* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660944
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 420
  • Language : MARATHI
  • Category : GRAMMAR
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"GRAMMAR IS THE CORE OF A LANGUAGE; IT IS THE FOUNDATION OF THE LANGUAGE. HENCE A STUDENT OF MARATHI LANGUAGE MUST KNOW THE BASIC PRINCIPLES AND ITS SCIENTIFIC ANALYSIS. TO DO SO, A STUDENT HAS TO GO THROUGH MANY BOOKS WHICH HE MIGHT FIND LENGTHY AND BORING. AFTER REALIZING THE PROBLEMS OF THE STUDENTS, AN ATTEMPT HAS BEEN MADE TO OVERCOME IT. IN THIS CURRENT BOOK, THE OPINIONS OF THE GREAT SCHOLARS OF MARATHI GRAMMAR HAVE BEEN DISCUSSED COVERING ALL THE POINTS IN DETAIL. WHEREVER, THE AUTHOR HAD A DOUBT, HE HAS JOTTED IT DOWN ALONGSIDE AND WHEREVER NECESSARY, HE HAS SHARED HIS OWN VIEWS TOO. THE THREE NEW CHAPTERS INCLUDED IN THIS BOOK ARE `SWANIM VICHAR`, `PADMI VICHAR`, AND `VAKYAVINYAS`. WE ARE SURE THAT THE STUDENTS WILL ENJOY THE DETAILED DISCUSSIONS ON ALL THE IMPORTANT AND DEBATABLE CONTROVERSIES, AND WILL BE BENEFITTED BY IT.
भाषा ही एक पद्धती आहे आणि भाषेचे घटक सामान्यपणे विशिष्ट नियमांना अनुसरून वागत असतात. पुन्हा हे नियम सुटे सुटे नसतात, तर एका समठा नियम व्यवस्थेचे ते भाग असतात. भाषेतल्या ध्वनींची व अर्थवाहक घटकांची रचना व कार्य यांचे दिग्दर्शन ही समठा नियम व्यवस्था करीत असते. ही नियमव्यवस्था पूर्णपणे समजावून घेणे, तिच्या मर्यादा जाणणे, तिने स्वीकारलेल्या अपवादांची माहिती करून घेणे आणि अशा अभ्यासानिशी समठा नियमव्यवस्थेची पुन्हा जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध मांडणी करणे, हेच व्याकरणाचे कार्य होय. पतंजलीच्या ’व्यक्रियते अनेन इति व्याकरणम्’ या व्याख्येचा हाच अर्थ सांगता येतो. हा अर्थ लक्षात घेऊनच डॉ. लीला गोविलकर यांनी प्रस्तुत ठांथात मराठी भाषेचे व्याकरण सिद्ध केल्याचे दिसेल. मराठीच्या विद्यमान प्राध्यापकांमध्ये व्याकरणशास्त्राचा मूलभूत अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल, इतकी अत्यल्प आहे. डॉ. लीला गोविलकर यांचा समावेश या अत्यल्प प्राध्यापकांत होतो. व्याकरणशास्त्राच्या अभ्यासक म्हणूनच त्या सर्वांना परिचित आहेत. त्यांनी अद्ययावत दृष्टी बाळगून तयार केलेला प्रस्तुत ठांथ व्याकरणाच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHICHEVYAKARAN #MARATHICHEVYAKARAN #मराठीचेव्याकरण #GRAMMAR #MARATHI #LEELAGOVILKAR "
Customer Reviews
  • Rating Starमराठी ग्रामर

    Write More Marathi

  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-07-201994

    व्याकरणाचा शास्त्रशुद्ध विचार... कोणत्याही भाषेच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी व्याकरणाचा मुलभूत अभ्यास आवश्यक आहे हे ठाऊक असूनही या विषयामध्ये व्यासंग असणाऱ्या अभ्यासकांची संख्या फार कमी असते ही वस्तुस्थिती आहे. मराठी भाषादेखील या गोष्टीला अपवाद नाही विद्यमान काळात तर ज्यांना खऱ्या अर्थाने ‘वैय्याकरणी’ म्हणता येईल असे व्याकरणशास्त्राचे अभ्यासक मराठी भाषेत फारच मोजके सापडतील. अशा विवेचक आणि साक्षेपी अभ्यासकांत डॉ. लीला गोविलकर यांची गणना होते. व्याकरण शास्त्राविषयीच्या आस्थेमुळेच त्यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास करुन आपला प्रबंध सादर करुन डॉक्टरेट मिळविली. ‘मराठीचे व्याकरण’ हा त्यांचा ग्रंथ त्या प्रयत्नाचीच फलश्रुती. प्राध्यापिका या नात्याने व्याकरणाचे अध्ययन - अध्यापन करीत असताना लेखिकेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. मराठीतील व्याकरणकारांची व्याकरणे अभ्यासताना त्यामध्ये डॉ. लीला गोविलकरांना अनेक प्रकारची विविधता आणि मतभिन्नता आढळली. व्याकरणाच्या या अभ्यासकांची व्याकरणाकडे पाहण्याची भूमिका, व्याकरणातील अभ्यासघटकांचे त्यांचे विवरण इ. गोष्टींमध्ये वैविध्य असले तर त्यामध्ये एक ‘आंतरिक सुसंगती’ असल्याचे लेखिकेला जाणवले. एकूण या विषयाच्या खोलात शिरताना डॉ. गोविलकरांच्या लक्षात आले की, अजूनही हा विषय बराच दुर्लक्षित आहे आणि त्याच्या मूलभूत शास्त्रशुद्ध व विवेचक अभ्यासाची गरज आहे. या गरजेतूनच त्यांना प्रस्तुत ग्रंथलेखनाची प्रेरणा मिळाली. डॉक्टरेटसाठी हा शोधनिबंध लिहिला असल्याने साहजिकच ग्रंथाची मांडणी त्या अनुषंगाने झालेली आहे. व्याकरणातील शब्दांच्या जातीबरोबरच शब्दसिद्धी, विभक्तिविचार, विकरणविचार, वाक्यविचार इत्यादी घटकांचा विचार ग्रंथात केलेला आढळतो. त्याशिवाय मराठी व्याकरणाची परंपरा, व्याकरणविषयक काही प्रश्न, शुद्धलेखन व मराठीतील काही प्रमुख व्याकरणकार इ. विषयांचाही ऊहापोह केलेला आहे. एकंदरीत मराठी व्याकरणाच्या सर्व अंगांची/घटकांची साधकबाधक चर्चा करुन डॉ. गोविलकर यांनी काही निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे. कोणत्याही चांगल्या प्रबंधलेखनासाठी आवश्यक असणारी अभ्यासाची शिस्त डॉ. गोविलकर यांच्या लेखनात आहे याचा प्रत्यय ‘मराठीचे व्याकरण’ हा ग्रंथ वाचताना आल्याखेरीज राहत नाही. एकूण वीस प्रकरणांमध्ये विषयाचे विवेचन विभागले असून प्रत्येक प्रकरणाची विशेष अशी मांडणी केलेली आहे. प्रतिपाद्य घटकांसंबंधीचे प्रास्ताविक, त्यानंतर उपशिर्षके देऊन घटकाचे विश्लेषण आणि शेवटी समारोप अशा मांडणीतून प्रत्येक प्रकरण सिद्ध झालेले आहे. समारोपामध्ये लेखिकेने सांगोपांग विश्लेषणानंतर काढलेले निष्कर्ष आहेत. अभ्यासकाच्या सहजपणे लक्षात यावेत यासाठी हे निष्कर्ष ठळक अक्षरात दिले आहेत. प्रतिपादनात आवश्यक तेथे इंग्रजी प्रतिशब्द आणि इंग्रजी अवतरणेही दिली आहेत. उपोद्घाचे ‘मराठी व्याकरणाची परंपरा’ आणि उपसंहारामध्ये दिलेले ‘मराठीतील काही प्रमुख व्याकरणकार’ ही दोन्ही प्रकरणे एकत्रित वाचणे उद्बोधक ठरावे. या उभय प्रकरणांची छाया परस्परांवर पडलेली आढळते. मराठी व्याकरणातील विविध मतप्रवाह आणि त्यांचे वेगळेपण जाणून घेण्यासाठी जिज्ञासूंनी ही प्रकरणे अवश्य अभ्यासावीत. या प्रकरणांच्या अनुषंगाने डॉ. गोविलकरांनी मराठी व्याकरणांचा घेतलेला आढावा आणि मराठी व्याकरण-लेखनाची केलेली समीक्षा अभ्यासकांना वेगळी दृष्टी देऊन जाते. लेखिकेने शुद्धलेखनाच्या संदर्भात प्रतिपादिलेले विचारही चिंतनीय आहेत. ग्रंथाच्या शेवटी दिलेली संदर्भग्रंथसूची अभ्यासकांना/जिज्ञासूंना उपयुक्त ठरावी. मराठी व्याकरणाचा शास्त्रशुद्ध विचार करणाऱ्या या पुस्तकाचे भाषेचे अभ्यासक, शिक्षकवर्ग, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थीवर्ग मनापासून स्वागत करील अशी प्रांजल अपेक्षा बाळगायला हरकत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more