DR.SACHIN PACHORKAR

About Author


WRITER MARATHA VIDYA BROADCASTER K.B.T. A PROFESSOR IN THE COLLEGE OF ENGINEERING, HE HAS MORE THAN A DECADE OF EXPERIENCE IN TEACHING THE SUBJECT OF MANAGEMENT. AFTER STUDYING MECHANICAL ENGINEERING, HE COMPLETED HIS MASTERS IN BUSINESS ADMINISTRATION. DOCTORATE IN SELF EMPLOYMENT FROM UNIVERSITY OF PUNE. FOR THE PAST SEVERAL YEARS, HE HAS BEEN WORKING EXCLUSIVELY IN THE SOCIAL INDUSTRIAL SECTOR.

लेखक मराठा विद्या प्रसारक के.बी.टी. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे प्राध्यापक असून, व्यवस्थापन शास्त्र हा विषय शिकवण्याचा एका दशकाहून अधिक अनुभव आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतर त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर्स ही पदवी पूर्ण केली. युनिव्हर्सिटी ऑफ पुणे येथून सेल्फ एंप्लॉयमेंट या विषयांतर्गत डॉक्टरेट ही डिग्री मिळवली आहे. मागील अनेक वर्षांपासून सामाजिक औद्योगिक क्षेत्रामध्ये ते विशेष कार्यरत आहेत. २०१५ साली नाशिक च्या कुंभमेळ्यातील इनोवेशन ला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘कुंभथॉन’ हा उपक्रम सुरु केला , त्याद्वारे नाशिक कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष मदत मिळाली.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे