* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618682
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE IS NO SIMILARITY IN THE URBAN AND RURAL LIFE. THIS MAKES LIFE MORE MISERABLE. THE STORY OF HARI AND SHANKAR TOOK PLACE IN A CITY. A NEW CITY LIKE THE MIDC IS PLANNED. TALL BUILDINGS ARE BEING BUILT. NEW RESIDENTS ARE COMING TO RESIDE IN EVERY.
खेड्यात हे आसं आन शहरात दुसरंच. ताळमेळ कायी बसत नव्हता. डोसक्याचा गोयंदा झालेला. हरि शंकर परसाइची गोष्ट आठवली. ती घडते शहरात. नव्यानंच जसं एमआयडीसी सारखं नवं शहर वसत हाये. उंच उंच इमारती उभ्या रहातात. येगयेगळया इमारतीत नवीन आलेली खटली. सारी शिकली सवरलेली. कुनी इंजिनियर तर कुनी डाक्तर. आता परेम हा तसा साथीच्या रोगासारख पसवरत जातो. तिथं जातीपातीची, धरमाची, परांताची बंधनं आड येत न्हायीत. अशाच नाजूक येळी एका मराठ्याच्या पोराचं आन बामनाच्या पोरीचं लफडं सुरू झालं. आई-बापांना पत्ता न्हायी. शेवटी पोरानं आपल्या बापाला सांगितलं- ‘बस,काही पन करा; कुलकरनीच्या बाला भेटा. तिच्यावर माझं मन जडलंय. तिच्यावाचून जगू शकत न्हायी.’ लेकाचा जीव तीळतीळ तुटतांना पाहून मुलाचा बाप कुलकरनीच्या घरी गेला. बापाला आधी वाटलं, हे सारं ऐकून हुसकूनच देतील आपल्याला कुलकरनी; पन झालं भलतंच! लयी आगतस्वागत झालं. सारं ऐकल्यावर कुलकरनी म्हंगाला,‘फार बरं झालं तुमी आलात. न्हायी तर आमच्या जातीत लयी हुंडा. तुमाला मुलगी दिली तर हुंड्यातून सुटका व्हयील. पन एक मातूर खरं, की लगीन लावता येनार न्हायी. ते धर्मशास्त्रात बसत न्हायी. तुमी तुमच्या लेकाला सांगा, माझ्या मुलीला पळवून न्यायला. पळवून नेणं धरमात
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JAGLYA #JAGLYA #जागल्या #ESSAYSMARATHI #DAYAPAWAR #दयापवार "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 04-07-1999

    विविधांगी अनुभवांचा ‘जागल्या’… दया पवार यांचा ‘जागल्या’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात एकूण एकतीस कथा आहेत. भारतीय समाजरचनेत विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळे येणाऱ्या विविध प्रकारच्या अनुभवांचा साठा या कथासंग्रहात वाचावयास मिळो. एकेक अनुभवातून एकेक कथा साकार झाली आहे. या अनुभवांतील दु:खाची झळ वाचकांपर्यंत पोहोचते. अनुभवाच्या मांडणीत कुठेही ऊरबडवा आक्रोश केलेला दिसत नाही. -- ओघात समाजातील वृत्ती-प्रवृत्तीवर भाष्य केले आहे. ‘परेम हा तसा साथीच्या रोगासारखा पसरत जातो. तिथं जातीपातीची, धरमाची, परांताची बंधनं आड येत न्हायीत. अशाच नाजूक येळी एका मराठ्याच्या पोराचं आन बामनाच्या पोरीचं लफडं सुरु झालं. आईबापांना पत्ता न्हायी. शेवटी पोरानं आपल्या बापाला सांगितलं ‘बस-काही पन करा कुलकरनीच्या बाला भेटा. लेकाचा जीव तीळ-तीळ तुटताना पाहून मुलाचा बाप कुलकरनीच्या घरी गेला. बापाला आधी वाटलं, हे सारं ऐकून हुसकूनच देतील आपल्याला कुलकरनी. पन झालं भलतंच. लयी आगत-स्वागत झालं. सारं ऐकल्यावर कुलकरनी म्हणाला, ‘फार बरं झालं तुमी आलात. न्हायी तर आमच्या जातीत लयी हुंडा. तुमाला मुलगी देली तर हुंड्यातून सुटका व्हयील. पण एक मातुर खरं की लगीन लावता येणार न्हायी. ते धरमशास्त्रात बसत न्हायी. तुमी तुमच्या लेकाला सांगा, ‘माझ्या मुलीला पळवून न्यायला.पळवून नेणं धरमात बसतं.’’ परदेसातील ‘मिसीसिपी मसाला’ हा चित्रपट दया पवार यांच्या एका कथेचा विषय झालेला दिसतो. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर जाता जाता भाष्य केलेले आहे. ‘जगात कुठेही गेलं तरी माणूस हा एकच. एका मासाचा हाये. त्यात दुजाभाव न्हायी.’ हा संदेश देणारा ‘मिसीसिपी मसाला’ आपल्याही देशात घराघरात जायला हवा अशी सदिच्छाही ते व्यक्त करतात. व्यक्तिचित्रणावर कथेत ‘तुकाराम’ या कथेचा विचार करता येतो. महार जातीतील या तुकारामाला आपल्याला दिली जाणारी वेगळी वागणूक सहन होत नाही. तो या गोष्टीचा प्रतिकार करतो, त्याला जे योग्य वाटेल तेच तो करतो. पुढे काही काळानंतर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याला काम करण्याची काहीच आवश्यकता नसतानाही फुटपाथवर जुन्या पुस्तकांची तो विक्री करतो. गोकुळासारखे नांदते घर सोडून जुन्या पुस्तकांच्या जगात फुटपाथवर राहतो. पाऊस आला तर पुस्तके भिजू नयेत म्हणून जपतो. अशा या तुकारामाकडे पाहताना लेखकाला ‘संत तुकारामां’ची आठवण होते. संत तुकारामाला विठोबाचा ध्यास तर या आधुनिक तुकारामाला जुन्या पुस्तकांचा ध्यास. संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेला असं म्हणतात, पण पुस्तकांसाठी रानोमाळ भटकणारा हा आधुनिक तुकाराम. उद्या फुटपाथवर मरुन पडला तर देवाच्या सोडाच, पण येणाऱ्या जाणाऱ्याला तरी ध्यानात येईल काय? असा हृदयाला भिडणारा प्रश्न विचारुन ‘अशा मान्सापुढं नाही चिरा-नाही पनती. हेच मान्य केले आहे.’ मराठी सारस्वतांनी बेदखल केलेले अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीचं प्रेम, आदर, सहानुभाव व त्यांना समाजाने दिलेलं दु:खं ‘जग बदल घालून घाव’ या कथेत व्यक्त झालेले आहे. ‘जुनून’ सारख्या कथेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलेले आहे. या कथेचे स्वरुप नाट्यात्मक संवादांसारखे आहे. समाजातील निरनिराळ्या थरातील माणसे ‘जात’ या संस्थेला खतपाणी घालताना दिसतात. याचा अनुभव ‘फराळ’सारख्या कथेत येतो. ‘जात’ ‘धर्म’ या संकल्पनांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न या कथेतून दिसतो. भ्रष्टाचार, राजकारण, कटकारस्थान या संदर्भातील काव्य ‘बोफर्स’ या कथेत वाचावयास मिळते. आपल्या देशात जशी ही जातीपातीची उतरंड दिसते तोच अनुभव परदेशातही आलेला आहे. या अनुभवांचा उच्चार ‘इटा’, ‘गरिबी हटाव’ या कथांतून केलेला आहे. ‘जागल्या’ हा कथासंग्रह आजच्या जीवन-जाणिवांकडे पुन्हा एकदा नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करतो. आजच्या जीवनाशी या कथासंग्रहाचे असलेले हे साम्य लक्षात घेता वाचकांनी या कथासंग्रहाची जरूर दखल घ्यावी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.