* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: MAINE RAM RATAN DHAN PAYO
 • Availability : Available
 • Translators : SWATI CHANDORKAR
 • ISBN : 9788184981308
 • Edition : 2
 • Publishing Year : JULY 2010
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 200
 • Language : Translated From HINDI to MARATHI
 • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
 • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
IT IS RATHER IMPOSSIBLE TO UNDERSTAND MEERA. IF ONE TRIES TO MEASURE HER INTENSITY BASED ON THE CREDENTIALS OF POETRY, SCIENCE OR PHILOSOPHY THEN HE WOULD FAIL IN HIS ATTEMPT AS SHE IS NEITHER A POEM NOR A SCIENTIFIC DESIRE OR PHILOSOPHICAL ASPIRATION. THOUGH SHE DOES NOT HAVE ANY PHYSICAL FORM SHE IS VERY TRUE IN HER OCCURRENCE. IT WAS THE DEVOTION THAT TOOK THE FORM OF A PHYSICAL APPEARANCE OTHERWISE, MEERA WOULD NEVER HAVE KNOWN ANY MATERIAL OUTLINING HIGHLIGHTING HER. THE COMMON MAN ALWAYS CURSES THE ALMIGHTY WHEN HE IS BOMBARDED BY ANGUISH; IN CONTROVERSY TO THIS, MEERA THANKS THE ALMIGHTY FOR ALL THE GRIEF AND ANGUISH THAT THE ALMIGHTY CASTS UPON HER AS IT GIVES HER ADDED OPPORTUNITY TO PRAISE HIM. SHE THANKS HIM FROM THE BASE OF HER HEART FOR RELEASING HER FROM THE CHAOS OF LIVING. SHE FINDS PEACE WITH THE SITUATION AS IT GIVES HER EXTRA STRENGTH AND VIGOUR TO MERGE HER SOUL DEEPER WITH THE ALMIGHTY. HER PENANCE IS MEANT ONLY FOR THE LORD KRISHNA. SHE DOES NOT SEE THE ALMIGHTY IN ANY OTHER FORM. IT IS HER FAITH THAT ENABLES HER TO SACRIFICE HER WILLINGLY TO THAT LORD KRISHNA WHO IS BELIEVED TO BE A PART OF SOME 25 THOUSAND YEARS AGO. YET, THE TIME PERIOD DOES NOT DIMINISHES THE INTENSITY OF HER CERTAINTY ABOUT ‘HIS’ BEING INTO EXISTENCE. THOSE WHO ARE UNABLE TO UNDERSTAND HER DEVOTION, CURSE HER, BLAME HER, TRY TO END HER LIFE SO AS TO GIVE A FULLSTOP TO THE DIVINE DEVOTION REFLECTED BY HER. HOWEVER, SHE REMAINS TRANQUIL AND DOES NOT LOSE HER COMPOSURE OVER IT. A SWEET SMILE LINGERS ON HER LIPS. THOUGH WE HAVE NEVER SEEN MEERA AND WILL HAVE NO CHANCE OF SEEING HER, WE FEEL HER PRESENCE, WE SENSE HER SMILE, WE UNDERSTAND HER CALMNESS. WE BECOME SURER ABOUT HER DEVOTIONAL ATTITUDE, REMEMBERING ONLY HER MERGER WITH LORD KRISHNA.
जेव्हा दु:खाचा भडिमार होतो तेव्हा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. ‘सर्व मोहपाशातून सुटका केलीस,’ असं म्हणते. ‘ईश्वराराधना व्हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.’ असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही. ईश्वराराधना म्हणजे फक्त कृष्णाची आराधना. पंचवीस हजार वर्षांपूर्वी अवतरलेल्या कृष्णावर ती पंचवीस हजार वर्षांनंतर स्वत:ला समर्पित करू शकते. अशा भक्तीला नावं ठेवली जातात, कलंक लावला जातो, जीवे मारण्याचा यत्न केला जातो. तरीही प्रसन्नता, शांतता, सुमधुर हास्य विलसत राहतं. न पाहिलेल्या मीरेचं रूप नजरेसमोर तरळत राहतं. शिल्पकारांनी त्यांच्या कल्पनेनुसार घडवलेली मीरा नजरेसमोर येते आणि वाटून जातं, ‘खचितच, मीरा अशीच दिसत असणार. शांत, सुंदर, जगाचं भान नसलेली, कृष्णमय झालेली.’

No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
 • Rating StarSHRAMEEK EKJOOT 26-9-2010

  ओशो करतात मीरेची उकल सामान्य माणसाला निराकारावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. पूर्ण लक्ष एकवटल्याखेरीज लक्ष्य नेमके समजल्याखेरीज त्याविषयी आवड किंवा नावड या मनाच्या भावना कशा जोखता येणार? मीरा तर य निराकारावरच प्रेम करते हे अगम्य समजून घेण्यासाठी मीेची प्रेमातील उत्कटता समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ओशोंच्या प्रवचानातून आधी प्रेमाची ताकद उलगत जाते. नंतर स्वत:चा विसर पडल्यानंतरच जीव खऱ्या अर्थाने निराकारावर जडवता येतो याची जाणीव होते. मीरेचे स्वत:ला विसरणे ओशो भक्तांना समजावून सांगतात आणि मीरा आपोआप उलगडत जाते. शब्दांना अगम्य असणारी मीरा तिच्या प्रेमाभावनेची उकल होताच अधिक मोकळेपणाने सादकांसमोर उभी ठाकते. अधात्म मार्गावरील कोणताही विचार ओशोंकडून ऐकणे ही अनुनूभूत अशी पर्वणी ठरते. ओशोंच्या प्रवचनांची ध्वनिमुद्रिते उपलब्ध आहेत. मीरेच्या पदांवर ओशोंच्या केलेल्या विश्लेषणाच्याही कॅसेट, सीडी उपलब्ध आहेतच. मात्र मुळात अरुपावर प्रेम करणारी, हजारो वर्षांचे अंतर तोडणारी आणि कृष्णाला प्रियकर मानणारी मीरा सामान्य माणसाच्या जाणीवेच्या आवाक्यात सहजासहजी येत नाही. भगवंत-भक्त, भगवंत माऊली-मी तान्हा किंवा भगवंत माझा सखा अशा पातळीवरची भगवद् - भक्ती निदान मनाला पटते. म्हणूनच बाकी संत, त्यांचे तत्वज्ञान त्यांची भक्तीची पातळी माध्यमखेरीज समजून घेणे कदाचित शक्य होते. मात्र स्त्री भूमिकेतून कृष्णचरणी सर्वस्व समर्पित करणारी, लोकलज्जेचे भय न मानणारी मीरा गाभ्यातून समजून घ्यायला समर्थ माध्यमाची गरज भासते. ओशो आपल्या प्रवचनातून मीरेची फार सुंदर उकल करतात. नव्याने या प्रातांत शिरणाऱ्यासाठी मुळात ओशोंची शैली समजून घेणेही कठीण ठरते.याच मुद्यावर ओशोंच्या मीरेच्या पदावरील प्रवचनांची पुस्तक रुपातील उपलब्धी महत्त्वाची ठरते. स्वाती चांदोरकर यांनी या प्रवचानांचा मराठीत अनुवाद केला आहे. ध्वनिमुद्रितांमधील प्रवचानांचा शब्दनशब्द पुस्तकात वेचला आहे. मेहता प्रकाशनाने आणलेली ‘मीरेची प्रेमतीर्थावर’ आणि ‘मीरा एक वसंत आहे’ ही दोन्ही पुस्तके मीरा समजून घेताना भक्तांना फार मदत करतात. जाणिवेचा आवाका वाढवण्यासाठी ध्वनिमुद्रितांपेक्षा पुस्तक अधिक साह्यभूत ठरते. गरज पडली तर प्रत्येक विचारापाशी अधिक काळ थांबून आधी ओशोंच्या आणि नंतर मीरेच्या अंत:करणात डोकावणे पुस्तकामुळे अधिक सोपे ठरते. पाच पाच प्रवचनांच्या या पुस्तकरूपात मीरेची भक्ती, मीरेचे साधन- साध्य , मीरेचे संपूर्ण समर्पण ओशोंच्या शब्दात त्यांच्या वाक्यरचनेच्या विशिष्ट शैलीत स्वाती चांदोरकरांनी उघडे केले आहे. मीरेच्या भक्तीबद्दल बोलताना ओशो सांगतात, मीरेची भक्ती कशी होती हा प्रश्नच चुकीचा ठरतो. मीरा ‘मीरा’ नव्हतीच. साक्षात भक्तीच मीरेचे रूप घेऊन पृथ्वीतलावर अवतरली होती. मीरेचे बोटे धरून श्रोत्यांना श्रद्धेच्या पहिल्या पायरीवर नेऊन उभे करताना ओशोंनी श्रद्धेचे स्वरूप वर्णन केले आहे. मरणाच्या दारातही तर्काचा आधार न घेता अढळ राहते. तीच खरी श्रद्धा. जन्म घेतेवेळीच श्रद्धा माणसाच्या बरोबर असते. मनुष्य जन्मानंतर श्रद्धेत अडथळा निर्माण करणारे तर्क हळूहळू शिकत असतो. मनुष्य तर्क इतक्या प्रमाणात शिकतो की त्याची श्रद्धा झाकोळली जाते. पुन्हा श्रद्धा ही लौकीक अर्थाने प्रमाणित न होऊ शकणारी आहे. मग श्रद्धेचे स्वरूप कसे पारखून घ्यायचे? आपली श्रद्धा आहे हाच मुद्दा महत्त्वाचा. श्रद्धा खरी की खोटी असा सवाल मुमुक्षूच्या मनात उमटूच नये. जसे जगात पाणी कुठे ना कुठे म्हणूनच मनुष्याला आर्त तृष्णेची भावना जाणवते. जगात पाणी अस्तित्वात नसतेच तर पाण्यानेच केवळ शांत होऊ शकेल, अशी तृष्णेची भावना माणसाच्या मनात निसर्गत:च निर्माण झाली नसती हे जेवढे निर्विवाद सत्य आहे तेवढीच श्रद्धाही खरी असते. जगात परमात्म्याचे अस्तित्वच नसते तर ते असण्याची भावना मनात निर्माणच झाली नसती. परमात्मा जगात आहेच आहे आणि तो असल्याची ठाम ग्वाही आपले मन देते, हेच श्रद्धेचे निखळ रूप आहे. श्रद्धेच्या पायरीवरून वर गेलात तर अनुभूती निश्चित आहे, असे ओशो ठामपणे सांगतात. अशी अनुभूती मिळायला जाणिवा जाग्या असायला हव्यात असे मात्र नाही. जीवनात अंतिम अनुभूतीचा साक्षात्कार जाणिवेने करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतीचा साक्षात्कार करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतींचे संकेत विनासायास मिळाले होते. मात्र, तेव्हा ही अनुभूती आहे हे कळण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आपल्याकडे नसल्याने या अलौैकीक अनुभवाचे अस्तित्व तेव्हा आपल्याला जाणवले नाही. बुद्धी तर्कात अडकल्याने खूपदा या अनुभवाची तुलना एखाद्या क्षुद्र गोष्टीशी करते आणि त्याच क्षणी अनुभवाचे अस्तित्व थांबते. सामान्य माणसाच्या बाबतीत अलौकीक अनुभवांच्या बाबतीत गल्लत होण्याची आणखी एक शक्यता असते. जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा हा अनुभव आपल्याला खरेच आला की हा भास आहे. अशी शंका माणसाच्या मनात येते. साशंक मनाने सत्याला भिडता येत नाही. त्यामुळेच साशंक मन हाच अनुभवातील अडथळा ठरतो. अलौकीक अनुभव येतातच आणि ते सत्यच असतात हे सांगण्यासाठी ओशोंनी सामान्य जीवनातील एक सामान्य उदाहरण दिले आहे. प्रकृती बिघडते तेव्हा आपण डॉक्टरकडे त्याचे कारण जाणून घेण्यासाठी जातो. प्रकृती स्वस्थ असताना ती तशी का आहे याची पृच्छा आपण करत नाही. कारण स्वस्थ प्रकृती ही नैसर्गिक अवस्था आहे. तद्वत जीवाला मिळणारी आनंददायी अनुभूती हीच शाश्वत आहे आणि त्याचे कारण शोधण्याची गरज नाही. अशा प्रकारे प्रेमदिवान्या मीरेची भक्ती समजावून देताना ओशो सामान्यजनांच्या जाणिवा जाग्या करण्याचा प्रयत्न करतात, ओशोंची ही भावना समजून घेण्यासाठी ही पुस्तके आपल्याला मदत करतात. ‘मीरेच्या प्रेमतीर्थावर’ हे १७६पानांचे तर ‘मीरा एक वसंत आहे’ हे १८८ पानांचे पुस्तक प्रत्येकी १५० रूपयांना उपलब्ध आहे. ओशोंच्या तत्त्वज्ञानांचा आदर करणाऱ्यांसाठी हे पुस्तक जणू वरदानच ठरते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more