* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HUNGRY SPIRIT
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788190734455
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THERE IS SO MUCH CONTROVERSY IN THIS WORLD. ON ONE HAND, ONE THIRD OF THE TOTAL WORKERS ARE WITHOUT ANY WORK. ON THE OTHER HAND, TWO THIRD OF THE WORLD TRADE IS CONCENTRATED WITH ONLY 500 OF THE COMPANIES ALL OVER THE WORLD. THESE COMPANIES ARE ANSWERABLE TO THE SHARE HOLDERS. ON THE BACKGROUND OF THIS CONTROVERSY AND UNCERTAINTY, CHARLES HENRY EARNESTLY PENS DOWN THE NEED OF CREATING A FUTURE WHICH WILL BE MORE CERTAIN THAN THE CURRENT EASILY SHAKABLE CULTURE AND VALUES. THIS BOOK GIVES AN INITIATIVE. IT EXPRESSES THE AUTHENTICITY OF THE WRITER AND HIS THOUGHTS, AT THE SAME TIME, IT PROVOKES OUR HOUGHTS.THE WONDERFUL PART OF IT IS THE OPTIMISM. WHEREVER THE READING OF THIS BOOK IS DONE I AM SURE IT WILL CREATE AN ATMOSPHERE OF DIFFERENCE OF OPINIONS AND ARGUMENTS. "ONCE AGAIN CHARLES HANDY: THE HUNGRY SPIRIT IS THE MORAL OF THE AUTHOR`S LIFE. THIS IS IN A WAY HIS PERSONAL APPROACH SO AS TO STAND FIRMLY ROOTED IN THE WORLD OF CAPITALISM. HIS STYLE IS DIFFERENT, HE DOES NOT LECTURE US ABOUT ANYTHING, ON THE CONTRARY WITH THE HELP OF SMALL STORIES HE ELABORATES HIS POINT MAKING IT VERY INTERESTING. HIS INTELLECTUAL THINKING IS REVEALED ON EACH OF THE PAGE OF THIS BOOK." PEOPLE`S MANAGEMENT: "THE HUNGRY SPIRIT: IS A RESEARCH WORK ON THE INDUSTRY, TRADE AND SOCIAL PROBLEMS. IT IS A HIGHLY EFFECTIVE AND INTELLIGENT PRESENTATION OF THE PROBLEMS." MODERN MANAGEMENT: "CHARLES HANDY IS THE ONE AND ONLY MANAGEMENT BOSS OF BRITAIN." DIRECTOR MAGAZINE: AT LAST, CHARLES HANDY IS AN AUTHOR; HE IS ALSO AN EFFECTIVE AND MOST POPULAR SPEAKER ON THE RADIO AND T.V. MORE THAN 10 LAC COPIES OF HIS BOOK HAVE BEEN SOLD.
एकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त ५०० कंपन्यांच्या हातांत आहे आणि या कंपन्या फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांनाच उत्तरं देण्यास बांधील आहेत. या विषमता आणि अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठ अभिमुख भांडवलशाहीच्या मूल्यांपेक्षा अधिक चिरंतन आणि समृद्ध मूल्यं असणारं भविष्य निर्माण करण्याची गरज चार्ल्स हॅन्डी अतिशय कळकळीनं मांडतात. द हंग्री स्पिरीट हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं आणि मुख्यत: त्यात आशावाद ठासून भरलेला आहे. हे पुस्तक जिथे कुठे वाचलं जाईल, तिथे मतभेद आणि वादविवाद नक्कीच उफाळून येतील. ‘‘पुन्हा एकदा चार्ल्स हॅन्डी : द हंग्री स्पिरीट म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवांचं सार आहे. भांडवलशाही समाजामध्ये कशी तग धरायची, याची ही एक व्यक्तिगत पद्धत आहे. हॅन्डी यांची शैली गोष्टीरूपानं विचार मांडण्याची असल्यामुळे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे आणि त्यांची विद्वत्ता प्रत्येक पानावर दिसून येते. हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.’’ : पीपल मॅनेजमेंट. ‘‘द हंग्री स्पिरीट हा उद्योग-व्यापार संबंधित तसंच सामाजिक समस्यांचा एक विस्तृत शोध आहे. या समस्यांंचं हे एक चतुर, विद्वत्तापूर्ण आणि विवेकी विश्लेषण आहे.’’ : मॉडर्न मॅनेजमेंट. ‘‘चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनचे एकमेव जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत.’’ : डायरेक्टर मासिक. चार्ल्स हॅन्डी हे एक लेखक आणि नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते आहेत. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून जास्त प्रती खपल्या आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SWARTHATUNPARARTHAKADE #THEHUNGRYSPIRIT #स्वार्थातूनपरमार्थाकडे #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #CHARLESHANDY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 25-01-2009

    भांडवलशाहीचे आशावादी तत्त्वज्ञान… चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनमधील जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत. व्यापार उद्योगातील असमतोल आणि त्यामुळे निर्माण होणारा सामाजिक बेबनाव भांडवलशाहीचे सद्य:स्वरूप आणि तिची अधिक प्रगत अशी भावी दिशा. छोट्या गावातील परस्प संबंध आणि शहरीकरणानंतर माणसामाणसांत येणारा दुरावा. गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढता भेदभाव, पृथ्वीच्या पर्यावरणात मानवी चंगळवादाने निर्माण होणारा अनर्थ, ज्यांचा उपयोग आणि उपभोग आपण कधीच करून शकणार नाही इतके अतिरिक्त आणि अनावश्यक उत्पादन जगातील तीस टक्के कामगार बेकार असताना उपभोग्य वस्तूंच्या जलद उत्पादनासाठी विकसित करण्यात येणारी कार्यक्षमता, अनेक देशांच्या संपूर्ण वार्षिक अंदाजपत्रकापेक्षाही अधिक उलाढाल असणाऱ्या सतराव्या अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्या, काळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीमुळे जनसामान्यांतील असंतोष आणि चिंता आपोआप दूर होऊ शकतील हा भ्रामक आशावाद आर्थिक आणि शास्त्रीय प्रगतीने सर्व प्रश्न सुटतील या गृहीतकातील भ्रामक भाबडेपणा आणि मतलबी दांभिकपणा, शासनव्यवस्थेने सगळ्या नागरिकांचे हित समोर ठेवून सभ्य आणि समताधिष्ठित कायदेकानून करावे की काही मूठभर बहुराष्ट्रीय उत्पादकांच्या नफावाढीसाठी आणि वाढत्या करसंकलनासाठी त्यांच्यावर सवलतींचा मारा करावा आणि सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्य आणि बांधिलकी यांच्यातला सुवर्णमध्य गाठणे अशक्य व्हावे. सर्वभक्षक अशा या शासनव्यवस्थेची आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची अधाशी भूक ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही भूक आटोक्यात राहिली तरच सर्वसामान्य व्यक्तीला सन्मानाचे जिणे जगणे शक्य होईल. त्यासाठी भांडवलशाहीने आता नवा टप्पा गाठायला हवा. चार्ल्स हॅन्डी यांनी त्याबाबत एक मूलगामी विचार मांडला आहे. भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीमुळे शक्य झालेले स्वातंत्र्य आणि उपलब्ध झालेले वेगवेगळे पर्याय हे अधिकाधिक वस्तूंचा संचय करण्यात वाया घालवू नका, जास्तीत जास्त लोकांना स्वातंत्र्य मिळू द्या, त्यासाठी तुमच्याएवढेच पर्याय त्यांनाही मिळवून देण्यासाठी जागरूक राहा, त्याबाबत सुयोग्य स्वार्थीपणा दाखवा अशी हॅन्डी यांची भूमिका आहे. ‘हे एक आशावादी तत्त्वज्ञान आहे’ असे हॅन्डी यांचे प्रतिपादन आहे. शामरॉक आणि संघराज्याच्या स्वरूपाच्या संघटना, रोजगार मिळवून देणाऱ्या कामाचे स्वरूप या दोन कल्पनांवर त्यांचा भर आहे. दि हंग्री स्पिरिट या पुस्तकाचे तीन भाग पाडले आहेत. सद्य:कालीन भांडवलशाहीचे दोष पहिल्या भागात भांडवलशाहीच्या सद्य:कालीन स्वरूपाचे विश्लेषण करून तिच्यातील दोषांची आणि त्रुटींची चर्चा केली आहे. कार्यक्षमतेत वाढ होत आहे. परंतु प्रगत तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या घटत आहेत; त्यामुळे कार्यक्षमता हीच एक धोंड बनत आहे. भांडवलशाही म्हणजे एक मुक्त तत्त्वप्रणाली; पैसा हे या प्रणालीत एक साधन आहे, साध्य नव्हे, जीवनाची विविध साधनं मिळवून देण्याची यंत्रणा भांडवलशाहीत आहे. तो साम्यवादात नाही. साम्यवाद गरीबीचे उच्चाटन, रोजगाराची हमी आणि प्रत्येकाला अन्न-वस्त्र निवारा यांचा आग्रह धरतो; परंतु त्या त्या व्यक्तीला ते मिळवून देण्याचा मार्ग मात्र साम्यवादाकडे नाही. भांडवलशाही ही केवळ एक यंत्रणा आहे आणि तिचा कार्यकारणभाव ठरवण्याची जबाबदारी स्वत:पुरती प्रत्येक व्यक्तीवर आहे. भांडवलशाहीचा साचा होऊ शकत नाही. भांडवलशाही कितीही यशस्वी ठरली तरी भांडवलशाही कशासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्याची ताकद तिच्यात नाही. भांडवलशाहीच्या सार्थकतेसाठी आपल्याला आपल्या स्वत:साठी आणि इतरांसाठी जीवनाकडून काय हवं आहे या संबंधीची अधिक नेमकी, चांगली समजूत सर्वंकष जाणीव आवश्यक आहे. या जाणिवेमध्ये पैशाला योग्य ते महत्त्व असेल परंतु त्याचे फाजील स्तोम माजवले जाणार नाही. शासनाच्या दृष्टीने भांडवलशाही सांभाळणे ही एक महाकर्मकठीण बाब आहे. बाजारपेठेचा भस्मासुर सर्व काही गिळंकृत करू शकेल. भांडवलशाहीवर त्यासाठी अंकुश हवा; त्यासाठी लोकांची सामूहिक इच्छाशक्ती जागवावी लागेल. दुसऱ्या भागात व्यक्तिगत सार्वभौमत्वात उद्घोष करण्यात आला आहे. आपले जीवन हे आपले स्वत:चे आहे. आपल्या जगण्याचा उद्देश त्यासाठी स्पष्ट जाणवायला हवा. हा उद्देश ठरवण्यासाठी काही तात्त्विक अधिष्ठान लागते. हा उद्देश केवळ आर्थिक व्यवस्थेने ठरवता येत नाही. ठरवू नये. विशिष्ट शासकीय पद्धत, विशिष्ट शासकीय धोरण, बाजारपेठेचे स्वरूप याद्वारे आपल्या जीवनाचे उद्दिष्टे ठरवणे इष्ट नाही. आपल्या वैयक्तिक अस्तित्वाचा आणि जीवनाचा हेतू काय आहे, काय असावा हे प्रथम आपण ठरवायला हवे. त्याचा निरोप विचारबुद्धी गहाण टाकून विशिष्ट धार्मिक दंडक वा नीतिनियम प्रमाण मानायला आता लोक तयार नाहीत. धार्मिकता अंतरात्म्याशी संपर्क साधण्याचे मार्ग दाखवते. त्या अर्थाने महत्त्वपूर्ण असते चार्ल्स हॅन्डी या संदर्भात सुयोग्य स्वार्थीपणाची संकल्पना मांडतात. तिच्यासाठी स्वहिताचा अर्थ नव्याने लावताना आर्थिक बाबींवर फार जोर देण्याचे टाळावे असे म्हणतात. स्वहितावर आधारित प्रगती ही आर्थिक प्रगतीपेक्षा व्यापक हवी. आर्थिक सुरक्षिततेबरोबर सामाजिक सुरक्षिततेलाही महत्त्व असते. टिवूâन राहण्याची इच्छाही महत्त्वाची ठरते. बाह्य गोष्टींद्वारे तसेच आंतरिक गोष्टींद्वारे प्रेरणा मिळते. स्वार्थीपणामागची नैतिकता ही सुयोग्य पातळीवर राहिली तर तो सर्वांनी हितावह ठरते. इतरांबरोबर नैतिकता ही सुयोग पातळीवर राहिली तर ती सर्वांना हितावह ठरते. इतरांबरोबर राहून काम करणे हेही एक मूल्य आहे. माणसाच्या स्वास्थ्यासाठी त्याची गरज आहे. अधिक सभ्य आणि सुखी समाज तिसऱ्या भागात अधिक चांगल्या भांडवली व्यवस्थेकडे जाण्याचे, अधिक सभ्य व सुखकारक समाजाकडे जाण्याचे मार्ग सुचवण्यात आले आहेत. भांडवलशाहीला सभ्यता देण्यासाठी संस्था, शिक्षणव्यवस्था, शासकीय प्रणाली, वैयक्तिक जबाबदारीची उन्नत जाणीव या सर्व गोष्टींची गरज आहे. बर्टेलसमान (प्रसारमाध्यमातील एक महत्त्वपूर्ण कंपनी-उलाढाल ८२ लक्ष पौंड) च्या उदाहरणाद्वारे सध्याच्या व्यवस्थापनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रँडनेमबद्दलचा विश्वास निर्माण करणे हे एक मोठे दिव्य असते. सुयोग्य शिक्षणाद्वारे माहिती, विश्लेषण, आकडेवारी, क्रीडा, अंतज्र्ञान, भावना, व्यवहार, नातेसंबंध, संगीत वगैरे बाबतीतील बुद्धिमत्तेचा विकास साधायला हवा याकडे लक्ष वेधले आहे. आयुष्यही एक लांब पल्ल्याची मॅरेथॉन शर्यत आहे, याचेही भान हवे, असे हॅन्डी बजावतात. सुयोग्य शिक्षण या प्रकरणात शेवटी चार्ल्स हॅन्डी अनेक अभिनव कल्पना मांडतात. शाळा-कॉलेजातून ज्ञान देण्याची जी शिक्षणपद्धती आहे, ती मुलामुलींना बाह्य जगापासून दूर ठेवते. शिक्षण घेताना मुलांना बाहेरच्या जगाचेही अनुभव आवश्यक आहेत. तेव्हा चार्ल्स हॅन्डी युनिव्हर्सिटी र्आफ कम्युनिटी, व्यावसायिक विद्यापीठ, जीवनविषयक विश्वविद्यापीठ यासारख्या कल्पनांचा पुरस्कार करतात. देशाने, शासनाने आपल्या आयुष्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी ते अधिक सुखकर करण्याकडे लक्ष द्यावे; आपण प्रजानन नाही, नागरिक आहो हे शासनाने लक्षात ठेवावे. पुरेसं मिळवल्याची तृप्तीची, समाधानाची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी शासनाने आवश्यक ती संसाधने पुरवावी. हे लोकांचा सेवक असलेल्या शासनाचे कर्तव्य आहे. जीवनाचे पायाभूत घटक शासनाने पुरवायला हवेत. हे घटक केवळ उच्च वर्गीयांसाठी सीमित राहू नयेत, ते कमजोर वर्गालाही सहज साध्य हवेत. त्यामुळे त्यांनाही समर्थ होणे शक्य व्हावे असा दृष्टिकोन हवा. कार्यक्षमता आणि परिणामकारकता आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरणात क्रमप्राप्त आहे. परंतु जेथे अधिक लोक लागतात त्या क्षेत्रात (उदाहरणार्थ सरकारी कामकाज) निकष जरासे सैल करून तांत्रिकदृष्ट्या आवश्यक त्यापेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवावे असाही सल्ला हॅन्डी यांनी दक्षिण आफ्रिकन सरकारला दिला होता. बेकारभत्ता देण्यापेक्षा हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर असे त्यांना वाटते. लोकांचा सेवक असलेल्या शासनाने लोकांवर वाटेल तशी सक्ती करू नये, लोकांच्या मर्जीने आणि संमतीने त्यांच्याचसाठी काम करावे. लोकांना संपूर्ण माहिती देणे, त्यांचे मत जाणून निर्णय घेणे हा मार्ग श्रेयस्कर. याबाबतीत भलेबुरे अनुभव ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र आलेले आहेत. जबाबदार सुजाण नागरिकत्व आणि व्यापक जनहित यावर भर दिला तर त्यातून मार्ग निघेल. जबाबदारी हक्कातून जन्मते. खऱ्या सुयोग्य स्वार्थासाठी आपली जबाबदारीची जाणीवच प्रखर करायला हवी असा याचा अर्थ आहे. ‘दि हंग्री स्पिरिट’मुळे जागतिक समस्यांवरचा, राजकीय व्यवस्थेबाबतचा तोडगा एका नव्या भूमिकेतून समोर येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती