* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS MEAN BY PASANG ? `PAASANG` IN MARATHI HAS A DEFINITE MEANING. IT IS ACTUALLY THE SMALL WEIGHT WHICH BALANCES BETWEEN THE TWO SIDES OF A WEIGHING SCALE. GENERALLY, IT IS USED TO SHOW THE MINUTENESS OF A THING. I WAS INVOLVED IN AMBEDKAR MOVEMENT SINCE MY YOUNG AGE. I HAVE COME ACROSS THIS WORD DURING THAT PERIOD SAYING THAT, THE MOVEMENT OF DALIT`S IS VERY WEAK AND THE PLACE THEY HAVE IN POLITICS IS JUST NEGLIGIBLE, IT IS JUST EQUIVALENT TO `PAASANG`. THIS CLEARLY REVEALS THAT DALITS` EXISTENCE IS JUST TO BALANCE THE TWO SIDES OF THE WEIGHING SCALE. DR. BABASAHEB AMBEDKAR BELIEVED THAT POLITICALLY THE PRESENCE OF DALIT WILL BALANCE THE SOCIETY. THROUGH THIS BOOK I AM TRYING TO FIND OUT THE IGNORED INCIDENTS OR PERSONS OF THIS SOCIETY. SOME OF THEM HAVE SUPPORTED THE DALITS FOR SURE, BUT AT THE SAME TIME IT IS A FACT THAT SOME OF THEM HAVE PRESSURIZED THE MOVEMENTS OF DALIT, HAVE ATTACKED THEM VIGOROUSLY.
पासंग म्हणजे काय? `पासंगालाही काही पुरत नाही` या अर्थाची म्हण मराठीत आहे. `क्षुल्लक` या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला, दोन तागडी समतोल राहावीत, म्हणून छोटेसे जे वजन लावले जाते, ते `पासंग`. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून एकात आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थच असा, की समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता. अनेक `पासंगात` जातिधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. केवळ दलितांचे, त्यांच्या चळवळीचे उदात्तीकरण केले नाही, तर त्यांच्यावर त्यांच्या चळवळीवर कठोर आघातही केले आहेत. समाजाच्या सर्व थरांत ज्या घटना किंवा व्यक्ती `फूटनोट` म्हणून आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आल्या, त्यांचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#PASANG #DAYA PAWAR #DEHAVARCHA KALANK #DALITATVA HE BHUSHANAVAH AHE KAY? #BAI MI DHARAN BANDHITE #TISARYA PIDHICHI CHINTA #BHAKARIBABROBAR PEND KHA #KAMAGAR ZALA GATAI KAMAGAR #JIHAD MHNAJE DHARMAYUDHA NAVHE #DHAVALYASHEJARI PAVALA #EKLAVYACHA ANGATHA #BALBHARTICHA BEERCHA DHADA #TUMBDIBHAR DANA BAJIRAO NANA #TAMRAPAT #RAGHAVVEL #JAT NAHI TI JAT #KULHAD SANSKRUTI #NAMANTAR YERE MAZYA MAGALYA #पासंग #दया पवार #देहावरचा कलंक #दलितत्व हे भूषणावह आहे काय? #बाई मी धरण बांधते #तिसर्या पिढीची चिंता #भाकरीबरोबर पेंड खा #कामगार झाला गटई कामगार #जिहाद म्हणजे धर्मयुद्ध नव्हे #ढवळ्याशेजारी पवळ्या #एकलव्याचा अंगठा #बालभारतीचा बिअरचा धडा #तुबंडीभर दाना बाजीराव नाना #ताम्रपट #राघववेळ #जात नाही ती जात #कुल्हड संस्कृती #नामांतर येरे माझ्या मागल्या
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 03-08-1995

    मराठी साहित्यात ‘बलुतं’ या आत्मकथनाने एक वादळ निर्माण झाले आणि आपला वेगळा असा ठसा त्याचे लेखक दया पवार यांनी निर्माण केला. त्यानंतर मग उचल्या, उपरा आक्करमाशी इत्यादी आत्मकथनाची लाट आली. ‘बलुतं’ या पुस्तकानंतर दलित कवितेत दया पवारांचा ‘कोंडवाडा’ या सं्रहाची भर पडली. अशा या साहित्यिकाचे ‘पासंग’ नावाचे पुस्त्क मेहता पब्लिशिंगने नुकतेच प्रकाशित केले. यापूर्वी ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘पासंग’ पुस्तक क्रमश: स्तंभास्तंभाने प्रकाशित झाले आहे. ‘पासंग’ या शब्दाचा अर्थ प्रस्तावनेत श्री. पवार यांनी अत्यंत मार्मिकपणे सांगितला आहे. ‘पासंग’ म्हणजे ‘क्षुल्लक गोष्ट’ तराजूच्या दांड्याला दोन तागडी समतोल राहावा म्हणून छोटेसे पासंग. याचा अर्थ कोणत्याही क्षेत्रात काही क्षुल्लक गोष्टी बरेच मोठे काम करून जातात. अशा गोष्टींविषयी लेखकाने या पुस्तकात छोटे छोटे लेख समाविष्ट केले आहेत. ‘बलुतं’ आत्मकथन लिहिल्यामुळे दलितांतील एक गट लेखकावर नाराज झाला होता. पण त्यांच्याच ‘पासंग’ या पुस्तकातील लेख वाचून ते नक्कच शांत होतील, असा विश्वास लेखकाला वाटतो. ‘जात नाही ती जात’ या स्तंभात वाचकाला अंतर्मुख करणारे विचार व्यक्त केले आहेत. ‘संस्कार’ या शब्दाबाबत लेखकाने मेहतांचं उदाहरणही समर्पक असेच दिले आहे. फार पुराणकाळापासून दहशतवादाचा राक्षस थैमान घालतो आहे. त्यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. कथनी आणि करणी या लेखात साहित्यिक प्रचार माध्यमांपासून दूर राहण्याचा कसा प्रयत्न करतो याचे वर्णन आहे. काही व्यक्ती कष्ट करून मोठ्या पदापर्यंत पोहोचतात. अशांची छोटी व्यक्तिचित्रेही लेखकाने सुंदर रंगवली आहेत. ‘जो आला तो नडला’ या लेखात अनसुया शेवते ही हालअपेष्टा सहन करून नोकरी करते. पती निधनानंतर एकटी नोकरी करते पण तिला फारच त्रास होतो. तिच्याच या जीवनाबद्दल लेखकाने फारच सुंदर लिहिले आहे. लेखकाची समाजाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी पुस्तकाच्या पानापानात दिसून येते. पासंगातील या लेखामध्ये जातिधर्म निरपेक्ष अशा अनेक घटना व व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. अगदी मोजक्या शब्दात उपेक्षित गरीब समाजाबद्दलची माहिती विचार करायला लावणारी आहे. मोहन रणसिंग, पप्पू जाधव, रमेश शिंदे, कोल्हटकर या व इतर विविध क्षेत्रातील लोकांबद्दल मार्मिक पासंगालाही काही पुरत नाही. साहित्यात एका चांगल्या पुस्तकाची भर पडली आहे. असे म्हणवेसे वाटते. -विलास पगारे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.