* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: FANTASY EK PREYASI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177663501
 • Edition : 8
 • Publishing Year : JUNE 1989
 • Weight : 100.00 gms
 • Pages : 88
 • Language : MARATHI
 • Category : ESSAYS
 • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
THIS IS A TOTALLY DIFFERENT VARIATION OF VA PU`S WRITINGS. THOUGH THE BASE OR THE FOUNDATION OF HIS THOUGHTS AND WRITING CULTURE HAS BEEN IMPRINTED ON THE PAGES INSIDE, THE ROUTE THAT HE HAS FOLLOWED THIS TIME IS UNEXPECTEDLY GRAND. WE START READING THE BOOK WITH THE BACKGROUND OF ALL HIS OTHER BOOKS, BUT THEN WE END UP GETTING A PLEASANT SURPRISE. SOMETIMES, HE HAS CRITICIZED HIS OWN WRITINGS, SOMETIMES HE HAS REVEALED THE SECRETS BEHIND HIS WRITINGS AND IDEAS. IF WE START READING JUST FOR THE SAKE OF ENTERTAINMENT, THEN IT WOULD BE NOT WORTH IT. ON THE CONTRARY, IT IS WORTH A LOT MORE. HIS THOUGHTS PROVOKE US TO THINK ABOUT THE THINGS NOT THOUGHT BEFORE. HIS WORDS HAVE THE POWER TO WAKE UP A SLEEPING MIND, TO THE DAWN OF THOUGHTS, FRESH AND NEW. THIS BOOK ALSO INCLUDES THE TESTIMONIAL WHICH HE HAS WRITTEN IN THE HONOUR OF THE GREAT INDIAN SINGER, LATA DIDI. IT IS EXCLUSIVE IN ITS STYLE, PRESENTATION AND WORDS, NOT TO MENTION THE THAT EVERY INDIAN IS PROUD OF HER. THE OTHER MOST EXCLUSIVE FEATURE OF THE BOOK IS THE VISUAL MEMORIES OF HIS SWEET HEART I.E. HIS DAUGHTER THAT HE HAS SHARED WITH US. ALONG WITH THOSE PHOTOS` RIGHT FROM HER TENDEREST AGE TO THE IMPORTANT MILESTONEMARRIAGE; HE HAS SHARED HIS VERY PERSONAL THOUGHTS FOR HER; WITH US. THE VERY SET UP BRINGS US CLOSER TO VA PU AS A PERSON; NOT LIMITING TO THE AUTHOR ITSELF. WHILE REVEALING HIS THOUGHTS, HE ALSO TEACHES US THE PHILOSOPHY OF LIFE BY SAYING THAT THE INTELLIGENCE OF A GIFTED ARTIST IS INCOMPLETE UNTIL RECOGNIZED BY EQUALLY GIFTED AND PROFICIENT APPRECIATOR. IN THE CONCLUSION IT IS BEST TO SAY THAT FROM THE VERY FIRST PAGE TO THE LAST, THIS BOOK IS JUST EXCELLENT, ADDING ANOTHER FEATHER TO THE ALREADY FEATHERY CAP.
वपुचं हे पुस्तक म्हणजे एक "वा वा` मैफिलच. नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAKAL 8-7-1990

  एक अस्सल माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा बहुतेक कलावंतांच्या ठिकाणी प्रबळ असते. हा ‘अस्सल माणूस’ जेवढा बहुश्रुत, आयुष्यात इंटरेस्ट घेणारा, तितकेच त्याचे ललित लेखनही वैशिष्टयपूर्ण आणि वेगळे ठरते. कथा, कथा-कथन आणि कादंबरी या तिन्ही प्रांतात व.पुं. चे ललि लेखनही वेगळ्या वाटेने जाणारे व आपला पृथगात्म ठसा उमटवून देणारेच आहे. व.पुं.च्या संवेदनशील, स्पंदनशील आणि संपन्नशील व्यक्तिमत्त्वाच्या आकलनासाठी ‘फॅन्टसी - एक प्रेयसी’ हा आठ लेखांचा ललितसंग्रह नक्कीच साह्यभूत ठरतो. फॅन्टसी आणि व.पु. हे समीकरण सर्वश्रुतच आहे. माणसाच्या वृत्तीवर, विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणाऱ्या फॅन्टसीबद्दल व.पुं.च्या मनात कमालीचे प्रेम आहे. फॅन्टसी ही हवे तेव्हा अवतरणारी चीज नसून, एखाद्या लहरी प्रेयसीप्रमाणे हटून बसणारी प्रेयसीच आहे, असा प्रत्यक्षानुभव व.पुं.नी व्यक्त केला आहे. मन उद्ध्वस्त करणारे अनुभव पचविण्याचे सामर्थ्य देणारी फॅन्टसी हा उदास मन:स्थितीवरचा उतारा असून, आपल्या लेखनाच्या दिगंताच्या प्रवासातील सावलीच आहे, असे व.पु. जेव्हा कथन करतात, तेव्हा ‘फॅन्टसी’ या प्रकाराशी त्यांचे असलेले मानसिक नाते लक्षात येते. प्रवासाने माणूस चतुर होतो, या न्यायाने रेल्वेतला तिकीट चेकर हा सर्वांत हुशार माणूस अशाच एका प्रवासात रेल्वे तिकीट चेकरने टारगट मुलांना शिकविलेला धडा (केल्याने देशाटन) आणि सुधीर फडक्यांपासून श्रीधर फडक्यांपर्यंतच्या संगीत कलावंताचा आलेख (माझं गं तारू) वपुंनी रेखाटला आहे. दूरदर्शनने आकाशवाणीची केलेली हकालपट्टी, प्रचंड जाहिरातबाजी आणि कॅसेटचे राजकारण या गदारोळात खऱ्या संगीत कलावंताची परवडच होत असते, हे विदारक सत्य ‘माझं गं तारू’ या लेखाच्या निमित्ताने वपु निदर्शनास आणून देतात. बदलत्या परिस्थितीचा अचूक वेध घेत ‘घर’ या संकल्पनेसंबंधी स्वत:चे चिंतन ‘कशासाठी घरासाठी’ या लेखात वपुंनी अभिव्यक्त केले आहे, ते विचारार्ह आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रचंड प्रमाणात झालेल्या औद्योगीकरणाने माणसाचाच घेतलेला बळी आणि सगळ्या घरांची झालेली थिएटर्स त्यांना अस्वस्थ करतात. दिवेलागण, पाढे, शुभंकरोतीचा जमाना कधीच अस्तंगत झाला आणि मग घर म्हणजे आसरा, सावली, आधार, गारवा देणारा मित्र न राहता, आपल्याशी स्पर्धा करणारे, त्याच्या प्राप्तीसाठी आयुष्याचे दान मागणारे विधिलिखितच होऊन बसले. शेवटी ज्यामुळे वास्तूला ‘घरपण’ येते, ते माणसामाणसातले नाते, माणसामाणसांतला संवाद हरवलेले घर आपल्याला घराचाच बळी देऊन मिळते. वपुंचा ‘कशासाठी घरासाठी’ हा लेख वाचकांच्या मनात घर करून राहील, असाच आहे. मध्यमवर्गीय जाणिवांच्या परिघातच वपु टच लेखणी घुटमळतच राहिली आहे, असा आरोप अनेक समीक्षकांनी केला आहे; पण मध्यमवर्गाच्या मर्यादा केवळ साहित्यालाच पडल्या, असे नव्हे. तर जगण्यालाच पडल्या होत्या, असा कबुली-जबाब ‘बडोदेकर मित्रांनो’ या आत्मचरित्रपर लेखात वपुंनी दिला आहे. सामान्यांचा प्रतिनिधी या एकमेव नात्याने व एक अस्सल माणूस म्हणून जगण्याच्या प्रबळ इच्छेखातरच या लेखाचा जन्म झालेला आहे. लता दीदीला अर्पण केलेले एक आगळेवेगळे मानपत्र आणि ‘घरचा आहेर’ हे अखेरीचे लेख मात्र शाब्दिक कारागिरी, ओढूनताणून आणलेली चमत्कृती, आकाराला दिलेले अकारण महत्त्व आणि एकसुरी संवाद यांमुळे खटकतच राहतात; पण तरीही कथा, कथा-कथन, कादंबरी या प्रांतांप्रमाणेच ललितलेखांवरचा ‘वपुटच’ त्यांच्या साहित्याच्या समग्र अभ्यासासाठी आणि शोधासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, याबद्दल तिळमात्र शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more