* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WILD SWANS : THREE DAUGHTERS OF CHINA
  • Availability : Available
  • Translators : VIJAYA BAPAT
  • ISBN : 9788184984576
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 652
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BLENDING THE INTIMACY OF MEMOIR AND THE PANORAMIC SWEEP OF EYEWITNESS HISTORY, WILD SWANS HAS BECOME A BESTSELLING CLASSIC IN THIRTY LANGUAGES, WITH MORE THAN TEN MILLION COPIES SOLD. THE STORY OF THREE GENERATIONS IN TWENTIETH-CENTURY CHINA, IT IS AN ENGROSSING RECORD OF MAO`S IMPACT ON CHINA, AN UNUSUAL WINDOW ON THE FEMALE EXPERIENCE IN THE MODERN WORLD, AND AN INSPIRING TALE OF COURAGE AND LOVE.587~ DESCRIBES THE LIFE OF HER GRANDMOTHER, A WARLORD`S CONCUBINE; HER MOTHER`S STRUGGLES AS A YOUNG IDEALISTIC COMMUNIST; AND HER PARENTS` EXPERIENCE AS MEMBERS OF THE COMMUNIST ELITE AND THEIR ORDEAL DURING THE CULTURAL REVOLUTION. CHANG WAS A RED GUARD BRIEFLY AT THE AGE OF FOURTEEN, THEN WORKED AS A PEASANT, A "BAREFOOT DOCTOR," A STEELWORKER, AND AN ELECTRICIAN. AS THE STORY OF EACH GENERATION UNFOLDS, CHANG CAPTURES IN GRIPPING, MOVING X AND ULTIMATELY UPLIFTING X DETAIL THE CYCLES OF VIOLENT DRAMA VISITED ON HER OWN FAMILY AND MILLIONS OF OTHERS CAUGHT IN THE WHIRLWIND OF HISTORY.
ही कहाणी आहे हिंसाचार , अमानुष छळ, अनन्वित अत्याचार आणि जुलमी व्यवस्था यांच्या काळ्याकुट्ट गर्तेमध्ये सौंदर्याची आस धरणाऱ्या , नवनिर्मितीचा आणि आधुनिकतेचा ध्यास घेणाऱ्या स्त्रियांची, त्यांच्या आयुष्यांची. या कहाणीला पाश्र्वभूमी आहे चीनमधल्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांची, बदलांची. यात क्रांतीमुळे चीनी जनतेच्या आयुष्यावर झालेले परिणाम आहेत; श्रीमंत-गरीब लोकांचं जीवन आहे; समाजजीवनातल्या कथा, मिथकं, चालीरीती यांचे संदर्भ आहेत; आदर्शवादाने भारलेले आणि तो आदर्शवाद फोल ठरल्यानंतर कोसळून गेलेले स्त्री-पुरुषही आहेत. ही कहाणी चीनच्या इतिहासातील एक व्यापक कालखंड तपशीलवारपणे डोळ्यांसमोर उभा करून आपल्याला अंतर्मुख करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MUKTAVIHANGCHINCHYATEENKANYA #WILDSWANS:THREEDAUGHTERSOFCHINA #मुक्तविहंग:चीनच्यातीनकन्या #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIJAYABAPAT #विजयाबापट #JUNGCHANG "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    चीनच्या त्या जगप्रसिद्ध भिंतीमागे काय चालू आहे याची उत्सुकता सगळ्यांच असते. तेथे असलेली कम्युनिस्ट राजवट, राजकारण याची माहिती सर्वानाच हवी असते .या पुस्तकात लेखिका ,तिची आई,आणि तिची आजी अश्या तीन स्त्रियांची वेगवेगळ्या कलखंडातली कहाणी सांगितली आहे चीनमधल्या जुलमी राजवटीची ,अमानुष क्रौर्यची आणि क्रांतीची कहाणी आहे .या क्रांतीमुळे चिनी जनतेवर झालेले परिणाम ,श्रीमंत गरीब लोकांचे जीवन ,त्यांचे राहणीमान अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे .या पुस्तकास चीनमध्ये बंदी घातली आहे .पुस्तकाचे मूळ नाव वाइल्ड स्वान्स थ्री डॉटर्स ऑफ चायना हे आहे .यातील अमानुष हिंसाचार वाचून अंगावर काटा येतो. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 25-12-2015

    आरसा चीनचा लेखिका युंग चँग चीनमधल्या सेशुआन प्रांतातल्या यी बीन शहरात १९५२ मध्ये जन्मली. सरकारी आज्ञेनुसार शेतात तसंच कारखान्यात काम करत असताना सुरुवातीला चोरुनमारुन आणि नंतर उघडपणे ती इंग्रजी शिकली. नंतर सरकारच्याच एका शिष्यवृत्तीचा आधार घेऊन ती आणी शिकण्यासाठी १९७८ साली इंग्लडला गेली. तिथे तिने यॉर्क विद्यापीठातून भाषाशास्त्राची पीएच. डी. मिळवली. ब्रिटिश विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी ती पहिली चिनी विद्यार्थिनी. एक स्त्री, तिची मुलगी आणि तिची नात या तीन पिढ्यांच्या प्रतिनिधींची ही कहाणी म्हणजे तेवढ्या वर्षांचा चीनचा राजकीय, सामाजिक इतिहासच आहे, पण तो इतिहासाच्या पटलावर कधीही न दिसणारा. गेल्या काही वर्षात चीनमधल्या जुलमी राजवटीच्या अमानुष छळाच्या, अत्याचारांच्या कहाण्या सांगणारी इतरही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यातली काही चिनी माणसांनीच लिहिली आहेत, पण त्या सगळ्यांपेक्षा या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे हे आई, मुलगी आणि नात अशा एकाच घरातल्या तीन पिढ्यांची कहाणी सांगत. मुख्य म्हणजे या पुस्तकावर चीनमध्ये बंदी आहे. चीनमध्ये त्या काळात असलेल्या हजारो कानकुबाईन्सपैकी एकीच्या आयुष्यापासून (कानकुबाईन्स अंगवस्त्र) सुरू झालेलं हे पुस्तक तिच्याच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या, स्वतंत्र, निर्भय आयुष्य जगणाऱ्या नातीच्या आयुष्यापाशी येऊन संपतं. या तीन पिढ्यांच्या दरम्यान हेलकावत राहिलेली अनेक आयुष्य या पुस्तकातून भेटत राहतात, राजसत्तेचा, तिच्याशी संबंधित सगळ्या यंत्रणेचा जुलूम-जबरदस्ती, त्यानंतर माओच्या लहरीनुसार बदलत गेलेलं सगळ्या देशाचं जगणं, सत्तावर्तुळातल्या त्याच्यानंतरच्या उतरंडीतल्या लोकांचं वागणं, या सगळ्यामध्ये दडपली गेलेली चीनची जनता हे सगळं जसजसं आपण वाचत जातो तसतसा एक मोठा आलेख आपल्यासमोर उभा राहतो. चिनी विक्षिप्तपणाचे, अमानुषपणाचे एकच उदाहरण या पुस्तकानं मांडलेलं दाहक वास्तव देण्यासाठी पुरेसं आहे. ‘माओच्या राज्यात इंग्रजीचा अभ्यास’ या प्रकरणात लेखिका लिहिते. एका कापडाच्या गिरणीला आग लागली. सरकारी मालमत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात तिथली एक वीणकर मुलगी गंभीर जखमी झाली. तिचे हातपाय कापावे लागले. पण तिचा चेहरा आणि बाकी शरीर मात्र नीट राहिलं. पक्षाने तिची इच्छा विचारली. तिला एखाद्या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करायचं होतं. लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लेखिकेच्या लष्करात असलेल्या भावाला तिच्याशी लग्न करायला सांगितलं. त्याचं म्हणणं होतं, त्या मुलीचं शरीर धड होतं आणि त्यामुळे ती मुलांना जन्म द्यायला सक्षम होती, म्हणून तिच्याशी लग्न केलं जावं. तिचे हात-पाय जाऊन ती अपंग झाल्याची करूणा वाटण्यापेक्षा ती मुलांना जन्म द्यायला सक्षम आहे असा विचार करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे अंगावर काटा आणणारंच आहे. दर बदलत्या राजवटीमध्ये चीनमध्ये थोड्याफार फरकाने सामान्य माणसाच्या, स्त्रियांच्या वाट्याला चिरडलं जाण्याखेरीज दुसरं काहीच आलेलं नाही, हे आपल्या अगदी शेजारी असलेल्या चीनचं दाहक वास्तव आपल्या मनावर ओरखडे उमटवत राहतं, पण त्याबरोबरच चिनी समाजाची अशी अनेक अंग, वेगवेगळ्या सामाजिक प्रथा-कुप्रथा, चालीरीती, मिथकं या सगळ्यांत दर्शन या पुस्तकातून घडतं. पुस्तकाचे नाव : मुक्त विहंग चीनच्या तीन कन्या ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI

    हे पुस्तक वाचताना आपण भारतिय समाजाचेच चित्रण पहात आहोत असा भास होत रहातो . सुरुवातीला जपानी सैनिकांकडुन जनतेचा छळ , त्यानंतर रशियन सैन्याकडुन ,त्यानंतर क्वो-मिन-तॉंग आणि कम्युनिस्टांकडुन केली जाणारी ससे होलपट . त्यातही माओचा आत्मकेंद्रीत राज्यकारभार, कम्युनिझम आणि धार्मिक कट्टारतावाद यात काहीही फरक नाही याचे पुरावे अनेक ठिकाणी मिळतात . प्रत्येकवेळी माओ ’वर्गशत्रु ’म्हणुन कुणा समुहाकडॆ बोट दाखवी . की त्या समुहाचा छळ सुरु होत असे . त्यातुन शिक्षक ,पांढरपेशा वर्गाची भरपुर छळणुक झाली .कोणतेही विधायक काम न करता निव्वळ समाजात तेढ निर्माण केल्याने पडलेले दुष्काळ आणि त्यातुन ३० कोटी मनुष्यांचे मृत्यु माओच्या राज्यात झाले . माओच्या सांस्कृतीक क्रांतीमधे त्याने हुकुम दिला , पोलाद तयार करायचा . शिक्षण बाजुला ठेऊन शिक्षक आणि विद्यार्थी त्यात गुंतले ,नाही त्यांना गुंतावेच लागले .त्यांनी तसे केले नसते तर त्यांना वर्गशत्रु ठरवुन छळले गेले असते . शिक्षकांचे काम शेगडी पेटवायची आणि ती पेटती ठेवायची . विद्यार्थ्यांचे काम जे काही लोखंडाच्या वस्तु मिळतील त्या शेगडीत टाकणे आणि वितळवणे . अख्खा देश या वेडाचारात गुंतला . शेतकरी शेती पिकवण्याऐवजी पोलाद करण्यात गुंतले . शेगडी पेटती ठेवण्यासाठी लाकडे हवीत .त्यासाठी जंगले तोडली गेली . चिमण्या दाणे खातात म्हणुन माओला चिमण्या आवडत नसत . त्याने त्यासाठी सगळ्या जनतेला कामाला लावले . घरातील भांडी वाजवुन चिमण्यांना हाकलत बसण्याचे काम सगळे करु लागले . मोठमोठ्या सुंदर बागा , सरंजामदारीचे लक्षण म्हणुन उध्वस्त केल्या गेल्या . शिल्पे तोडली गेली . माओप्रती आपली निष्ठा दाखवायला लोकांना माओची वचने असलेले पुस्तक वाचावे लागे .माओची स्तुती करणारीच गाणी म्हणावी लागत . हे म्हणजे देवावरची श्रध्दा दाखवायला पोथ्या वाचाव्यात त्यातलाच प्रकार . कोणत्याही सुंदर गोष्टीचा आस्वाद घेणे ,कोणत्याही गोष्टीचा आनंद घेणे हे क्रांतीविरोधी ठरवले गेले . स्वच्छ कपडे घालणे ,रोज आंघोळ करणे हेहेी उजवे ठरवले गेले . एकुणच ,लोकांच्या आयुष्यातला आनंद नाहीसा केला गेला . त्यातुन मनोरुग्णांची संख्या वाढली . आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले . लेखिकेचे वडिल आणि आई दोघेही कम्युनिस्ट असले तरी आपले स्थान बळकट करण्यासाठी कुणाचा तरी बळी देण्याविरुध्द होते . त्याची शिक्षा दोघांनाही छळाला सामोरे जाऊन मिळाली . या सर्व प्रकाराने ५० वर्षांचे तिचे वडिल ७० वर्षांच्या वृध्दासारखे दिसु लागले . आपल्या देशातही पुढारी लोक ,शेतकरी आणि अशिक्षित जनतेची कड घेऊन ,पांढरपेशा समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असतात . हे कोणीही पुढारी कुटुंब नियोजनाला महत्व देताना दिसत नाहीत . एकिकडे ते स्त्रिपुरुष समानतेची भाषा करतात आणि त्याच वेळी स्त्रिला बाळंतपणाच्या त्रासातुन मुक्त करण्यासाठी कुटुंब नियोजनाचा प्रसार करत नाहीत . हाच प्रकार चीन मधे दिसतो . कुटुंब नियोजनाचा प्रसार करणार्‍या मा यीन चुन या अर्थतद्न्याला उजवा ठरवले गेले . आपल्या व्यक्तीगत स्वातंत्र्यावर असलेला सरकारी हस्तक्षेप पाहुन लोक मेंढरासारखे वागु लागले .नवे विचार ,सर्जनशिलतेला काहीही महत्व राहिले नाही . वर्गशत्रु ठरवुन छळ केला जाई .पण नक्की वर्गशत्रु कोण याबाबत जनतेच्या मनात संभ्रमही निर्माण होत असे . आपल्या शेतात जेव्हढे धान्य पिकणे अशक्य आहे तितके धान्य पिकते असा खोटा दावा करायला लोकांना शिकवले गेले . समाजात अवाच्या सव्वा दावे करण्याची चढाओढ लागली . खरे चित्र कधीही समोर येत नव्हते . अडाणी जनता सरकारला प्रश्न विचारत नाही .पण सुशिक्षितांना सरकारची धोरणे समाजविघातक आहेत का ते समजते .म्हणुन माओला सुशिक्षित समाजाबद्दल राग होता . परिक्षा म्हणजे भांडवलशाहीला उजाळा देण्यासारखे आहे अशी मुक्ताफळे उधळणारे महाभाग होते .माओ पत्नी व तिचे साथिदार यांनी शैक्षणिक दर्जावर असलेल्या भराचा ,पांढरपेशी जुलुमशाही असे म्हणत निषेध केला . ’सारा देश अशिक्षित झाला तर काय बिघडले ?सांस्कृतिक क्रांतीचा विजय होणे महत्वाचे ’ असे ते म्हणाले . सांस्कृतिक क्रांतीने समाजसुधारणेकडे काहीही लक्ष दिले नाही . लेखिकेला शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी दुरच्या प्रांतात पाठवले गेले . तेथे काही लोकांनी तिच्याकडचे भांडे , नुडल्स शिजवण्यासाठी घेतले . काही कारणाने नुडल्सचा गोळा झाला .यावरुन ते सर्व तिच्याकडे रागाने बघु लागले . त्या रागाचे कारण होते त्यांची अंधश्रध्दा . त्यांनी अशी समजुत करुन घेतली की मासिक पाळीच्या काळात लेखिकेने ते भांडे आंघोळीसाठी वापरल्याने त्या नुडल्स बिघडल्या . असाच दुसरा प्रकार म्हणजे एकदा कावड घेऊन काही तरुण रस्त्याकडेला बसलेले होते .रस्ता अरुंद असल्याने लेखिकेला ती कावड ओलांडुन जावे लागते . तिने कावड ओलांडताच एक तरुण रागारागाने तिच्यासमोर येऊन उभा रहातो .तो तिला मारणार आहे असे तिला वाटते . तो असे करण्यामागची अंधश्रध्दा असते की बाईने कावडीच्या काठीला ओलांडले तर ती वाहुन नेणार्‍याच्या खांद्यावर फोड येतात . अशा परिस्थितीत चांगले शिक्षण मिळणे अशक्य झाले होते . जगणे हे एक ओझे झाले होते . यातुन सुटका नाही हे पक्के झाले होते .पण तरीही लेखिकेची सुटकेची इच्छा होतीच . योगायोगाने तिला इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली . हे पुस्तक लिहिले तेंव्हा लेखिका इंग्लंडमधेच रहात होती . लेखिकेची आई तिला भेटायला इंग्लंडला गेली होती तेंव्हा तिने लेखिकेला ,स्वत:च्या आईबद्दल आणि स्वत:बद्दल माहिती दिली आणि लिहिण्यास प्रवृत्त केले . या पुस्तकावर चीनमधे बंदी आहे . लेखिका चीनमधे गेली तरी लोकांबरोबर या विषयावर बोलु शकत नाही . ज्या भारतियांना कम्युनिझमचे आकर्षण आहे त्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे . समाजाचे काही भले करायची प्रामाणिक इच्छा असणार्‍या व्यक्तीला कम्युनिझमचे कधीही आकर्षण वाटणे अशक्य आहे . लोकशाहीला पर्याय नाही हेच खरे . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more