* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASHRU
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667479
  • Edition : 15
  • Publishing Year : JANUARY 1954
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS 20TH CENTURY HAS PRESENTED THE WORLD WITH MANY THINGS GOOD AS WELL AS BAD, BUT THE BEST OF ALL IS THE IMPORTANCE GIVEN TO THE COMMON MAN, MAKING HIM UNCOMMON. WHAT IS LIFE? IT IS A COMBINATION OF HUMAN BEINGS COMMON AS WELL AS UNCOMMON 99% ARE COMMON, ONLY ONE PERCENT OF THEM ARE UNCOMMON. TILL TODAY WE HEARD ONLY FROM THESE ONE PERCENT PEOPLE, THEY WERE KINGS, SAINTS, PHILOSOPHERS, POETS, SCIENTIST, HEROES... THEY PRESENTED THEIR SUGARCOATED TALKS AND CHEATED THE COMMON MEN. THEY KILLED THE INITIATIVES OF EVERY COMMON MAN. STILL, THE COMMON MAN WAS STRIVING WITH ALL HIS STRENGTH TO SAFE GUARD THE CULTURAL VALUES, THE ONLY SUPPORT FOR HUMANITY. THE HERO OF THIS NOVEL IS A COMMON MAN. HE DOES NOT HAVE ANY EXCLUSIVE QUALITIES, HE DOES NOT SUCCEED IN DOING SOMETHING EXCLUSIVELY GOOD BUT HE HESITATES TO DO ANYTHING BAD. THIS IS AN OUTSTANDING NOVEL BY KHANDEKAR EXPRESSING THE PAINS IN THE LIFE OF A COMMON MAN.
या विसाव्या शतकानं जगाला बयावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो? मूठभर असामान्यांचा की शेकडा नव्वद, किंबहुना शेकडा नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला फारसे बोलू दिले नाही. या असामान्यांनी सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि.स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #अश्रू
Customer Reviews
  • Rating StarShashi sanap

    अश्रू ही कादंबरी वाचून पूर्ण झाली.. अतिशय सुंदर व मार्मिक वि. स. खांडेकरांच साहित्य लेखन टिळक,मा.गांधी,नेहरू,आगरकर यांचा विचाराचा प्रचंड प्रभाव असलेलं टिळकांच्या आग्रह खातर शिक्षक झालेला शंकर मुख्य पात्र,प्रेमळ निस्वार्थी पत्नी उमा,सावत्र असून भवाच्या पत्नीवर जीव देणारी सुमित्रा , केवळ अहिंसा ने स्वतंत्र मिळणार नाही असा मानणारा ,क्रांती विचारक भाऊ अरविंद आणि लक्षवेधक शंकर चा मित्र दिगंबर .. अश्रू कादंबरी ही मुळात प्रत्येकांच्या घरात घडणारी गोष्ट आहे,किती ही अडचणी आल्या तरी देखील घरातला कर्ता मात्र कधीही विचलित होत नाही तो त्यांच्या विचारांवर ठाम राहतो, अश्या वेळी त्याला घरातील मंडळींची साथ देखील तशीच मिळते..शंकर हा खूप प्रामाणिक पात्र आहे,बहिणीचे लग्न,मुलाची सायकल,पत्नी साठी एक पातळ ,शाळेतील स्वखर्चाने फी भरणारा विद्यार्थी प्रिय शिक्षक... समाजातील काही लोकांनी पैसेच्या मोहात ओढण्याचा देखील प्रयत्न यामध्ये केलेला आहे।। शेवट मात्र अश्रू ठिपकन येणारा आहे.. अश्रू आहेत म्हणून तर या जगात प्रीती,भक्ती,सेवा,त्याग व्यतीचे स्वभाव गुण आहेत... ...Read more

  • Rating StarMilind Pawar

    *अश्रू* लेखक- वि.स.खांडेकर अश्रु ही जणु आपलीच कहाणी आहे असं भासणारी एक अप्रतिम कांदबरी. पुस्तक हातात घेतलं अन् सुरवातीला उमा, शकंर या पात्रांची स्थिती जाणवली मग असं झालं की केव्हा एकदाचं पुस्तक संपवतो. कहाणी जरी स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळातल असली तरी आजही एकविसाव्या शतकातील मध्यमवर्गीय कुटुंबात घरोघरी घडणारी घटनेसारखी वाटते. प्रत्येक पात्र हे आपला ठसा उमटवणारी आहे. उमा व शकंर सारखी पात्र आजही आपल्या अवतीभवती महागाईच्या विळख्यातुन प्रामाणिकपणे संसाराचा गाडा ओढतांना आपल्या स्वप्नांचा चक्काचुर करत पुढे चालतांना दिसतात. राजकारण व व्यवस्थेचा बळी ठरणारे दिंगबर व अरविंद सारखी तरुण आपल्या कुटुंबातसुद्धा दिसतात.अरविंदच्या माध्यमातुन आजही राजकारणात प्रवेश करु ईच्छिणा-या सतरंजी व झेंडा उचलणा-या तरुणासाठी सणसणित चपराक आहे. सुमित्रा सारख्या काॕलेजला जाणाऱ्या मुलींना प्रेम म्हणजे सर्वस्व वाटणाऱ्यांना सुद्धा शेवटी प्रेम जरी आंधळ असलं तरी आशा ही वेडी ठरते हे कळतं. सर्वच प्रेमकहाण्या रोमियो-ज्युलीयट सारख्या नसतात याची जाणिव करुन देतात. दिंगबर व शकंरची मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नातं श्रेष्ठ ठरवणारी ठरते. पण उमा व शकंरचे प्रामाणिकपणे संसार करत असतांना एकमेकांवरचे निस्वार्थी प्रेम ,संसारातील सुखदुःखाची समान वाटणी , कुटुंबाप्रती आपुलकी , जिव्हाळा, प्रेम व त्याग खुपच आदर्श ठरतात. ...Read more

  • Rating StarUMA NIJSURE

    पुस्तकाचे नाव - अश्रू लेखक - वि.स. खांडेकर ही कहाणी आहे एका सामान्य , नाकासमोर चालणार्या अर्थातच गरीब असलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाची. प्रेमळ बायको , खाष्ट सावत्र आई , उडाणट्प्पू भाउ, प्रेमात पडलेली बहिण, आठ वर्षाचा मुलगा , जुगारी मित्र दिगंबर , लबड ढोंगी पापासाहेब, अपर्णा, गायकवाड हे विद्यार्थी अशी भरपूर पात्र कादंबरीत आहेत .जणू काही एखाद्या मराठी सिरियल चा मसाला. मुलाला साधी सायकल ही घेऊन देता येत नाही म्हणून अश्रू ढाळणारा हा नायक. ध्येयवादाचे चटके त्याला बसतात. त्याच्या डोळ्यतून अश्रू येतात. पण ते अश्रू हेच तो आपले वैभव मानतो. अकरावी बारावीत असताना ही कादंबरी पहिल्यांदा वाचली . आणि खांडेकरांची मिळतील तेवढी सगळी पुस्तके वाचून काढली. अश्रू तला नायक आज़च्या दुनियेत दुर्मिळ झालाय म्हणजे इतकं आदर्श कोणी आज दिसतही नाही. तरीही ही कादंबरी परत परत का वाचावीशी वाटते कळत नाही. कदाचित खांडेकरांच्या लेखणी ची किमया असेल. मुखपृष्ठ अर्थातच चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे . त्यांचे मुखपृष्ठ असले की पुस्तक घ्यावेसे वाटतेच . असो . आपल्या पैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेलच पण ज्यांनी अज़ून वाचलेलं नाहीये त्यांनी नक्की वाचावे.- उमा निजसुरे ...Read more

  • Rating StarVikas Dokhe

    आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी कादंबरी या विसाव्या शतकानं जगाला बऱ्या वाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीव म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book