* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668407
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANOJ FOLLOWED NEMADE INTO THE ROOM. SUDHIRA WAS SITTING ON THE BED, HER BACK TOWARD THEM. SHE TURNED SHARPLY AT THE SOUND AND MANOJ RECOILED IN HORROR. SUDHIRA HAD WASTED AWAY TO NOTHING; HE COULD SEE THE HARSH LINES OF HER COLLARBONES BENEATH HER DRESS. HER EYELASHES HAD TURNED WHITE, AND HER SKIN WAS COVERED IN A PALE MOSS-LIKE FUR. AS HER EYES FLICKED UPWARDS TO MEET HIS, HE SAW IN THEM A FLASH OF BRILLIANT GREEN. DESPERATELY, MANOJ SEARCHED SUDHIRA`S IMPASSIVE FACE, BUT IT BETRAYED NO SIGN OF RECOGNITION. NUMBLY, HE TURNED AWAY FROM SUDHIRA AND HIS GAZE FELL ON HER SHADOW. THERE, A DARK ANTONYM TO THE STARK WHITE OF THE WALL, WAS THE SILHOUETTE OF A CROUCHING CAT...
नेमाड्यांच्या पाठोपाठ मनोज सुधीराच्या खोलीत गेला. सुधीरा कॉटवर बसली होती. मनोज आणि नेमाडे खोलीत शिरताच तिने मान वळवून त्यांच्याकडे पाहिले आणि मनोजच्या जीवाचा थरकाप झाला. सुधीराच्या डोळ्यात ओळखीचे भाव किंचितही दिसत नव्हते. तिच्या डोळ्यांत हिरवट झाक आली होती आणि पापण्या पूर्णपणे पांढऱ्या झाल्या होत्या. अंगावरही बुरशीसारखी पांढरट लव दिसत होती. तिचे शरीर तर कमालीचे कृश झाले होते. अवाक् होऊन तिच्याकडे पाहता पाहताच त्याचे लक्ष भिंतीवर पडलेल्या तिच्या सावलीकडे गेले आणि तो पुन्हा एकदा विलक्षण दचकला. भिंतीवर पडलेली सावली एका मांजराची होती. दोन पाय पुढे ठेवून मागचे पाय दुमडून कॉटवर बसलेले एक मांजर त्या सावलीत स्पष्ट दिसत होते. या कथासंठाहातील प्रत्येक कथेतला थरार आणि भयनाट्य काळजाचा ठोका चुकवणारे आहे. अतिंद्रिय, अनाकलनीय प्रसंगाच्या रोमांचकारी घटना जेव्हा आपल्यासमोर साकार होऊ लागतात तेव्हा त्या त्या व्यक्तींच्या मनातील ताणाचे आणि भयाचे प्रक्षेप आपल्याही मनावर येऊन आदळतात. शब्दाशब्दांतून अघोरी वासनांच्या क्रौर्याची धग आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या अंतर्मनाला अस्वस्थ, घामाघूम करते. ...आणि मग या शब्दभ्रमाच्या मायाजालातून वेगळे होऊन आपण जेव्हा पुन्हा आपल्या नित्याच्या वास्तव जगात परत येतो, तेव्हा आपल्याच सावलीकडे पाहतानाही आपल्याला क्षणभर विलक्षण भीती वाटते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
MANJARACHI SAVALI# JAYSHREE KULKARNI# MRUTUYACHE DALAL# CHAKRAVYUH# TYA DARAPALIKADE# NARBALI# MI AALO AAHE# SHAP# THARBABU# NAYAN TUZE JADUGAR# VISHARI VILAKHA #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starदैनिक ऐक्य 28 ऑक्टोबर 2007

    मांजराची सावली भयकथासंग्रहात जयश्री कुलकर्णी यांनी वेळोवेळी लिहिलेल्या निवडक भयकथांचा समावेश आहे. भयकथा, गूढकथा, रहस्यकथा यांच्या वाट्याला सहसा महिला जात नाहीत, परंतु कुलकर्णी यांनी लेखिका म्हणून कुठलेही क्षेत्र स्वत:ला वर्ज्य मानलेले नाही. सामाजिक,कौटुंबिक कथांबरोबरच मनोविश् लेषणात्मक कादंबरी, ललित लेख एवढेच नव्हे तर वास्तुशास्त्र, पर्यटन, विज्ञान यावरही लेखन केले आहे आणि निरनिराळ्या वृत्तपत्रांतून तसेच मासिकांतून त्यांचे हे लेखन छापून येत आहे. साठ-सत्तर रहस्यकथा त्यांनी लिहिल्या आहेत. कुठल्याच एका लेखनाविषयाशी बांधिलकी ठेवणे मला रुचत नाही... असे त्या म्हणतात. अमुकच विषय किंवा लेखनप्रकर जमतो असा न्यूनगंड त्यांना कधी वाटला नाही. उलट वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळावेसे वाटले, लेखनात साचेबंदपणा येऊ नये असा प्रयत्न त्यांनी केला. रहस्यकथा आणि गूढकथा हे लेखनप्रकार जुळ्या भावंडांसारखे आहेत असे त्यांना वाटते. तंत्र आणि मांडणी करताना वैचारिक भूमिका मात्र पूर्णतया वेगळी असावी लागते. मांजराची सावली या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कुलकर्णी म्हणतात, भीतीचे किंवा घाबरण्याचे आणि घाबरवण्याचे आकर्षण माणसाला लहानपणापासूनच असते... तरीही लहान मुलांना अपरिपक्व वयात भूतकथा, भयकथा सांगू नयेत किंवा वाचायला देऊ नयेत. बालवाचक बौद्धिकदृष्ट्या पूर्ण विकसित झाला, आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सक्षम झाला, तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक त्याला समजू लागला तरच भयकथा, भूतकथांमधील कल्पनाविश् वाला सामोरा जायला तो तयार झाला असे म्हणता येईल. मांगल्यावरच्या श्रद्धेचा पाया भक्कम असायला हवा. थोडक्यात, थोड्या वेळेपुरते रोमांचक अनुभवातून जाणे वेगळे आणि कायमच मनात अनाकलनीय भीतींचे ओझे बाळगून जगणे वेगळे. चुकीच्या कल्पनांच्या प्रभावाखाली जगणारी काही प्रौढ माणसेही अमंगल शक्तींचे अस्तित्व, देवदैवतांच्या आराधनेतील कडक नियम किंवा ताण उरावर बांधून जन्मभर जगतात. हे निश् चितच धोकादायक आहे. प्रत्येक सुजाण व्यक्तीने याचे भान ठेवायला हवे. कुलकर्णी यांच्या भयकथा या स्वयंर्स्फूत, स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या केंद्रस्थानी कल्पनाव्यूहांचे वेगवेगळे नमुने आढळतात. मांजराची सावली ही कथासंग्रहाला शीर्षक पुरवणारी कथा. डॉ. मनोजकडे त्यांचे क्लबमधले मित्र नेमाडे येऊन एक अजब तक्रार करतात, आमच्या घरातील रेडिओच्या जागी फ्लॉवरपॉट, गोल टीपॉयच्या जागी आयताकृती टीपॉय, साडेसहा फुटी कपाटाच्या जागी पाच फूट उंचीचे कपाट अशा वस्तू आहेत. त्या कशा बदलल्या गेल्या हेच कळत नाही. एके रात्री धाकटी मुलगी झोपेतून उठून स्वप्नात भयंकर मांजर दिसतेय म्हणू लागली... मी स्वत: एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असताना मला तिची सावली भिंतीवर दिसली. ती सावली मांजराची होती.. हे सर्व काय चाललंय तेच कळत नाही...डॉ. मनोज याला आपल्या काकांकडून टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची विद्या मिळालेली असते आणि अमंगल शक्तींच्या तसेच अघोरी मांत्रिकापासून संरक्षण होण्यासाठी एक संरक्षक कवचही त्याच्या शरीराभोवती तयार केलेले असते. आपल्या योगसाधनेचे सर्व सामर्थ्य एकवटलेला एक नीलमणीही काका त्याला देतात. शुद्ध आचरण आणि परमेश् वराची सेवा करीत राहा असे सांगून ते आपल्या संग्रहातील दुर्मिळ वैद्यकीय व इतर पुस्तकांचीही व्यवस्था पहा असे सांगतात. त्यानंतर त्यांचे देहावसान होते. नेमाडे यांच्या घरात टेलिट्रॅन्सफॉर्मेशनचा प्रकार होत असणार हे मनोजच्या लक्षात येते. तो नेमाडे यांच्या शेजारी नव्यानेच एक भाडेकरू रहायला आल्यावर या प्रकारांना सुरुवात झाली असे नेमाडे म्हणतात. तेव्हा त्या शेजाऱ्याला डॉ. मनोज भेटतो... हा शेजारी म्हणजे अंगद... त्याच्याकडे आपल्या काकांची काही पुस्तके मनोजला दिसतात... ती रद्दीवाल्याकडून घेतली आहेत असे अंगद सांगतो... त्यावरून त्याने टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची विद्या आत्मसात केलेली असते आणि नेमाडे यांचा सावत्रभाऊ असल्याचा दावा करून तो म्हणतो, ‘तुमच्या मुलीचं मांजरात रुपांतर झालं तरी तिचं मन आणि बुद्धी मात्र माणसाचीच राहणार... मला 25 हजार दिले तर मी माघार घेईन...’ डॉ. मनोजवर तो अशुभ शक्तीद्वारे हल्ला चढवू पाहतो. परंतु नीलमण्यामुळे मनोजवर काही परिणाम होत नाही. अंगद म्हणतो, ‘आता तू वाचलास. पण माझ्या शक्तीची कल्पना तुला आली असेल. माझ्यापासून दूर पहा...’ अंगदच्या या धमकीने डॉ. मनोज त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या विद्येचा वापर करतो. सुधीराच्या शरीरावर आपल्या डोळ्यातून निघणारे विशिष्ट किरण केंद्रित करतो. मांजराच्या शरीराचे उपरे आणू वेगवेगळे होऊन, आसपास वावरणारे मूळ अणू आपली जागा घेतात आणि सुधीरा पूर्ववत होते... तिच्या शरीराभोवती मनोज संरक्षक कवच तयार करतो. ही कथा इथेच संपत नाही. अंगद हा सुधीराला पळवून नेतो आणि कालभैरवीच्या देवळात तिचा नरबळी देऊ पाहतो. नेमाडे डॉ. मनोजकडे मदतीसाठी येतात... मनोज नीलमणी खिशात टाकून बघतो तर नेमाडे यांच्या जागी एक पांढरट विरविरीत आकार दिसतो... स्वत:भोवती संरक्षक कवच तयार करून मनोज निघतो... अंगदने नेमाडेंच्या रूपात अशुभ शक्तीला पाठवले आहे हे तो ओळखतो आणि अंगदचा डाव त्याच्यावर उलटवतो. अंगदला न मारता टेलिट्रॅन्सफॉर्मेशनद्वारे त्याच्या शरीरातले अणू-परमाणूत रुपांतर करून ते सर्व दिशांना पसरवून टाकतो. बळीच्या चौथर् यावरील स्त्रीला मुक्त करतो आणि ‘तू आता घरी जाशील आणि घडलेला सर्व प्रकार विसरून जाशील’ असाही संदेश देतो. टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची कल्पना वापरून ‘मांजराची सावली’ या कथेची उभारणी केली गेली आहे. चक्रव्यूह’ या कथेच पाच वर्षांपूर्वी पुराणवस्तू संशोधन करताना रुपाली मध्यप्रदेशच्या जंगलातल्या स्टडी टूरच्या वेळी तेथून आणलेल्या वस्तूंपैकी एका चपट्या डबीला अपशकुनी मानत असते. त्या डबीत कसले तरी चूर्ण असते आणि पाठीमागे विचित्र लिपीत काहीतरी कोरलेले असते. तिचा विश् वासू नोकर चंदन ती डबी उघडतो आणि त्यानंतर बेपत्ता होतो तेव्हा रुपाली आपला मित्र विभाकर याला बोलावून ती डबी दाखवते. विभाकर म्हणतो, ‘ही डबी पंडितरावांना दाखवायला हवी. ते तिचे रहस्य शोधून काढतील.’ पाच वर्षांपूर्वीच्या त्या स्टडी टूरमध्ये रुपाली तिचे प्रा. सिन्हा व इतर सहकारी मित्र यांना जंगलात राहणारी एक आदिवासी तरुणी भेटलेली असते. डॉ. सिन्हा यांना ती डबी सापडलेली असते आणि नंतर ते मृतावस्थेत आढळतात... पंडितराव ही पूर्वकहाणी ऐकून, या डबीत एक दुर्दैवी आत्मा बंदिस्त असावा असा तर्क करतात आणि मंत्राने मारलेले पाणी त्या डबीवर टाकतात. त्याबरोबर ती डबी टणटण उड्या मारू लागते. एक पुरुषी किंकाळी ऐकू येते, ‘मला त्रास देऊ नको.’ ‘मी तुला मुक्ती देणार आहे, तू कोण आहेस?’ तेव्हा आवाज येतो, ‘मी सोमदत्त. चारशे वर्षांपूर्वी मी सेनापती होतो. बादशहाच्या बेगमचे प्रेम माझ्यावर जडले. पण तिच्या दासीने घात केला. बादशहाने माझे डोके धडावेगळे केले. बेगमेलाही ठार केले आणि मला म्हटले मी तुझ्या आत्म्याला कायमचे जखडून ठेवणार आहे. तुझ्या अस्थिंचे चूर्ण करून ते डबीत बंदिस्त करणार आहे. बेगमेच्या प्रेताबरोबर ही डबी राहील.’ पंडितराव त्याला आश् वासन देतात, ‘सोमदत्त, मी तुझ्या अस्थिचूर्णावर धार्मिक संस्कार करून तिचे योग्य जागी विसर्जन करीन. तुला मुक्ती मिळवून देईन.’ ...पंडितरावा रुपालीला घेऊन त्या मध्यप्रदेशातील जंगलात जातात. त्यांनाही ती झोपडी-तिच्यासमोर एक व्यक्ती दिसते... ती व्यक्ती म्हणजे चंदन असते... रुपाली हाक मारते... पण पंडितराव म्हणतात, ‘हा चंदन नाही. ही एक अमानवी शक्ती आहे... तू रिंगणात पाऊल ठेवू नकोस...’ नंतर पंडितराव खुलासा करतात, ‘सोमदत्ताची ती डबी दोनशे वर्षांपूर्वी एका युवतीने उघडली. तिच्या आत्म्याला थडग्यापाशी पहारा देत बसण्याची वेळ आली. नंतर प्रा. सिन्हा यांच्यावर ती पाळी आली... आता त्यांची जागा चंदनने घेतलीय... हे दुष्टचक्र आहे.’ ...या कथेच्या शेवटी आणखी एक आश् चर्य प्रकट होते. हा सोमदत्त कोण, ही रुपाली कोण? त्यांचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध कसे असतात. त्याचा केवळ निर्देश येतो आणि कथा संपते. मसुरीच्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये डॉ. दिवाण यांच्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून प्रा. जयवंत नामजोशी यांना पोलीस कोठडीत डांबले जाते. तो खून नामजोशींनी केलेला नाही. डॉ. दिवाण यांची व नामजोशींची गाठ त्या हॉटेलातच पहिल्यांदा पडली. नरबळी’मधील गूढरम्य वातावरण संन्यासी मांत्रिक देवीपुढे आत्मसमर्पण करायला निघालेला चक्रधर आणि पंडितराव विभाकर यांनी त्याला वाचवण्याचा केलेला प्रयत्न... त्यामुळे चिडलेला संन्यासी... त्या संन्याशावर तुटून पडलेले वखवखणारे आत्मे... पंडितराव त्या संन्याशावर अंत्यसंस्कार करून त्याला मुक्त करतात... हे पंडितराव ‘विषारी विळखा’ या कथेतही पुन्हा भेटतात. अमितावर प्रेम करणाऱ्या सोमनाथचा खून करून त्याचे प्रेत कारंजासाठी खणलेल्या खड्ड्यात पुरण्यात येते. अमिताचे लग्न होते. तिच्या वडिलांना वेड लागते. अमिताला वेगवेगळे भास होऊ लागतात. पंडितराव तिला घेऊन... त्या सोमनाथच्या आत्म्याला आश् वासन देतात, तुझी काही इच्छा असेल तर ती पूर्ण करायचे वचन देते... तुझ्या बायकामुलांना सुखाचा घास मिळेल अशी व्यवस्था करते. कारंजाखाली पुरलेल्या तुझ्या देहावर योग्य ते धार्मिक संस्कार करते. ...आणि बागेतले कारंजे उद्ध्वस्त होते. तेथे एक सांगाडा सापडतो. पंडितरावांची कामगिरी फत्ते होते. मांजराची सावली ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more