दर्शन ढोबळ, अपुरे असले तरी ते निखालस खोट किंवा पूर्ण निरुपयोगी असू शकत नाही. औद्योगिक संस्कृतीची कठोर गती आणि असह्य दडपण याखाली चिरडून मूल्यविचाराबाबत गोंधळून गेलेल्या समाजापुढे अर्ध्या कच्च्या रूपात का होईना पण निखळ प्रामाणिकपणाचे महत्त्व, सचोटीची किंमत, धैर्याचे मूल्य, मूढ आत्मसंतुष्टतेपेक्षा विशाल, निरागस त्यागातले साफल्य अशा गोष्टी ठेवल्या जाणे अगत्याचे आहे. अगदी अशाच पद्धतीने तीस-पस्तीस वर्षापूर्वी मावळत आलेल्या, परंपरागत सदाचाराची कास धरू पाहणाऱ्या सत्त्वशील पिढीच्या काही गोष्टी ‘आषाढ’, ‘वैशाख’ या कथासंग्रहाद्वारे वाचकांसमोर येतात. या कथा पुनर्मुद्रित आहेत आणि लेखकाचे नावही नवे नाही. महाराष्ट्राचे लाडके लेखक ‘स्वामी’कार रणजित देसाई यांच्या लेखणीतून उतरलेल्या या कथा आहेत. जीवनाबद्द्ल प्रेम या कथांच्या वाटा आणि वळणे गुंतागुंतीची आणि दुर्बोध नाहीत. कथांचे संदर्भ केवळ प्रासंगिक आहेत, व्याप्तीही मर्यादित आहे, पण कथांच्या अभिव्यक्तीमध्ये त्या त्या लेखकांचे जीवनाबद्दलचे प्रेम आणि कुतुहल अत्यंत प्रांजळपणे, थेटपणाने प्रगट झाले आहे. रणजित देसार्इंच्याबाबतीत हे प्रेम खूपदा सौजन्याच्या चौकटींवर अधिक आहे. माणुसकीचा, उमदेपणाचा गौरव करणारी त्यांची प्रतिभा, खानदानी, अब्रुदार, सज्जन, सुसंस्कृत, लोकलाजेला भिणाऱ्या व्यक्तिशेषांची प्रभावी चित्रे अत्यंत सहज कौशल्याने रंगवते. या चित्रांचे रंग खूपदा नको इतके झगझगीत असतात. म्हणजे अमावस्येचे चित्रही निळ्या रंगाने रंगविण्याकडे कल असतो. दरोडेखोरही विशाल अंत:करणाचे असतात. तिथे इनामदार, पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे? खूपदा परीकथांशी साम्य सांगणाऱ्या या कथांच्या चौकटी आहेत. काही ठराविक टप्पे आणि कल्पनाबंध त्यात जाणवतात. त्यातून नकळत एक संदेश मिळतो. त्यांच्या प्रकाशात वाचणाऱ्यांचं माणुसपण उजळून निघतं. या एकाच सामर्थ्यामुळे आपल्या सर्व तथाकथित मर्यादा ओलांडून या कथा मोठ्या होतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book