* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MOTHER DANCE:HOW CHILDREN CHANGE YOUR LIFE
  • Availability : Available
  • Translators : JAYASHREE GODASE
  • ISBN : 9789386888631
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :HARRIET LERNER COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FROM THE CELEBRATED AUTHOR OF THE DANCE OF ANGER COMES AN EXTRAORDINARY BOOK ABOUT MOTHERING AND HOW IT TRANSFORMS US -- AND ALL OUR RELATIONSHIPS -- INSIDE AND OUT. WRITTEN FROM HER DUAL PERSPECTIVE AS A PSYCHOLOGIST AND A MOTHER, LERNER BRINGS US DEEPLY PERSONAL TALES THAT RUN THE GAMUT FROM THE HILARIOUS TO THE HEART-WRENCHING. FROM BIRTH OR ADOPTION TO THE EMPTY NEST, THE MOTHER DANCE TEACHES THE BASIC LESSONS OF MOTHERHOOD: THAT WE ARE NOT IN CONTROL OF WHAT HAPPENS TO OUR CHILDREN, THAT MOST OF WHAT WE WORRY ABOUT DOESN`T HAPPEN, AND THAT OUR CHILDREN WILL LOVE US WITH ALL OUR IMPERFECTIONS IF WE CAN DO THE SAME FOR THEM. HERE IS A GLORIOUSLY WITTY AND MOVING BOOK ABOUT WHAT IT MEANS TO DANCE THE MOTHER DANCE.
मातृत्व आपल्यात कसे बदल घडवून आणते आणि आपली सगळीच नाती आतून आणि बाहेरूनही कसे बदलते याबाबत माहिती देणारे हे अप्रतिम पुस्तक आहे. प्रत्यक्ष माता, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक या विविध भूमिकांमधून लिहिताना हॅरिएट लर्नर यांनी अगदी विनोदी ते अत्यंत हृदयस्पर्शी अशा खूप वैयाQक्तक गोष्टी सांगितल्या आहेत. जन्म, दत्तकविधान ते रिकामे घरटे या सगळ्या टप्प्यांबाबत नर्मविनोदी शैलीत लिहिले आहे. पालकत्वाविषयीचे अतिशय समृद्ध आणि प्रामाणिक अनुभव सांगताना पालकत्वातील चुका दाखवलेल्या नाहीत, पण त्यातून मिळणारी शिकवण अतिशय सुरेख आहे. एकूण चार विभागांत मिळून मातेच्या जबाबदाऱ्यांचे चित्रण यामध्ये आहे. लर्नर यांनी निव्वळ कोरडे सल्ले दिलेले नाहीत तर वैयाQक्तक उदाहरणांमुळे त्यांचे लिखाण अधिक प्रामाणिक वाटते. प्रसंगी आई म्हणून स्वत:च्याच वर्तनावर, झालेल्या चुकांवर भाष्य करत टीकाही केली आहे. गर्भधारणा, बाळाचा जन्म, मग एक वर्षापर्यंतचा अवघड काळ! त्यामध्ये आई-बाबांची होणारी ओढाताण, कुटुंब, समाज यांचा परिणाम आणि नातेसंबंध कसे टिकवावेत याबाबत मार्गदर्शन करताना वापरलेली सहज साधी, सोपी भाषा ही लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हे पुस्तक म्हणजे खरोखरच एक प्रकारे `मातृत्वाचा जल्लोष’ आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MOTHERHOOD#PREGNANT#BABY#MATERNITYEXPERT#PSYCHOLOGISTS#
Customer Reviews
  • Rating Star मिळून साऱ्याजणी मे, २०१८

    ‘आरंभ’ या पहिल्या टप्प्यात लेखिकेने गर्भधारणा आणि जन्म, या कालावधीत थोडी संभ्रमित अवस्था ज्यामध्ये आपण माता होण्यासाठी योग्य आहोत का या प्रश्नाची तपासणी करण्याचा अवसर मिळतो आणि त्याची आवश्यकता असते असे प्रतिपादन केले आहे. त्याचवेळी एक व्यक्ती म्हणून क मार्ग खुणावत असतो आणि त्याचवेळी मुलाशी संलग्न माता म्हणून नवीन आयुष्याला सुरुवात होत असते. दुसNया टप्पा ‘अग्निपरीक्षा’ यात मुलांना त्यांचे व्यक्तिमत्व हळूहळू प्राप्त होत असते. त्यांच्यावर संस्कार करणे ह्या जबाबदारीने आई सतत काळजी करायला लागते. तिसNया टप्प्यात, ‘मोठी मुले-मोठी आव्हाने’ येथे अन्नाच्या योग्य सवयी आणि लैंगिकतेचे भान येऊ लागल्यावर आईची उडणारी धांदल याचे अतिशय सुंदर वर्णन लेखिकेने केले आहे. आपल्याकडील वडिल सतत मुलांना अतिरेकी पद्धतीने धारेवर धरत असतात. आई नवNयापुढे नांगी टाकते. चौथा टप्पा खरं म्हणजे मुले उडून गेली, ‘घरटे रिकामे’ झाले की मातेचे मन कसे होते याचे वर्णन करणारा आहे. तिने तरुण मातांना अनेक टीप्स दिल्या आहेत. काही आया मुलांमध्ये काही दोष निघाला, उनाडपणा आला, विंâवा उर्मटपणे वागायला लागली की स्वतःला दोष द्यायला लागतात. ते अगदी चुकीचे आहे. मुलांना रागवावे, कडक शिक्षा करावी, पण गरज पडली तर क्षमासुद्धा मागता यावी. मुलांना न्यायाची अपेक्षा असते. आपण १०० टक्के चांगली आई झाले पाहिजे, हा सर्वोत्तम होण्याचा अट्टाहास टाळा. साधी, सोपी भाषा नर्मविनोद यामुळे पुस्तक वाचताना प्रसन्न वाटत रहाते. ...Read more

  • Rating StarSHABD RUCHI, MAY 2018

    मातृत्वाचा जल्लोष दि मदर डान्स... वाढत्या मुलांशी कसे वागावे हा पालकांसमोरचा कळीचा प्रश्न! जगभरातील माता या प्रश्नाने धास्तावलेल्या असतात. ‘मदर डान्स’ या पुस्तकात हॅरिएट लर्नर ही लेखिका प्रत्येक आईशी मनमोकळा संवाद साधत या मानसशास्त्रीय प्रश्नाला भिडे. मुले मोठी होईतोवर म्हणजे कायदेशीररीत्या पाहिले तर वय वर्षे १८ नंतर, सज्ञान होईपर्यंत पालकांवर त्यांच्या सांस्कृतिक पालनाची जबाबदारी आहे असे समजले जाते. जगभर ही प्रथा आहे पण आपल्या समाजात मात्र विशेषत: मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय समाजात मुले, म्हणजेच मुलगे आणि मुलीसुद्धा बराच काळपर्यंत, पालकांच्या छत्रछायेखाली असावीत असे मानले जाते, विशेषत: विवाहापर्यंत. जातीच्या शुद्धतेचे महत्व असल्याने त्यांची लग्ने एकदा जातीत करून दिली की मग आईबाप निश्चिंत होतात, पण हे छायाछत्र कसे सांभाळायचे, आर्थिकह्ष्ट्या नाही पण भावनिकह्ष्ट्या याबद्दल मात्र फारच कमी चर्चा होतांना दिसते. आजकाल जागृत पालक काही प्रमाणात मानसशास्त्रज्ञांची मदत घेऊ लागले आहेत, पण तीही एखादी केस फारच हाताबाहेर जाऊ लागली आहे असे वाटले तर! नाहीतर शिस्त लावणे म्हणजे चांगले वाईट आपणच ठरवून किंवा परंपरांचा आधार घेऊन मुलांना जरबेत ठेवणे, ती आपल्यावर विशेषत: आर्थिकह्ष्ट्या अवलंबित आहेत याचा फायदा घेऊन, त्याचा उच्चार करत किंवा वेळप्रसंगी त्यांना आवडत्या वस्तूपासून वंचित करून, मारहाण करूनही त्यांच्यावर आपल्याला योग्य वाटतील ते संस्कार करणे यातही त्यांना काही वावगे वाटत नाही. अर्थात पालक म्हटले की त्यामध्ये आई आणि वडील किंवा दोघांपैंकी एक किंवा दोघेही नसतील घरातील दुसरी मोठी माणसे त्यांना या संस्कारांचे ओझे सांभाळावे लागते. पण मुख्यत: आई ही मुलांसाठी अधिक जबाबदार ठरविली जाते. ही एकाअर्थाने जगभरची परिास्थिती आहे. हे जबाबदार असणे आईनेही आजपर्यंत मान्य केले आहे. ते खरोखर आवडीने की वडील जबाबदारी घेत नाहीत असे वास्तव असल्यामुळेही असावे असे मला वाटते. आई नोकरी करतानाही ही जबाबदारी सांभाळत असते आणि त्यासाठी गरज पडली तर नोकरीचा त्याग करणे किंवा कमी जबाबदारीची नोकरी घेणे, करिअरिस्ट न होणे असेही मार्ग ती शोधून काढत असते. संस्कार करताना, चांगले वाईट शिकविताना नवऱ्याची साथ मिळावी, निदान त्याने तिने घेतलेले धोरण समजावून घेऊन साथ करावी, मुलांदेखत तिच्या धोरणाला विरोध करू नये, पैशाच्या जोरावर, मुलांचे हट्ट पुरवीत मुलांचे मन सहज किंवा स्वस्त पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करून आईबद्दल त्यांच्या मनात द्वेष, किंवा दूरत्व निर्माण करू नये एवढी तिची अपेक्षा नक्कीच असते. एका समंजस आईला, (केवळ शिकलेली नाही) काय-काय प्रकारचे ताण सहन करावे लागतात, डोळ्यात तेल घालून आपली मुले वाईट मार्गाला जाणार नाहीत ना, यासाठी केवळ धाकदपटशा न दाखविता, पण वेगवेगळ्या मार्गाने त्यांची मने कशी वळवता येतील याचा विचार करायला लावणारे पुस्तक म्हणजे ‘मदर डान्स’. मी मुद्दाम ‘शिकलेली आई’ असा शब्दप्रयोग न वापरता जाणूनबुजून समंजस आई असा वापरला आहे त्यामध्ये एखादी गरीब घरातील आईसुद्धा मला अभिप्रेत आहे. सुशिक्षित असणे आणि आईची भूमिका समजावून घेऊन, वेळप्रसंगी स्वत:च्या इच्छा, आकांक्षा मागे सारून मुलांना एक समंजस, मानवाधिकाराची जाण असलेला, लोकशाही मूल्यांवर विश्वास असणारा आदर्श नागरिक बनविणे ही महत्त्वाकांक्षी भूमिका एखादी गरीब घरातील, कनिष्ठ जातीतील आईसुद्धा सार्थ करते अशी उदाहरणे आहेतच. कुटुंबातील नातेसंबधांचे बारकावे, गुंतागुंत समजावून घेत-घेत ही आई मुलांना सुसंस्कृत करत असते. त्यांच्या राग लोभांचे निरीक्षण करत अनेक कठीण प्रसंगी सर्वांना न्याय्य वाटेल असा मार्ग काढायचा प्रयत्न करते. भावंडांमध्ये ‘तो तुझा अधिक लाडका, मी दोडकी’, किंवा उलट अशा पद्धतीचे रिमार्क्स/टिप्पण्या तिला नेहमीच ऐकायला मिळतात. त्यापासून स्वत:ला सोडवून घेत, ‘तू जुनाट मतांची आहेस, जग किती बदललंय’ अशीही टिप्पणी ऐकायची तिला सवय करावी लागते. बदलत्या वयानुसार वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या विषयांना सामोरे जात त्याविषयी धोरण आखण्याची तिची जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडण्यासाठी विश्लेषण करण्याची सवय लावणे, स्वत:लाही तपासून पहाणे कसे महत्त्वाचे आहे हे ह्या पुस्तकातून लेखिका समजावून देते. लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि त्यातूनही कुटुंब व नातेसंबंध यातीलही खास शिक्षण तिने घेतले आहे. समुपदेशनाचे कामही ती करते. त्यामुळे खूपशी उदाहरणे स्वत:च्या मुलांच्या संबंधातील तसेच तिच्याकडे येणाऱ्या पालक व मुले यामधील संबंधातील, तिच्या लेखनात येतात. साधी, सोपी भाषा, नर्म विनोद यामुळे पुस्तक वाचताना प्रसन्न वाटत रहाते. लेखिकेने आई व मुले यांच्या संबंधातील चार टप्पे येथे चित्रित केले आहेत. ‘आरंभ’ या पहिल्या टप्प्यात गर्भधारणा आणि जन्म, या कालावधीत थोडी संभ्रमित अवस्था ज्यामध्ये आपण माता होण्यासाठी योग्य आहोत का? या प्रश्नाची तपासणी करण्याचा अवसर मिळतो आणि त्याची आवश्यकता असते असे प्रतिपादन केले आहे. त्याचवेळी एक व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून तुमचा एक मार्ग तुम्हाला खुणावत असतो आणि त्याच वेळी तुमच्या मुलाशी संलग्न माता म्हणून नवीन आयुष्याला सुरवात होत असते. मुलांना त्यांचे असे व्यक्तिमत्त्व हळूहळू प्राप्त होत जात असते. त्यांच्यावर संस्कार करणे ह्या जबाबदारीने आई सतत काळजी करायला लागते. मुले पडली धडपडली तरी त्यांची काळजी आणि त्याच वेळी हे सर्व आपल्या चुकीमुळे घडतंय का? आपण पुरेसे जागृत नाही आहोत का? असे स्वत:कडे दोषी म्हणून पहाण्याचे हे दिवस. मुलांचे हट्ट चुकीचे असतील तर आपली मते लादू न देता त्यांना कसे पटवायचे, किती प्रमाणात त्यांचे स्वातंत्र्य अधोरेखित करायचे आणि किती प्रमाणात ती आपल्यावर अवलंबून आहेत याचे भान त्यांना द्यायचे अशी तारेवरची कसरत आईला करावी लागते. असा आईच्या अग्निपरीक्षेचा टप्पा हा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा ‘मोठी मुले-मोठी आव्हाने’ यावर लक्ष केंद्रित करतो. येथे अन्नाच्या योग्य सवयी आणि लैंगिकतेचे भान येऊ लागल्यावर आईची उडणारी धांदल याचे अतिशय सुंदर वर्णन लेखिकेने केले आहे. आपल्याकडेही आईच्या जिवाला या काळामध्ये घोर लागतोच. विशेषत: मुलीच्या आईला! पण काही प्रमाणात मुलाच्याही बाबतीत हे खरे असते. समाजाच्या संकेतांविरोधी काही घडत नाही ना, याची काळजी जीव पोखरून काढते. बरं मुलांबरोबर बोलायचीही चोरी त्यामुळे त्यांच्या वागणुकीच्या निरीक्षणातून काही कळले तरच धोका टाळण्याची शक्यता. त्यामुळे आपल्याकडील बहुतेक पालक, विशेषत: वडील तर सतत मुलांना अतिरेकी पद्धतीने धारेवर धरत असतात. आई अधिक संवेदनाशील असायची शक्यता पण तीही नवऱ्यापुढे नांगी टाकते आणि शरीरभान आलेल्या मुलामुलींना स्वतंत्रपणे हाताळण्याची जबाबदारी टाळत जाते. अमेरिकेत तर व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना पिढीबरोबरच बरीच पुढे जात असल्यामुळे आईला सतर्क राहूनच गरजेप्रमाणे मुलांच्या मदतीला कसे जाता येईल याचा संवेदनशीलतेने प्रयत्न करावा लागतो. याच काळात मुले भावंडे म्हणून एकमेकांच्यापासून दूर जात असतात. त्यांच्या प्रत्येकाचे वेगळे विेश तयार होत असते. आणि आईला एक प्रश्न सतावत राहतो की आपण हे कुटुंब एकत्र रहावे म्हणून खूप प्रयत्न केले आणि भविष्यामध्ये मुलांना अडचणीच्या काळात एकमेकांची साथ मिळावी अशी मनापासून प्रार्थना केली, पण त्यांचा संवाद टिकून राहील का? चौथा टप्पा खरं म्हणजे मुले उडून गेली, ‘घरटे रिकामे’ झाले की मातेचे मन कसे होते याचे वर्णन करणारा आहे. त्यामध्ये नवऱ्यालाही आणले आहे. मुले दूर गेल्याचा त्यालाही त्रास होत असतो असा तिचा अनुभव आहे. तिच्या मैत्रिणीने मात्र ह्या ‘रिकामे घर सिंड्नोम’ संकल्पनेला खूप विरोध केला आहे. तिच्या मते सतत बायका या बिचाऱ्या आहेत असे म्हटले जाते तसेच मुले घर सोडून गेली की पालकांना आयुष्यच रहात नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मग तिने तिच्या आईचे उदाहरण दिले आहे. तिच्या आईने आपल्या आवडत्या विषयाला, पेंटिंग्जना पूर्ण वेळ देऊन टाकला होता. तिला लोकांनी असेही सांगितले की घरटे रिकामे झाल्यावर दोन पिढ्यांमधील संवाद अधिक मोकळा होतो. तिचा सल्ला आहे की आभासमय जुन्या विशाकडे स्वप्नवत् पाहाणे सोडून देणे आवश्यक आहे. जुन्या सोनेरी दिवसांची आठवण काढून आपण त्यामध्ये रमू शकणार नाही. तिने तरुण मातांना अनेक टिप्स दिल्या आहेत. काही आया मुलांमध्ये काही दोष निघाला, उनाडपणा आला, किंवा उर्मटपणे वागायला लागली की स्वत:ला दोष द्यायला लागतात. सतत अपराधीपणाची भावना वागवितात. ते अगदी चुकीचे आहे. मुलांना रागवावे, कडक शिक्षा करावी, पण गरज पडली तर क्षमासुद्धा मागता यावी. मुलांना न्यायाची अपेक्षा असते. आपले सगळे निर्णय योग्यच असतील, आपण शंभर टक्के चांगली आई झाले पाहिजे, हा सर्वोत्तम होण्याचा अट्टाहास टाळा. अनेक आया मुलांची सतत चिंता करतात, मुख्यत: त्यांना काही अपघात होईल का, संकटे कोसळतील का याची भीती बोलून दाखवितात. काळजीमागील वेदना सतत ठसठसत राहाते. आपल्याला मरण आले तर मुलांचे कसे होईल? ती अनाथ झाली तर त्यांचा विकास कसा होईल अशा अनंत भ्रामक काळज्या मनात बाळगल्या तर त्यांना सृजनशीलतेने मुलांचे प्रश्न सोडविता येणार नाहीत. काळजी आणि सृजनता यांचे नाते परस्परविरोधी असते म्हणूनच लेखिका आयांना सल्ला देते की तुम्ही तुमच्या मनाची शांतता कशी टिकेल याचा विचार करा. जॉगिंग, ध्यान धारणा, एखादा छंद असे काही उद्योग निवडा. दोन उदाहरणातून तिच्या सूक्ष्म ह्ष्टीचा परिचय करून देता येईल. तिचे आणि तिच्या दुसऱ्या मुलाचे, बेनचे, खोली आवरणे या विषयावरून खूप वाद होत असत. ती मुलांसाठी विशेष विचार करून नियम बनवीत असे आणि त्याची अंमलबजावणी तीव्रपणे व्हावी असे तिला प्रामाणिकपणे वाटे. ती सतत त्याला आठवण करून देई आणि तरीही तो तिच्या उपदेशाचे पालन अजिबात करत नसे. ती बोलून दाखवे की तिच्या मोठ्या मुलाने कसे हे कायदेकानून बिनातक्रार पाळले होते आणि हे त्याच्याच भल्यासाठी होते. उद्या होस्टेलला गेल्यावर त्याला उपयोगी पडतील असे होते. शेवटी तिने नाद सोडला. पंधरा-वीस दिवसांनी तिच्या लक्षात आले की बेन, धाकटा मुलगा आपणहून खोली आवरून ठेवायला लागला आहे. थोरल्या भावाशी केलेली तुलना त्याला आवडली नव्हती. तिने निष्कर्ष काढला होता की त्याला सारखं मोठ्या भावाचे उदाहरण दिलेले आवडायचे नाही. मी वेगळा आहे. ‘माझे निर्णय मी घेईन’, ही भावना त्याच्या पाठी होती. तसेच पुढे एकदा कानात डूल घालण्यावरून वाद झाला. त्याकाळी आजच्यासारखी सरसकट मुलांनी कानात डूल घालायची प्रथा नव्हती. तिने आणि नवऱ्याने पण विरोध केला. तरी बेनने पुन्हा-पुन्हा विषय धरून ठेवला. त्यांनी त्याला सोळाव्या वर्षापर्यंतची मुदत दिली. तोपर्यंत `तू आमचे ऐकले पाहिजे’ हे एकच धोरण ते पुन्हा-पुन्हा, न कंटाळता ते सांगत राहिले. त्यानेही एकच धोशा लावला. शेवटी पंधराव्या वर्षीच्या वाढदिवसाला त्यांनी त्याच्या हातात पैसे ठेवले आणि परवानगी दिली. बेन बेहद्द खूश झाला. त्याचा आईवडिलांवरील विश्वास वाढला आणि लेखिका म्हणते की मी शिकले, ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करता कामा नये. मुलांच्या मनात द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.’ लैंगिकतेबाबतही लेखिकेने एका सल्ला मागणाऱ्या स्त्रीचे उदाहरण दिले आहे. पंधराव्या वर्षी तिच्या मुलीच्या खोलीत तिला तिच्या पलंगाखाली ठेवलेली मैथुनाची चित्रे दाखविणारी पुस्तके मिळाली. ती घाबरून गेली आणि धावत सल्ला मागायला आली. ‘आतापासून हे काय चाललंय? हे बरोबर आहे का?’ तिच्या मनात प्रश्न होते. मुलगी आतापासूनच लैंगिक व्यवहार करायला लागली असेल तर खूप जड जाईल आपल्याला. पाळत ठेवणेही प्रशस्त दिसत नाही. प्रश्न विचारायला लागले तर ती अधिकच दूर जाईल. लेखिका म्हणते की, मी तिला तिच्या मनात डोकावयाला सांगितले. ‘तू त्या वयात काय करत होतीस? तू ही माहिती मिळविण्याचे प्रयत्न कसे केले होतेस? कदाचित तुला ही शारीर भावना सोळाव्या वर्षी झाली असेल, पण नव्या पिढीमध्ये कदाचित ही भावना लवकर येत असेल. शिवाय व्यक्ती वेगवेगळ्या असतात. तू आणि तुझी मुलगी एकाच पद्धतीने वाढेल, विचार करत असेल असे तू का समजतेस? तिच्या शाळेतील वातावरण, मित्रमैत्रिणी हा माहोलसुद्धा वेगळा असेल. लेखिका म्हणते की, मी तिला दोष देत म्हटले की तू तिच्या खोलीत का गेलीस? आणि तिच्या बेडखाली शोधावेसे तुला का वाटले? मुलांचा खासगीपणा टिकविणे आवश्यक असते. नाहीतर ती अधिक दूर जातात. मुलांबाबतीत अनेक छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात, पण त्यासाठी तर्कशुद्ध धोरण ठरविणे महत्त्वाचे असते. ती म्हणते की दोन टोकाच्या भूमिका पहायला मिळतात. मानसिकरीत्या सर्व ताब्यात ठेवणारे अतिरेकी पालक किंवा जबाबदार, शहाणे, समंजस पालक. आपण एकच प्रश्न विचारायला हवा की माता मुलांच्या मनाचा पूर्ण ताबा घेऊ शकते का? आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की प्रौढांकडे अधिक सत्ता असली की त्याचा नातेसंबंधांवर निश्चित परिणाम होतो. लेखिका आवर्जून सांगते की योग्य तऱ्हेने मातृत्वाच्या जबाबदाऱ्या राबविल्या गेल्या तर खरोखरंच ‘मातृत्वाचा जल्लोष’ अनुभवता येतो. ‘एखाद्या अनुभवी मातेने मारलेल्या गप्पा’ असे या पुस्तकाचे स्वरूप असल्याने ते वाचनीय झाले आहे. मराठीतही जयश्री गोडसे यांनी या पुस्तकाचा रसाळ अनुवाद केला आहे. - छाया दातार ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more