* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: CAT O NINE TALES
 • Availability : Available
 • Translators : LEENA SOHONI
 • ISBN : 9788184980653
 • Edition : 2
 • Publishing Year : SEPTEMBER 2009
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 224
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
CAT O` NINE TALES IS THE FIFTH COLLECTION OF IRRESISTIBLE SHORT STORIES FROM THE MASTER STORYTELLER. THESE YARNS ARE INGENIOUSLY PLOTTED, WITH RICHLY DRAWN CHARACTERS AND DELICIOUSLY UNEXPECTED CONCLUSIONS, AND WITH THE ADDED BONUS OF ILLUSTRATIONS BY THE INTERNATIONALLY ACCLAIMED ARTIST, RONALD SEALER. WHILE INCARCERATED FOR TWO YEARS IN FIVE DIFFERENT PRISONS. JEFFREY ARCHER PICKED UP SEVERAL IDEAS FOR SHORT STORIES. THEY RANGE FROM A TALE OF THE MAN WHO ROBBED HIS OWN POST OFFICE TO THE STORY OF A COMPANY CHAIRMAN WHO TRIED TO POISON HIS WIFE WHILE ON A TRIP TO ST PETERSBURG - BOTH WITH UNEXPECTED CONSEQUENCES. IN ANOTHER , MAESTRO, AN ITALIAN RESTAURATEUR ENDS UP IN JAIL, UNABLE TO EXPLAIN TO THE TAX MAN HOW HE CAN AFFORD A YACHT, A FERRARI AND A HOME IN FLORENCE, WHILE ONLY DECLARING A PROFIT OF 1000000 POUNDS A YEAR. THE RED KING IS A TALE ABOUT A CON MAN WHO DISCOVERS THAT AN ENGLISH LORD REQUIRES ONE MORE CHESS PIECE TO COMPLETE A SET THAT WOULD BE WORTH A FORTUNE. IN ANOTHER TALE OF DECEPTION, THE COMMISSIONER, A BOMBAY CON ARTIST ENDS UP IN THE MORGUE AFTER HE USES THE POLICE CHIEF AS BAIT IN HIS LATEST SCAM. THE ALIBI REVEALS HOW A CONVICT MANAGES TO REMOVE AN OLD ENEMY WHILE HE`S LOCKED UP IN JAIL, AND THEN SET UP TWO PRISON OFFICERS AS HIS ALIBI. IN CONTRAST IS THE ACCOUNTANT, WHO, IN CHARITY BEGINS AT HOME, REALIZES HE HAS ACHIEVED NOTHING IN HIS LIFE AND SETS OUT TO MAKE A FORTUNE BEFORE HE RETIRES. AND THEN THERE IS ARCHER`S FAVORITE, WHICH HE CAME ACROSS AFTER LEAVING PRISON, IN THE EYE OF THE BEHOLDER, WHERE A HANDSOME PREMIER DIVISION FOOTBALLER FALLS IN LOVE WITH A TWENTY-STONE WOMAN...WHO JUST HAPPENS TO BE THE NINTH RICHEST WOMAN IN ITALI.
विख्यात कथाकार जेफ्री आर्चर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला ‘कॅट ओ’नाईन टेल्स’ हा पाचवा कथासंग्रह. अत्यंत कल्पकतेने गुंफलेल्या या कथांमधे सशक्त व्यक्तीचित्रं आहेत आणि या कथांचे शेवट वाचकांची मती कुंठित करणारे आहेत. जेफ्री आर्चर यांनी दोन वर्षांच्या कालावधीत एकूण पाच वेगवेगळ्या कारागृहात वास्तव्य केले. त्या काळात अनेक लघुकथांचे धागे त्यांना मिळाले. स्वत:च्याच मालकीचे पोस्ट ऑफिस लुटणा-या माणसापासून ते रशियाच्या दौ-यावर असताना आपल्या पत्नीच्या खुनाचे कारस्थान करणा-या माणसाची कथा रंगतदार शैलीत त्यांनी मांडली आहे. प्रत्येक कथेचा शेवट मात्र अनपेक्षित आहे, धक्कादायक आहे. या कथासंग्रहात एक रेस्टॉरंटचा मालक आहे, जो मोठा धूर्त आणि चलाख आहे. फेरारीतून हिंडणारा आणि फ्लोरेन्समधे प्रासादतुल्य व्हिलात सुटीसाठी जाऊन राहणारी ही असामी टॅक्स चुकवण्यासाठी काय काय क्ऌप्त्या योजते याची मनोरंजक कहाणी आहे. ‘लाल बादशहा’ कथेमधे एका संग्राहकाला एका बुद्धिबळातील सेटमधील लाल रंगाचा राजा मिळवून देण्यासाठी एक भामटा कसा जिवाचा आटापिटा करतो त्याची वाचकांना थक्क करून सोडणारी हकिकत आहे. ‘द कमिशनर’ ही कथा तर चक्क मुंबईतील एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पोलीस कमिशनरच्याच आयुष्यात घडते. ‘द अ‍ॅलिबी’ आणि ‘चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम’ या कथाही अशाच वाचकांना हतबुद्ध करून सोडणा-या आहेत. शेवटची कथा ‘इन द आय ऑफ द बिहोल्डर’ ही कथा लेखक जेफ्री आर्चर यांची सर्वांत आवडती कथा. तुरुंगवासाच्या अखेरच्या दिवसांमधे त्यांना त्या कथेचा धागा गवसला. आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत हा बारा कथांचा संग्रह त्यांनी वाचकांसाठी सादर केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #जेफ्रीआर्चर #JEFFREYARCHER #ANJANINARAVANE #AJITTHAKUR #SUDHAKARLAWATE #LEENASOHONI #NOTAPENNYMORENOTAPENNYLESS #नॉटअपेनीमोअरनॉटअपेनीलेस #SONSOFFORTUNE #सन्सऑफफॉर्च्युन #FALSEIMPRESSION #फॉल्सइम्प्रेशन #APRISONEROFBIRTH #अप्रिझनरऑफबर्थ #KANEANDABLE #केनअँडएबल #CATONINETALES #कॅटओनाइनटेल्स #TOCUTALONGSTORYSHORT #टूकटअलाँगस्टोरीशॉर्ट #ANDTHEREBYHANGSATALE #अ‍ॅण्डदेअरबायहँग्जअटेल PATHS OF GLORY पाथ्स् ऑफ ग्लॉरी "
Customer Reviews
 • Rating StarBhagwatkinkar AakashRajnath

  जेफ्री आर्चरचं आणखी एक अप्रतिम पुस्तक खरोखर काय अवलिया माणूस आहे हा!

 • Rating StarDAINIK HINDUSTAN

  जेफ्री आर्चर यांचा ‘कॅट ओ-नाईन टेल्स’ हा पाचवा कथासंग्रह. या कथासंग्रहातील व्यक्तीचित्रे अत्यंत स्पष्ट, ठसठशीत आणि सशक्त आहेत. कथांचे शेवट वाचकांची मती गुंग करणारे आहेत. जेफ्री आर्चर यांचे नाव जगातील सर्वात्कृष्ट दहा लेखकांमध्ये होते. त्यांनी अनेक कथ, कादंबऱ्या, लघुकथा, नाटके लिहिली. त्यांच्या कादंबऱयांवर आधारीत दूरवाहिन्यांवर मालिकाही गाजल्या आहेत. त्यांच्या तुरुंगवासातील अनुभवावर आधारीत ‘प्रिझनर डायरी’चे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक, धावपटू त्यानंतर उद्योजक, कंपनीचे दिवाळे वाजल्यामुळे दिवाळखोर आणि शेवटी संसद सदस्य, महापौरपदाचे उमेदवार असे विविधांगी जीवन ते जगले. फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवास भोगला आणि त्यांचे जीवन कादंबरीचा विषय होऊन राहिला. तुरुंगातील विविध अनुभवांचे कथाबीज त्यांना मिळाले. त्यांनी या बीजावर साहित्याचा मोठा वृक्ष निर्माण केला. ‘कॅट ओ-नाईन टेल्स’ या कथासंग्रहात बारा कथा आहेत. प्रत्येक कथेचा शेवट अनपेक्षित आहे. ‘द रेड किंग’ या कथेत एका संग्राहकाला एका बुद्धिबळाच्या सेटमधील लाल रंगाचा राजा मिळवून देण्यासाठी एक तर मुंबईतील एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलीस कमिशनरच्या आयुष्यावर घडलेली ‘द कमिशन’ ही कथा वाचकांना थक्क करून सोडणारी आहे. ‘इन द आय ऑफ दी होल्डर’ ही जेफ्री आर्चर यांना सर्वांत आवडणारी कथा या संग्रहात आहे. सर्व कथांचे अनुवाद लीना सोहोनी यांनी अत्यंत समर्थपणे केले आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पृष्ठे २१७ असून किंमत २०० रूपये इतकी आहे. ...Read more

 • Rating StarMAHARASHTRA TIMES 21-2-2010

  जेफ्री आर्चर...आपल्या लेखनाने स्वत:च एक ब्रॅण्ड झालेला हा इंग्लिश लेखक. ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ या पहिल्याच कादंबरीने त्यांना प्रकाशझोतात आणलं. तब्बल १७ देशांमध्ये त्यांची ही कादंबरी विकली गेली. लेखक, अभिनेता, नाटककार, राजकारणी अशी जेफ्री यंची ओळख असली, तरी फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवासही भोगलाय. कंपनीत गुंतवलेले पैसे बुडाल्याने ते दिवाळखोर झाले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी लेखन सुरू केलं आणि पहिल्याच फटक्यात ते जगभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनाही एखाद्या पिक्चरप्रमाणे रोमांचकारी आहेत. आयुष्याच्या चढउतारावर भेटलेल्या अनेक प्रसंगांचा अनुभव त्यांच्या लेखणीतून व्यक्त होतो... स्टोरी नरेट करण्याची जेफ्री यांची स्वत:ची आहे. त्यांची कादंबरी एकदा हातात घेतली, की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटत नाही. ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ प्रिझन डायरीज, फर्स्ट अमंग इक्वल्स अशा अनेक कादंबऱ्या हे याचं उदाहरण. इंग्रजीमधील त्यांचं दर्जेदार आणि इण्टरेस्टिंग साहित्य आता मराठीतही येतंय. ‘कॅट ओ’नाईन टेल्स’ हा त्यांचा पाचवा कथासंग्रह मेहतांनी मराठीत आणलाय. एकूण १२ कथांचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. दोन वर्षांच्या तुरुंगवासात आर्चर पाच वेगवेगळ्या तुरुंगात राहिले. या दरम्यान त्यांना भेटलेल्या व्यक्तींच्या या कथा आहेत. स्वत:च्या मालकाचे पोस्ट ऑफिस लुटणारं जोडपं, पत्नीच्या खुनाचं कारस्थान रचणारा माणूस, टॅक्स चुकवण्यासाठी निरनिराळ्या कल्पना लढवणारा हॉटेलिअर, घटस्फोटानंतर प्रॉपर्टीची मागणारी लोभी पत्नी अशा अनेक एकाहून एक सुरस कथा यात आहेत. रंगतदार अशा या कथा वाचता-वाचता आपण नकळत त्यात गुंततो. कथा पुढे काय वळण घेणार, याची अपार उत्सुकता लागते. कथा संपत आल्यावर शेवट ‘प्रेडिक्ट’ करणार तेवढ्यात अनपेक्षित असतो, तेवढाच धक्कादायकाही. त्यामुळेच कथा वाचण्याची ही गंमत अनुभवायला हवी. आर्चर यांची कथा सांगण्याची ओघवती शैली मराठीतही जपण्याची काळजी लीना सोहोनी यांनी घेतली आहे. सोपी आणि ओघवती भाषा, रंगतदार कथा आणि अनपेक्षित असा शेवट यामुळे पुस्तक खरंच इण्टरेस्टिंग होतं. एकदा तरी वाचून त्या अनुभवायला हवं. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Krishna Diwate

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. इतका intellectual मनुष्य आपल्या भारतात-महाराष्ट्रातात होऊन गेला, याचा आपणां सर्वांनाच सार्थ आभिमान वाटायला हवा. त्यांच्याप्रती विनम्र अभिवादन!* 🙏 *१४ विद्या - चार वेद + ६ वेदांगे आणि न्याय, मीमांसा, पुराणे णि धर्मशास्त्र.* पैकी दोन महत्वाची वेदांगे म्हणजे *१. व्याकरण - भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र* *२. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन* या दोन्ही विद्यांचा जिथे उत्तम संयोग-मिलाप होतो, ती व्यक्ती एक उत्तम लेखक असू शकते, असे मला वाटते. आणि हे वाटणे अधिकाधिक दृढ होत जाते, जेव्हा जेव्हा मी व्यंकटेश माडगूळकरांची पुस्तके-कादंबऱ्या-शब्दचित्रे व स्थलवर्णन वाचते, त्यात गढून जाते. पुन्हा ६४ कलांपैकी एक - चित्रकला \हीसुद्धा त्यांच्याजवळ आहे. या सर्व कलागुणांचा सुंदर मिलाफ त्यांच्या प्रत्येक पुस्तकात बघायला मिळतो, मग माझ्यासारखा वाचक का नाही त्यांच्या साहित्याचा fan होणार? आणि तसेही माझे पुसु सत्र त्यांच्या एका तरी पुस्तकाशिवाय मलाच सुने-सुने वाटले असते. त्यात आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखाव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more