"THIS BOOK IS A QUARTER OF MY LIFE," SAYS SANJAY RAUT HIMSELF ABOUT THE BOOK BODH KIRTAN! IT CANDIDLY SKETCHES A LIFE ENRICHED BY THE COMPANY OF NUMEROUS PROMINENT PERSONALITIES, ALONGSIDE HIS TRAVEL EXPERIENCES. THE BOOK PRESENTS A FINE BLEND OF THOUGHTS, WISE SAYINGS, POETRY, LETTERS, SHORT STORIES, CASE STUDIES, PERSONAL ANGUISH, AND PHILOSOPHY. YOU CAN READ IT COVER TO COVER FROM THE VERY FIRST PAGE OR OPEN IT RANDOMLY AT ANY PAGE TO DIVE STRAIGHT INTO THIS OCEAN OF THOUGHT. THE BOOK OFFERS AN OPPORTUNITY TO EXPERIENCE INSPIRING MOMENTS OF LIFE AS WELL AS ENLIGHTENING DIALOGUES FROM ANCIENT TIMES.
"हे पुस्तक म्हणजे माझं चतकोर जीवन आहे," असे खुद्द संजय राऊत ज्या पुस्तकाबद्दल म्हणतात, ते पुस्तक म्हणजे `बोध कीर्तन`! असंख्य मोठ्या माणसांच्या सहवासाने समृद्ध झालेले जीवन आणि प्रवासातील अनुभव यात मनमोकळेपणाने रेखाटले आहेत. विचार, सुविचार, काव्य, पत्रे, लघु कथा, केस स्टडीज, मनातील उद्वेग आणि तत्त्वज्ञान यांचा सुरेख संगम या पुस्तकात पाहायला मिळतो. तुम्ही हे पुस्तक पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचू शकता किंवा मधूनच पान उघडून या विचारसागरात थेट डुबकी मारू शकता. जीवनातील प्रेरणेचे क्षण आणि प्राचीन काळातला बोधप्रद संवाद अनुभवण्याची संधी हे पुस्तक देते.