* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: LETTERS FROM PRISON
 • Availability : Available
 • Translators : V. S. KHANDEKAR
 • ISBN : 9788171616336
 • Edition : 6
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 152
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : ESSAYS
 • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO OFFER - 119 BOOKS
Quantity
ERNST TOLLER WAS A GERMAN LEFT-WING PLAYWRIGHT, BEST KNOWN FOR HIS EXPRESSIONIST PLAYS. HE SERVED IN 1919 FOR SIX DAYS AS PRESIDENT OF THE SHORT-LIVED BAVARIAN SOVIET REPUBLIC, AND WAS IMPRISONED FOR FIVE YEARS FOR HIS ACTIONS. DURING HIS DAYS IN THE PRISON TOLLER WROTE LETTERS TO HIS FRIENDS WHICH ARE EXCLUSIVE LITERARY PIECE . THESE LETTERS FROM TOLLER ARE TRANSLATED BY V.S.KHANDEKAR .
‘मी एका ज्यू आईच्या पोटी जन्माला आलो. जर्मनीनं माझ्या शरीराचं पालनपोषण केलं. युरोपनं माझ्या आत्म्याला संस्कारसंपन्न बनवलं. धरणी हेच माझं घर आणि सारं जग हीच माझी पितृभूमी...’ अशा गौरवपूर्ण शब्दांत स्वत:विषयी प्रांजळ निवेदन करणाऱ्या अन्स्र्ट टोलरनं तुरुंगातून लिहिलेल्या छोट्या छोट्या पत्रांचा हा स्वैर अनुवाद. मागच्या पिढीतल्या एका प्रतिभासंपन्न, ध्येयवादी आणि असामान्य अशा कलावंत क्रांतिकारक आत्म्यानं लिहिलेल्या या पत्रांमध्ये कवित्व आणि कर्तृत्व या दोन्ही दृष्टींनी प्रतिबिंबित झालेलं त्याचं व्यक्तित्व जेवढं कलापूर्ण, तेवढंच जीवनदर्शीही आहे. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा, विचार आणि आचार, कठोरपणा आणि कोमलपणा यांच्या संगमात न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तित्वाचं समग्र दर्शन या पत्रांतून वाचकांना घडेल.
Video not available
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #तुरुंगातील पत्रे
Customer Reviews
 • Rating StarDAINIK PUDHARI 02-02-1997

  अंत:करणाचा ठाव घेणारी पत्रे… अन्सर्ट टोलरने तुरुंगातून लिहिलेल्या छोट्या छोट्या पत्रांचा स्वैर अनुवाद वि. स. खांडेकर यांनी ‘तुरुंगा’तील पत्रे या तीन भाग एकत्रित केलेल्या पुस्तकात केलेला आहे. पहिल्या भागात ३९, दुसऱ्या भागात ३५ व तिसऱ्या भागात २३ अशी कूण ९७ पत्रे खांडेकरांनी अनुवादीत केलेली आहेत. अंत:करणाचा ठाव घेणारे कितीतरी प्रसंग या पुस्तकात अनुभवयास मिळतात. त्याचबरोबर विचारांना वेगाने चालना देणारे उद्गार स्मरणात येतात. कल्पना आणि भावना फुलविण्याचे प्रचंड सामर्थ्य या पत्रातून अनुभूतीस येते. आजच्या जगातल्या आणि जीवनातल्या अनेक कटू प्रश्नांची प्रभावीपणे उत्तरे या पुस्तकातून वाचकास मिळतात. कला आणि क्रांती यांचा संगम किती मनोहर होऊ शकतो. याचा विरळ असलेला अनुभव ही पत्रे वाचताना मिळतो. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा विचार आणि आचार, कठोरपणा आणि कोमलपणा यांच्या संगमातून न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तिमत्त्वाचे विलक्षण श्रेष्ठ कला आजच्या माणसाप्रमाणे उद्याच्या मानवतोही आवाहन देत असते. चालू क्षणाबरोबर अनंत काळालाही ती प्रफुल्लीत करू इच्छिते. टोलरने ‘तुरुंगवास हीच ज्ञानाची गुरुकिल्ली आहे’ असे म्हटले आहे. तुरुंगात राहिल्यामुळेच तुरुंगातील कामगारवर्गाच्या खऱ्याखुऱ्या जीवनाचे, भावनांचे ज्ञान त्या तुरुंगावासामुळे मिळाले त्या सत्याचे दर्शन अनेक पत्रातून होते. टोलरची पत्रे हृदयस्पर्शी अनुभवावी आणि प्रभावी विचारांनी नटलेली आहेत. या पत्रातून टोलरचे कवित्व आणि कर्तृत्व या दोन्ही दृष्टीनी त्यात प्रतिबिंबित झालेले व्यक्तिमत्त्व फार मोठे आहे ते जितके कलापूर्ण आहेत तितकेच जीवनदर्शी आहे असा अनुभव प्रत्येक पत्राच्या वाचनाच्यावेळी येतो. पत्रातील आशय संवेदनशील मनाला भुरळ पाडणारा असा असून वाचकांच्या विचारांना चालना, भावनांना धार, कल्पनेला उल्हासितपणा, मनास प्रसन्नपणा हा सारा अनुभव अगदी विरळ किंबहुंना अपूर्व असा आहे. पाकोळ्याच्या जोडप्याने बांधलेले यांच्या संगमातून न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तिमत्त्वाचे, विलक्षण दर्शन पत्रातून होऊन टोलरविषयी तीव्र आकर्षण वाचकास वाटू लागते. अनुवादक वि. स. खांडेकर यांना तर टोलरची पत्रे प्राणप्रिय वाटली असून ते टोलरचे प्रथमदर्शनी भक्त बनले. ‘तुरुंगातील पत्रे’ मराठीत अनुवादीत करून अन्सर्ट टोलरच्या प्रभावी, प्रामाणिक व वैचित्र्यपूर्ण अशा व्यक्तिमत्त्वाची ओळख मराठी जगताला वि. स. खांडेकर यांनी करून दिली. मी एका ज्यू आईच्या पोटी जन्माला आलो. जर्मनीत माझ्या शरीराचे पालनपोषण केलं. युरोपनं माझ्या आत्म्याला संस्कारसंपन्न बनवलं. धरणी हेच माझं घर आणि सारं जग हीच माझी पितृभूमी अशा गौरवपूर्ण शब्दात स्वत:विषयी प्रांजळ निवेदन अन्सर्ट टोलरने आपल्या आत्मकथेत केले. यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व किती आकर्षक होते याची प्रचिती वाचकास येते. मानवी मनाच्या विलक्षण गुंतागुंतीवर नवा प्रकाश टाकणे हे कलेचे मुख्य कार्य आहे. श्रेष्ठ कला जगाला निद्रेतून जागृत करीत असते. विरळ किंबहुंना अपूर्व असा आहे. पाकोळ्याच्या जोडप्याने बांधलेले घरटे, कला व प्रचार याविषयी ठाम मत असणारी पत्रे वाचकास अविस्मरणीय ठरतात. जग सुधारू पाहणाऱ्या मनुष्याचे हात रक्ताने माखल्याशिवाय कुठलाही बदल होऊ नये असाच सृष्टीचा संकेत आहे? बहुजन समाज ध्येयापेक्षा भूक आणि दारिद्र्य यांनीच कार्यप्रवण होतो हा नित्याचा अनुभव आहे असे अनेक मानसिक संघर्ष असणारे प्रसंग पत्रातून आढळतात. टोलरचे लिखाण हे जीवनाच्या एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर भेदक प्रकाश टाकणाऱ्याचे मार्मिक विचार अनेक पत्रातून प्रत्ययास येतात. थोडक्यात संपूर्ण निवडक ९७ पत्रांमधून अन्सर्ट टोलरच्या व्यक्तिमत्त्वाचं समग्रदर्शन या पत्रातून वाचकास सहज घडते. -प्रा. युवराज दीक्षित ...Read more

 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  अर्न्स्ट टोलर हा जर्मन कवी व नाटककार. तो ज्यू होता. जुलमी राजसत्तेविरुद्ध बंड केल्यामुळे त्याला कारावासात डांबले होते. तुरुंगातील वास्तव्यात त्याने आपल्या संपादकाला, मित्रांना, व नातलगांना पत्रे लिहिली. त्यांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्याने शेवटी आत्मत्या करून जगाचा निरोप घेतला. योगायोगाने खांडेकरांचा टोलरची ही ‘तुरुंगातील पत्रे’ मिळाली. त्यापैकी काही निवडून त्यांनी तरी मराठीत आणली. एका क्रांतिकारक कलावंताचा आत्म्याशी त्या पत्रांमुळे जवळीक साधली. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा, विचार आणि आचार यांच्या संगमात न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तिमत्त्वाने खांडेकर विलक्षण भारखून गेले. या पत्रांची क्रमवारी ठरवताना खांडेकरांनी त्या योगे आपोआप टोलरचे चरित्र व विचार समजत जावे अशी दक्षता घेतली आहे. १९१९ साली तुरुंगातून पळून जाण्याची संधी मिळूनही तिचा फायदा घेण्याचे त्याने नाकारले. अन्यायावर विजय मिळविण्यासाठी पाशवी शक्तीचा वापर करायचा नाही अशा ध्येयनिष्ठांना सेंट फ्रॅंन्सिसचा आत्मार्पणचा, आत्मक्लेशाचा मार्गच काय तो मोकळा असतो, या मॅक्स वेबरच्या वचनाचे स्मरण अन्स्र्ट टोलर देतो. ‘मासेस अँड मॅन’ या नाटकात त्याने व्यक्तीची नीतिमूल्ये आणि समाजाची नीतिमूल्ये यांच्यातला संघर्ष रंगवला आहे. तुरुंगात रात्री नऊ वाजता दिवे मालवले जात. मेणबत्तीच्या प्रकाशात चोरून त्याने हे नाटक रात्ररात्र जागून पूर्ण केले. पॅरिसमधील एका प्रकाशन संस्थेने त्याचा कवितासंग्रह काढला. रोमा रोलाची त्याला प्रस्तावना होती. त्याची तुरुंगातून मुक्तता व्हावी म्हणून जर्मनीतील विचारवंतांनी मागणी केली. तेव्हा मला मुक्तते ऐवजी मेणबत्ती मिळाली तरी पुरे - असे त्याने म्हटले. तुरुंगात त्याने अर्थशास्त्र - राज्यशास्त्र वगैरे विषयांचा अभ्यास केला. तो कारावासात असताना त्याच्या अनेक नाटकांचे प्रयोग जर्मनीत होत होते. गाजत होते. तिसावा वाढदिवस तुरुंगात त्याने साजरा केला. प्रिय टेसाला त्या दिवशी लिहिले. ‘‘क्रोध हा कलात्मक सौंदर्याचा शत्रू असेल, पण ज्यांना आपलं दुख प्रकट करण्याचं अन्य साधन उपलब्ध नाही, त्यांच्या विषयी मौनव्रत धारण करणे हा गुन्हाच नाही का माझं कर्तव्य मला केलंच पाहिजे. या एकान्तवासात पशू, पक्षी, माणसं किंवा सारं चराचर जग याच्याशी एकरूप व्हायला माणूस शिकतो.’’ दुसऱ्या एका पत्रात तो लिहितो. ‘‘टेसा, तू कोण आहेस मी कोण आहे आपल्या दोघांच्या जीवनाचा अर्थ काय आहे माझ्या अनेक चाहत्यांनी कल्पनेने माझी एक दिव्य मूर्ती घडवली आहे. ते त्या मूर्तीची पूजा करायला उत्सुक आहेत. पण प्रत्यक्ष पाहिल्यावर ही देवाची मूर्ती नाही, हा माणूस आहे असं कळून येताच ते चाहाते काय करतील ’’ तुरुंगातील चिंतनानंतर आपण कुठल्याही एका पक्षाचा अनुयायी होणे दुरापास्त आहे असे त्याला पटते. आपण साहित्यिक आहोत, राजकीय पुढारी नाही. लोकप्रिय घोषणेपेक्षा जीवनावर प्रकाश टाकणारा प्रामाणिक विचार व मूलगामी कल्पना अधिक महत्त्वपूर्ण होय असे तो म्हणतो. स्टिफन झ्वाइगला लिहिलेल्या पत्रात तो लिहितो, ‘‘तुरुंग हा भोग नाही, भाग्य आहे असे मी मानतो. येथून बाहेर पडताना माझ्या मनोवृत्तीत अश्रद्धा, तिरस्कार, कडवटपणा वा माणूसघाणेपणा यांचा लवलेशही असणार नाही अशी माझी खात्री आहे. मानवतेच्या मंगलमूर्तीचे पावित्र्य दूषित करणाऱ्या राक्षसांविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांपैकी मी एक आहे.’’ दुसऱ्या एका पत्रात हिकमॅन या नाटकाची जन्मकथा त्यांनी दिली आहे. केवळ तीन दिवसात त्याने ट्रॅन्सफिगरेशन हे दुसरे नाटकही लिहिले. ‘‘ज्यू आई, जर्मनीचं ऋण, युरोपने केलेले संस्कार यामुळे हे विश्वचि माझे घर’’ अशा भावनेने तो या कारावासातही स्वतचे आत्मबळ वाढवत जगला. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SHIVCHARITRAPASUN AAMHI KAY SHIKAVE
SHIVCHARITRAPASUN AAMHI KAY SHIKAVE by DR.JAYSINGRAO PAWAR Rating Star
Ajay Bobade

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही घटनांबाबत ऐतिहासिक माहिती देणारे पुस्तक आहे. यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना, त्यांचे धर्मनिरपेक्ष धोरण, रयत व कल्याणकारी प्रशासन, त्यांचा राज्याभिषेक यासंदर्भात लिहीलेले छोटेलेख आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात केलेली एकमेव आरमारी मोहीम म्हणजेच `बसरूर ची मोहीम` याबाबत माहिती आहेच, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रंज यांचे संबंध व छत्रपती शिवाजी महाराजांवर सुरतेच्या मोहिमेदरम्यान झालेला खुनी हल्ली याबाबत माहिती आहे. सर्वांनी जरूर वाचावे असे. मला पुस्तकातील आवडलेले एक वाक्य :- "शिवाजी राजा हा इतिहासावरही मात करणारा राजा होता." ! ...Read more

MAZA GAON
MAZA GAON by RANJEET DESAI Rating Star
Bageshree Deshmukh

#रणजितदेसाई #माझागाव उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे पुस्तकांच्या राशीत लोळायचं, उठायचं बसायचं, अखंड वाचायचं. पुस्तकं म्हटले की रणजित देसाई हे नाव मला वगळता येत नाही. या वेळी "माझा गाव" नावाचं पुस्तक हातात घेतलं. सध्याच्या वातावरणात जिथे कोरोनाने धुमाकू घातलाय त्यापासून तुटून एका वेगळ्याच गावी जाऊन बसले. बेळगावच्या परिसरातले डोंगर- टेकाडातले गाव. गावात नदी आहे, देऊळ आहे, विविध जातीचे थर आहेत कुलकर्णी- पाटलांची सत्ता आहे. पण त्या सत्तेत स्वार्थापेक्षा एकमेकांना जगवण्यासाठी लागणारा माणुसकीचा खळाळता झरा आहे. म्हणूनच गावावर अनेक संकटं येऊन गेली तरी माणसा- माणसांतला ओलावा आटलेला नाहीय... कथेचा सुत्रधार त्याचं हे गाव सोडून निघाला आहे, त्याच्या मनात आठवणींनी गर्दी केलीय. नदीकाठाला वळसा देऊन तो पुढे जाताना, टेकडीवरचं लक्ष्मीचं देऊळ त्याच्या नजरेत भरतंय. समोरच्या पांधीतून पुढे जाऊन पुर्वेची टेकडी ओलांडली की तालुक्याला जाणा-या बसने तो बेळगावी जाणार आहे... त्याचं मन भरून आलं आहे. या उंचावरच्या पांधीतून पलीकडे गेला की गाव दृष्टीआड होईल याची त्याला जाणीव आहे. न राहवून मागे वळून पाहताना एकाच ठिकाणी खिळल्यागत तो उभा राहिला आहे. दूर माडांच्या चौकोनाकडे त्याची नजर लागलीय. त्या चौकोनी जागेतच त्याचा दिमाखदार वाडा उभा आहे. इनामदारांचा वाडा. आणि हे स्वतःचं गाव सोडून, भविष्याकडे वाटचाल करताना त्याचं मन त्या वाड्यात, नव्हे. वाड्यातल्या एका व्यक्तीत अडकले आहे.... ती व्यक्ती त्याच्याशिवाय किती एकटीये, याची जाणीव त्याच्या भारलेल्या मनाला अधिकच अस्वस्थ करते आहे..... या पार्श्वभुमीवर सुरू झालेली गोष्ट आपल्याला त्या काळातल्या इनामदारकी. सत्तालोलूप नसलेली पण आपल्या पाखराखाली असलेल्या गावाचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची जाणीव मनात सतत जागृत असलेले अप्पासाहेब या कथेचे नायक असल्यासारखे शोभतात. अप्पासाहेबांचा मुलगा त्यांच्या अगदीच विरोधी वृत्तीचा. बाहेरख्याली सुद्धा. तोच आपला अधिकृत वारस असल्याने अप्पासाहेबांची पदोपदी होणारी कोंडी. सोन्यासारखी सून, उमा. तिचे तुटलेले माहेर. लग्न होऊन दहा वर्षे उलटून गेली तिला मूल नसल्याने तिची होणारी तगमग आणि अप्पासाहेबांचा दुसरा मुलगा म्हणजेच कथेचा सुत्रधार, जयवंत तो अवघा आठ वर्षांचा. म्हणजे उमा घरात आली तेव्हा दोन वर्षांचा जयवंतच जणू तिचे मूल. त्याने फक्त उमेच्या पोटी जन्म घेतलेला नाही. पण उमेने आईची जागा भरून वर काकणभर जास्तच त्याच्यावर माया केलेली आहे. शेजारी राहणारे तात्यासाहेब गावातले मानलेले ब्राह्मणाचे घर आहे. तात्या- अप्पा बालपणीचे मित्र आहेत. तात्या आणि काकूने गावाला आपलंस केलंय ते फक्त त्यांच्या प्रेमाने नव्हे तर ते गावचे अनाधिकृत वैद्य आहेत. कुठल्याही व्याधीवर तात्या उपचार करू शकतात. ते वैद्य म्हणून धावत जातात तेव्हा त्यांना कुठलाही धर्म, जात त्याज्य नाही. एक आदर्श गाव कदाचित रणजित देसाईंच्या मनात रेंगाळत असावा. त्यातून त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं असावं. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारकीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पाहिला आहे, तिथे देसाईंच्या या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज पाहिला की जाणवतं असं काही खरोखरच असलं असतं तर आपला समाज फार पूर्वीच माणुसकीने ओतप्रोत, समृद्ध असा झाला असता. जगावर, भारतावर कुठलीही आपदा कोसळल्यावर लोकांनी सर्व थरांतून मदत करावी. एकमेकांना जगवावे हे आवाहन करण्याची वेळ आली नसती. कृती आपोआप घडत गेली असती. तो समाज- स्वभाव ठरला असता. अतिसुखाने नांदणा-या गावात जत्रा भरतात, सोहळे होतात. अप्पासाहेब सूनेवर प्रेम-माया- विश्वास आपल्या पोटच्या पोरापेक्षा अधिक करतात. आपल्या पोरांत असलेल्या दुर्गुणांमूळे या घरात आणलेल्या या मुलीला "पुरेसे" सुख मिळालेले नाहीये, याची जाणीव अप्पासाहेब ठेवून आहेत. आपल्या अवती- भोवती कुठे अशी व्यक्ती सापडते का, आपण शोधत राहतो. गावावर अनेकवेळा अनेक संकटे येतात. अप्पासाहेब धिरोदात्त. परोपकारी. एकदा गावावर महामारी ओढवते. माणसे पटापटा गळून जातात. प्रेतांची विल्हेवाट लावायला तरूण धजावत नाहीत. अप्पसाहेब स्वतः तिरडी धरायला पुढे होतात तसा गाव जागा होतो. पुढे दुष्काळ येतो. अप्पासाहेब धनधान्याचे कोठार खुले करून देतात. गाव इनामदारांचे कोठार बघता बघता रिकामे करतात. अप्पासाहेबांच्या मुलावरच त्याच्या आततायी स्वभावामुळे बाहेरख्यालीपणामुळे नको ते बालंट येतं. तेव्हा मात्र हवालदिल अप्पासाहेब, ज्याला मायेने गोंजारलं तेच गाव यावेळी अप्पासाहेबांच्या विरोधात उभं ठाकल्यावर हललेले अप्पासाहेब देसाई लेखणीतून उभे करतात. गावात पडलेली दुफळी पुन्हा कसबाने जोडून घेतात. गाव पुन्हा अप्पासाहेबांना मानू लागतं. आपल्याला अप्पासाहेबांची काहीही घडलं तरी माझ्यावर कलंक नको ची भुमिका क्षणभर व्यथित करते. त्या पेक्षा जास्त तात्यासाहेबांतले राजकारण पाहून आपण दिग्मुढ होतो. या ठिकाणी देसाईंनी हे राजकारण ब्राह्मण तात्यांनाच का खेळायला लावले, आपण विचारात पडतो. तात्यांची झाकली मुठ, उघडी झाल्यावर, एकाएकी व्यक्तीरेखातला हा बदल पचायला जड जातो. गावावरच्या एका दरोड्यात अप्पासाहेब स्वतः लढून मृत्यूमुखी पडतात तेव्हा मात्र आपण लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर वाचतो आहोत असा भास होतो. आपल्याला उमा मात्र कथेत धरून ठेवते. एका पातळीवर या अनेक गोष्टी घडत असताना, अप्पासाहेब -उमा, जयवंत- उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातली हळवी तार छेडून जातातच. वहिनी दीरातले हे संवाद. मर्यादाशील असले तरी, त्यांच्यातलं आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पहात असतं. देसाईंचे हेच कसब हाती घेतेलेले पुस्तक सोडू देत नाही. जयवंताची एक- एक करून प्रेमाची माणसं गळून गेली आहेत आणि तो वरच्या शिक्षणाकरता हे गाव सोडून जातो आहे. पांधीच्या तोंडाशी त्याला त्याचा जीवनपट उलगडत जातोय. "माझा गाव" म्हणून अप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगतो आहे. हे गाव सोडून जाताना, वाड्यात नवरा असला, तिचा तो सहचर असला तरीही, अप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे त्याची उमावहिनी किती एकटी आहे, याची जाणीव होऊन पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यांतून पाणी अखंड खळतंय.... वाड्याकडे पाहून त्याचे हात जोडले गेले आहेत. "तुला माहिती आहे, तू हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा झाला आहे.... ...Read more