"B. D. KHER HAS INCLUDED THE VERSE-BASED BIOGRAPHIES OF SAINTS FROM MAHIPATI’S TEXT ‘BHAKTAVIJAY’ IN STORY FORM IN THIS BOOK. MAHIPATI, A HIGHLY LEARNED INDIVIDUAL ENDOWED WITH EXTRAORDINARY POETIC INSPIRATION, CONSIDERED TUKARAM AS HIS GURU. TUKARAM GAVE HIM A DREAM VISION AND INSPIRED HIM TO PUT THE BIOGRAPHIES OF SAINTS INTO WORDS. FOR A FULL TWELVE YEARS, MAHIPATI’S PEN FLOWED UNCEASINGLY, GIVING RISE TO AN ABUNDANCE OF POETIC TREASURE IN THE FORM OF BOOKS. MAHIPATI WROTE DELIGHTFUL AND DEVOTION-FILLED TEXTS SUCH AS ‘BHAKTAVIJAY’, ‘SANTLILAMRIT’, ‘SANTVIJAY’, AND ‘KATHASARAMRIT’. THE AUTHOR HAS DESCRIBED THE BIOGRAPHIES OF TWENTY-SIX SAINTS ACROSS TWENTY-FOUR ORIGINAL POETIC CHAPTERS OF ‘BHAKTAVIJAY’ AS STORIES IN SIMPLE AND FLUENT LANGUAGE. THESE SAINTS TAUGHT RELIGION, ETHICS, AND PRACTICAL CONDUCT TO PEOPLE OF ALL AGES, GUIDING THEM ONTO THE PATH OF DEVOTION. THEY IMPARTED LESSONS OF RIGHTEOUS CONDUCT AND THOUGHT, GOODWILL, AND UNIVERSAL EQUALITY. READING SUCH A BOOK BRINGS A BLOSSOMING OF DEVOTION TO OUR INNATE FAITH, CAUSING US TO BOW DOWN HUMBLY BEFORE OUR REVERED DEITY.
"
भा. द. खेर यांनी या पुस्तकात महिपती रचित ‘भक्तविजय’ या ग्रंथातील ओवीबद्ध संतचरित्रे गोष्टीरूपाने समाविष्ट केली आहेत. अलौकिक काव्यऊर्मी असलेले बहुश्रुत महीपती तुकारामांना गुरू मानत असत. तुकारामांनी स्वप्नदृष्टान्त देऊन त्यांना संतचरित्रे शब्दबद्ध करण्यास उद्युक्त केले. तब्बल बारा वर्षे महीपतींची लेखणी अविश्रांतपणे स्रवत होती. त्यातून ग्रंथरूपाने उदंड काव्यसंपत्तीची निर्मिती झाली. महीपतींनी ‘भक्तविजय’, ‘संतलीलामृत’, ‘संतविजय’, ‘कथासारामृत’ इत्यादी रसाळ आणि भक्तिरसपूर्ण ग्रंथ लिहिले. लेखकाने ‘भक्तविजय’ ग्रंथातील मूळ काव्यमय असलेल्या चोवीस अध्यायांतील सव्वीस संतांची चरित्रे गोष्टीरूपाने साध्यासोप्या प्रवाही भाषेत वर्णिली आहेत. या संतांनी आबालवृद्धांना धर्म, नीती आणि व्यवहार याचे शिक्षण देत त्यांना भक्तिमार्गाला लावले. सदाचार-विचार, सद्भाव आणि सर्वांभूती समभाव यांची शिकवण दिली. अशा पुस्तकाच्या वाचनाने आपल्या अभिजात श्रद्धेला भक्तीचा मोहर येतो आणि आपण आराध्य दैवतापुढे लीन होतो...