A STORMY CHAPTER IN THE RADIANT CAREER OF CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ. THE LIBERATION OF THE SOUTHERN TRADING TOWN OF BASRUR FROM PORTUGUESE TYRANNY, A DARING MISSION LED BY SHIVAJI MAHARAJ HIMSELF WITH HIS OWN NAVAL FLEET! A VIVID ACCOUNT OF THE BATTLE OF PURANDAR, THE UNPARALLELED VALOUR OF MURARBAJI DESHPANDE, AND THE BLAZING LOYALTY OF NETAJI PALKAR. THE SEARING, RELENTLESS CLASH BETWEEN SHIVAJI MAHARAJ AND AURANGZEB! MAHARAJ’S SOARING ESCAPE FROM CAPTIVITY IN AGRA A BREATHTAKING ASMANBHARARI, BREAKING THROUGH THE MIGHT OF AURANGZEB’S ARMY OF TEN LAKH SOLDIERS. ASTONISHING FACETS OF NEW HISTORICAL RESEARCH THAT COMPEL A FRESH REFLECTION ON THE AGRA CAMPAIGN. FROM AGRA, KASHI, AND PRAYAG TO AMARKANTAK, PALAMU, AND THE DENSE FORESTS OF JHARKHAND AND CHHATTISGARH THIS IS NOVELIST VISHWAS PATIL’S THRILLING PURSUIT OF SHIVAJI MAHARAJ’S EPIC JOURNEY BACK HOME.
"शिवरायांच्या देदीप्यमान कारकिर्दीतील एक वादळी कालखंड. राजांनी स्वतःचे आरमार घेऊन दक्षिणेत बसरूर या व्यापार नगरीची पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून केलेली मुक्तता!
तसेच पुरंदरच्या लढाईचा आणि मुरारबाजी देशपांडे यांनी दिलेल्या अभूतपूर्व लढ्याचा, तसेच नेताजी पालकर यांच्या तेजस्वी स्वामीभक्तीचा धांडोळा. शिवराय आणि औरंगजेब या दोघांमध्ये घडलेला जळता, धुमसता कडो-विकोडीचा संघर्ष!
महाराजांनी औरंगजेबाच्या दहा लाख फौजेच्या शस्त्रसामर्थ्याला भेदून आग्र्याच्या बंदिवासातून घेतलेली उत्तुंग अस्मानभरारी!
आग्रा मोहिमेचा पुनर्विचार करायला लावणाऱ्या नव्या ऐतिहासिक संशोधनाचे विस्मयकारक व अद्भुत कंगोरे!
कादंबरीकार विश्वास पाटील यांनी आग्रा, काशी, प्रयाग ते अमरकंटक, पलामू , झारखंड आणि छत्तीसगडच्या जंगलरानांतून शिवरायांच्या परतीच्या प्रवासाचा घेतलेला हा रोमहर्षक शोध!
"