* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO ACHIEVE SUCCESS
  • Availability : Available
  • Translators : CHARULATA PATIL
  • ISBN : 9788171615988
  • Edition : 6
  • Publishing Year : OCTOBER 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANANT PAI COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THIS BOOK, THE AUTHOR DISCUSSES THE VARIOUS ASPECTS CONCERNED WITH BEING SUCCESSFUL. HE SAYS, `ONCE YOU FIND THE MAGIC LAMP OF CONFIDENCE THEN YOU SURELY WILL ACHIEVE EVERY SINGLE THING SET IN YOUR MIND. YOU JUST HAVE TO THINK ABOUT THE THING AND IT WILL BE YOURS!` BUT THERE IS A SPECIFIC WAY OF SOWING THE SEEDS OF CONFIDENCE IN YOUR MIND. THE AUTHOR HAS DISCUSSED THE SAME IN DETAIL IN THIS BOOK. HE DESCRIBES IN A VERY SIMPLE LANGUAGE THE VARIOUS WAYS TO CROSS ALL THE OBSTACLES IN THE PATH OF YOUR SUCCESS. EVERYONE, AT THE STAGE OF ADOLESCENCE SHOULD READ THIS BOOK.
या पुस्तकात लेखकांनी यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणाया विविध घटकांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. ते म्हणतात, ‘‘एकदा का तुमच्या हाती आत्मविश्वासाचा जादूचा दिवा आला, की बस्स! तुम्ही मनात इच्छा करायचाच अवकाश, की तुमची ती इच्छा पूर्ण झालीच, म्हणून समजा!’’ मात्र मनात ती इच्छा रुजवण्याचं देखील एक तक तंत्र आहे; आणि तेच या पुस्तकात लेखकांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तुमच्या यशाच्या आड येणारे सगळे अडथळे कसे दूर सारायचे, हे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत या पुस्तकात सांगितलेलं आहे... त्यामुळं पौगंडावस्थेत पदार्पण करणाया प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SELFHELP #ANANTPAI #SUCESS #मार्गदर्शनपर #अनुवाद #अनंतपै #यश #व्यक्तिमत्वविकसन
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    आयुष्यात यशस्वी कसे, मित्र कसे मिळवावेत, पैसा कसा राखावा, आनंद कसा मिळवावा, याबद्दल मार्गदर्शन करणारी बरीच पुस्तके असतात. कळते पण वळत नाही, अशीच वाचणाऱ्यांची अवस्था होते. काही वेळा लेखकाने सुचवलेले उपाय वरवरचे वाटतात. यशाचा पाया सकारात्मक विचारसरणी ह आहे. अमूक एक गोष्ट मी नक्की करीन, असा स्वत:विषयी विश्वास, निश्चय आवश्यक आहे. निराशा भोवताली भरून राहिली तरी कोलंबस डगमगला नाही. त्याने वल्हवत रहा, असाच संदेश साथीदारांना दिला. बोटीत जे पाणी शिरते तेच बोट बुडवते. एरवी भोवताली भ्रष्टाचार, हिंसा यांचे वातावरण असले तरी ते आपल्या मनात झिरपू देऊ नये. मनोबल वाढवण्याचे अनेक उपाय श्री. पै सांगतात. तीर्थयात्रांच्या शारीरिक कष्टांमुळे मनोबल वाढते हेही सांगतात. शारीरिक अपंगत्वावर मात करून यश मिळवणाऱ्या विथोव्हेन, सुधा चंद्रन, हेलन केलर, रुझवेल्ट, लुईस ब्रेल यांची उदाहरणे दिली आहेत. तरुणांना हे पुस्तक वाचण्यात रस वाटू शकेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more